< Zsoltárok 130 >
1 Grádicsok éneke. A mélységből kiáltok hozzád, Uram!
१हे परमेश्वरा, मी तुला शोकसागरातून आरोळी मारीत आहे.
2 Uram, hallgasd meg az én szómat; legyenek füleid figyelmetesek könyörgő szavamra!
२हे प्रभू, माझी वाणी ऐक; माझ्या विनवणीच्या वाणीकडे तुझे कान लक्षपूर्वक लागलेले असोत.
3 Ha a bűnöket számon tartod, Uram: Uram, kicsoda maradhat meg?!
३हे परमेश्वरा, तू जर अन्याय लक्षात ठेवशील तर, हे प्रभू, तुझ्यासमोर कोण उभा राहू शकेल?
4 Hiszen te nálad van a bocsánat, hogy féljenek téged!
४पण त्यांनी तुझे भय धरावे, म्हणून तुझ्याजवळ क्षमा आहे.
5 Várom az Urat, várja az én lelkem, és bízom az ő igéretében.
५मी परमेश्वराची वाट पाहतो, माझा आत्मा वाट पाहतो, आणि त्याच्या वचनावर मी आशा ठेवतो.
6 Várja lelkem az Urat, jobban, mint az őrök a reggelt, az őrök a reggelt.
६पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यापेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो.
7 Bízzál Izráel az Úrban, mert az Úrnál van a kegyelem, és bőséges nála a szabadítás!
७हे इस्राएला, परमेश्वरावर आशा ठेव. कारण परमेश्वर दयाळू आहे, आणि त्याच्याजवळ विपुल उद्धार आहे.
8 Meg is szabadítja ő Izráelt minden ő bűnéből.
८तोच इस्राएलास त्यांच्या सर्व पापांपासून मुक्त करीन.