< イザヤ書 41 >
1 海沿いの国々よ、静かにして、わたしに聞け。もろもろの民よ、力を新たにし、近づいて語れ。われわれは共にさばきの座に近づこう。
१अहो द्वीपांनो, तुम्ही माझ्यापुढे शांत राहा; राष्ट्रे त्यांची शक्ती संपादन करोत; ते जवळ येवोत आणि बोलोत; चर्चा आणि वादविवाद करण्यास आपण एकमेकांजवळ येऊ.
2 だれが東から人を起したか。彼はその行く所で勝利をもって迎えられ、もろもろの国を征服し、もろもろの王を足の下に踏みつけ、そのつるぎをもって彼らをちりのようにし、その弓をもって吹き去られる、わらのようにする。
२पूर्वेकडून येणाऱ्याला कोणी उठविले? त्यास त्याच्या क्रमाने चांगल्यासेवेसाठी कोणी बोलावले आहे? त्याने राष्ट्रे त्याच्यापुढे दिली आणि तो राजावर अधिकार चालवीन असे केले; त्याने त्यांना धुळीसारखे त्याच्या तलवारीच्या आणि उडवलेल्या धसकटासारखे त्याच्या धनुष्याला दिले.
3 彼はこれらの者を追ってその足のまだ踏んだことのない道を、安らかに過ぎて行く。
३तो त्यांचा पाठलाग करतो आणि ज्या जलद वाटेवर मोठ्या कष्टाने त्यांच्या पावलाचा स्पर्श होतो, ते सुरक्षित पार जातात.
4 だれがこの事を行ったか、なしたか。だれが初めから世々の人々を呼び出したか。主なるわたしは初めであって、また終りと共にあり、わたしがそれだ。
४ही कृत्ये कोणी शेवटास आणि सिद्धीस नेली? सुरवातीपासून पिढ्यांना कोणी बोलाविले? मी, परमेश्वर, जो पहिला आणि जो शेवटल्यासह आहे तोच मी आहे.
5 海沿いの国々は見て恐れ、地の果は、おののき、近づいて来た。
५द्वीपे पाहतात आणि भितात; पृथ्वीच्या सीमा भीतीने थरथर कापतात; त्या जवळ येतात.
6 彼らはおのおのその隣を助け、その兄弟たちに言う、「勇気を出せよ」と。
६प्रत्येकजण त्याच्या शेजाऱ्याला मदत करतो आणि प्रत्येकजण एक दुसऱ्याला म्हणतो, धीर धर.
7 細工人は鍛冶を励まし、鎚をもって平らかにする者は金敷きを打つ者に、はんだづけについて言う、「それは良い」と。また、くぎをもってそれを堅くし、動くことのないようにする。
७तेव्हा सुतार सोनाराला धीर देतो, आणि तो जो हातोड्याने काम करतो जो ऐरणीसह काम करतो, त्यास धीर देऊन सांधण्याविषयी, ते चांगले आहे. असे म्हणतो मग ते सरकू नये म्हणून तो ते खिळ्यांनी घट्ट बसवतो.”
8 しかし、わがしもべイスラエルよ、わたしの選んだヤコブ、わが友アブラハムの子孫よ、
८परंतु तू, इस्राएला, माझ्या सेवका, याकोबा, माझ्या निवडलेल्या, अब्राहाम याच्या संताना,
9 わたしは地の果から、あなたを連れてき、地のすみずみから、あなたを召して、あなたに言った、「あなたは、わたしのしもべ、わたしは、あなたを選んで捨てなかった」と。
९मी तुला पृथ्वीच्या सीमांपासून परत आणले आणि मी तुला खूप लांबपासूनच्या दूर ठिकाणाहून बोलावले, आणि मी तुला म्हटले, तू माझा सेवक आहेस; मी तुला निवडले आहे आणि तुला नाकारले नाही.
10 恐れてはならない、わたしはあなたと共にいる。驚いてはならない、わたしはあなたの神である。わたしはあなたを強くし、あなたを助け、わが勝利の右の手をもって、あなたをささえる。
१०भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे. चिंतातुर होऊ नकोस, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देईन, आणि मी तुला मदत करीन, मी आपल्या विजयाच्या उचित उजव्या हाताने तुला आधार देईन.
