< 4 Mózes 35 >

1 És szólt az Örökkévaló Mózeshez Móáb síkságain, a Jordán mellett, Jerichóval szemben, mondván:
परमेश्वर मोशेशी बोलला. हे मवाबामधील यार्देनाच्या खोऱ्यात यरीहोसमोर यार्देन नदीजवळ घडले. परमेश्वर म्हणाला,
2 Parancsold meg Izrael fiainak, hogy adjanak a levitáknak örökségük birtokából városokat lakásul és legelőt a városokhoz köröskörül adjatok a levitáknak.
इस्राएल लोकांस सांग की, त्यांनी त्यांच्या वतनातील काही नगरे लेवी लोकांस द्यावी. इस्राएल लोकांनी काही नगरे आणि त्याच्या आजूबाजूची कुरणे लेवी लोकांस द्यावी.
3 És legyenek a városok nekik lakásul, legelőik pedig legyenek barmuk, szerzeményük és minden állatuk számára.
लेवी लोक त्या नगरात राहतील आणि लेवी लोकांची कुरणे गाईबैल आणि शेरडेमेंढरे इत्यादी जनावरांसाठी असावीत.
4 A városok legelői pedig, melyeket a levitáknak adjatok, legyenek a város falától kifelé ezer könyök körös-körül.
आणि नगराची जी कुरणे लेव्यांना जी गायराने द्याल ती हजार हात सभोवार असावी.
5 És mérjetek le a városon kívül a keleti oldalon kétezer könyöknyit, meg a déli oldalon kétezer könyöknyit meg a nyugati oldalon kétezer könyöknyit és az északi oldalon kétezer könyöknyit, a város pedig a középen; ez legyen nekik a városok legelője.
नगरांच्या तटबंदी बाहेर पूर्व बाजूस दोन हजार हात, दोन हजार हात दक्षिणेला, दोन हजार हात पश्चिमेला आणि दोन हजार हात उत्तर बाजूस मोजावे. नगर मध्ये असावे.
6 A városok pedig, melyeket a levitáknak adtok: hat menedékváros, amelyet adtok, hogy oda meneküljön a gyilkos; azokon felül pedig adjatok negyvenkét várost.
त्यापैकी सहा शहरे शरणपुरे असतील. जर एखाद्या मनुष्याने चुकून कुणाला मारले तर तो मनुष्य संरक्षणासाठी त्या शहरात जाऊ शकतो. त्या सहा शहरांखेरीज आणखी बेचाळीस नगरे तुम्ही लेवींना द्या.
7 Mind a városok, melyeket adtok a levitáknak, negyvennyolc város, azokat és legelőiket.
म्हणजे तुम्ही एकूण अठ्ठेचाळीस नगरे लेवींना द्या. त्या शहरांभोवतालची जमीनही तुम्ही लेवींना द्या.
8 A városok pedig, melyeket adtok Izrael fiainak örökségéből, a nagyobból többet adjatok, a kisebből kevesebbet adjatok; mindenki birtoka szerint, melyet kap, adjon városaiból a levitáknak.
इस्राएलाच्या मोठ्या कुटुंबांना वतनाचे मोठे तुकडे मिळतील आणि लहान वतनातून कमी अशी द्यावीत. प्रत्येक वंशाने आपआपल्या वतनाच्या मानाने लेव्यांना नगरे द्यावी.
9 És szólt az Örökkévaló Mózeshez, mondván:
नंतर परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
10 Szólj Izrael fiaihoz és mondd nekik: Midőn átvonultok a Jordánon Kánaán országába,
१०इस्राएलाच्या वंशाशी बोल, त्यांना या गोष्टी सांग, तुम्ही लोक यार्देन नदी पार करून कनानच्या प्रदेशात जाल.
11 akkor rendeljetek magatoknak városokat, menedékvárosok legyenek nektek, hogy oda meneküljön a gyilkos, aki agyonüt valakit tévedésből;
११तेव्हा तुम्ही शरणपुरे निवडा. जर एखाद्याने चुकून कुणाला ठार मारले तर तो संरक्षणासाठी त्यापैकी एखाद्या शहरात जाऊ शकतो.
12 hogy legyenek nektek e városok menedékül a vérbosszú rokon elől, hogy meg ne haljon a gyilkos, míg nem áll a község előtt ítélet végett.
१२आणि ती नगरे सूड घेणाऱ्यापासून आश्रयासाठी असावी. त्या मनुष्याचा न्याय होईपर्यंत तो तेथे सुरक्षित राहू शकतो.
