< 歴代誌Ⅰ 13 >
1 ここにダビデは千人の長、百人の長などの諸将と相はかり、
१दावीदाने हजारांचे आणि शंभरांचे सेनापती यापैकी प्रत्येक पुढारी यांचा सल्ला घेतला.
2 そしてダビデはイスラエルの全会衆に言った、「もし、このことをあなたがたがよしとし、われわれの神、主がこれを許されるならば、われわれは、イスラエルの各地に残っているわれわれの兄弟ならびに、放牧地の付いている町々にいる祭司とレビびとに、使をつかわし、われわれの所に呼び集めましょう。
२मग दावीदाने इस्राएलमधील सर्व मंडळीस म्हटले. “तुम्हास जर हे योग्य वाटत असेल आणि आपला देव परमेश्वर याच्याकडून हे असेल तर आपले भाऊ, इस्राएलाच्या सर्व प्रदेशात राहिलेले आहेत त्यास आपापल्या नगरांत व खेड्यांत त्यांच्याबरोबर जे याजक आणि लेवी आहेत त्यांना आपणाकडे एकत्र जमण्यास त्यांच्याकडे दूत पाठवू.
3 また神の箱をわれわれの所に移しましょう。われわれはサウルの世にはこれをおろそかにしたからです」。
३आपल्या देवाचा कोश आपणाकडे पुन्हा आणू. शौल राज्य करत असताना आपण त्याचा शोध केला नाही.”
4 会衆は一同「そうしましょう」と言った。このことがすべての民の目に正しかったからである。
४तेव्हा सर्व मंडळीने या गोष्टी करण्याची सहमती दिली कारण ती गोष्ट सर्व लोकांच्या दृष्टीने बरोबर होती.
5 そこでダビデはキリアテ・ヤリムから神の箱を運んでくるため、エジプトのシホルからハマテの入口までのイスラエルをことごとく呼び集めた。
५किर्याथ-यारीमाहून देवाचा कोश आणण्यासाठी दावीदाने मिसरमधील शीहोर नदीपासून लेबो हमाथच्या प्रदेशापर्यंत पसरलेल्या सर्व इस्राएल लोकांस एकत्र जमवले.
6 そしてダビデとすべてのイスラエルはバアラすなわちユダのキリアテ・ヤリムに上り、ケルビムの上に座しておられる主の名をもって呼ばれている神の箱をそこからかき上ろうと、
६करुबांवरती राहणारा देवाचा कोश, ज्याला परमेश्वर देवाचे नाव ठेवले आहे तो, यहूदातील बाला म्हणजेच किर्याथ-यारीम येथून आणावा म्हणून दावीदासह सर्व इस्राएली तिकडे चढून वर गेले.
7 神の箱を新しい車にのせて、アビナダブの家からひきだし、ウザとアヒヨがその車を御した。
७मग त्यांनी देवाचा कोश अबीनादाबाच्या घरातून काढून, तो नव्या गाडीवर ठेवला. उज्जा आणि अह्यो हे दोघेजण ही गाडी हाकत होते.
8 ダビデおよびすべてのイスラエルは歌と琴と立琴と、手鼓と、シンバルと、ラッパをもって、力をきわめて神の前に踊った。
८दावीद आणि सर्व इस्राएल आपल्या सर्व शक्तीने देवापुढे जल्लोष करत चालले होते. ते स्तुतिगीते गात, वीणा, सतार, डफ झांजा, कर्णे इत्यादी वाद्ये वाजवत ते चालले होते.
9 彼らがキドンの打ち場に来た時、ウザは手を伸べて箱を押えた。牛がつまずいたからである。
९किदोनाच्या खळ्यापर्यंत ते पोहचले. तेव्हा गाडी ओढणारे बैल अडखळले. तेव्हा उज्जाने कोश धरण्यास हात पुढे केला.
10 ウザが手を箱につけたことによって、主は彼に向かって怒りを発し、彼を撃たれたので、彼はその所で神の前に死んだ。
१०तेव्हा परमेश्वराचा उज्जावर कोप भडकला व उज्जाने कोशाला हात लावला म्हणून त्याने त्यास मारले आणि तेथे तो देवासमोर मेला.
11 主がウザを撃たれたので、ダビデは怒った。その所は今日までペレヅ・ウザと呼ばれている。
११परमेश्वराने उज्जाला असा मार दिला. याचे दावीदाला वाईट वाटले. तेव्हापासून आजपर्यंत त्या ठिकाणाचे नाव पेरेस-उज्जा असे आहे.
12 その日ダビデは神を恐れて言った、「どうして神の箱を、わたしの所へかいて行けようか」。
१२दावीदाला त्यादिवशी देवाची भीती वाटली. तो म्हणाला, “आपल्या घरी मी देवाचा कोश कसा आणू?”
13 それでダビデはその箱を自分の所ダビデの町へは移さず、これを転じてガテびとオベデ・エドムの家に運ばせた。
१३त्यामुळे दावीदाने दावीद नगरात तो कोश आणला नाही, पण तो ओबेद-अदोम गीत्ती याच्या घरात एकाबाजूला नेऊन ठेवला.
14 神の箱は三か月の間、オベデ・エドムの家に、その家族とともにとどまった。主はオベデ・エドムの家族とそのすべての持ち物を祝福された。
१४मग देवाचा कोश ओबेद-अदोम याच्या घरात तीन माहिने राहिला. परमेश्वराने त्याच्या घराला आणि त्याचे जे काही होते त्या सगळ्याला आशीर्वादित केले.