< Példabeszédek 10 >
1 Salamon bölcs mondásai. A bölcs fiú örvendezteti az ő atyját; a bolond fiú pedig szomorúsága az ő anyjának.
१ही शलमोनाची नितीसूत्रे आहेत. शहाणा मुलगा आपल्या वडिलांना सुखी करतो, पण मूर्ख मुलगा आपल्या आईला दु: खी करतो.
2 Nem használnak a gonoszság kincsei; az igazság pedig megszabadít a halálból.
२दुष्टाईने गोळा केलेली संपत्ती ही कवडी मोलाची असते. पण धार्मिकता मरणापासून दूर ठेवते.
3 Az Úr nem hagyja éhezni az igaznak lelkét; az istenteleneknek kivánságát pedig elveti.
३परमेश्वर चांगल्यांना भुकेले राहू देत नाही, परंतु तो वाईटाची कामना निष्फळ करतो.
4 Szegénynyé lesz, a ki cselekszik rest kézzel; a gyors munkások keze pedig meggazdagít.
४आळशी हात मनुष्याच्या गरीबीस कारण होतात. पण उद्योग्याचा हात संपत्ती मिळवतो.
5 Gyűjt nyárban az eszes fiú; álomba merül az aratás idején a megszégyenítő fiú.
५उन्हाळ्यात जो मुलगा पीक जमा करतो तो शहाणा आहे, परंतु जो मुलगा हंगामात झोपतो त्यास ते लज्जास्पद आहे.
6 Áldások vannak az igaznak fején; az istentelenek szája pedig erőszaktételt fed be.
६नितीमानाच्या मस्तकी आशीर्वाद असतात, पण बलात्कार दुष्टाचे मुख झाकतो.
7 Az igaznak emlékezete áldott; a hamisaknak neve pedig megrothad.
७नितीमानाची जेव्हा आपण आठवण करतो, तेव्हा ते आपणास आनंदित करते; पण वाईट करणाऱ्याचे नाव नष्ट होते.
8 A bölcs elméjű beveszi a parancsolatokat; a bolond ajkú pedig elveszti magát.
८जो समजदार आहे तो आज्ञा मान्य करतो, परंतु बडबड्या मूर्खाची अधोगती होते.
9 A ki tökéletességben jár, bátorsággal jár; a ki pedig elferdíti az ő útát, kiismertetik.
९जो कोणी प्रामाणिकपणे चालतो तो सुरक्षितपणे चालतो, परंतु जो कोणी त्याचे मार्ग वाकडे करतो तो कळून येईल.
10 A ki szemmel hunyorgat, bántást szerez; és a bolond ajkú elesik.
१०जो कोणी डोळे मिचकावतो तो दुःखास कारण होतो, बडबड्या मूर्खाची अधोगती होते.
11 Életnek kútfeje az igaznak szája; az istenteleneknek szája pedig erőszaktételt fedez el.
११नितीमानाचे मुख जीवनाचा झरा आहे, परंतु बलात्कार दुष्टाचे मुख झाकतो.
12 A gyűlölség szerez versengést; minden vétket pedig elfedez a szeretet.
१२द्वेष भांडण उत्पन्न करतो; परंतु प्रीती सर्व अपराधांवर झाकण घालते.
13 Az eszesek ajkain bölcseség találtatik; a vessző pedig a bolond hátának való.
१३विवेकशीलाच्या वाणीत ज्ञान सापडते, परंतु जो अक्कलशून्य असतो त्याच्या पाठीस काठीच योग्य आहे.
14 A bölcsek tudományt rejtegetnek; a bolondnak szája pedig közeli romlás.
१४शहाणे माणसे ज्ञान संग्रह करतात, परंतु मूर्खाचे मुख म्हणजे अरिष्ट जवळ आणते.
15 A gazdagnak marhája az ő megerősített városa; szűkölködőknek romlása az ő szegénységök.
१५श्रीमंताची संपत्ती हे त्याचे बळकट नगर आहे; गरिबांचा नाश त्यांच्या दारिद्र्यात होतो.
16 Az igaznak keresménye életre, az istentelennek jövedelme bűnre van.
१६नीतिमानाचे वेतन जीवनाकडे घेऊन जाणारे आहे; दुर्जनाचा फायदा त्यास पापाकडे घेऊन जाणारा आहे.
