< 列王記Ⅰ 1 >

1 爰にダビデ王年邁みて老い寝衣を衣するも温らざりければ
आता राजा दावीद म्हातारा होऊन उतारवयात पोहोंचला होता. त्यांनी त्याच्यावर कितीही पांघरुणे घातली तरी त्यास ऊब येईना.
2 其臣僕等彼にいひけるは王わが主のために一人の若き處女を求めしめて之をして王のまへにたちて王の左右となり汝の懐に臥て王わが主を暖めしめんと
म्हणून त्याचे सेवक त्यास म्हणाले, “आपण आपल्या प्रभूराजासाठी एखादी तरुण कुमारी पाहूया. अशासाठी की तिने राजाची सेवा करावी आणि काळजी घ्यावी. आपल्या प्रभूराजाला ऊब यावी म्हणून ती तुझ्या उराशी निजेल.”
3 彼等乃ちイスラエルの四方の境に美き童女を求めてシユナミ人アビシヤグを得て之を王に携きたれり
आणि सेवकांनी या कामासाठी इस्राएलामध्ये सुंदर तरुण कन्यांचा शोध सुरु केला. तेव्हा त्यांना शुनेम या नगरात अबीशग नावाची कन्या सापडली. त्यांनी तिला राजाकडे आणले.
4 此童女甚だ美くして王の左右となり王に事たり然ど王之と交はらざりき
ती अतिशय देखणी होती. तिने अतिशय काळजीपूर्वक राजाची शुश्रूषा केली. असे असले तरी राजाने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले नाहीत.
5 時にハギテの子アドニヤ自ら高くし我は王とならんと言て己のために戰車と騎兵および自己のまへに驅る者五十人を備へたり
तेव्हा हग्गीथ्थेचा पुत्र अदोनीया स्वत: ला उंच करून म्हणाला, “मी राजा होईन.” त्याने स्वत: समोर रथ, घोडे तयार केले आणि रथापुढे धावायला पन्नास माणसे ठेवली.
6 其父は彼が生れてより已來汝何故に然するやと言てかれを痛しめし事なかりきアドニヤも亦容貌の甚だ美き者にてアブサロムの次に生れたり
“तू असे का करतोस?” असे म्हणून दाविदाने त्यास कधी दुखावलेले नव्हते, शिवाय अदोनीया हा दिसायलाही सुंदर होता, अबशालोमानंतर त्याचा जन्म झाला होता.
7 彼ゼルヤの子ヨアブおよび祭司アビヤタルと商議ひしかば彼等之に從ひゆきて助けたり
सरूवेचा पुत्र यवाब आणि याजक अब्याथार यांच्याशी अदोनीयाने बोलणे केले. त्यांनी अदोनीयाला अनुसरून त्यास सहाय्य केले.
8 されど祭司ザドクとヱホヤダの子ベナヤと預言者ナタンおよびシメイとレイならびにダビデに屬したる勇士はアドニヤに與せざりき
पण सादोक याजक, यहोयादाचा पुत्र बनाया, नाथान संदेष्टा, शिमी रेई आणि दाविदाच्या पदरी असलेले वीर, ह्यानी अदोनीयाला अनुसरले नाही.
9 アドニヤ、エンロゲルの近邊なるゾヘレテの石の傍にて羊と牛と肥畜を宰りて王の子なる己の兄弟および王の臣僕なるユダの人を盡く請けり
एन-रोगेलजवळ जोहेलेथ खडकापाशी अदोनीयाने मेंढरे, गुरे, पुष्ट वासरे कापले व आपले भाऊ, राजाची मुले आणि यहूदातील सर्व लोकांस, जे राजाचे चाकर होते त्यांना बोलावले.
10 されども預言者ナタンとベナヤと勇士とおのれの兄弟ソロモンとをば招かざりき
१०पण राजाचे खास शूर वीर, आपला भाऊ शलमोन, बनाया आणि संदेष्टा नाथान यांना त्याने बोलावले नाही.
11 爰にナタン、ソロモンの母バテシバに語りていひけるは汝ハギテの子アドニヤが王となれるを聞ざるかしかるにわれらの主ダビデはこれを知ざるなり
११तेव्हा शलमोनाची आई बथशेबा हिच्याशी नाथान बोलला, “हग्गीथेचा पुत्र अदोनीया हा राजा झाला, आणि आपले स्वामी दावीद यांना त्याचा पत्तासुद्धा नाही, असे तुझ्या कानावर आले नाही काय?”
