< エゼキエル書 19 >
1 あなたはイスラエルの君たちのために悲しみの歌をのべて
१मग तू इस्राएलाच्या पुढाऱ्यांच्या आक्रोशा विरुध्द विलाप कर.
2 言え、あなたの母はししのうちにあって、どんな雌じしであったろう。彼女は若いししのうちに伏して子じしを養った。
२आणि म्हण तुझी आई कोण? सिंहीण, आपल्या छाव्यासोबत राहते तरुण सिंहाच्यामध्ये ती आपल्या छाव्याचे पालनपोषण करते.
3 彼女は子じしの一つを育てたが、それは若いししとなって、獲物をとることを学び、人を食べた。
३आणि ती आपल्या छाव्याचे पोषण करून त्यास तरुण सिंह बनवते जो आपल्या शिकारीला फाडून टाकतो. तो मनुष्यास खाऊन टाकते.
4 国々の人は彼に対して叫び声をあげ、落し穴でこれを捕え、かぎでこれをエジプトの地に引いて行った。
४मग राष्ट्रांना त्याची वार्ता ऐकू येते, तो त्याच्याच पाशात अडकला जातो, आणि त्यास आकडीने धरुन मिसरात घेऊन गेले.
5 雌じしは自分の思いが破れ、その望みを失ったのを見たので、ほかの子じしをとって、これを若い子じしとした。
५मग जरी तिने हे पाहिले तरी त्याची परतण्याची ती वाट बघते, तिची आशा आता निघून गेली, मग तिने आपल्या दुसऱ्या छाव्याला घेतले आणि त्याची वाढ तरुण सिंह होण्यास केली.
6 彼はししのうちに行き来し、若いししとなって、獲物をとることを学び、人を食べた。
६हा तरुण सिंह इतर सिंहाच्यामध्ये हिंडू फिरु लागतो, तो तरुण सिंह असता त्याने आपल्या शिकारीला फाडून टाकणे शिकला, त्याने मनुष्यांना खाऊन टाकले.
7 彼はその要害を荒し、その町々を滅ぼした。そのほえる声によって、その地とその中に満ちるものとは皆恐れた。
७मग त्याने विधवांवर बलात्कार केले आणि शहराला देशोधडीला लावले, त्याची भूमी पूर्णपणे बेबंदशाहीने भरली कारण त्याच्या गर्जनेचा आवाज दुमदुत होता.
8 そこで国々の人は彼に対して四方にわなを設け、彼に網を打ちかけ、落し穴で彼を捕えた。
८सर्व प्रांतातून एकवटून सर्व देशाचे लोक त्याच्या विरोधात जमले; त्यांनी त्याच्या भोवती जाळे टाकले. त्यास पाशात पकडले.
9 彼らはかぎをもって、これをかごに入れ、これをバビロンの王のもとに連れて行き、これをおりの中に入れて、再びその声をイスラエルの山々に聞えさせないようにした。
९त्यास पिंजऱ्यात कोंडून ताळेबंद केले आणि बाबेलाच्या राज्यापुढे आणले, त्यांना त्यास तटबंदी असलेल्या डोंगरावर नेले यास्तव त्याचा स्वर इस्राएलाच्या घराण्याला आता ऐकू जाणार नाही.
10 あなたの母は水のほとりに移し植えられたぶどう畑のぶどうの木のようで、水が多いために実りがよく、枝がはびこった。
१०तुझी आई पाण्याजवळ लावलेली द्राक्षाच्या झाडासारखी होती ती फलद्रुप व फांद्यांनी बहरलेली अशी होती कारण तेथे भरपूर पाणी होते.
11 その強い幹は君たる者のつえとなった。それは茂みの中に高くそびえ、多くの枝をつけて高く見えた。
११तिच्याकडे न्यायाचा बळकट राजदंड आहे आणि तिची उंची दाट रानाच्या फांद्यांच्या वर गेलेली होती.
12 しかしこのぶどうの木は憤りによって抜かれ、地に投げうたれ、東風がそれを枯らし、その実はもぎ取られ、その強い幹は枯れて、火に焼き滅ぼされた。
१२पण द्राक्षाच्या झाडाला मुळासकट त्वेषाने उपटून टाकले आणि भूमीवर फेकून दिले, पूर्वेकडील वाऱ्याने तिच्या फळांना सुकून टाकले.
13 今これは荒野に、かわいた、水のない地に移し植えられ、
१३मग तिला ओसाड प्रदेशात लावले जेथे पाऊस नाही आणि तहान आहे.
14 火がその幹から出て、その枝と実とを滅ぼしたので、強い幹で、君たる者のつえとなるべきものはそこにない。これが悲しみの言葉、また悲しみの歌となった。
१४तिच्या दाट फांद्यांना अग्नीने होरपळले आणि फळे खाऊन टाकीली, तेथे आता बळकट फांदी उरली नाही, न्यायाचा राजदंड नाही, तेथे आक्रोश आणि रडगाणे आहे.