< イザヤ書 28 >
1 エフライムの酔いどれの誇る冠と、酒におぼれた者の肥えた谷のかしらにあるしぼみゆく花の美しい飾りは、わざわいだ。
१एफ्राइममधील मद्यप्यांनो तुमच्या गर्वाच्या मुकुटाला हायहाय! आणि धुंद झालेल्या सुपिक खोऱ्याच्या माथ्यावरील मोठी शोभा देणारे जे कोमेजणारे फुल त्यास हायहाय!
2 見よ、主はひとりの力ある強い者を持っておられる。これはひょうをまじえた暴風のように、破り、そこなう暴風雨のように、大水のあふれみなぎる暴風のように、それを激しく地に投げうつ。
२पाहा! परमेश्वराकडे पराक्रमी आणि बलवान असा एक आहे. तो गारपिटीप्रमाणे आहे. नष्ट करणाऱ्या वादळाप्रमाणे, आणि प्रचंड ढगफूटी प्रमाणे, तो पृथ्वीला आपल्या हाताने ताडना करेल.
3 エフライムの酔いどれの誇る冠は足で踏みにじられる。
३एफ्राइममधील मद्याप्यांचा अभिमानी मुकुट पायाखाली तुडवला जाईल.
4 肥えた谷のかしらにあるしぼみゆく花の美しい飾りは、夏前に熟した初なりのいちじくのようだ。人がこれを見ると、取るやいなや、食べてしまう。
४त्याच्या वैभवशाली सौंदर्याचे कोमेजणारे फूल, जे खोऱ्याच्या माथ्यावर आहे, उन्हाळ्यात झाडावर प्रथम आलेल्या अंजिरांप्रमाणे त्याची स्थिती होईल, त्याकडे पाहणारा पाहतो तेव्हा तो त्याच्या हातांत असतानांच तो खाऊन टाकतो.
5 その日、万軍の主はその民の残った者のために、栄えの冠となり、麗しい冠となられる。
५त्या दिवशी सेनाधीश परमेश्वर आपल्या लोकांच्या उरलेल्यांना सुंदर मुकुट असा होईल.
6 また、さばきの席に座する者にはさばきの霊となり、戦いを門まで追い返す者には力となられる。
६आणि जो न्याय करत बसतो त्यास तो न्यायाचा आत्मा आणि जे वेशीजवळ लढाई मागे हटवतात त्यांना तो पराक्रम असा होईल.
7 しかし、これらもまた酒のゆえによろめき、濃き酒のゆえによろける。祭司と預言者とは濃き酒のゆえによろめき、酒のゆえに心みだれ、濃き酒のゆえによろける。彼らは幻を見るときに誤り、さばきを行うときにつまづく。
७पण हे सुद्धा द्राक्षरसाने हेलकावे खात आहेत, आणि मादक मद्यानी अडखळत आहेत. याजक व संदेष्टे सर्वच जण द्राक्षरस व मद्य पिऊन धुंद झाले आहेत आणि मद्याने त्यांना गिळून घेतले आहे. ते मद्याने अडखळून पडत आहेत आणि ते दृष्टांतात भ्रमतात, ते न्याय करण्यात अडखळतात.
८खरोखर सर्व मेजे ओकारीने भरलेली आहेत, कोठेही स्वच्छ जागा राहिलेली नाही.
9 「彼はだれに知識を教えようとするのか。だれにおとずれを説きあかそうとするのか。乳をやめ、乳ぶさを離れた者にするのだろうか。
९तो कोणाला ज्ञान शिकवील? आणि तो कोणाला निरोप समजावेल? दुग्धापासून दूर केलेल्यांना किंवा स्तनपानापासून दूर केलेल्यांना काय?
10 それは教訓に教訓、教訓に教訓、規則に規則、規則に規則。ここにも少し、そこにも少し教えるのだ」。
१०कारण नियमा वर नियम, नियमावर नियम, ओळीवर ओळ, ओळीवर ओळ, इथे थोडे, तिथे थोडे, असे आहे.