12 されば請ふ來れ我汝に計を授て汝をして己の生命と汝の子ソロモンの生命を救しめん
१२तर आता चल मी तुला सल्ला देतो, अशारितीने तू आपला जीव व तुझा मुलगा शलमोन याचा जीव वाचवशील.
13 汝往てダビデ王の所に入り之にいへ王わが主よ汝は婢に誓ひて汝の子ソロモンは我に継で王となりわが位に坐せんといひたまひしにあらずや然にアドニヤ何故に王となれるやと
१३तर आता तू दावीद राजा कडे जा आणि त्यास म्हण की, माझ्या स्वामी तुम्ही मला वचन दिले नाही काय? “खचित तुझा पुत्र शलमोन माझ्यानंतर राज्य करील, आणि तोच माझ्या राजासनावर बसेल?” तर मग अदोनीया का राज्य करीत आहे?
14 われまた汝が尚其處にて王と語ふ時に汝に次て入り汝の言を證すべしと
१४“तुझे राजाशी बोलणे चाललेले असतानाच मी तेथे येईन व तुझ्या शब्दांची खात्री पटवून देईन.”
15 是においてバテシバ寝室に入りて王の所にいたるに王は甚だ老てシユナミ人アビシヤグ王に事へ居たり
१५तेव्हा राजाला भेटायला बथशेबा त्याच्या खोलीत गेली राजा फारच थकला होता, शुनेमची अबीशग राजाची सेवा करत होती.
16 バテシバ躬を鞠め王を拝す王いふ何なるや
१६बथशेबाने राजाला लवून अभिवादन केले. राजा म्हणाला, “तुझी काय इच्छा आहे.”
17 かれ王にいひけるはわが主汝は汝の神ヱホバを指て婢に汝の子ソロモンは我に継で王となりわが位に坐せんと誓ひたまへり
१७ती त्यास म्हणाली, “महाराज, तुम्ही आपल्या परमेश्वर देवासमक्ष मला वचन दिले आहे की, माझ्यानंतर शलमोन राजा होईल व तोच या राजासनावर बसेल असे तुम्ही म्हणाला आहात.
18 しかるに視よ今アドニヤ王となれり而て王わが主汝は知たまはず
१८तर आता पाहा, अदोनीया राजा झाला आहे, आणि तुम्ही माझे स्वामी महाराज, तुम्हास याची माहितीही नाही का?
19 彼は牛と肥畜と羊を饒く宰りて王の諸子および祭司アビヤタルと軍の長ヨアブを招けりされど汝の僕ソロモンをば招かざりき
१९त्याने तर अनेक गुरे आणि पुष्ट पशू, उत्तम मेंढरे कापून शांत्यर्पणाचा यज्ञ केला आहे, त्याने सर्वांना आमंत्रित केले आहे. तुमची मुले, याजक अब्याथार, सेनापती यवाब यांना त्याने बोलावले आहे. पण तुमचा सेवक शलमोन याला मात्र बोलावणे पाठवले नाही.
20 汝王わが主よイスラエルの目皆汝に注ぎ汝が彼等に誰が汝に継で王わが主の位に坐すべきを告るを望む
२०महाराज, आता सर्व इस्राएल लोकांचे तुमच्याकडे लक्ष लागले आहे. स्वत: नंतर तुम्ही कोणाला राजा म्हणून घोषित करता याची ते वाट बघत आहेत.
21 王わが主の其父祖と共に寝たまはん時に我とわが子ソロモンは罪人と見做さるるにいたらんと
२१नाहीतर माझे स्वामी राजे आपल्या वाडवडिलांसारखे झोपल्यावर, मी आणि शलमोन लोकांच्या दृष्टीने गुन्हेगार ठरु.”
22 バテシバ尚王と語ふうちに視よ預言者ナタンも亦入きたりければ
२२बथशेबा हे राजाशी बोलत असतानाच, नाथान संदेष्टा राजाला भेटायला आला.
23 人々王に告て預言者ナタン此にありと曰ふ彼王のまへに入り地に伏て王を拝せり
२३राजाच्या सेवकांनी त्यास सांगितले, “तेव्हा नाथान संदेष्टा राजाच्या समोर आला” व खाली लवून अभिवादन केले.
