< Példabeszédek 14 >
1 A bölcs asszony építi a maga házát; a bolond pedig önkezével rontja el azt.
१सुज्ञ स्त्री आपले घर बांधते, पण मूर्ख स्त्री आपल्या स्वतःच्या हाताने ते खाली पाडते.
2 A ki igazán jár, féli az Urat; a ki pedig elfordult az ő útaiban, megútálja őt.
२जो सरळपणे चालतो तो परमेश्वराचे भय धरतो, पण जो कोणी आपल्या मार्गात अप्रामाणिक आहे तो त्यास तुच्छ मानतो.
3 A bolondnak szájában van kevélységnek pálczája; a bölcseknek pedig beszéde megtartja őket.
३मूर्खाच्या मुखातून त्याच्या गर्वाची काठी निघते, पण सुज्ञाची वाणी त्याची जोपासना करते.
4 Mikor nincsenek ökrök: tiszta a jászol; a gabonának bősége pedig az ökörnek erejétől van.
४गुरेढोरे नसले तर गोठा स्वच्छ राहतो, पण बैलाच्या बलाने विपुल पिक येऊ शकते.
5 A hűséges tanú nem hazud; a hamis tanú pedig hazugságot bocsát szájából.
५विश्वासू साक्षीदार खोटे बोलत नाही, पण खोटा साक्षीदार मुखाने लबाड्या करतो.
6 A csúfoló keresi a bölcseséget, és nincs; a tudomány pedig az eszesnek könnyű.
६निंदक ज्ञानाचा शोध करतो आणि काहीच मिळत नाही, पण जो कोणी बुद्धिमान आहे त्यास ज्ञान मिळवणे सोपे आहे.
7 Menj el a bolond férfiú elől; és nem ismerted meg a tudománynak beszédét.
७मूर्ख मनुष्यापासून दूर जा, कारण त्याच्या वाणीत तुला काही ज्ञान सापडणार नाही.
8 Az eszesnek bölcsesége az ő útának megértése; a bolondoknak pedig bolondsága csalás.
८शहाण्याने आपले मार्ग समजणे यामध्ये त्याची सुज्ञता आहे, परंतु मूर्खाचे मूर्खपण कपट आहे.
9 A bolondokat megcsúfolja a bűnért való áldozat; az igazak között pedig jóakarat van.
९मूर्खाला पापार्पणाचे अर्पण थट्टा वाटते, पण सरळांमध्ये परस्पर कृपा असते.
10 A szív tudja az ő lelke keserűségét; és az ő örömében az idegen nem részes.
१०हृदयाला आपल्या स्वतःच्या खेदाची जाणीव असते, आणि त्याच्या आनंदात परक्याला भाग नाही.
11 Az istenteleneknek háza elvész; de az igazaknak sátora megvirágzik.
११दुष्टाच्या घराचा नाश होईल, पण सरळांच्या तंबूची भरभराट होईल.
12 Van olyan út, mely helyesnek látszik az ember előtt, és vége a halálra menő út.
१२मनुष्यास एक मार्ग बरोबर आहे असे वाटते, पण त्याचा शेवट फक्त मरणाकडे नेतो.
13 Nevetés közben is fáj a szív; és végre az öröm fordul szomorúságra.
१३हृदय हसू शकते पण तरी त्यामध्ये वेदना असतात, आणि आनंदाचा शेवट शोकात होतो.
14 Az ő útaiból elégszik meg az elfordult elméjű; önmagából pedig a jó férfiú.
१४जो कोणी अविश्वासू आहे त्यास त्याच्या वागणुकीचे फळ मिळेल, पण चांगल्या मनुष्यास जे काही त्याचे आहे तेच मिळेल.
15 Az együgyű hisz minden dolognak; az eszes pedig a maga járására vigyáz.
१५भोळा प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतो, पण शहाणा मनुष्य आपल्या पावलांविषयी विचार करतो.
16 A bölcs félvén, eltávozik a gonosztól; a bolond pedig dühöngő és elbizakodott.
१६शहाणा मनुष्य भय धरतो आणि वाईटापासून दूर राहतो, पण मूर्ख धिटाईने इशारा विचारात घेत नाही.
17 A hirtelen haragú bolondságot cselekszik, és a cselszövő férfi gyűlölséges lesz.
१७शीघ्रकोपी मूर्खासारख्या गोष्टी करतो, आणि जो वाईट योजना करतो त्या मनुष्याचा द्वेष होतो.
18 Bírják az esztelenek a bolondságot örökség szerint; az eszesek pedig fonják a tudománynak koszorúját.
१८भोळ्यांना मूर्खपणाचे वतन मिळते, पण शहाणे ज्ञानाने वेढलेले असतात.
