< Isaia 48 >
1 ASCOLTATE questo, o casa di Giacobbe, che siete nominati del nome d'Israele, e siete usciti delle acque di Giuda; che giurate per lo Nome del Signore, e mentovate l'Iddio d'Israele; [benchè] non in verità, nè in giustizia.
१जे तुम्ही इस्राएलाच्या नावाने ओळखले जाता, आणि जे तुम्ही यहूदाच्या शुक्राणातून जन्मले आहा, याकोबाच्या घराण्या, हे ऐक. जे तुम्ही परमेश्वराच्या नावाची शपथ वाहता आणि इस्राएलाच्या देवाला विनंती करता, पण हे तुम्ही प्रामाणिकपणे आणि खरेपणाने करीत नाही.
2 Perciocchè essi si nominano della città santa, si appoggiano sopra l'Iddio d'Israele, il cui Nome è: Il Signor degli eserciti.
२कारण ते स्वत: ला पवित्र नगराचे म्हणतात आणि इस्राएलाच्या देवावर विश्वास ठेवतात, ज्याचे नाव सेनाधीश परमेश्वर
3 Io annunziai già ab antico le cose di prima, e quelle uscirono della mia bocca, ed io le feci intendere; [poi] di subito [le] ho fatte, e sono avvenute.
३“मी काळापूर्वीच या गोष्टी जाहीर केल्या आहेत, त्या माझ्या मुखातून निघाल्या आणि मीच त्या कळविल्या. मी त्या अचानक करु लागलो, आणि त्या घडून आल्या.
4 Perciocchè io so che tu [sei] indurato, e che il tuo collo è un nerbo di ferro, e che la tua fronte [è] di rame.
४कारण मला माहित होते की तुम्ही हट्टी आहात, तुमच्या मानेचे स्नायु लोखंडाप्रमाणे ताठ आणि तुझे कपाळ कांस्याचे आहे.
5 Perciò ti annunziai [quelle cose] già anticamente; io te [le] feci intendere, avanti che fossero avvenute; che talora tu non dicessi: Il mio idolo le ha fatte, e la mia scultura, e la mia statua di getto le ha ordinate.
५यास्तव मी तुला या गोष्टी आधीच घोषीत केल्या, त्या घडण्या अगोदरच मी तुला सांगितले, जेणेकरून तू असे म्हणू नये की, माझ्या मूर्तीने ती कृत्ये केली, आणि माझ्या कोरीव मूर्तीने व माझ्या ओतीव मूर्तीने ती आज्ञापिले.”
6 Tu hai udite tutte queste cose, considerale; e non le annunziereste voi? da ora io ti ho fatte intendere cose nuove, e riserbate, le quali tu non sapevi.
६तू या गोष्टी बद्दल ऐकले; हे सर्व पुरावे पहा; आणि तू, मी जे काही बोललो ते खरे आहे का ते मान्य नाही करणार? आतापासून मी तुला नव्या गोष्टी, माहीत नसलेल्या गोष्टी दाखवील्या आहेत.
7 Ora sono state create, e non ab antico, nè avanti [questo] giorno; e tu non [ne] avevi udito nulla; che talora tu non dica: Ecco, io le sapeva.
७या गोष्टी पूर्वी घडून गेलेल्या नाहीत, त्या आत्ताच अस्तित्वांत आणल्या या आता घडत असणाऱ्या गोष्टी आहेत, आणि आधी तू त्यांच्याबद्दल कधीच ऐकले नाहीस. त्यामुळे आम्हांला हे अगोदरच माहीत होते असे तू म्हणू शकणार नाही.
8 Tu non [le] hai nè udite, nè sapute; [ed] anche in alcun tempo non ti è stato aperto l'orecchio; perciocchè io sapeva che del tutto tu ti porteresti dislealmente, e che tu sei chiamato: Prevaricator fin dal ventre.
८त्या तू ऐकल्या नाही, त्या तुला माहीत नाही, या गोष्टी पूर्वकालापासून तुझ्या कानाला माहित नव्हत्या, कारण मला माहित होते के तू फार कपट करणारा आहेस, आणि जन्मापासूनच तू बंडखोर आहेस.
9 Per amor del mio Nome, io rallenterò la mia ira; e [per amor del]la mia lode, io mi ratterrò inverso te, per non distruggerti.
९पण माझ्या नावा करिता, आणि माझ्या सन्मानार्थ मी तुझा नाश करणार नाही.
10 Ecco, io ti ho posto al cimento, ma non già come l'argento; io ti ho affinato nel fornello dell'afflizione.
१०पाहा! मी तुला गाळून पाहिले आहे, पण चांदी सारखे नाही, मी तुला संकटाच्या भट्टीत शुध्द केले आहे.
11 Per amor di me stesso, per amor di me stesso, io farò [questo]; perciocchè, come sarebbe profanato [il mio Nome] ed io non darò la mia gloria ad alcun altro.
११माझ्यासाठी, माझ्यासाठीच, मी हे करेन, कारण मी माझ्या नावाचा अनादर कसा होऊ देऊ? मी माझे वैभव दुसऱ्याला देणार नाही.