24 しかしてナタンいひけるは王わが主汝はアドニヤ我に継で王となりわが位に坐すべしといひたまひしや
२४मग नाथान म्हणाला, “महाराज, तुमच्यानंतर अदोनीया राज्यावर येणार असे तुम्ही घोषित केले काय? आणि तो तुमच्या राजासनावर बसेल असे तुम्ही ठरवले आहे काय?”
25 彼は今日下りて牛と肥畜と羊を饒く宰りて王の諸子と軍の長等と祭司アビヤタルを招けりしかして彼等はアドニヤのまへに飮食してアドニヤ王壽かれと言ふ
२५कारण आजच त्याने खाली जाऊन गुरे, पुष्ट पशू, मेंढरे कापून शांत्यर्पणाचा यज्ञ केला आहे तुमचे पुत्र, सेनापती, व अब्याथार याजक यांना त्याचे आमंत्रण आहे. ते सगळे आत्ता त्याच्याबरोबर खाण्यापिण्यात दंग आहेत, “राजा अदोनीया चिरायु होवो” म्हणून घोषणा देत आहेत.
26 されど汝の僕なる我と祭司ザドクとヱホヤダの子ベナヤと汝の僕ソロモンとは彼請かざるなり
२६पण मी, सादोक याजक यहोयादाचा पुत्र बनाया आणि तुमचा सेवक शलमोन यांना मात्र त्याने बोलावलेले नाही.
27 此事は王わが主の爲たまふ所なるかしかるに汝誰が汝に継で王わが主の位に坐すべきを僕に知せたまはざるなりと
२७माझे स्वामी, राजा आपल्याकडून हे आम्हाला न सांगता झाले का? यानंतर राजासनावर कोण बसेल? हे तुझ्या सेवकांना कळव.
28 ダビデ王答ていふバテシバをわが許に召せと彼乃ち王のまへに入て王のまへにたつに
२८तेव्हा राजा दावीद म्हणाला, “बथशेबाला पुन्हा माझ्याकडे बोलवा” त्याप्रमाणे बथशेबा राजासमोर येवून उभी राहिली.
29 王誓ひていひけるはわが生命を諸の艱難の中に救ひたまひしヱホバは活く
२९मग राजाने शपथपूर्वक वचन दिले: “परमेश्वर देवाने आत्तापर्यंत मला सर्व संकटातून सोडवले आहे. देवाला स्मरुन मी हे वचन देतो.
30 我イスラエルの神ヱホバを指て誓ひて汝の子ソロモン我に継で王となり我に代りてわが位に坐すべしといひしごとくに我今日爲すべしと
३०पूर्वी मी जे वचन तुला दिले त्याप्रमाणे मी आज करणार आहे. इस्राएलाच्या परमेश्वर देवाने हे वचन द्यायचे मला सामर्थ्य दिले, त्याप्रमाणे मी कबूल करतो की माझ्यानंतर तुझा पुत्र शलमोन राज्य करील, या राजासनावर माझ्यानंतर तो आरुढ होईल. आजच हे मी पूर्ण करील.”
31 是においてバテシバ躬を鞠め地に伏て王を拝し願くはわが主ダビデ王長久に生ながらへたまへといふ
३१बथशेबाने हे ऐकून राजाला लवून वंदन केले व म्हणाली, “माझे स्वामीराज दावीद चिरायु होवो.”
32 ダビデ王いひけるはわが許に祭司ザドクと預言者ナタンおよびヱホヤダの子ベナヤを召と彼等乃ち王のまへに來る
३२मग दावीद राजा म्हणाला, “सादोक हा याजक, नाथान संदेष्टा आणि यहोयादाचा पुत्र बनाया यांना येथे बोलावून घ्या” तेव्हा ते तिघेजण राजाच्या भेटीला आले.
33 王彼等にいひけるは汝等の主の臣僕を伴ひわが子ソロモンをわが身の騾に乗せ彼をギホンに導き下り
३३राजा त्यांना म्हणाला, माझ्या अधिकाऱ्यांना सोबत घ्या. माझा पुत्र शलमोन याला माझ्या स्वत: च्या खेचरावर बसवून खाली गीहोनाकडे जा.