11 見よ、あなたにむかって怒る者はみな、はじて、あわてふためき、あなたと争う者は滅びて無に帰する。
११पाहा, जे सर्व तुझ्यावर रागावले आहेत ते लज्जित व फज्जित होतील; जे तुला विरोध करतात ते काहीच नसल्यासारखे होतील आणि नष्ट होतील.
12 あなたは、あなたと争う者を尋ねても見いださず、あなたと戦う者は全く消えうせる。
१२जे तुझ्याबरोबर भांडण करतात त्यांचा शोध तू करशील आणि तरी ते तुला सापडणार नाहीत. जे तुझ्याविरूद्ध लढाई करतात ते शून्यवत, काहीच नसल्यासारखे होतील.
13 あなたの神、主なるわたしはあなたの右の手をとってあなたに言う、「恐れてはならない、わたしはあなたを助ける」。
१३कारण मी, परमेश्वर तुझा देव, तुझा उजवा हात धरतो, मी तुला सांगतो: घाबरू नकोस; मी तुला मदत करीन.
14 主は言われる、「虫にひとしいヤコブよ、イスラエルの人々よ、恐れてはならない。わたしはあなたを助ける。あなたをあがなう者はイスラエルの聖者である。
१४हे किटका, याकोबा आणि इस्राएलाच्या मनुष्या; घाबरू नको. मी तुम्हास मदत करीन ही परमेश्वराची घोषणा आहे, इस्राएलाचा पवित्र प्रभू, तुमचा उद्धारक आहे.
15 見よ、わたしはあなたを鋭い歯のある新しい打穀機とする。あなたは山を打って、これを粉々にし、丘をもみがらのようにする。
१५पाहा, मी तुला नवीन व दुधारी, मळणीच्या घणाप्रमाणे करीत आहे; तू डोंगर मळून त्यांचा चुराडा करशील; तू टेकडयांना भुसांप्रमाणे करशील.
16 あなたがあおげば風はこれを巻き去り、つむじ風がこれを吹き散らす。あなたは主によって喜びイスラエルの聖者によって誇る。
१६तू त्यांना उफणशील आणि वारा त्यांना वाहून दूर नेईल; वावटळ त्यांना विखरील. आणि तू परमेश्वराच्या ठायी हर्ष करशील, इस्राएलाच्या पवित्र प्रभूच्या ठायी तू उत्साह करशील.
17 貧しい者と乏しい者とは水を求めても、水がなく、その舌がかわいて焼けているとき、主なるわたしは彼らに答える、イスラエルの神なるわたしは彼らを捨てることがない。
१७खिन्न झालेले आणि गरजवंत पाण्याचा शोध घेतात, पण तेथे काहीच नाही आणि त्यांची जीभ तहानेने कोरडी पडली आहे; मी परमेश्वर त्यांच्या प्रार्थनेला उत्तर देईल; मी, इस्राएलाचा देव, त्यांना सोडणार नाही.
18 わたしは裸の山に川を開き、谷の中に泉をいだし、荒野を池となし、かわいた地を水の源とする。
१८मी उतरणीवरून खाली प्रवाह आणि दऱ्यांमधून झऱ्याचे पाणी वाहायला लावीन; मी वाळवंटात पाण्याचे तळे आणि शुष्क भूमीवर पाण्याचे झरे वाहतील.
19 わたしは荒野に香柏、アカシヤ、ミルトスおよびオリブの木を植え、さばくに、いとすぎ、すずかけ、からまつをともに置く。
१९मी रानात गंधसरू, बाभूळ, व मेंदीचे, जैतून वृक्ष वाढतील. मी वाळवंटात देवदारू, भद्रदारू आणि सरू एकत्र वाढण्यास कारण करील.
20 人々はこれを見て、主のみ手がこれをなし、イスラエルの聖者がこれを創造されたことを知り、かつ、よく考えて共に悟る」。
२०मी हे यासाठी करीन की, लोकांनी पाहावे, ओळखावे आणि एकत्रित समजावे, परमेश्वराच्या हाताने हे केले आहे, इस्राएलाचा पवित्र प्रभू ज्याने हे उत्पन्न केले आहे.