19 Meghajtják magokat a gonoszok a jók előtt, és a hamisak az igaznak kapujánál.
१९दुर्जन सज्जनापुढे नमतात, आणि नीतिमानाच्या दारापुढे दुष्ट नमतील.
20 Még az ő felebarátjánál is útálatos a szegény; a gazdagnak pedig sok a barátja.
२०गरीब मनुष्याचे स्वतःचे सोबतीसुद्धा द्वेष करतात, पण श्रीमंताला खूप मित्र असतात.
21 A ki megútálja az ő felebarátját, vétkezik; a ki pedig a szegényekkel kegyelmességet cselekszik, boldog az!
२१जो कोणी आपल्या शेजाऱ्याचा तिरस्कार करतो तो पापी आहे, परंतु जो कोणी गरीबावर दया दाखवतो तो आनंदी आहे.
22 Nemde tévelyegnek, a kik gonoszt szereznek? kegyelmesség pedig és igazság a jó szerzőknek.
२२जो दुष्ट योजना आखतो तो चुकीच्या मार्गाने जात नाही का? पण जो कोणी चांगले करण्याची योजना करतो, तो कराराचा विश्वास आणि विश्वसनियता स्वीकारतो.
23 Minden munkából nyereség lesz; de az ajkaknak beszédéből csak szűkölködés.
२३सर्व कष्टात फायदा आहे, पण जेव्हा तेथे फक्त बोलतच राहिलात, ते दारिद्र्याकडे घेऊन जाईल.
24 A bölcseknek ékességök az ő gazdagságuk; a tudatlanok bolondsága pedig csak bolondság.
२४शहाण्याची संपत्ती त्याचा मुकुट आहे, पण मूर्खांची मूर्खता केवळ मूर्खताच आणते.
25 Lelkeket szabadít meg az igaz bizonyság; hazugságokat szól pedig az álnok.
२५खरा साक्षी जीव वाचवतो, पण खोटा साक्षीदार लबाड्या करतो तो दगलबाज आहे.
26 Az Úrnak félelmében erős a bizodalom, és az ő fiainak lesz menedéke.
२६परमेश्वराच्या भयात दृढ विश्वास आहे, आणि त्याच्या मुलांसाठी ती आश्रयस्थान आहेत.
27 Az Úrnak félelme az életnek kútfeje, a halál tőrének eltávoztatására.
२७परमेश्वराचे भय जीवनाचा झरा आहे, याकरिता त्यांनी मरणाच्या जाळ्यापासून दूर रहावे.
28 A nép sokasága a király dicsősége; a nép elfogyása pedig az uralkodó romlása.
२८प्रजावृद्धित राजाचे गौरव सापडते, पण प्रजेशिवाय राजपुत्राचा नाश आहे.
29 A haragra késedelmes bővelkedik értelemmel; a ki pedig elméjében hirtelenkedő, bolondságot szerez az.
२९सहनशील मनुष्य खूप समजदार असतो, पण शीघ्रकोपी मूर्खता उंचावतो.
30 A szelíd szív a testnek élete; az irígység pedig a csontoknak rothadása.
३०शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे, पण मत्सराने हाडे कुजतात.
31 A ki elnyomja a szegényt, gyalázattal illeti annak teremtőjét; az pedig tiszteli, a ki könyörül a szűkölködőn.
३१जो मनुष्य गरीबांवर जुलूम करतो तो त्याच्या निर्माणकर्त्याला शाप देतो, परंतु जो गरजवंतावर दया करतो तो त्याचा सन्मान करतो.
32 Az ő nyavalyájába ejti magát az istentelen; az igaznak pedig halála idején is reménysége van.
३२दुष्ट आपल्या वाईट कृतीने खाली आणला जातो, पण नीतिमानाला मरणाच्या वेळेसही आश्रय मिळतो.
33 Az eszesnek elméjében nyugszik a bölcseség; a mi pedig a tudatlanokban van, magát hamar megismerheti.
३३बुद्धिमानाच्या अंतःकरणात ज्ञान स्थिर असते, पण मूर्खाच्या अंतर्यामात जे असते ते कळून येते.
34 Az igazság felmagasztalja a nemzetet; a bűn pedig gyalázatára van a népeknek.
३४योग्य ते केल्याने राष्ट्राची उन्नती होते, पण पाप लोकांस कलंक आहे.
35 A királynak jóakaratja van az eszes szolgához; haragja pedig a megszégyenítőhöz.
३५शहाणपणाने वागणाऱ्या सेवकावर राजाची मर्जी असते, पण जो लज्जास्पद कृत्य करतो त्याच्यासाठी त्याचा राग आहे.