< Isaia 36 >
1 OR avvenne, l'anno quartodecimo del re Ezechia, che Sennacherib, re di Assiria, salì contro a tutte le città forti di Giuda, e le prese.
१हिज्कीया राजाच्या कारकिर्दीच्या चौदाव्या वर्षी अश्शूरचा राजा सन्हेरीब याने यहूदाच्या सर्व तटबंदी नगरांवर हल्ला केला, आणि त्यांचा ताबा घेतला.
2 Poi il re di Assiria mandò Rab-sache, da Lachis in Gerusalemme, al re Ezechia, con un grande stuolo. Ed esso si fermò presso dell'acquidotto dello stagno disopra, nella strada del campo del purgator di panni.
२नंतर अश्शूरच्या राजाने रब-शाके याला आपल्या मोठ्या सैन्यासह लाखीशाहून यरूशलेमेमध्ये हिज्कीया राजाकडे पाठवले, तो वरच्या तळ्याच्या नळाजवळ परटाच्या शेताच्या रस्त्यावर येऊन पोहचला, आणि उभा राहीला.
3 Ed Eliachim, figliuolo di Hilchia, mastro del palazzo, e Sebna, segretario, e Ioa, figliuolo di Asaf, cancelliere, uscirono fuori a lui.
३मग हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम, घरावरचा कारभारी व शेबना चिटणीस व आसाफचा मुलगा यवाह इतिहास लेखक हे त्याच्याकडे भेटण्यास गेले.
4 E Rab-sache disse loro: Or dite ad Ezechia: Così ha detto il gran re, il re di Assiria: Quale [è] questa confidanza, che tu hai avuta?
४रब-शाके त्यांना म्हणाला, “तुम्ही जाऊन हिज्कीयाला सांगा, अश्शूरचा महान राजा म्हणतो, तुझ्या विश्वासाचा स्त्रोत काय आहे?
5 Io ho detto, [dici tu], che il consiglio, e la forza per la guerra, [non sono altro] che parole di labbra; or pure, in cui ti sei confidato, che tu ti sei ribellato contro a me?
५तेथे युद्धासाठी मसलत आणि सामर्थ्य आहे, असे सांगून, तू फक्त निरर्थक शब्द बोलतो, आता तू कोणावर विश्वास ठेवतो? माझ्याविरूद्ध बंड करण्यासाठी तुला कोण धैर्य देतो?
6 Ecco, tu ti sei confidato in quel sostegno di canna rotta, sopra il quale se alcuno si appoggia, esso gli entra nella mano, e la fora; tale [è] Faraone, re di Egitto, a tutti coloro che si confidano in lui.
६पाहा, तू या मिसराच्या ठेचलेल्या बोरूच्या चालण्याच्या काठीवर विश्वास ठेवतोस, पण जर मनुष्य आपल्या हातातील काठीवर टेकतो, तर तो भेदून जाईल; जे कोणी एक मिसराचा राजा फारो याच्यावर भरवसा ठेवतात, तो त्यांना तसाच आहे.”
7 E se pur tu mi dici: Noi ci confidiamo nel Signore Iddio nostro; non [è] egli quello, del quale Ezechia ha tolti via gli alti luoghi, e gli altari; ed ha detto a Giuda, ed a Gerusalemme: Adorate dinanzi a questo altare?
७पण जर तू मला म्हणशील, आम्ही आमचा देव परमेश्वर ह्यांवर भरवसा ठेवतो, तर हिज्कीयाने ज्यांची उच्चस्थाने व वेद्या पूजेसाठी काढून टाकल्या आणि यहूदाला आणि यरूशलेमेला म्हटले, “तुम्ही यरूशलेमेत याच वेदीपुढे उपासना करा, तोच तो आहे की नाही?”
8 Deh! scommetti ora col mio signore, re di Assiria, ed io ti darò duemila cavalli, se tu potrai dare [altrettanti uomini] che li cavalchino.
८तर आता मी माझा धनी अश्शूरचा राजा याच्यापासून एक चांगला प्रस्ताव तुझ्याशी करण्याची इच्छा आहे, मी तुला दोन हजार घोडे देईन, जर तू त्यांच्यासाठी घोडेस्वार शोधण्यास समर्थ असलास तर.
9 E come faresti tu voltar faccia all'uno de' capitani d'infra i minimi servitori del mio signore? Ma tu ti sei confidato nell'Egitto, per de' carri e per della gente a cavallo.
९माझ्या धन्याच्या कनिष्ठ सेवकांतील एक नायकाचा तरी प्रतिकार तू कसा करू शकशील? तुम्ही रथ व घोडेस्वारांसाठी तुमचा भरवसा मिसरावर ठेवता?
10 Ora, sono io forse salito contro a questo paese per guastarlo, senza il Signore? il Signore mi ha detto: Sali contro a quel paese, e guastalo.
१०तर आता, मी येथपर्यंत प्रवास करून आलो, ते या देशाविरूद्ध लढण्यास आणि नाश करण्यास, ते परमेश्वराशिवाय काय? परमेश्वर मला म्हणाला, या देशावर हल्ला कर आणि त्यांचा नाश कर.
11 Allora Eliachim, e Sebna, e Ioa, dissero a Rab-sache: Deh! parla a' tuoi servitori in lingua siriaca; perciocchè noi l'intendiamo; e non parlarci in lingua giudaica, udente il popolo, che [è] sopra le mura.