13 És a városok, melyeket adnotok kell, hat menedékváros legyen az nektek.
१३अशी सहा संरक्षक शहरे असतील.
14 Három várost adjatok a Jordánon innen és három várost adjatok Kánaán országában, menedékvárosok legyenek.
१४यापैकी तीन शहरे यार्देन नदीच्या पूर्वेला असतील आणि तीन शहरे कनानाच्या प्रदेशात यार्देन नदीच्या पश्चिमेला असतील ती तुम्ही आश्रयाची नगरे म्हणून द्या.
15 Izrael fiainak és az idegennek, meg a közöttük lakónak legyen ez a hat város menedékül, hogy oda meneküljön mindaz, aki agyonütött valakit tévedésből.
१५ही शहरे इस्राएलाच्या नागरिकांसाठी, परदेशी नागारिकासाठी आणि प्रवाशांसाठी शरणपुरे असतील. यांच्यापैकी कोणीही चुकून कुणाला ठार मारले तर ते संरक्षणसाठी या शहरात जाऊ शकतात.
16 Ha azonban vaseszközzel ütötte meg, és az meghalt, gyilkos ő; ölessék meg a gyilkos.
१६जर एखादा मनुष्य कुणाला मारण्यासाठी लोखंडी शस्त्राचा उपयोग करत असेल तर त्याने मरण पावले पाहिजे.
17 Ha pedig kővel kezében, amely által meghalhat, ütötte meg és meghalt, gyilkos ő; ölessék meg a gyilkos.
१७आणि जर एखाद्याने दगड घेऊन कुणाला मारले तर त्यानेसुध्दा मरण पावले पाहिजे. पण त्या दगडाचा आकार एखाद्याला मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दगडाएवढा असला पाहिजे.
18 Vagy pedig faeszközzel kezében, amely által meghalhat, ütötte meg, és az meghalt, gyilkos ő; ölessék meg a gyilkos.
१८आणि जर एखादा मनुष्य कुणाला मारण्यासाठी लाकडाच्या तुकड्याचा उपयोग करीत असेल तर तो मनुष्य सुद्धा मेला पाहीजे. हा लाकडाचा तुकडा म्हणजे सामान्यतः कोणाला तरी मारण्यासाठी उपयोगात आणतात तसे लाकडाचे शस्त्र असले पाहिजे.
19 A vérbosszú rokon ölje meg a gyilkost; ahol rátalál, megölheti őt.
१९मरण पावलेल्या मनुष्याच्या कुटुंबातील कोणीही त्या खुन्याचा पाठलाग करून त्यास ठार मारू शकतो.
20 Vagy ha gyűlöletből taszítja vagy hajított rá leselkedve, és az meghalt;
२०मनुष्य एखाद्याला हाताने मारून सुद्धा ठार मारू शकतो. किंवा एखाद्याला ढकलून देऊन सुद्धा ठार मारू शकतो. किंवा कोणाला काही फेकून मारून सुद्धा त्यास ठार करु शकतो.
21 vagy ellenségeskedésből ütötte meg kezével és az meghalt, ölessék meg az, aki agyonütötte, gyilkos az; a vérbosszuló rokon megölheti a gyilkost, ahol rátalál.
२१जर कोणी ते हेतूपूर्वक द्वेषबुद्धीने केले असेल तर तो खुनी ठरतो. त्या मनुष्यास ठार मारलेच पाहिजे. मरण पावलेल्या मनुष्याच्या कुटुंबातील कोणीही त्या खुन्याचा पाठलाग करून त्यास मारु शकतो.
22 Ha pedig történetesen, ellenségeskedés nélkül taszította, vagy hajított rá bármely eszközt leselkedés nélkül,
२२एखादा मनुष्य अपघाताने दुसऱ्याला मारू शकेल. मरण पावलेल्या मनुष्याचा त्याने द्वेष केला नाही त्यास त्याने चुकून मारले असेल. किंवा त्याने एखादी वस्तू चुकून फेकली असेल आणि ती चुकून एखाद्याला लागून तो मेला तर त्याने ते विचारपूर्वक केले असे नाही.
23 vagy bármi követ, amely által meghalhat, nem látván őt, rávetett és az meghalt, de ő nem ellensége annak és nem kereste vesztét,
२३किंवा एखाद्या मनुष्याने दगड फेकला आणि तो त्यास न दिसलेल्या मनुष्यास लागला व तो मेला तर त्या मनुष्याने योजनापूर्वक मारले असे नाही. तो मनुष्य मरण पावलेल्या मनुष्याचा द्वेष करत नव्हता. तो केवळ योगायोगाने मेला.
