< Filimoni 1 >
1 Paulo mutungwa wang'wa Yesu Klisto, hangi indugu nu Timoteo kung'wa Filimoni, molowa muhumba miitu hangi mitumi mulimu palung'we nusese,
१पौल, ख्रिस्त येशूचा बंदिवान आणि भाऊ तीमथ्य यांच्याकडून; आमचा प्रिय आणि सोबतीचा कामकरी फिलेमोन ह्यास,
2 nukung'wa Afia dada witu nu kung'wa Arkapas meitu nukiteekelo nilukutukilwa mito lako.
२आणि बहीण अफ्फिया हिला व अर्खिप आमचा सोबतीचा शिपाई यास व तुझ्या घरी जी ख्रिस्ती मंडळी आहे तिला,
3 Uukende utule nunyee nuupolo nuupumile kung'witunda tata witu nukung'wa mukulu u Yesu Klisto.
३देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हास कृपा व शांती असो.
4 Matungo iihi numusongeye idunda nuukuta mumalompiane.
४मी आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा तुझी आठवण करून, माझ्या देवाची उपकारस्तुती करतो;
5 Nigulye uulowa nuuhueli nutite kung'wa mkulu u Yesu kunsoko auhuli ehi.
५कारण प्रभू येशूवर तुझा जो विश्वास आहे आणि सर्व पवित्रजनांवर तुझी जी प्रीती आहे, त्यांविषयी मी ऐकले आहे.
6 Kulompa itee wihangueli nuuhoeli wanyu, utule uza kumanye kela lukani nuluzepie pa ng'wanyu nukung'wa Kilisto.
६आणि मी अशी प्रार्थना करतो की तुम्हामध्ये असलेल्या ख्रिस्त येशूतल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचे पूर्ण ज्ञान झाल्याने तुझे विश्वासातील सहभागीपण कार्यकारी व्हावे.
7 Ingi nainandoilwe nuupolo, kunsoko aulowa wako, kunsoko inkolo yaahueli yakendakilagigwa nuewe mulana.
७कारण तुझ्या प्रीतीमुळे मला फार आनंद व सांत्वन झाले आहे कारण हे बंधू, तुझ्याकडून पवित्र जनांची अंतःकरणे समाधान पावली आहेत.
8 Kuite gwa nkete uugimya wihi mung'wa Kilisto, kuuila uwe witume kehi nuuhumile kituma.
८याकरिता जे योग्य ते तुला आज्ञा करून सांगण्याचे जरी मला ख्रिस्ताद्वारे पूर्ण धैर्य आहे.
9 Ingi gwa kunsoko aulowa, kuleka gwa ite kuupepelya nene, nene numunyampala, nitungelega ntungilwe nsoko ang'wa Kilisto u Yesu.
९तरी प्रीतीस्तव विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पौल आणि आता ख्रिस्त येशूसाठी बंदिवान.
10 Kuupepelya nsoko ang'waane Onesmo, nene numutungile muutugwa wane.
१०मी बंधनात असता ज्याला आध्यात्मिक जन्म दिला ते माझे लेकरू अनेसिम ह्याच्याविषयी तुला विनंती करतो.
11 Kunsoko pang'wandyo shanga akuloeye, ingi itungile uukuloeye uewe nunene.
११तो पूर्वी तुला निरुपयोगी होता पण आता, तुला व मला दोघांनाही उपयोगी आहे.
12 Namulagilya ung'wenso nukete inkolo anga nane lukulu kusuka kung'wako.
१२म्हणून मी त्यास म्हणजे माझ्या जिवालाच, तुझ्याकडे परत पाठवले आहे.
13 Azansigile azuzasaga palung'we nunene, ili wanintumile badalako, matungo nukole mukitungo nsoko ainjili.
१३सुवार्तेमुळे मी बंधनात पडलो असता तुझ्याऐवजी त्याने माझी सेवा करावी म्हणून त्यास जवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते.
