< 1 Thesalonike 3 >

1 Ku lulo, nai katulaa shanga kuhumile kugimya ikilo, ai kusigile kina ai ituile iziza kusaga kuko ku Athene king'wene duu.
म्हणून आमच्याने आणखी दम धरवेना, तेव्हा आम्ही अथेनै शहरातच एकटे मागे रहावे, हे आम्हास बरे वाटले.
2 Kikamulagiilya uTimotheo, muluna itu hangi munya milimo nuang'wa Itunda mu nkani ninza niang'wa Kristo, kumuika ikaku nu kumupoeelya kukaminkana nu uhuiili nuanyu.
आणि आम्ही आपला बंधू तीमथ्य, ख्रिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक ह्याला ह्यासाठी पाठवले की, त्याने तुम्हास स्थिर करावे आणि तुमच्या विश्वासाच्या वाढीविषयी उपदेश करावा;
3 Ai kitumile aya iti kisigo aleke kutula umoli wihi nua ku nkukankuka kupumiila nu lwago ulu, kunsoko akola mulingile kina kakondya sagulwa ku nsoko a ili.
तो असा की, या संकटात कोणी घाबरू नये; कारण आपण ह्यासाठीच नेमिलेले आहोत. हे तुम्ही स्वतः जाणून आहात.
4 Ku tai, itungo nai kukoli palung'wi nu nyenye, ai katongela kumuganuila nia kina ai katulaa pakupi kulija u lwago, nayo ai apumie anga nai mulingile.
कारण आम्ही तुम्हाजवळ होतो तेव्हा आम्ही तुम्हास सांगून ठेवले की, आपल्याला संकटे भोगावयाची आहेत आणि त्याप्रमाणे घडलेही, हे तुम्हास माहीतच आहे.
5 Ku nsoko ili, nai natulaa nemilwe kugimya hangi, ai ndagiiye iti kusiga ndije kulinga migulya a uhuiili nuanyu. Anga itye u mugemi ai watulaa bahu wamugemaa, nu mulimo nuitu utule nankanda.
ह्यामुळे मलाही आणखी दम धरवेना, म्हणून मी तुमच्या विश्वासासंबंधाने विचारपूस करण्याचे पाठवले; कोण जाणे, कदाचित परीक्षकाने तुम्हास मोह घातल्याने आमचे श्रम व्यर्थ झाले असतील.
6 Kuiti uTimotheo ai uzile kitaitu kupembelya kitalanyu nu ku uletela inkani ni nkende migulya a uhuiili nu ulowa nuitu. Ai ukutambuie ni yakina mukete u ukimbukiilyi nu uziza migulya itu, ni kina mukete nsula kuihenga anga niiza usese kihung'waa nsula kumihenga unyenye.
आता तीमथ्याने तुम्हापासून आम्हाकडे येऊन, तुमचा विश्वास व प्रीती ह्यांविषयी आणि जसे आम्ही तुम्हास भेटावयास उत्कंठित आहोत तसे तुम्हीही आम्हास भेटावयास उत्कंठित असून आमची प्रेमाने नेहमी आठवण करता ह्याविषयीची शुभवर्तमान आम्हाकडे आणले;
7 Ku nsoko a ili, aluna ai kipoelya nangaluu nu nyenye ku nsoko a uhuiili nuanyu, mu lwago nu wagigwa nuitu wihi.
ह्यामुळे बंधूनो, आम्हास आपल्या सर्व अडचणीत व संकटात तुमच्या विश्वासावरून तुम्हाविषयी समाधान मिळाले;
8 Ku itungili kikie, anga mi mike ikomo ku Mukulu,
कारण जर तुम्ही प्रभूमध्ये खंबीरपणे टिकता तर आता आम्ही जिवात जीव आल्यासारखे राहतो.
9 Ku iti ingi ilumbi ni niuli kuminkiilye Itunda ku nsoko anyu, ku iloeelya lihi ni kukete ntongeela ang'wa Itunda migulya anyu?
कारण आपल्या देवापुढे, आम्ही तुमच्याकरता, ज्या सर्व आनंदामुळे आनंद करतो त्याबद्दल आम्ही देवाला तुमच्याकरीता काय धन्यवाद देऊ शकणार?
10 Kulompile nangaluu utiku nu mung'wi iti kuhume kihenga u usu nuanyu nu kumongeelya ni kikepile mu uhuiili nuanyu.
१०आम्ही रात्रंदिवस पुष्कळ प्रार्थना करतो की, आम्ही तुम्हास तोंडोतोंड पाहावे आणि तुमच्या विश्वासांतील उणे आहे ते पूर्ण करावे.
11 Itunda itu hangi Tata mukola, nu Mukulu itu uYesu wakutongeele i nzila yitu kupike kitalanyu.
११देव, आपला पिता हा स्वतः व आपला प्रभू येशू हा, आमचे तुम्हाकडे येणे कुठलीही अडचण न येता होऊ देवो;
12 Nu Mukulu amuike mongeeleke nu kukila mu ulowa, muze miloilwe nu kualowa i antu ihi, anga ni kimutendeela unyenye.
१२आणि जशी आमची प्रीती तुम्हावर आहे, तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर व सर्वांवर वाढवून विपुल करो;
13 Nu itume izi iti kuikomya inkolo nianyu itule shanga nu utukwi mu welu ntongeela ang'a Itunda nuitu hangi Tata nuitu mu upembyi nua Mukulu uYesu palung'wi ni elu akwe ihi.
१३ह्यासाठी की, आपला प्रभू येशू आपल्या सर्व पवित्र जनांसह येईल त्यावेळेस त्याने तुमची अंतःकरणे देव आपला पिता ह्याच्यासमोर पवित्रतेत निर्दोष होण्यासाठी स्थिर करावी.

< 1 Thesalonike 3 >