21 主は言われる、「あなたがたの訴えを出せ」と。ヤコブの王は言われる、「あなたがたの証拠を持ってこい。
२१परमेश्वर म्हणतो, आपला वाद पुढे आणा; याकोबाचा राजा म्हणतो, आपल्या मूर्तींसाठी आपले उत्तम वादविवाद पुढे आणा.
22 それを持ってきて、起るべき事をわれわれに告げよ。さきの事どもの何であるかを告げよ。われわれはよく考えて、その結末を知ろう。あるいはきたるべき事をわれわれに聞かせよ。
२२त्यांनी आपले वादविवाद आमच्याकडे आणावे; त्यांनी पुढे यावे आणि काय घडणार आहे ते सांगावे, पूर्वीच्या होणाऱ्या गोष्टी आम्हास सांगा, म्हणजे आम्ही त्यावर काळजीपूर्वक विचार करू आणि त्याची परिपूर्तता कशी होईल ते जाणू. म्हणजे ह्यागोष्टी आम्हास चांगल्या कळतील.
23 この後きたるべき事をわれわれに告げよ。われわれはあなたがたが神であることを知るであろう。幸をくだし、あるいは災をくだせ。われわれは驚いて肝をつぶすであろう。
२३भविष्यात होणाऱ्या गोष्टीविषयी सांगा, म्हणजे जर तुम्ही देव असाल तर आम्हास समजेल; काही तरी चांगले किंवा वाईट करा, म्हणजे आम्ही विस्मीत आणि प्रभावीत होऊ.
24 見よ、あなたがたは無きものである。あなたがたのわざはむなしい。あなたがたを選ぶ者は憎むべき者である」。
२४पाहा, तुमच्या मूर्ती आणि तुमचे कृत्ये काहीच नाहीत; जो कोणी तुम्हास निवडतो तो तिरस्करणीय आहे.
25 わたしはひとりを起して北からこさせ、わが名を呼ぶ者を東からこさせる。彼はもろもろのつかさを踏みつけてしっくいのようにし、陶器師が粘土を踏むようにする。
२५“मी उत्तरेपासून एकाला उठविले आहे आणि तो आला आहे; तो सूर्याच्या उगवतीपासून जो माझ्या नावाने हाक मारतो त्यास मी बोलावून घेतो, आणि तो चिखलाप्रमाणे सत्ताधाऱ्यास तुडविल, जसा कुंभार चिखल पायाखाली तुडवतो तसा त्यांना तुडविल.”
26 だれか、初めからこの事をわれわれに告げ知らせたか。だれか、あらかじめわれわれに告げて、「彼は正しい」と言わせたか。ひとりもこの事を告げた者はない。ひとりも聞かせた者はない。ひとりもあなたがたの言葉を聞いた者はない。
२६आम्हास कळावे, म्हणून पहिल्यापासून कोणी जाहीर केले? आणि त्यावेळेपूर्वी आम्ही असे म्हणावे, तो योग्य आहे? खरोखर त्यांनी काहीच सांगितले नाही, होय! तू सांगितलेले कोणीच ऐकले नाही.
27 わたしははじめてこれをシオンに告げた。わたしは、よきおとずれを伝える者をエルサレムに与える。
२७मी सियोनेला प्रथम म्हणालो, पाहा, ते येथे आहेत; मी यरूशलेमेकडे अग्रदूत पाठविला आहे.
28 しかし、わたしが見ると、ひとりもない。彼らのなかには、わたしが尋ねても答えうる助言者はひとりもない。
२८जेव्हा मी पाहिले, तेथे कोणी नाही, मी त्यांना विचारले असता, एका शब्दाने तरी उत्तर देऊ शकेल असा त्यांच्यामध्ये कोणीही नाही, एक चांगला सल्ला देऊ शकेल असा कोणी नाही.
29 見よ、彼らはみな人を惑わす者であって、そのわざは無きもの、その鋳た像はむなしき風である。
२९पाहा, त्यातले सर्व काहीच नाहीत, आणि त्यांची कृत्ये काहीच नाहीत; त्यांच्या धातूच्या ओतीव प्रतिमा वारा आणि शून्यवतच आहेत.