< Colossesi 2 >
1 Voglio infatti che sappiate quale dura lotta io devo sostenere per voi, per quelli di Laodicèa e per tutti coloro che non mi hanno mai visto di persona,
१कारण माझी इच्छा आहे की, तुमच्यासाठी व त्याचप्रमाणे जे लावदीकिया शहरात आहेत आणि ज्यांनी मला शारीरीकरित्या पाहिलेले नाही, अशा तुम्हा सर्वांसाठी माझा लढा किती मोठा आहे हे तुम्हास समजून,
2 perché i loro cuori vengano consolati e così, strettamente congiunti nell'amore, essi acquistino in tutta la sua ricchezza la piena intelligenza, e giungano a penetrare nella perfetta conoscenza del mistero di Dio, cioè Cristo,
२ते परिश्रम ह्यांसाठी की, त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे आणि तुम्ही प्रीतीत एकत्र जोडले जावे. बुद्धीची पूर्ण खातरी विपुलतेने मिळावी व देवाचे रहस्य म्हणजे ख्रिस्त ह्यांचे पूर्ण ज्ञान त्यास व्हावे.
3 nel quale sono nascosti tutti i tesori della sapienza e della scienza.
३त्याच्यात सर्व ज्ञानीपणाचे व ज्ञानाचे धन लपलेले आहेत.
4 Dico questo perché nessuno vi inganni con argomenti seducenti,
४कोणी तुम्हास लाघवी भाषणांनी फसवू नये म्हणून मी हे सांगत आहे.
5 perché, anche se sono lontano con il corpo, sono tra voi con lo spirito e gioisco al vedere la vostra condotta ordinata e la saldezza della vostra fede in Cristo.
५कारण मी देहाने दूर असलो तरी मनाने तुमच्याजवळ आहे आणि तुमची व्यवस्था व तुमच्यात असलेल्या ख्रिस्तावरील विश्वासाचा स्थिरपणा पाहून मी आनंद करीत आहे.
6 Camminate dunque nel Signore Gesù Cristo, come l'avete ricevuto,
६आणि म्हणून, ख्रिस्त येशू जो प्रभू ह्याला तुम्ही जसे स्वीकारले आहे तसे तुम्ही त्याच्यात चाला.
7 ben radicati e fondati in lui, saldi nella fede come vi è stato insegnato, abbondando nell'azione di grazie.
७तुम्ही त्याच्यात मुळावलेले आणि त्याच्यावर उभारलेले व तुम्हास शिक्षण दिल्याप्रमाणे तुम्ही विश्वासात स्थिरावलेले होऊन, उपकारस्मरण करीत, त्यामध्ये वाढत जा.
8 Badate che nessuno vi inganni con la sua filosofia e con vuoti raggiri ispirati alla tradizione umana, secondo gli elementi del mondo e non secondo Cristo.
८तुम्ही अशी काळजी घ्या की, कोणी मनुष्यांच्या संप्रदायास अनुसरून, जगाच्या मूलतत्त्वांस अनुसरून असणार्या तत्त्वज्ञानाने व त्याच्या पोकळ फसवेपणाने तुम्हास ताब्यात घेऊ नये; ते ख्रिस्ताला अनुसरून नाही.
9 E' in Cristo che abita corporalmente tutta la pienezza della divinità,
९कारण ख्रिस्ताच्या ठायीच देवपणाची सर्व पूर्णता शरीरधारी होऊन त्याच्यात राहते.
10 e voi avete in lui parte alla sua pienezza, di lui cioè che è il capo di ogni Principato e di ogni Potestà.
१०तो सर्व सत्ता व शक्ती ह्यांवर मस्तक असून त्याच्याठायी तुम्ही पूर्ण झाला आहा,
11 In lui voi siete stati anche circoncisi, di una circoncisione però non fatta da mano di uomo, mediante la spogliazione del nostro corpo di carne, ma della vera circoncisione di Cristo.
११आणि ख्रिस्ताच्या सुंताविधीने तुमचे पापमय दैहिक शरीर काढले जाऊन, कोणी हातांनी न केलेल्या सुंताविधीने तुमचीही त्यांच्यात सुंता झाली आहे.
12 Con lui infatti siete stati sepolti insieme nel battesimo, in lui anche siete stati insieme risuscitati per la fede nella potenza di Dio, che lo ha risuscitato dai morti.
