< Geremia 2 >
1 LA parola del Signore mi fu ancora [indirizzata], dicendo:
१परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले,
2 Va', e grida agli orecchi di Gerusalemme, dicendo: Così ha detto il Signore: Io mi ricordo di te, della benignità [che io usai inverso te] nella tua giovanezza, dell'amore [che io ti portava nel tempo] delle tue sponsalizie, quando tu comminavi dietro a me per lo deserto, per terra non seminata.
२“जा आणि यरूशलेमेच्या कानामध्ये अशी घोषणा कर, परमेश्वर असे म्हणतो, तुझ्याविषयी तुझ्या तरूणपणाची निष्ठा, तुझ्या वाडनिश्चयाची प्रिती, जेव्हा तुम्ही वाळवंटातून आणि पडीत जमिनीतून माझ्यामागे आलात, हे माझ्या ध्यानात आहे.
3 Israele [era] una cosa santa al Signore, le primizie della sua rendita; tutti quelli che lo divoravano erano colpevoli, male ne avveniva loro, dice il Signore.
३इस्राएल परमेश्वरास पवित्र होते, त्याच्या उत्पन्नांचे प्रथम फळ. जो कोणी या प्रथम फळातील खातो तो पाप करतो, त्यांच्यावर आपत्ती येईल, असे परमेश्वर म्हणतो.”
4 Ascoltate la parola del Signore, casa di Giacobbe, e [voi] tutte le famiglie della casa d'Israele.
४याकोबाच्या घराण्यांनो आणि इस्राएलाच्या घराण्याच्या सर्व कुळांनो, परमेश्वराचे वचन ऐका.
5 Così ha detto il Signore: Quale iniquità hanno trovata i vostri padri in me, che si sono allontanati da me, e sono andati dietro alla vanità, e son divenuti vani?
५परमेश्वर असे म्हणतो: “तुमच्या पूर्वजांना माझ्यामध्ये असे काय चुकीचे आढळले, जे ते माझ्यापासून दूर गेले आणि, कवडी मोल दैवतांच्या मागे जाऊन ते पण स्वत: कवडीमोल झाले?
6 E non hanno detto: Dove [è] il Signore, che ci ha tratti fuor del paese di Egitto; che ci ha condotti per lo deserto; per un paese di solitudine e di sepolcri; per un paese di aridità, e d'ombra di morte; per un paese, per lo quale non passò mai, ed ove non abitò mai alcuno?
६कारण ते असेही म्हणाले नाहीत की, ‘ज्याने आम्हास मिसरहून आणले, तो परमेश्वर कोठे आहे? ज्याने आम्हांला रानांतून पार नेले, ओसाड आणि खडकाळ प्रदेशातून, काळोख व धोका असलेल्या निर्जल देशातून, जेथून कोणीही प्रवास करीत नाही अशा प्रदेशातून आम्हांला पार नेले. तो परमेश्वर कोठे आहे?”
7 Or io vi ho menati in un paese di Carmel, per mangiar del suo frutto, e de' suoi beni; ma voi, essendovi entrati, avete contaminata la mia terra, ed avete renduta abbominevole la mia eredità.
७पण मी तुम्हास कर्मेलाच्या भूमीत आणले ह्यासाठी की तुम्ही तिचे फळ आणि इतर चांगल्या गोष्टीं खाव्या. तरीही तुम्ही माझी ही भूमी विटाळवीली, तुम्ही माझा वारसा घृणास्पद केला.
8 I sacerdoti non hanno detto: Dove [è] il Signore? e quelli che trattano la Legge non mi han conosciuto, e i pastori hanno commesso misfatto contro a me, ed i profeti hanno profetizzato per Baal, e sono andati dietro a cose che non giovano nulla.
८“याजकांनी ‘परमेश्वर कोठे आहे’ असे विचारले नाही. आणि नियमशास्त्रातील तज्ञांना माझ्या बद्दल काळजी नाही! राज्यकर्त्यांनी माझ्याविरूद्ध अपराध केला, संदेष्ट्यांनी बआल देवाच्या नावाने याच्या नावे भविष्य वर्तविले आणि निरर्थक गोष्टींच्या मागे लागले.”
9 Perciò, io contenderò ancora con voi, dice il Signore; e contenderò co' figliuoli de' vostri figliuoli.
९म्हणून मी अजूनही तुमच्यावर दोषारोप ठेवणार आहे आणि तुमच्या नातवंडानासुद्धा दोषी ठरवीन, परमेश्वर असे म्हणतो.