34 彼處にて祭司ザドクと預言者ナタンは彼に膏をそそぎてイスラエルの上に王と爲すべししかして汝ら喇叭を吹てソロモン王壽かれと言へ
३४तेथे सादोक याजक आणि नाथान संदेष्टा यांनी त्यास इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक करावा. रणशिंग फुंकून जाहीर करावे की “शलमोन राजा चिरायू असो.”
35 かくして汝ら彼に隨ひて上り來るべし彼は來りてわが位に坐し我に代りて王となるべし我彼を立てイスラエルとユダの上に主君となせりと
३५मग त्यास घेऊन माझ्याकडे या. तो या राजासनावर बसेल आणि राजा म्हणून माझी जागा घेईल. इस्राएल आणि यहूदाचा अधिकारी व्हावा म्हणून मी शलमोनला निवडले आहे.
36 ヱホヤダの子ベナヤ王に對へていひけるはアメンねがはくは王わが主の神ヱホバ然言たまはんことを
३६यहोयादाचा पुत्र बनाया राजाला म्हणाला, “आमेन! परमेश्वर, माझ्या स्वामीचा देव याला मान्यता देवो.
37 ねがはくはヱホバ王わが主とともに在せしごとくソロモンとともに在してその位をわが主ダビデ王の位よりも大ならしめたまはんことを
३७महाराज, जसा परमेश्वर आपल्याबरोबर होता. तोच परमेश्वर तसाच शलमोनाच्याही बरोबर राहील, आणि राजा शलमोनच्या राज्याची भरभराट करो आणि माझे स्वामी, दावीद आपल्यापेक्षा त्याचे राजासन महान करो.”
38 斯て祭司ザドクと預言者ナタンおよびヱホヤダの子ベナヤ並にケレテ人とペレテ人下りソロモンをダビデ王の騾に乗せて之をギホンに導きいたれり
३८सादोक याजक, नाथान भविष्यवादी, यहोयादाचा पुत्र बनाया आणि राजाचे सेवक करेथी व पलेथी यांनी खाली जाउन राजा दाविदाच्या सांगण्याप्रमाणे केले. दाविदाच्या खेचरावर शलमोनाला बसवून ते गीहोन येथे गेले.
39 しかして祭司ザドク幕屋の中より膏の角を取てソロモンに膏そそげりかくて喇叭を吹きならし
३९सादोक याजकाने पवित्र मंडपातून तेल आणले. आणि त्या तेलाने शलमोनाच्या मस्तकावर अभिषेक केला. त्यांनी कर्णा फुंकला आणि सर्वांनी “शलमोन राजा चिरायू होवो” असा एकच जयजयकार केला.
40 民みなソロモン王壽かれと言り民みなかれに隨ひ上りて笛を吹き大に喜祝ひ地はかれらの聲にて裂たり
४०मग शलमोनाबरोबर सर्वजण नगरात आले. येताना ते पावा वाजवत आले. लोकांस उत्साहाचे, आनंदाचे भरते आले होते. त्यांच्या जल्लोषाने धरणी कंप पावली.
41 アドニヤおよび彼とともに居たる賓客其食を終たる時に皆これを聞りヨアブ喇叭の聲を聞ていひけるは城邑の中の聲音何ぞ喧囂やと
४१हे चाललेले असताना इकडे अदोनीया आणि त्याची पाहुणे मंडळी यांचे भोजन आटपत आलेले होते. त्यांनी हा कर्ण्यांचा आवाज ऐकला. यवाबाने विचारले, “हा कसला आवाज? नगरात काय चालले आहे?”
42 彼が言をる間に視よ祭司アビヤタルの子ヨナタン來るアドニヤ彼にいひけるは入よ汝は勇ある人なり嘉音を持きたれるならん
४२यवाबाचे बोलणे संपत नाही तोच अब्याथार याजकाचा पुत्र योनाथान तिथे आला. अदोनीया त्यास म्हणाला, “ये तू भला मनुष्य आहेस. तेव्हा माझ्यासाठी तू चांगलीच बातमी आणली असशील.”
43 ヨナタン答へてアドニヤにいひけるは誠にわが主ダビデ王ソロモンを王となしたまへり
४३पण योनाथानाने अदोनीयाला उत्तर देऊन म्हणाला, “आमचा स्वामी, दावीद याने शलमोनाला राजा केले आहे.”