11 否、むしろ主は異国のくちびると、異国の舌とをもってこの民に語られる。
११खरच, तोतऱ्या ओठांनी आणि अन्य भाषेने तो या लोकांशी बोलेल.
12 主はさきに彼らに言われた、「これが安息だ、疲れた者に安息を与えよ。これが休息だ」と。しかし彼らは聞こうとはしなかった。
१२पूर्वी तो त्यांना म्हणाला, “येथे विश्रांती आहे, थकलेल्यांना येथे येऊन विश्रांती घेऊ द्या, आणि हे उत्साहवर्धक आहे.” पण ते काही ऐकेनात.
13 それゆえ、主の言葉は彼らに、教訓に教訓、教訓に教訓、規則に規則、規則に規則、ここにも少し、そこにも少しとなる。これは彼らが行って、うしろに倒れ、破られ、わなにかけられ、捕えられるためである。
१३लोकांस परमेश्वराचे बोलणे परक्या भाषेसारखे अनाकलनीय वाटले. हुकूमावर हुकूम, हुकूमावर हुकूम, नियमावर नियम, नियमावर नियम, थोडे इकडे, थोडे तिकडे, एक धडा तिकडे. लोकांनी स्वत: ला पाहिजे ते केले. म्हणून ते मागे पडून पराभूत झाले, ते सापळ्यात अडकले आणि पकडले गेले.
14 それゆえ、エルサレムにあるこの民を治めるあざける人々よ、主の言葉を聞け。
१४याकरिता, जे तुम्ही थट्टा करता, आणि जे तुम्ही यरूशलेमेवर राज्य करता, ते तुम्ही परमेश्वराचे वचन काय म्हणते ते ऐका.
15 あなたがたは言った、「われわれは死と契約をなし、陰府と協定を結んだ。みなぎりあふれる災の過ぎる時にも、それはわれわれに来ない。われわれはうそを避け所となし、偽りをもって身をかくしたからである」。 (Sheol )
१५तुम्ही म्हटले, “आम्ही मृत्यूबरोबर करारनामा केला आहे. अधोलोकाशी आम्ही करार केला आहे म्हणून आम्हांला शिक्षा होणार नाही, जेव्हा बुडवणारी शिक्षा पार केली जाईल तेव्हा ती आमच्यापर्यंत येऊ शकणार नाही; कारण आम्ही कपटाच्या मागे लपलो आहोत व असत्याला आपले आश्रय केले आहे.” (Sheol )
16 それゆえ、主なる神はこう言われる、「見よ、わたしはシオンに一つの石をすえて基とした。これは試みを経た石、堅くすえた尊い隅の石である。『信ずる者はあわてることはない』。
१६यासाठी परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “पाहा, मी सियोनेत आधारशिला, पारखलेला धोंडा, कोपऱ्याचा मोलवान धोंडा, स्थीर पाया म्हणून घालतो. जो कोणी त्यावर विश्वास ठेवेल, तो लाजवला जाणार नाही.
17 わたしは公平を、測りなわとし、正義を、下げ振りとする。ひょうは偽りの避け所を滅ぼし、水は隠れ場を押し倒す」。
१७मी न्याय मोजमापाची काठी, आणि नितीमत्ता हा ओळंबा असे करीन, तेव्हा गारपीट खोट्यांचे आश्रय झाडून टाकील, आणि पूराचे पाणी लपण्याच्या जागा झाकून टाकील.”
18 その時あなたがたが死とたてた契約は取り消され、陰府と結んだ協定は行われない。みなぎりあふれる災の過ぎるとき、あなたがたはこれによって打ち倒される。 (Sheol )
१८तुमचा मृत्यूशी असलेला करारनामा विरवला जाईल आणि अधोलोकाशी तुमचा झालेला करार रद्द केला जाईल. जेव्हा प्रकोपाचा पूर पार केला जाईल, त्या द्वारे तुम्ही झाकले जाल. (Sheol )
19 それが過ぎるごとに、あなたがたを捕える。それは朝な朝な過ぎ、昼も夜も過ぎるからだ。このおとずれを聞きわきまえることは、全くの恐れである。
१९जेव्हा तो पार जाईल तेव्हा तो तुला झाकून टाकेल. आणि रोज रोज सकाळी, दिवसा आणि रात्री तो पार जाईल. आणि जेव्हा संदेश कळेल, तर ते भयच असे होईल.
