< 3 Mózes 27 >
1 Szóla ismét az Úr Mózesnek, mondván:
१परमेश्वर मोशेला म्हणाला,
2 Szólj Izráel fiainak, és mondd meg nékik: Ha valaki fogadásul a te becslésed szerint való személyeket szentel az Úrnak:
२इस्राएल लोकांस सांग: एखाद्या मनुष्याने परमेश्वरास मानवाचा विशेष नवस केला तर त्या मनुष्याचे मोल याजकाने याप्रमाणे ठरवावे.
3 Akkor, ha férfit kell becslened, húsz esztendőstől hatvan esztendősig ötven ezüst siklusra becsüljed, a szent siklus szerint.
३वीस ते साठ वर्षे वयाच्या आतील पुरुषाचे मोल पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे पन्नास शेकेल रुपे असावे,
4 Ha pedig asszony-személy az, harmincz siklusra becsüljed.
४आणि त्याच वयाच्या स्त्रीचे मोल तीस शेकेल रुपे असावे.
5 Ha pedig öt esztendőstől húsz esztendősig való, akkor a fiúgyermeket húsz siklusra becsüljed, a leányt pedig tíz siklusra.
५मुलगा पाच वर्षे ते वीस वर्षांच्या आतील वयाचा असेल तर त्याचे मोल वीस शेकेल रुपे व मुलीचे दहा शेकेल रुपे असावे.
6 Ha pedig egy hónapostól öt esztendősig való, akkor a fiút öt ezüst siklusra becsüld, a leányt pedig három ezüst siklusra.
६मुलगा एक महिन्याहून मोठा व पाचवर्षाहून लहान असला तर त्याचे मोल पाच शेकेल रुपे व मुलीचे तीन शेकेल रुपे असावे.
7 Ha pedig hatvan esztendős és azon felül való, ha férfi, akkor becsüljed tizenöt siklusra, az asszony-személyt pedig tíz siklusra.
७साठ वर्षे वा साठ वर्षाहून अधिक वर्षे वयाच्या पुरुषाचे मोल पंधरा शेकेल रुपे व स्त्रीचे दहा शेकेल रुपे असावे.
8 Ha pedig szegényebb az, mint te becsülted, akkor állassák a pap elé, és becsülje meg azt a pap; a szerint becsülje azt a pap, a milyen módja van a fogadást tevőnek.
८परंतु तू ठरविलेले मोल न देण्याइतका कोणी गरीब असेल तर त्यास याजकापुढे आणावे; आणि याजकाने नवस करणाऱ्याच्या ऐपतीप्रमाणे नवसाच्या मानवाचे मोल ठरवावे.
9 Ha pedig olyan barom az, a miből áldozni szoktak az Úrnak: mindaz, a mit az eféléből ád valaki az Úrnak, szent legyen.
९काही पशू परमेश्वरास अर्पण करता येतात त्यापैकी कोणी एखाद्या पशूचा नवस केला तर परमेश्वरास अर्पावयाचा असा प्रत्येक प्राणी पवित्र समजावा.
10 Ne adjon mást helyette, és ki ne cserélje azt: jót hitványért, vagy hitványat jóért; de ha mégis kicserélne barmot barommal: mind ez, mind az, a mivel kicserélte, szent legyen.
१०त्याने तो बदलू नये किंवा त्याच्या ऐवजी दुसरे काही देण्याचा प्रयत्न करु नये. त्याने वाईट पशू ऐवजी चांगला किंवा चांगल्याबद्दल वाईट असा बदल करू नये त्याने जर तसा बदल करण्याचा प्रयत्न केला तर मग ते दोन्ही पवित्र होतील व दोन्ही परमेश्वराच्या मालकीचे होतील.
11 Ha pedig valamely tisztátalan barom az, a melyből nem vihetnek áldozatot az Úrnak: állassák azt a barmot a pap elé.
११काही पशू परमेश्वरास अर्पण करावयास योग्य नसतात ते अशुद्ध असतात कोणी अशुद्ध पशूपैकी एखादा परमेश्वरास अर्पण करावयास आणला तर त्याने तो याजकाकडे आणावा.
12 És becsülje meg azt a pap akár jó, akár hitvány, és a mint becsüli a pap, úgy legyen.
१२तो पशू चांगला असो किंवा वाईट असो याजकाने त्याचे मोल ठरवावे; याजक ठरवील ते त्याचे मोल समजावे.
13 Ha pedig meg akarja váltani, adja hozzá annak ötödrészét a te becsléseden felül.
१३पण नवस करणाऱ्याला तो पशू सोडवावयाचा असला तर त्या किंमतीत आणखी एकपंचमांश भर घालून त्याने तो सोडवावा.