17 A bölcseség megőrizőnek útja életre van; a fenyítéket elhagyó pedig tévelyeg.
१७जो कोणी शिस्तीचे अनुसरण करतो तो जीवनाच्या मार्गात आहे, पण जो दोषारोपाला नकार देतो तो चुकीच्या मार्गाने जातो.
18 A ki elfedezi a gyűlölséget, hazug ajkú az; és a ki szól gyalázatot, bolond az.
१८जो कोणी द्वेष लपवून ठेवतो तो लबाड ओठांचा आहे, आणि जो कोणी निंदा पसरवतो तो मूर्ख आहे.
19 A sok beszédben elmaradhatatlan a vétek; a ki pedig megtartóztatja ajkait, az értelmes.
१९जेव्हा पुष्कळ वाचाळता असते, तेथे पापाला कमतरता नाही, परंतु तो जे काही बोलतो ते काळजीपूर्वक आहे, तो सुज्ञ आहे.
20 Választott ezüst az igaznak nyelve; a gonoszok elméje kevés érő.
२०जो कोणी चांगले करतो त्याची जिव्हा शुध्द रुप्यासारखी आहे; पण तेथे दुष्टाच्या हृदयात कवडी किंमत आहे.
21 Az igaznak ajkai sokakat legeltetnek; a bolondok pedig esztelenségökben halnak meg.
२१नीतिमानाचे ओठ पुष्कळांचे पोषण करतात, पण मूर्ख मरतात कारण त्यांच्यात बुद्धीचा अभाव असतो.
22 Az Úrnak áldása, az gazdagít meg, és azzal semmi nem szerez bántást.
२२परमेश्वराचे आशीर्वाद चांगली संपत्ती आणते, आणि त्यामध्ये तो अधिक दुःख देत नाही.
23 Miképen játék a bolondnak bűnt cselekedni, azonképen az eszes férfiúnak bölcsen cselekedni.
२३दुष्कर्म करणे मूर्खाला खेळ असे आहे, परंतु सुज्ञ मनुष्यास ज्ञानात आनंद आहे.
24 A mitől retteg az istentelen, az esik ő rajta; a mit pedig kivánnak az igazak, meg lesz.
२४दुष्ट ज्याला भितो ते त्याच्यावर येईल, पण नीतिमानाची इच्छा मान्य होईल.
25 A mint a forgószél ráfuvall, már oda van az istentelen; az igaznak pedig örökké való fundamentoma van.
२५दुष्ट वावटळीसारखे आहेत ती येऊन जाते आणि तसा तो नाहीसा होतो, पण जो चांगले करतो तो सर्वकाळ टिकणाऱ्या पायासारखा आहे.
26 Minémű az eczet a fogaknak és a füst a szemeknek, olyan a rest azoknak, a kik azt elküldötték.
२६जशी आंब दातांना आणि जसा धूर डोळ्यांना, तसा आळशी त्यास पाठवणाऱ्यांना आहे.
27 Az Úrnak félelme hosszabbítja meg a napokat; az istenteleneknek pedig esztendeik megrövidülnek.
२७परमेश्वराचे भय आयुष्याचे दिवस वाढवते, पण दुष्टाचे वर्ष कमी होतील.
28 Az igazaknak reménysége öröm; az istenteleneknek várakozása pedig elvész.
२८नीतिमानाची आशा त्यांचा आनंद होईल, पण दुष्टाची वर्षे कमी होतील.
29 Erősség a tökéletesnek az Úrnak úta: de romlás a hamisság cselekedőinek.
२९जो कोणी प्रामाणिक आहे परमेश्वर त्याचे रक्षण करील, दुष्कर्म करणाऱ्यांना तो नाशकारक आहे.
30 Az igaz soha meg nem mozdul; de az istentelenek nem lakják a földet.
३०नीतिमान कधीही उलथून टाकले जाणार नाहीत, परंतु दुष्ट देशात राहणार नाहीत.
31 Az igaznak szája bőségesen szól bölcsességet; a gonoszság nyelve pedig kivágatik.
३१नीतिमानाच्या मुखातून ज्ञानाचे फळ निघते, पण कपटी जीभ कापली जाईल.
32 Az igaznak ajkai azt tudják, a mi kedves; az istenteleneknek szája pedig a gonoszságot.
३२नीतिमानाला जे काही स्वीकारणीय ते त्यांच्या ओठास कळते, पण दुष्टाच्या मुखास, जे कुटिल बोलणे आहे ते समजते.