< イザヤ書 15 >
1 モアブについての託宣。アルは一夜のうちに荒されて、モアブは滅びうせ、キルは一夜のうちに荒されて、モアブは滅びうせた。
१मवाबाबद्दलची घोषणा. खरोखर, एका रात्रीत मवाबाचे आर वैराण आणि नाश करण्यात आले; खरोखर एका रात्रीत मवाबाचे कीर वैराण आणि नाश करण्यात आले.
2 デボンの娘は高き所にのぼって泣き、モアブはネボとメデバの上で嘆き叫ぶ。おのおのその頭をかぶろにし、そのひげをことごとくそった。
२दीबोनाचे लोक मंदिरापर्यंत, उच्चस्थानावर रडण्यास चढून गेले; नबो व मेदबा यांच्यासाठी मवाब विलाप करत आहे. त्यांच्या सर्वांची डोकी मुंडिलेली आहेत व त्यांच्या सर्वांच्या दाढ्या कापलेल्या आहेत.
3 彼らはそのちまたで荒布をまとい、その屋根または広場で、みな泣き叫び、涙に浸る。
३ते आपल्या रस्त्यात गोणताट पांघरून आहेत; आपल्या घराच्या धाब्यावर आणि आपल्या चौकात प्रत्येकजण आक्रोश करीत आहेत, अश्रू गाळीत आहेत
4 ヘシボンとエレアレとは叫び、その声はヤハズまで聞える。それゆえ、モアブの兵士は声をあげ、その魂はおののく。
४हेशबोन व एलाले आरोळी मारत आहेत; त्यांचा आवाज याहसापर्यंत ऐकू जात आहे. यामुळे मवाबाचे शस्त्रधारी माणसे आरोळ्या देत आहेत; त्यांचा जीव त्यांच्यात थरथरत आहे.
5 わが心はモアブのために叫び呼ばわる。その落人はゾアルおよびエグラテ・シリシヤにのがれ、泣きながらルヒテの坂をのぼり、ホロナイムの道で滅びの叫びをあげる。
५मवाबाकरता माझे हृदय ओरडते; तिचे शरणार्थी सोअर आणि एगलाथ-शलिशीया येथवर पळून गेले आहेत. लूहीथच्या चढणीवर ते रडत रडत चढत आहेत; होरोनाईमाच्या वाटेवर त्यांच्या नाशासाठी मोठ्याने आक्रोश करीत आहेत.
6 ニムリムの水はかわき、草は枯れ、苗は消えて、青い物はない。
६पण निम्रीमाचे पाणी आटले आहे; गवत सुकून गेले आहे आणि नवीन गवत नाहीसे झाले आहे; काहीच हिरवे नाही.
7 それゆえ、彼らはその得た富と、そのたくわえた物とを携えて、柳の川をわたる。
७यास्तव त्यांनी वाढवलेली विपुलता आणि साठवलेले आहे ते, वाळुंजाच्या ओढ्यापलीकडे घेऊन जात आहेत.
8 その叫びの声はモアブの境をめぐり、その嘆きの声はエグライムにいたり、またその嘆きの声はベエル・エリムにいたる。
८मवाबाच्या प्रदेशामध्ये सगळीकडे रडणे चालले आहे; त्यांचा आकांत एग्लाइमापर्यंत आणि बैर-एलीमापर्यंत त्यांचा आक्रोश पोहचला आहे.
9 デボンの水は血で満ちる。わたしはデボンの上にさらに災を加え、モアブののがれた者とこの地の残った者とに、ししを送る。
९दीमोनाचे पाणी रक्ताने भरले आहेत; पण मी दीमोनावर अधिक जास्त संकटे आणीन. जे मवाबापासून निसटले आहेत आणि जे देशात बाकी आहेत त्यांच्यावर सिंह हल्ला करतील.