14 Ingegwa singa azaneloilwa kitume lukani lehi bila kugombiigwa nueewe. Nitumile ite kunsoko lukani nuluza, lulekekitung'wa kunsoko akumiiligwa, kunsoko auloilwe uewe kituma.
१४पण, तुझ्या संमतीशिवाय काही करणे मला बरे वाटले नाही, ह्यासाठी की, तुझा उपकार जुलमाने झाल्यासारखा नसावा तर खुशीने केलेला असावा.
15 Ang'we nsoko aubague nuewe kumatungo aituile ite nsoko utule palong'we nong'wenso matungo ehi. (aiōnios )
१५कदाचित तो तुझ्यापासून ह्यामुळेच काही वेळ वेगळा झाला असेल की, त्याने सर्वकाळासाठी तुझे व्हावे. (aiōnios )
16 Nsoko itee alekekutula mutungwa hangi, inge bahu lukulu amutungwa, anga muluna muulowa, hasa kung'wane kukila kung'wako, mumwele nukung'wa mukulu.
१६त्याने आजपासून केवळ दासच नव्हे तर दासापेक्षा श्रेष्ठ, म्हणजे प्रिय बंधू, असे व्हावे, मला तो विशेष प्रिय आहे आणि तुला तर तो देहदृष्ट्या व प्रभूच्या ठायी ह्याहून कितीतरी अधिक प्रिय असावा.
17 Ne itegwa kang'wi unihoee unene anga nipalung'wi, anga nazuze nsigilya unee.
१७म्हणून जर तू मला आपला भागीदार समजतोस, तर तो मीच आहे असे मानून त्याचा स्वीकार कर.
18 Kuite angeze umukosee lukani lehi, kang'we uzumudaiye kentu kehi, kedai nekanso kitalane.
१८त्याने तुझे काही नुकसान केले असेल किंवा तो तुझे काही देणे लागत असेल तर ते माझ्या हिशोबी मांड.
19 Nene Paulo nuukuandika kumukono wane unene une kuulipa. Singa kulunga kung'wako ingi nukudaiye mulikalo lako itai.
१९मी पौल हे स्वहस्ते लिहित आहे; मी स्वतः त्याची फेड करीन. शिवाय तू स्वतःच माझे ऋण आहेस, पण याचा उल्लेख मी करीत नाही.
20 Hange muluna, lekampate uulowa wa mukulu kupuma kitalako niloeye munkolo ane kong'wa Kilisto.
२०हे बंधू, प्रभूच्या ठायी माझ्यावर एवढा उपकार कर; ख्रिस्ताच्या ठायी माझ्या जिवाला विश्रांती दे.
21 Nkete uhuili kutula ni ikulyo nilako, nukuukilisilya nize ningile kina ukituma ga ikilo nianso ni nukulagilye.
२१तू हे मान्य करशील अशा भरवशाने मी तुला लिहिले आहे; आणि मी जाणतो की, तू माझ्या म्हणण्यापेक्षा अधिकही करशील.
22 Matungo yayoyayo zepelya shumba kaageni konsoko ane inge itegwa nihuie kuukeila malompi ako, kuugendelela matungo makupe.
२२शिवाय माझ्यासाठी राहण्याची व्यवस्था करून ठेव कारण तुमच्या प्रार्थनांमुळे माझे तुमच्याकडे येणे होईल अशी आशा मी करत आहे.
23 Epafla mutungwa miane mung'wa Kilisto Yesu akuulamusha,
२३ख्रिस्त येशूमध्ये माझा सहबंदिवान एपफ्रास, हा तुला नमस्कार पाठवत आहे;
24 anga uu nukituma uMaliko, Alistalko, Dema, Luka, ituma milimo palung'wi nunene.
२४आणि तसेच माझे सहकारी मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक हे तुला नमस्कार सांगतात.
25 Ukende wang'wa Bwana u Yesu Kilisto utule palung'we ni nkolo ako. Huila.
२५आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्या आत्म्यासोबत असो. आमेन.