10 Perciocchè, passate nell'isole di Chittim, e riguardate; mandate in Chedar e considerate bene, e vedete se avvenne mai una cotal cosa.
१०कारण कित्तीम लोकांच्या बेटावर पार जाऊन व्यवस्थीत पाहा. कोणाला तरी केदारला पाठवा आणि लक्षपूर्वक पाहा, कोणी असे कधी काही केले आहे का ते बघा!
11 Evvi gente alcuna che abbia mutati i [suoi] dii, i quali però non [son] dii? ma il mio popolo ha mutata la sua gloria in ciò che non giova nulla.
११काय राष्ट्रांनी देवांची अदलाबदली केली, जरी ते देव नसले तरी? पण माझ्या लोकांनी जे काही मदत करू शकत नाही त्याच्याशी आपल्या वैभवाची अदलाबदली केली आहे.
12 Cieli, siate attoniti di questo, ed abbiate[ne] orrore; siate[ne] grandemente desolati, dice il Signore.
१२“आकाशांनो, घडलेल्या गोष्टीबद्दल तुला आश्चर्याचा धक्का बसू दे, भितीने थरकाप होऊ दे.” असे परमेश्वर म्हणतो.
13 Perciocchè il mio popolo ha fatti due mali: hanno abbandonato me, fonte d'acqua viva, per cavarsi delle cisterne, cisterne rotte, che non ritengono l'acqua.
१३कारण माझ्या लोकांनी दोन दुष्कर्मे केली आहेत. जो मी जिवंत पाण्याचा झरा त्या मला सोडून त्यांनी आपणासांठी हौद, फुकटे हौद ज्याच्याने काही पाणी धरवून ठेववत नाही ते खोदले आहेत.
14 Israele [è egli] servo? [è] egli uno [schiavo] nato in casa? perchè [dunque] è egli in preda?
१४“इस्राएल गुलाम आहे काय? तो घरी जन्मला नाही काय? मग तो लूट का झाला आहे?
15 I leoncelli han ruggito, ed hanno messe le lor grida contro a lui, ed hanno ridotto il suo paese in desolazione; le sue città sono state arse, senza che alcuno vi abiti [più].
१५तरुण सिंहांनी त्याच्याविरुध्द डरकाळ्या फोडल्या आहेत. त्यांनी मोठा आवाज केला आहे आणि त्यांनी त्याची भूमी भयानक अशी केली आहे. त्याच्या शहरांचा नाश झाला आहे, त्यामध्ये कोणी रहिवाशी नाही.
16 Eziandio i figliuoli di Nof, e di Tahafnes, ti fiaccheranno la sommità del capo.
१६नोफ आणि तहपन्हेस येथील लोकांनी तुमचा माथा फोडला आहे आणि तुझ्यातून गुलाम काढले आहेत.
17 Non sei tu quella che fai questo a te stessa, abbandonando il Signore Iddio tuo, nel tempo ch'egli ti conduce per lo cammino?
१७तुम्ही स्वत: ला तसे केले नाही काय? जेव्हा परमेश्वर तुमचा देव तुम्हास योग्य मार्गाने घेऊन जात होता, तेव्हा तुम्हीच त्यास सोडले.
18 Ed ora, che hai tu a fare per lo cammino di Egitto, per bere dell'acque di Sihor? ovvero, che hai tu a fare per lo cammino di Assiria, per bere dell'acque del Fiume?
१८तर आता, शिहोराचे पाणी पिण्यास मिसरच्या रस्त्यात तुला काय काम आहे? आणि फरात नदीचे पाणी पिण्यासाठी अश्शूराची वाट का धरावी?
19 La tua malvagità ti castigherà, ed i tuoi sviamenti ti condanneranno; e tu saprai, e vedrai ch'egli [è] una mala ed amara cosa, che tu abbia lasciato il Signore Iddio tuo, e che lo spavento di me non [sia] in te, dice il Signore Iddio degli eserciti.
१९तुझे दुष्कृत्ये तुला दोष देतील आणि तुझा अविश्वासूपणा तुला शिक्षा देईल. तर आता ह्यावर विचार कर, मी, परमेश्वर तुझा देव, तू माझा त्याग केला आहे, आणि तुझ्या ठायी माझे भय नाही हे किती वाईट आणि कडू आहे!” प्रभू सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.