१२त्याच्याबरोबर तुम्ही बाप्तिस्म्यात पुरले गेला व ज्याने त्यास मरण पावलेल्यातून उठवले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाद्वारे तुम्ही त्यामध्येच त्याच्याबरोबर उठवले गेला,
13 Con lui Dio ha dato vita anche a voi, che eravate morti per i vostri peccati e per l'incirconcisione della vostra carne, perdonandoci tutti i peccati,
१३आणि तुम्ही जे तुमच्या अपराधांमुळे व देहस्वभावाची सुंता न झाल्यामुळे मरण पावलेले होता त्या तुम्हास देवाने त्याच्याबरोबर जिवंत केले आहे. त्याने आपल्या अपराधांची क्षमा केली आहे;
14 annullando il documento scritto del nostro debito, le cui condizioni ci erano sfavorevoli. Egli lo ha tolto di mezzo inchiodandolo alla croce;
१४आणि आपल्या आड येणारा जो नियमांचा हस्तलेख आपल्याविरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्याने खोडले व तो त्याने वधस्तंभाला खिळून ते त्याने रद्द केले.
15 avendo privato della loro forza i Principati e le Potestà ne ha fatto pubblico spettacolo dietro al corteo trionfale di Cristo.
१५त्याने त्यावर सत्तांना व शक्तींना निःशस्त्र केले व त्यांच्यावर जय मिळवून त्यांचे उघड प्रदर्शन केले.
16 Nessuno dunque vi condanni più in fatto di cibo o di bevanda, o riguardo a feste, a noviluni e a sabati:
१६म्हणून तुमच्या खाण्यापिण्यावरून, सण, अमावस्या किंवा शब्बाथ पाळण्यावरून कोणाला तुमचा न्याय करू देऊ नका.
17 tutte cose queste che sono ombra delle future; ma la realtà invece è Cristo!
१७या गोष्टी तर येणार्या गोष्टींची छाया अशा आहेत; पण शरीर ख्रिस्ताचे आहे.
18 Nessuno v'impedisca di conseguire il premio, compiacendosi in pratiche di poco conto e nella venerazione degli angeli, seguendo le proprie pretese visioni, gonfio di vano orgoglio nella sua mente carnale,
१८लीन म्हणवून घेण्याच्या इच्छेने व देवदूतांची उपासना करणाऱ्या, स्वतःला दिसलेल्या गोष्टीवर अवलंबून राहणाऱ्या व दैहिक मनाने विनाकारण गर्वांने फुगणाऱ्या कोणा मनुष्यास तुम्हास तुमच्या बक्षिसास मुकवू देऊ नका;
19 senza essere stretto invece al capo, dal quale tutto il corpo riceve sostentamento e coesione per mezzo di giunture e legami, realizzando così la crescita secondo il volere di Dio.
१९असा मनुष्य मस्तकाला धरून राहत नाही; त्या मस्तकापासून सर्व शरीराला सांधे व बंधने ह्यांच्या द्वारे पुरवठा होत आहे व ते दृढ जडले जात असता त्याची दैवी वाढ होते.
20 Se pertanto siete morti con Cristo agli elementi del mondo, perché lasciarvi imporre, come se viveste ancora nel mondo, dei precetti quali
२०म्हणून जगाच्या मूलतत्त्वांना तुम्ही ख्रिस्ताबरोबर मरण पावला आहात, तर जगात जगत असल्याप्रमाणे तुम्ही नियमाधीन का होता?
21 «Non prendere, non gustare, non toccare»?
२१शिवू नको, चाखू नको, हातात घेऊ नको
22 Tutte cose destinate a scomparire con l'uso: sono infatti prescrizioni e insegnamenti di uomini!
२२अशा नियमांतील सर्व गोष्टी या उपभोगाने नष्ट होणार्या गोष्टी आहेत.
23 Queste cose hanno una parvenza di sapienza, con la loro affettata religiosità e umiltà e austerità riguardo al corpo, ma in realtà non servono che per soddisfare la carne.
२३या गोष्टींत स्वेच्छेची उपासना, मनाची लीनता व शरीराची उपेक्षा असल्यामुळे ह्यात खरोखर ज्ञानीपणाची भाषा आहे, पण देहाच्या लालसेला प्रतिबंध करण्याची योग्यता नाही.