14 És ha valaki az ő házát szenteli az Úrnak szentségül, azt is becsülje meg a pap: akár jó, akár hitvány, és a mennyire a pap becsüli azt, úgy maradjon.
१४एखाद्याने आपले घर परमेश्वरास वाहिले तर ते चांगले असो किंवा वाईट असो याजकाने त्या घराचे मोल ठरवावे; याजक ठरवील ते त्याचे मोल समजावे.
15 Ha pedig az, a ki odaszentelte, megváltja az ő házát: akkor adja ahhoz a te becslésed szerint való árnak ötödrészét, és legyen az övé.
१५परंतु घर वाहणाऱ्याला ते सोडवून परत घ्यावयाचे असेल तर त्याने, याजकाने ठरवलेल्या किंमतीत एकपंचमांश भर घालून ते सोडवावे; मग ते घर त्याचे होईल.
16 És ha valaki az ő mezei birtokából szentel valamit az Úrnak, akkor a mag szerint becsüld meg, a mely abba megy: egy hómer árpa-mag után ötven ezüst siklusra.
१६एखाद्याने आपल्या शेतीचा काही भाग परमेश्वरास वाहिला तर त्यामध्ये किती बियाणे पेरले जाते त्यावरुन त्याचे मोल ठरेल; एक होमर, सुमारे सहा बुशेल जवासाठी पन्नास शेकेल रुपे अशी किंमत असावी.
17 Ha a kürtölésnek esztendejétől szenteli oda az ő mezejét, a mint becsülted, úgy maradjon.
१७योबेल वर्षापासून त्याने आपले शेत देवाला वाहिले तर याजक ठरविल त्याप्रमाणे त्याचे मोल होईल.
18 Ha pedig a kürtölés esztendeje után szenteli oda az ő mezejét, a pap számítsa fel néki az árt az esztendők száma szerint, a melyek hátra vannak a kürtölés esztendejéig, és szállíttassék le a te becslésed.
१८परंतु योबेल वर्षानंतर जर एखाद्याने आपले शेत परमेश्वरास वाहिले तर पुढच्या योबेल वर्षापर्यंत जितकी वर्षे उरली असतील तितक्या वर्षाचा हिशोब करून याजकाने त्याचे नक्की मोल ठरवावे.
19 És ha meg akarja váltani a mezőt az, a ki odaszentelte, akkor adja ahhoz az általad becsült árnak ötödrészét, és maradjon az övé.
१९शेत वाहणाऱ्याला, मोल देऊन आपले शेत सोडवून परत घ्यावयाचे असले तर त्याच्या ठरवलेल्या किंमतीत एकपंचमांश भर घालून त्याने ते सोडवावे. मग ते शेत परत त्याच्या मालकीचे होईल.
20 Ha pedig nem váltja meg azt a mezőt, és ha eladja azt a mezőt más valakinek, többé meg nem válthatja azt.
२०त्याने ते शेत सोडविले नसेल किंवा दुसऱ्या कोणाला ते विकले असेल तर त्या पहिल्या मालकाला ते सोडवून घेता येणार नाही;
21 És az a föld, mikor a kürtölésnek esztendejében felszabadul, az Úrnak szenteltessék, mint valamely néki szentelt mező, papok birtokává legyen az.
२१पण योबेल वर्षी ते शेत परत विकत घेतले नाही तेव्हा पूर्णपणे समर्पित केलेल्या शेताप्रमाणे परमेश्वराकरिता ते पवित्र ठरेल, अर्थात ते याजकाचे कायमचे वतन होईल.
22 Ha pedig pénzen vett mezejét, a mi nem az ő birtokának mezejéből való, valaki az Úrnak szenteli:
२२स्वत: च्या कुळाचे नसलेले म्हणजे एखाद्याने स्वत: खरेदी केलेले शेत त्यास परमेश्वराकरिता अर्पण करावयाचे असेल,
23 Akkor számolja fel néki a pap a te becslésed szerint való összeget a kürtölés esztendejéig, és adja oda azt, a mire te becsülted, azon a napon szentségül az Úrnak.
२३तर याजकाने योबेल वर्षापर्यंत त्याचा हिशोब करावा व जितके मोल ठरेल तितके परमेश्वराकरिता पवित्र समजून त्याने त्याच दिवशी ते देऊन टाकावे.