44 王祭司ザドクと預言者ナタンおよびヱホヤダの子ベナヤ並にケレテ人とペレテ人をソロモンとともに遣したまふ即ち彼等はソロモンを王の騾に乗せてゆき
४४दाविदाने सादोक याजक, नाथान संदेष्टा, यहोयादाचा पुत्र बनाया, करेथी आणि पलेथी आपले सेवक यांना शलमोनाबरोबर पाठवले. त्यांनी शलमोनाला राजाच्या खेचरावर बसवले.
45 祭司ザドクと預言者ナタン、ギホンにて彼に膏をそそぎて王となせり而して彼等其處より歓て上るが故に城邑は諠囂し汝らが聞る聲音は是なり
४५मग सादोक याजक आणि नाथान संदेष्टा यांनी गीहोन येथे शलमोन राजाला अभिषेक केला. यानंतर ते सर्वजण आनंदाने नगरात परतले, नगरातील लोक त्यामुळे फार आनंदात आहेत. हा जल्लोष त्यांचाच आहे.
46 又ソロモン國の位に坐し
४६शलमोन आता राज्याचा राजासनावर बसला आहे.
47 且王の臣僕來りてわれらの主ダビデ王に祝を陳て願くは汝の神ソロモンの名を汝の名よりも美し其位を汝の位よりも大たらしめたまへと言りしかして王は牀の上にて拝せり
४७राजाचा सेवकवर्ग स्वामी दावीद राजाला आशीर्वाद देत आहे. ते म्हणत आहेत, राजा दावीद थोर आहे. शलमोन त्याच्यापेक्षा थोर व्हावा अशी देवाजवळ आमची प्रार्थना आहे देव शलमोनाचे नाव तुमच्यापेक्षाही कीर्तिवंत करो. त्याचे राजासन तुझ्या राजासनापेक्षाही थोर होवो. तेव्हा पलंगावरूनच वाकून राजा अभिवादन करत होता.
48 王また斯いへりイスラエルの神ヱホバはほむべきかなヱホバ今日わが位に坐する者を與たまひてわが目亦これを見るなりと
४८आणि राजा म्हणाला, “इस्राएलाच्या परमेश्वर देव धन्य असो. परमेश्वराने माझ्या डोळ्यादेखत एका व्यक्तीला माझ्या राजासनावर बसवले आहे.”
49 アドニヤとともにある賓客皆驚愕き起て各其途に去りゆけり
४९हे ऐकून अदोनीयाची आमंत्रित पाहुणे मंडळी घाबरली आणि त्यांनी तेथून पळ काढला.
50 茲にアドニヤ、ソロモンの面を恐れ起て往き壇の角を執へたり
५०अदोनीया शलमोनाला घाबरला, व जावून तो वेदीपाशी गेला आणि वेदीचे दोन्ही शिंगे पकडून बसला.
51 或人ソロモンに告ていふアドニヤ、ソロモン王を畏る彼壇の角を執て願くはソロモン王今日我に劍をもて僕を殺じと誓ひ給へと言たりと
५१कोणीतरी शलमोनाला सांगितले, “अदोनीया तुमच्या धास्तीने पवित्र मंडपात वेदीची शिंगे धरुन बसला आहे. तो तिथून हलायला तयार नाही शलमोन राजाने मला तलवारीने मारणार नाही याचे अभिवचन द्यावे असे तो म्हणत आहे.”
52 ソロモンいひけるは彼もし善人となるならば其髮の毛一すぢも地におちざるべし然ど彼の中に惡の見るあらば死しむべしと
५२तेव्हा शलमोन म्हणाला, “एक भला गृहस्थ असल्याचे अदोनीयाने सिध्द केले तर त्याच्या केसासही इजा होणार नाही. पण त्याच्यात दुष्टता दिसली तर तो मरण पावेल.”
53 ソロモン王乃ち人を遣て彼を壇より携下らしむ彼來りてソロモン王を拝しければソロモン彼に汝の家に往といへり
५३मग राजा शलमोनाने अदोनीयाकडे आपल्या मनुष्यांना पाठवले, ते त्यास राजाकडे घेऊन आले. अदोनीयाने राजा शलमोनाला वाकून अभिवादन केले. “शलमोनाने त्यास घरी परत जाण्यास सांगितले.”

< 列王記Ⅰ 1 >