< 創世記 13 >
1 アブラムは妻とすべての持ち物を携え、エジプトを出て、ネゲブに上った。ロトも彼と共に上った。
१अशा रीतीने अब्रामाने मिसर देश सोडला आणि तो, त्याची पत्नी साराय, आणि त्याचे जे सर्वकाही होते ते घेऊन नेगेबात गेला. लोटही त्याच्याबरोबर गेला.
२आता अब्राम जनावरे, तसेच सोने आणि चांदी यांनी फार श्रीमंत झाला होता.
3 彼はネゲブから旅路を進めてベテルに向かい、ベテルとアイの間の、さきに天幕を張った所に行った。
३तो आपला प्रवास करीत नेगेबापासून बेथेल नगरामध्ये गेला, बेथेल व आय यांच्यामध्ये ज्या ठिकाणी त्याचा तंबू पूर्वी होता तेथपर्यंत गेला.
4 すなわち彼が初めに築いた祭壇の所に行き、その所でアブラムは主の名を呼んだ。
४जेथे त्याने पहिल्याने वेदी बांधली होती तेथेच ही जागा आहे आणि तेथे त्याने परमेश्वराच्या नावाचा धावा केला.
5 アブラムと共に行ったロトも羊、牛および天幕を持っていた。
५आता लोट जो अब्रामाबरोबर प्रवास करीत होता. याच्याकडेसुद्धा कळप, गुरेढोरे व लोक होते.
6 その地は彼らをささえて共に住ませることができなかった。彼らの財産が多かったため、共に住めなかったのである。
६तो देश त्या दोघांना एकत्र जवळ राहण्यास पुरेना, कारण त्यांची मालमत्ता फारच मोठी होती, ती इतकी की त्यांना एकत्र राहता येईना.
7 アブラムの家畜の牧者たちとロトの家畜の牧者たちの間に争いがあった。そのころカナンびととペリジびとがその地に住んでいた。
७तेथे अब्रामाचे गुराखी व लोटाचे गुराखी यांच्यामध्ये भांडणेसुद्धा होऊ लागली; त्या काळी त्या देशात कनानी व परिज्जी लोक राहत होते.
8 アブラムはロトに言った、「わたしたちは身内の者です。わたしとあなたの間にも、わたしの牧者たちとあなたの牧者たちの間にも争いがないようにしましょう。
८तेव्हा अब्राम लोटाला म्हणाला, “तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये, तसेच तुझे गुराखी व माझे गुराखी यांच्यामध्ये भांडण नसावे. शेवटी आपण एक कुटुंब आहोत.
9 全地はあなたの前にあるではありませんか。どうかわたしと別れてください。あなたが左に行けばわたしは右に行きます。あなたが右に行けばわたしは左に行きましょう」。
९तुझ्यापुढे सर्व देश नाही काय? पुढे जा आणि माझ्यापासून तू वेगळा हो. तू जर डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, आणि तू जर उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन.”
10 ロトが目を上げてヨルダンの低地をあまねく見わたすと、主がソドムとゴモラを滅ぼされる前であったから、ゾアルまで主の園のように、またエジプトの地のように、すみずみまでよく潤っていた。
१०लोटाने सभोवार पाहिले, आणि यार्देन खोऱ्याकडे नजर टाकली तेव्हा तेथे सर्वत्र भरपूर पाणी असल्याचे त्यास दिसले. परमेश्वराने सदोम व गमोरा या शहरांचा नाश करण्यापूर्वी सोअराकडे जाते त्या वाटेने लागणारे खोरे परमेश्वराच्या बागेसारखे, मिसर देशासारखे होते.
11 そこでロトはヨルダンの低地をことごとく選びとって東に移った。こうして彼らは互に別れた。
११तेव्हा लोटाने यार्देनेचे सर्व खोरे निवडले. मग ते दोघे वेगळे झाले आणि लोटाने पूर्वेकडे प्रवास करण्यास सुरुवात केली, आणि ते एकमेकांपासून वेगळे झाले.
12 アブラムはカナンの地に住んだが、ロトは低地の町々に住み、天幕をソドムに移した。
१२अब्राम कनान देशातच राहिला आणि लोट यार्देनेच्या मैदानातल्या शहरामध्ये जाऊन राहिला; लोट दूर सदोमाला गेला आणि तेथेच त्याने आपला तंबू ठोकला.
13 ソドムの人々はわるく、主に対して、はなはだしい罪びとであった。
१३सदोम नगराचे लोक अतिशय दुष्ट असून परमेश्वराच्या विरूद्ध पाप करणारे होते.
14 ロトがアブラムに別れた後に、主はアブラムに言われた、「目をあげてあなたのいる所から北、南、東、西を見わたしなさい。
१४लोट अब्राहापासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तू जेथे उभा आहेस त्या ठिकाणापासून उत्तरेकडे व दक्षिणेकडे, पूर्वेकडे व पश्चिमेकडे पाहा.
15 すべてあなたが見わたす地は、永久にあなたとあなたの子孫に与えます。
१५तू पाहतोस हा सगळा प्रदेश मी तुला आणि तुझ्यानंतर तुझ्या संततीला कायमचा देईन.
16 わたしはあなたの子孫を地のちりのように多くします。もし人が地のちりを数えることができるなら、あなたの子孫も数えられることができましょう。
१६मी तुझी संतती या पृथ्वीवरील धुळीच्या कणांइतकी करीन, ते असे की, जर कोणाला ते धुळीचे कण मोजता येतील तर तुझे संतानही मोजता येईल.
17 あなたは立って、その地をたてよこに行き巡りなさい。わたしはそれをあなたに与えます」。
१७ऊठ, देशातून येथून तेथून चालत जा आणि त्याची लांबी व त्याची रुंदी पाहा, कारण तो मी तुला देणार आहे.”
18 アブラムは天幕を移してヘブロンにあるマムレのテレビンの木のかたわらに住み、その所で主に祭壇を築いた。
१८तेव्हा अब्रामाने आपला तंबू हलविला व तो हेब्रोन शहराजवळील मम्रेच्या एलोन झाडाशेजारी रहावयास गेला. परमेश्वरासाठी त्याने तेथे वेदी बांधिली.