20 Perciocchè io già ab antico avea spezzato il tuo giogo, [e] rotti i tuoi legami; tu hai detto: Io non sarò [mai più] serva; perciocchè tu scorri fornicando sopra ogni alto colle, e sotto ogni albero verdeggiante.
२०“कारण फार वर्षांपूर्वी तुझे जोखड मोडले आणि तुझी बंधने तोडली. तरी तू म्हणालीस, ‘मी तुझी सेवा करणार नाही.’ तर प्रत्येक उंच टेकडीवरील अथवा प्रत्येक हिरव्या झाडाखालील तू व्यभिचारीणीप्रमाणे वाकलीस.
21 Or ti avea io piantata di viti nobili, di una generazione vera tutta quanta; e come mi ti sei mutata in tralci tralignanti di vite strana?
२१पण मी, माझ्याकरिता खास द्राक्षवेली म्हणून खरे बीज असे तुला लावले, तर आता तू बदलून माझ्यासाठी विश्वासघातकी अशा परक्या जातीच्या द्राक्षवेलीप्रमाणे झाली आहे.
22 Avvegnachè tu ti lavi col nitro, ed usi attorno a te assai erba di purgatori di panni; pure è la tua iniquità suggellata nel mio cospetto, dice il Signore Iddio.
२२जरी तू स्वत: ला नदी मध्ये स्वच्छ केलेस किंवा खूप साबणाने आपणाला धूतले, तरी तुझ्या अपराधाचा डाग माझ्या समोर आहे,” असे सेनाधीश परमेश्वर देव म्हणतो.
23 Come diresti: Io non mi sono contaminata? io non sono andata dietro ai Baali? Riguarda il tuo procedere nella valle, riconosci quello che tu hai fatto, o dromedaria leggiera, che involvi le tue vie;
२३“मी अशुद्ध नाही, मी बआल दैवताच्या मागे गेली नाही” असे तू मला कसे म्हणू शकतेस? तू दरीमध्ये केलेल्या वर्तनाकडे पाहा! तू काय केलेस त्याबद्दल विचार कर. एका जागेवरुन दुसऱ्या जागी धावणाऱ्या चपळ उंटिणीप्रमाणे तू आहेस.
24 asina salvatica, avvezza [a star] nel deserto, che sorbisce il vento a sua voglia; chi potrebbe stornare una sua opportunità? niuno di quelli che la cercano si stancherà [per trovarla]; la troveranno nel suo mese.
२४जी जंगलात राहायला सवकलेली रानगाढवी स्वेच्छाधीन असता वारा हुंगते तशी तू आहेस. ती माजावर असताना कोण तिला परतवील? जे तिला शोधतात ते आपणास श्रम देणार नाहीत. तिच्या ऋतूत ती त्यांना सापडेल.
25 Rattieni il tuo piè, che non sia scalzo; e la tua gola, che non abbia sete; ma tu hai detto: Non vi è rimedio, no; perciocchè io amo gli stranieri, ed andrò dietro a loro.
२५तू आपल्या पायांना अनवाणी होण्यापासून आणि तुझ्या गळ्याला तृषीत होण्यापासून आवरून धर. पण तू म्हणतेस, आशा नाही, नाही, मी परक्यांवर प्रीती केली आहे आणि मी त्यांच्या मागे जाईलच.
26 Come è confuso il ladro, quando è colto, così sarà confusa la casa d'Israele; essi, i loro re, i lor principi, i lor sacerdoti, ed i lor profeti;
२६चोराला लोकांनी पकडताच तो तसा लज्जीत होतो, त्याचप्रमाणे इस्राएलाचे घराने लाजले आहे. ते, त्यांचे राजे आणि त्यांचे अधिकारी, याजक आणि संदेष्टे लज्जित झाले आहेत.
27 che dicono al legno: Tu [sei] mio padre; ed alla pietra: Tu ci hai generati. Conciossiachè mi abbiano volte le spalle, e non la faccia; e pure, al tempo della loro avversità, dicono: Levati, e salvaci.
२७हे त्यातील एक आहेत जे झाडाला म्हणतात, “तू माझा बाप आहेस” आणि खडकाला बोलतात की, “तू मला जन्म दिला आहेस.” कारण त्यांनी आपली पाठ माझ्याकडे फिरवली आहे, त्यांचे तोंड नाही. असे असले तरी, ते आपल्या संकटात म्हणतील, “उठ आणि आम्हांला तार.”
