< Zsoltárok 25 >
1 Dávidé. Hozzád emelem, Uram, lelkemet!
१दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, मी आपला जीव तुझ्याकडे उंचावतो.
2 Istenem, benned bízom; ne szégyenüljek meg; ne örüljenek rajtam ellenségeim.
२माझ्या देवा, तुझ्यात माझा विश्वास आहे. मला निराश होऊ देऊ नको, माझे शत्रू माझ्यावर हर्ष न करोत.
3 Senki se szégyenüljön meg, a ki téged vár; szégyenüljenek meg, a kik ok nélkül elpártolnak tőled.
३तुझ्या विश्वासणाऱ्याची कधी निराशा होत नाही. परंतु जे कारण नसताना विश्वासघात करतात, ते लाजवले जातील.
4 Útjaidat, Uram, ismertesd meg velem, ösvényeidre taníts meg engem.
४हे परमेश्वरा तुझे मार्ग मला कळव, मला तुझे मार्ग शिकव.
5 Vezess engem a te igazságodban és taníts engem, mert te vagy az én szabadító Istenem, mindennap várlak téged.
५तू आपल्या सत्यात मला मार्ग दाखव आणि मला शिकव. कारण तू माझा तारणारा देव आहेस मी रोज तुझी वाट पाहतो.
6 Emlékezzél meg, Uram, irgalmasságodról és kegyelmedről, mert azok öröktől fogva vannak.
६हे परमेश्वरा, तुझ्या दयाळू कृत्यांची आणि प्रेमदयेची आठवण कर.
7 Ifjúságomnak vétkeiről és bűneimről ne emlékezzél meg; kegyelmed szerint emlékezzél meg rólam, a te jóvoltodért, Uram!
७हे परमेश्वरा, माझे तरुणपणाचे पाप आणि माझा बंडखोरपणा आठवू नको. तू आपल्या प्रेमदयेला अनुसरून आपल्या चांगुलपणामुळे माझी आठवण कर.
8 Jó és igaz az Úr, azért útba igazítja a vétkezőket.
८परमेश्वर चांगला आणि प्रामाणिक आहे. यास्तव तो पाप्यांस मार्ग शिकवतो.
9 Igazságban járatja az alázatosokat, és az ő útjára tanítja meg az alázatosokat.
९तो नम्र जणांस न्यायाने मार्गदर्शन करतो. आणि दीनांना आपला मार्ग शिकवीतो.
10 Az Úrnak minden útja kegyelem és hűség azoknak, a kik szövetségét és bizonyságait megtartják.
१०जे त्याचे करार आणि वचने पाळतात त्यांच्यासाठी परमेश्वराचे मार्ग प्रेमदया व विश्वासयोग्य आहेत.
11 A te nevedért, Uram, bocsásd meg bűnömet, mert sok az.
११परमेश्वरा, तुझ्या नामास्तव, माझ्या अपराधांची क्षमा कर, कारण ते खूप आहेत.
12 Kicsoda az, a ki féli az Urat? Megmutatja annak az útat, a melyet válaszszon.
१२परमेश्वराचे भय धरतो असा मनुष्य कोण आहे? प्रभू त्यास सूचना देईल, की त्याने कोणते मार्ग निवडावे.
13 Annak lelke megmarad a jóban, és magzatja örökli a földet.
१३त्याचे जीवन चांगुलपणात जाईल, आणि त्याची संतान भूमीचे वतन पावतील.
14 Az Úr bizodalmas az őt félőkhöz, és szövetségével oktatja őket.
१४परमेश्वराचे सत्य त्याचे अनुकरण करणाऱ्यांबरोबर असते. आणि तो त्याचे करार कळवतो.
15 Szemeim mindenha az Úrra néznek, mert ő húzza ki a tőrből lábamat.
१५मी नेहमी परमेश्वराकडे आपली दृष्टी लावतो. कारण तो माझे पाय जाळ्यातून मुक्त करतो.
16 Tekints reám és könyörülj rajtam, mert árva és szegény vagyok.
१६परमेश्वरा माझ्याकडे फिर आणि माझ्यावर दया कर. कारण मी एकटा आणि पीडलेला आहे.
17 Eláradtak szívemnek szorongásai, nyomorúságaimból szabadíts meg engem.
१७माझ्या हृदयाचा त्रास वाढला आहे, संकटातून मला तू काढ.
18 Lásd meg szegénységemet és gyötrelmemet; bocsásd meg minden bűnömet.
१८परमेश्वरा, माझे दु: ख आणि कष्ट बघ, माझ्या सर्व पापांची क्षमा कर.
19 Lásd meg ellenségeimet, mert megsokasodtak, és gyilkos gyűlölséggel gyűlölnek engem.
१९माझ्या सर्व शत्रूंकडे पाहा, कारण ते पुष्कळ आहेत. ते माझा कठोरपणे तिरस्कार करतात.
20 Őrizd meg lelkemet és szabadíts meg engem; ne szégyenüljek meg, hogy benned bíztam.
२०देवा, माझे रक्षण कर आणि मला वाचव. माझा तुझ्यावर विश्वास आहे, तेव्हा माझी निराशा करू नकोस.
21 Ártatlanság és becsület védelmezzenek meg engem, mert téged várlak.
२१तुझा प्रामाणिकपणा आणि सरळपणा माझे रक्षण करोत. कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे.
22 Mentsd ki, Isten, Izráelt minden bajából.
२२देवा, इस्राएलाच्या लोकांस त्यांच्या सर्व त्रासांपासून सोडव.