20 床が短くて身を伸べることができず、かける夜具が狭くて身をおおうことができないからだ。
२०कारण अंथरूण पाय पसरावयास खूप लहान आहे, आणि पांघरुण पांघरायला पुरत नाही एवढे ते अरुंद आहे.
21 主はペラジム山で立たれたように立ちあがり、ギベオンの谷で憤られたように憤られて、その行いをなされる。その行いは類のないものである。またそのわざをなされる。そのわざは異なったものである。
२१जसा परासीम डोंगरामध्ये परमेश्वर उभा राहिला होता, जसा तो गिबोन दरीत रागावला होता त्याप्रमाणे तो रागावेल. अशासाठी की त्याने आपले कार्य, त्याचे अद्भूत कृत्य आणि त्याचे विस्मयकारी कृत्य करावे.
22 それゆえ、あなたがたはあざけってはならない。さもないと、あなたがたのなわめは、きびしくなる。わたしは主なる万軍の神から全地の上に臨む滅びの宣言を聞いたからである。
२२तर आता तुम्ही थट्टा करू नका, नाहीतर तुमची बंधणे घट्ट करण्यात येतील. कारण पृथ्वीवर नाश होण्याचा ठराव, मी सेनाधीश परमेश्वरापासून ऐकला आहे.
23 あなたがたは耳を傾けて、わが声を聞くがよい。心してわが言葉を聞くがよい。
२३मी सांगत असलेला संदेश लक्षपूर्वक ऐका, सावध असा, माझे शब्द ऐका.
24 種をまくために耕す者は絶えず耕すだろうか。彼は絶えずその地をひらき、まぐわをもって土をならすだろうか。
२४पेरणी करण्यासाठी शेतकरी सतत शेत नांगरतो का? तो सतत मशागत करतो का?
25 地のおもてを平らにしたならば、いのんどをまき、クミンをまき、小麦をうねに植え、大麦を定めた所に植え、スペルト麦をその境に植えないだろうか。
२५त्याने जमीन तयार केल्यावरच तो काळे जिरे टाकतो व जिरे विखरतो, तो गहू रांगेत आणि जव नेमलेल्या ठिकाणी आणि त्याच्या काठाला काठ्या गहू पेरीत नाही काय?
26 これは彼の神が正しく、彼を導き教えられるからである。
२६कारण त्याचा देव त्यास सूचना देतो, तो त्यास सुज्ञपणे शिकवतो.
27 いのんどは麦こき板でこかない、クミンはその上に車輪をころがさない。いのんどを打つには棒を用い、クミンを打つにはさおを用いる。
२७शिवाय, काळे जिरे घणाने मळत नाही, किंवा तिच्यावर गाडीचे चाक फिरवले जात नाही, पण काळे जिरे काठीने आणि जिरे दंडाने झोडतात.
28 人はパン用の麦を打つとき砕くだろうか、否、それが砕けるまでいつまでも打つことをしない。馬をもってその上に車輪を引かせるとき、それを砕くことをしない。
२८भाकरीसाठी धान्य दळतात, पण ते नीट दळले जात नाही. आणि जरी त्याच्या गाडीचे चाक व त्याचे घोडे ते विखरतात तरी तो ते दळीत नाही.
29 これもまた万軍の主から出ることである。その計りごとは驚くべく、その知恵はすぐれている。
२९सेनाधीश परमेश्वर, जो संकल्पात सुंदर आहे आणि ज्ञानाने श्रेष्ठ आहे. त्याच्याकडून हे आहे.