११मग हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम आणि शेबना व यवाह हे रब-शाकेला म्हणाले, “कृपया आपल्या सेवकाशी अरामी भाषेत बोल, कारण ती आम्हास समजते. कोटावरील लोकांस तुमचे बोलणे समजेल म्हणून तुम्ही आमच्याशी यहूदी भाषेत बोलू नका.”
12 Ma Rab-sache disse: Il mio signore mi ha egli mandato a dir queste parole al tuo signore, od a te? Non [mi ha egli mandato] a coloro che stanno in sul muro, [per protestar loro] che mangeranno il loro sterco, e berranno la loro urina, insieme con voi?
१२पण रब-शाके म्हणाला “माझ्या धन्याने, मला तुझ्या धन्याशी व तुजशी हे शब्द बोलण्यास मला पाठवले आहे काय? कोटावर बसलेल्या मनुष्यांनी तुम्हाबरोबर आपली स्वतःची विष्ठा खावी आणि आपल्या स्वतःचे मूत्र प्यावे हे सांगण्यासाठी मला पाठवले नाही काय?”
13 Poi Rab-sache si rizzò in piè, e gridò ad alta voce, in lingua giudaica, e disse: Ascoltate le parole del gran re, del re di Assiria:
१३नंतर रब-शाके उभा राहिला व खूप मोठ्या आवाजात यहूदी भाषेत म्हणाला, “महान राजा, अश्शूरचा राजा याचे शब्द ऐका.”
14 Così ha detto il re: Ezechia non v'inganni; perciocchè egli non potrà liberarvi.
१४राजा म्हणाला, “हिज्कीयास तुम्हास भुरळ घालू देऊ नका; कारण तो तुमचे रक्षण करण्यास समर्थ नाही.
15 E non facciavi Ezechia confidar nel Signore, dicendo: Il Signore per certo ci libererà; questa città non sarà data nelle mani del re di Assiria.
१५परमेश्वर आम्हास खात्रीने सोडवील; हे नगर अश्शूर राजाच्या हाती दिले जाणार नाही, असे बोलून हिज्कीयाने तुम्हास परमेश्वरावर भरवसा ठेवायला लावू नये.”
16 Non ascoltate Ezechia; perciocchè così ha detto il re di Assiria: Fate pace meco, ed uscite a me; e ciascun di voi mangi della sua vite, e del suo fico, e beva dell'acqua della sua cisterna;
१६हिज्कीयाचे ऐकू नका, कारण अश्शूरचा राजा असे म्हणतोः माझ्याशी शांतीचा करार करा आणि माझ्याकडे बाहेर या, नंतर प्रत्येकजण आपापल्या द्राक्षवेलाचे व आपापल्या अंजिराचे फळ खा आणि प्रत्येकजण आपल्या स्वत: च्या टाकीतले पाणी प्या.
17 finchè io venga, e vi meni in un paese simile al vostro; in un paese di frumento e di mosto, in un paese di pane e di vigne.
१७मी येईन आणि जो देश तुमच्या स्वतःच्या देशासारखा आहे, धान्याचा व नव्या द्राक्षरसाचा देश, भाकरीचा व द्राक्षमळ्याचा देश, त्यामध्ये मी तुम्हास नेईपर्यंत तुम्ही असे करा.
18 [Guardatevi] che Ezechia non vi seduca, dicendo: Il Signore ci libererà. Ha alcuno degl'iddii delle genti potuto liberare il suo paese dalla mano del re di Assiria?
१८परमेश्वर आपल्याला सोडवील असे सांगून हिज्कीयाने तुम्हास चुकीचा मार्ग दाखवू नये. अश्शूर राज्याच्या सामर्थ्यापासून कोणत्या राष्ट्रातील देवाने आपल्या लोकांस सोडवीले आहे काय?
19 Dove [son] gl'iddii di Hamat, e di Arpad? Dove gl'iddii di Sefarvaim? ed hanno pure essi liberata Samaria di mano mia?
१९हमाथ आणि अर्पद यांचे देव कोठे आहेत? सफरवाईमचे देव कोठे आहेत? त्यांनी शोमरोनाला माझ्या सामर्थ्यापासून सोडविले काय?
20 Quali [son quei dii], fra tutti gl'iddii di que' paesi, che abbiano liberato il lor paese di mano mia, che il Signore abbia da liberare Gerusalemme di mano mia?
२०ज्यांनी आपला देश माझ्या सामर्थ्यापासून सोडवला आहे, असे या देशांच्या सर्व देवांपैकी कोण आहेत, तर परमेश्वर माझ्या हातून यरूशलेम सोडवील काय?
21 Ed [il popolo] tacque, e non gli rispose nulla; perciocchè tale era il comandamento del re: Non gli rispondete nulla.
२१पण लोक शांत राहीले, आणि त्यांनी काहीच उत्तर दिले नाही, कारण त्यास उत्तर देऊ नका अशी राजाची आज्ञा होती.
22 Ed Eliachim, figliuolo di Hilchia, mastro del palazzo, e Sebna, segretario, e Ioa, figliuolo di Asaf, cancelliere, vennero ad Ezechia, con le vesti stracciate, e gli rapportarono le parole di Rab-sache.
२२नंतर हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम जो घरावरचा कारभारी होता, शेबना चिटणीस व आसाफाचा मुलगा यवाह इतिहास लेखक हे आपले कपडे फाडून हिज्कीयाकडे आले व त्यांनी त्यास रब-शाकेचे शब्द सांगितले.