12 Ascoltami, o Giacobbe, e [tu], o Israele, che sei chiamato da me. Io [son] desso; io [sono] il primo; io [sono] anche l'ultimo.
१२याकोबा, माझे ऐक, आणि इस्राएला, ज्याला मी बोलाविले आहे, माझे ऐक. मी तोच आहे, मी पहिला आहे, शेवटलाही मी आहे.
13 La mia mano ha eziandio fondata la terra, e la mia destra ha misurati i cieli col palmo; quando io li chiamo, tutti quanti compariscono.
१३होय, माझ्याच हाताने पृथ्वीचे पाये घातले, आणि माझ्या उजव्या हाताने स्वर्गे पसरली, जेव्हा मी त्यांना हाक मारतो तेव्हा ते एकत्र उभे राहतात
14 Voi tutti, adunatevi, ed ascoltate: Chi, d'infra coloro, ha annunziate queste cose? Il Signore ha amato colui; egli metterà ad esecuzione la sua volontà contro a Babilonia, e il suo braccio sopra i Caldei.
१४तुम्ही सर्व एकत्र या आणि माझे ऐका. ज्या कोणी तुमच्या मध्ये कोणी या गोष्टी सांगितल्या? परमेश्वराची सहमती, त्याचा बाबेलविरूद्ध असणारा हेतू साध्य करीन. तो खास्द्यांविरूद्ध परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करीन.
15 Io, io ho parlato, ed anche l'ho chiamato; io l'ho fatto venire, e le sue imprese son prosperate.
१५मी, मी बोललो आहे, होय, मी त्यास बोलाविले आहे, मी त्यास आणले आहे आणि तो यशस्वी होईल.
16 Accostatevi a me, [ed] ascoltate questo; dal principio io non ho parlato di nascosto; dal tempo che la cosa è stata io vi [sono stato]; ed ora il Signore Iddio, e il suo Spirito, mi ha mandato.
१६माझ्या जवळ या आणि हे ऐका; प्रारंभापासून मी गुप्तात बोललो नाही, जेव्हा हे घडले, तेव्हा मी तीथे आहे. आणि आता परमेश्वर देवाने आणि त्याच्या आत्म्या ने मला पाठवले आहे.
17 Così ha detto il Signore, il tuo Redentore, il Santo d'Israele: Io [sono] il Signore Iddio tuo, che ti ammaestro per util tuo, che ti guido per la via, [per la quale] tu devi camminare.
१७जो तुझा खंडून घेणारा, इस्राएलचा पवित्र परमेश्वर असे म्हणतो, मी परमेश्वर तुझा देव, जो तुम्हास यशस्वी होण्यासाठी शिकवतो, ज्या मार्गात तू चालावे त्यामध्ये जो तुला चालवतो.
18 Oh avessi tu pure atteso a' miei comandamenti! la tua pace sarebbe stata come un fiume, e la tua giustizia come le onde del mare.
१८जर तू फक्त माझ्या आज्ञा पाळल्या असत्या तर किती बरे झाले असते! तेव्हा भरून वाहणाऱ्या नदीप्रमाणे तुझी शांती असती आणि समुद्राच्या लाटांप्रमाणे तुझे तारण असते.
19 E la tua progenie sarebbe stata come la rena, e quelli che sarebbero usciti delle tue interiora come la ghiaia di quello; il suo nome non sarebbe stato sterminato, nè spento dal mio cospetto.
१९तुझे वंशज वाळूच्या प्रमाणे आणि तुझ्या पोटची मुले तिच्या कणांप्रमाणे झाले असते. आणि तुमचे नाव माझ्यासमोर काढून टाकले गेले नसते अथवा नष्ट केले गेले नसते.
20 Uscite di Babilonia, fuggitevene dai Caldei, con voce di giubilo; annunziate, bandite questo; datene fuori voce fino alle estremità della terra; dite: Il Signore ha riscattato Giacobbe, suo servitore.
२०माझ्या लोकांनो, बाबेल सोडा, खास्दयापांसून पळा, गायनाच्या शब्दाने तुम्ही हे कळवा, तुम्ही हे सांगा, पृथ्वीच्या अंता पर्यंत गाजवून बोला. सांगा, परमेश्वराने त्याचा सेवक याकोब याला खंडूण घेतले आहे.
21 Ed essi non hanno avuto sete, [mentre] egli li ha condotti per li deserti; egli ha fatta loro stillar dell'acqua dalla roccia; egli ha fesso il sasso, e ne è colata dell'acqua.
२१तो त्यांचे वाळवंटांतून मार्गदर्शन करत असता, त्यांना तहान लागली नाही, त्याने खडकातून त्यांच्यासाठी पाणी वाहायला लावले, आणि त्याने खडक फोडला आणि पाणी बाहेर वाहू लागले.
22 Non [vi è] alcuna pace per gli empi, ha detto il Signore.
२२पण परमेश्वर म्हणतो, “पाप्यांस शांती नाही.”