24 akkor tegyen törvényt a község az agyonütő és a vérbosszú között e rendeletek szerint.
२४जर असे घडले तर काय करायचे ते लोकांनी ठरवायचे. मरण पावलेल्या मनुष्याच्या कुटुंबातील एखादा मनुष्य त्यास मारु शकतो की नाही ते लोक न्यायालयाने ठरवायचे.
25 És mentse meg a község a gyilkost a vérbosszuló rokontól, vigye őt vissza a község menedékvárosába, ahova menekült és maradjon ott, míg meghal a főpap, akit fölkentek a szentség olajával.
२५जर लोकांनी खुन्याचे त्या कुटुंबापासून रक्षण कराचये असे ठरवले तर लोकांनी खुन्याला संरक्षक शहरात परत न्यावे आणि पवित्र तेलाने अभिषेक केलेला मुख्य याजक मरत नाही तोपर्यंत खुन्याने तिथेच रहावे.
26 Ha azonban kimegy a gyilkos menedékvárosának határából, ahova menekült,
२६त्या मनुष्याने संरक्षक शहराच्या बाहेर जायचे नाही. जर त्याने त्या सीमा ओलांडल्या
27 és rátalál a vérbosszú rokon menedékvárosának határán kívül és meggyilkolja a vérbosszuló rokon a gyilkost, nincs miatta vérbűne.
२७आणि आश्रयाच्या नगराच्या सीमेबाहेर मृत मनुष्याच्या कुटुंबाने त्यास पकडले आणि मारले तर त्या कुटुंबातील तो मनुष्य खुनाचा अपराधी ठरणार नाही.
28 Mert menedékvárosában maradjon, amíg meghal a főpap; és a főpap halála után visszatérhet a gyilkos örökségének földjére.
२८एखाद्या मनुष्याने चुकून कोणाला मारले असेल तर त्याने मुख्य याजक मरेपर्यंत शरणपुरातच राहिले पाहिजे. मुख्य याजक मेल्यानंतर तो मनुष्य त्याच्या स्वत: च्या प्रदेशात जाऊ शकतो.
29 És legyenek ezek nektek a jog törvényéül nemzedékeiteken át, minden lakóhelyiteken.
२९तुम्हा लोकांच्या सर्व शहरांमध्ये हाच नियम सदैव लागू राहील.
30 Bárki, aki agyonüt valakit, tanuk vallomására öljék meg a gyilkost, de egy tanú ne valljon senki ellen, hogy az meghaljon.
३०मारणाऱ्याला मरणाची शिक्षा जर साक्षीदार असेल तरच दिली जाईल. जर एकच साक्षीदार असेल तर कोणालाही मरणाची शिक्षा दिली जाणार नाही.
31 Ne fogadjatok el váltságdíjat a gyilkos lelkéért, aki halálraítélt, hanem ölessék meg.
३१जर एखाद्या मनुष्यावर खुनाचा दोष असेल तर त्यास मारलेच पाहिजे. पैसे घेऊन त्याची शिक्षा बदलू नका, त्या खुन्याला आवश्य जीवे मारावे.
32 És ne fogadjatok el váltságdíjat azért, aki menekül menedékvárosába, hogy visszatérjen és lakjék az országban, mielőtt a főpap meghal.
३२जर एखाद्याने कुणाला मारले आणि तो संरक्षक शहरात पळून गेला तर घरी जाण्यासाठी त्याच्याकडून पैसे घेऊ नका. मुख्य याजक मरेपर्यंत त्याने शरणापुरातच राहिले पाहिजे.
33 És meg ne fertőztessétek az országot, amelyben vagytok, mert a vér, az megfertőzheti az országot és az országnak nem szerezhető engesztelés a vérért, mely kiontatott benne, csak annak vére által, aki kiontotta.
३३ज्या देशात तुम्ही रहाल तो भ्रष्ट करू नका. कारण खुनाने देश भ्रष्ट होतो आणि रक्तपात केल्याशिवाय देशाबद्दल म्हणजे त्या देशात झालेल्या रक्तपाताबद्दल प्रायश्चित होऊ शकत नाही.
34 És meg ne tisztátlanítsd az országot, melyben laktok, amelyben én lakozom, mert én az Örökkévaló lakozom Izrael fiai között.
३४मी परमेश्वर आहे. मी तुमच्या देशात इस्राएल लोकांबरोबर राहीन. मी तिथे राहणार आहे. म्हणून ती जागा निष्पाप लोकांच्या रक्ताने अशुद्ध करु नका.

< 4 Mózes 35 >