24 A kürtölésnek esztendejében visszaszáll a mező arra, a kitől vette azt, a kinek birtoka volt az a föld.
२४ज्याच्याकडून त्याने ते शेत पहिल्यांदा खरेदी केलेले असेल म्हणजे ज्याच्या वतनाचे ते असेल त्याच्या ताब्यात ते योबेल वर्षी परत जावे.
25 Minden becslésed pedig a szent siklus szerint legyen; húsz géra legyen a siklus.
२५मोल देताना ते पवित्रस्थानातील चलनाप्रमाणे ठरविलेले असावे. शेकेल म्हणजे वीस गेरा.
26 Csak elsőszülöttet, a mely elsőszülött úgyis az Úré, azt ne szenteljen a baromféléből senki; akár borjú akár bárány, az Úré az.
२६लोकांस गुरेढोरे, शेरडेमेढंरे विशेष देणग्या म्हणून अर्पण करता येतील परंतु त्यापैकी प्रथम जन्मलेला नर परमेश्वराचा ठरलेला आहेच; त्याला, ते विशेष भेट म्हणून वाहू शकणार नाहीत.
27 Ha pedig tisztátalan baromból való az, váltsa meg a te becslésed szerint, és adja hozzá annak ötödrészét; ha pedig nem váltják meg, adassék el a te becslésed szerint.
२७तो प्रथम जन्मलेला नर अशुद्ध पशूपैकी असला तर याजकाने ठरवलेल्या मोलात एकपंचमांश भर घालून अर्पण करणाऱ्याने तो सोडवावा; पण तो सोडवीत नसला तर याजकाने ठरवलेल्या किंमतीला तो विकून टाकावा.
28 De semmi, a mit valaki teljesen az Úrnak szentelt, mind abból a mije van, akár ember vagy barom, akár mezei birtokából való, el ne adassék, és meg se váltassék; minden, a mi teljesen néki szenteltetett, igen szentséges az Úrnak.
२८लोक परमेश्वरास काही विशेष देणगी देतात, ती देणगी माणसे, पशू किंवा वतनांची शेते या प्रकारची असेल, ती देणगी परमेश्वराचीच आहे; ती सोडवून परत घेता येणार नाही किंवा विकता येणार नाही.
29 Senki, a ki teljesen az Úrnak szenteltetett az emberek közül, meg ne váltassék, hanem halálra adassék bizonynyal.
२९ती वाहिलेली विशेष देणगी मानव प्राण्यांपैकी असेल तर त्या मानवाला सोडवून घेता येणार नाही; त्याचा अवश्य वध करावा.
30 A földnek minden tizede, a föld vetéséből, a fa gyümölcséből az Úré; szentség az az Úrnak.
३०भूमीच्या सर्व उत्पन्नाचा एक दशांश भाग म्हणजे, शेतातील सर्व उपज, आणि झाडे, वेली यांची फळे ह्यांचा एक दशांश भाग परमेश्वराकरिता पवित्र आहे.
31 És ha valaki meg akar valamit váltani az ő tizedéből: adja hozzá annak ötödrészét.
३१म्हणून एखाद्याला आपला एक दशांश भाग सोडवून घ्यावयाचा असला तर त्याच्या किंमतीत एक पंचमांशाची भर घालून त्याने तो सोडवावा.
32 És minden tizede a baromnak és juhnak, mindabból, a mi a vessző alatt átmegy, a tizedik az Úrnak legyen szentelve.
३२गुरेढोर किंवा शेरडेमेंढरे ह्यापैकी ज्यांची गणना काठीखालून चालवून होते अशा प्रत्येक दहांपैकी एक पशू याजक घेईल. प्रत्येक दहावे जनावर परमेश्वराचे वेगळे केलेले असेल.
33 Ne tudakozódjék, ha jó-e vagy hitvány, és el se cserélje azt; de ha mégis elcseréli azt, akkor az, és a mit cserébe adott azért, szent legyen, és meg se váltassék.
३३निवडलेला पशू चांगला आहे किंवा वाईट आहे या विषयी त्याच्या धन्याने चिंता करु नये किंवा त्यास बदलू नये; त्याने बदल करावयाचे ठरविले तर मग तो पशू व त्याच्या बदलीचा पशू असे दोन्ही पशू परमेश्वराकरिता पवित्र होतील; किंमत देऊन ते सोडविता येणार नाहीत.
34 Ezek azok a parancsolatok, a melyeket Mózes által parancsolt az Úr Izráel fiainak a Sinai hegyen.
३४परमेश्वराने इस्राएल लोकांकरिता सीनायपर्वतावर मोशेला दिलेल्या आज्ञा याच आहेत.