28 Ma, dove [sono] i tuoi dii, che tu ti hai fatti? levinsi, se pur ti potranno salvare al giorno della tua avversità; perciocchè, o Giuda, tu hai avuti tanti dii, quante città.
२८तर तुम्ही स्वत: साठी घडविलेले देव कोठे आहेत? संकट समयी तुम्हास सोडावयास त्या समर्थ असतील तर त्यांनी उठून यावे. कारण हे यहूदा, तुझ्या शहरांइतक्या तुझ्या मूर्त्या आहेत!
29 Perchè contendereste meco? voi tutti vi siete portati dislealmente inverso me, dice il Signore.
२९“तर तुम्ही माझ्यावर का आरोप लावता की मी काही वाईट केले आहे? तुम्ही सर्वांनी माझ्याविरूद्ध पाप केले आहेत,” असे परमेश्वर म्हणतो.
30 Indarno ho percossi i vostri figliuoli; non hanno ricevuta correzione; la vostra spada ha divorati i vostri profeti, a guisa d'un leone guastatore.
३०“तुझ्या लोकांस मी शिक्षा केली ती व्यर्थ झाली आहे. त्यांनी शिस्त स्विकारली नाही, नाश करणाऱ्या सिंहाप्रमाणे तुमच्याच तलवारीने तुमच्या भविष्यावाद्यांना खाऊन टाकले.”
31 O generazione, considerate voi stessi la parola del Signore; sono io stato ad Israele un deserto? [sono io stato] una terra caliginosa? perchè ha detto il mio popolo: Noi siamo signori; non verremo più a te?
३१जे तुम्ही या पिढीतले आहा, परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष द्या. इस्राएलाच्या लोकांस मी वाळवंटासारखा आहे का? किंवा काळोख प्रदेशासारखा त्यांना आहे काय? “आम्ही सभोवती भटकंती करू. आम्ही तुझ्याकडे येणार नाही.” ते असे का म्हणतात?
32 La vergine dimenticherà ella i suoi ornamenti, [o] la sposa i suoi fregi? ma il mio popolo mi ha dimenticato, già da giorni innumerabili.
३२कुमारी आपले दागिने आणि वधू आपला पोषाख विसरेल काय? पण माझे लोक मला असंख्य वेळा विसरले आहेत.
33 Perchè ti rendi [così] vezzosa nel tuo procedere, per procacciare amore? laonde tu hai insegnati i tuoi costumi, eziandio alle malvage femmine.
३३प्रिती शोधायला तू आपला मार्ग कसा चांगला करतेस, असे करून तू दुष्ट स्रियांनाही आपले मार्ग शिकवले आहेस.
34 Oltre a ciò, ne' tuoi lembi si è trovato il sangue delle persone de' poveri innocenti, i quali tu non avevi colti sconficcando; anzi [li hai uccisi] per tutte queste cose.
३४गरीब व निष्पाप यांच्या जिवांचे रक्त तुझ्या कपड्यांवर सापडले आहे. तुझे घर फोडताना तुला ते सापडले नाहीत.
35 E pur tu dici: Certo, io sono innocente; l'ira sua si è pure stornata da me. Ecco, io contenderò teco per ciò che tu hai detto: Io non ho peccato.
३५या सर्व गोष्टी असूनही उलट तू म्हणतेस, “मी निरपराध आहे. खरोखर परमेश्वराचा क्रोध माझ्यावरून फिरला आहे.” पण पाहा, “मी पाप केले नाही” या अशा बोलण्यावरून तुझा न्याय होणार.
36 Perchè trascorri cotanto or qua, or là, mutando il tuo cammino? tu sarai confusa di Egitto, come sei stata confusa di Assur.
३६तू आपला मार्ग बदलणे हे एवढे हलक्याने का घेतीस? अश्शूरविषयी जशी तू निराश झालीस, तशी तू मिसरविषयीही निराश होशील.
37 Eziandio d'appresso a costui uscirai con le mani in sul capo; perciocchè il Signore riprova le tue confidanze, e tu non prospererai in esse.
३७आणि तू आपले हात आपल्या डोक्यावर घेऊन तेथूनही उदास अशी निघून जाशील. कारण ज्यांच्यावर तुझा भरवसा होता त्यांना परमेश्वराने नाकारले, म्हणून तुला त्यांच्याकडून काहीच मदत होणार नाही.