< Mikeás 3 >
1 De mondtam: Halljátok csak, Jákób fejei, és Izraél házának vezérei. Nemde nektek kellene ismerni a jogot!
१मी म्हणालो, “याकोबाच्या अधिकाऱ्यांनो, आणि इस्राएल घराण्याच्या सरदारांनो, ऐका,
2 Gyűlölői a jónak és szeretői a rossznak! ki bőrüket rabolják le róluk és húsukat csontjaikról.
२जे तुम्ही चांगल्याचा तिरस्कार करता आणि वाईटावर प्रेम करता. जे तुम्ही लोकांची चामडी सोलता आणि त्यांच्या हाडांवरुन मांस ओढून काढता.
3 S a kik emésztették népemnek húsát és bőrüket húzták le róluk, csontjaikat pedig összetörték, és szétszedik mint a fazékban valót, és mint húst az üstben.
३जे तुम्ही माझ्या लोकांचे मांस खाता आणि त्यांची कातडी सोलता व त्यांची हाडे मोडता. भांड्यात घालण्यासाठी ज्याप्रमाणे मांस चिरतात, आणि जसे पातेल्यांत घालण्यासाठी त्याचे तुकडे करता, तशी जे तुम्ही त्यांची हाडे ठेचता व त्यांचे तुकडे करता, त्या तुम्हास न्याय कळत नाही काय?
4 Akkor majd kiáltanak Örökkévalóhoz, de nem hallgatja meg őket, hanem elrejti arczát tőlük abban az időben, a szerint, a mint rosszat tettek cselekedeteikben.
४आता, तुम्ही अधिकारी कदाचित परमेश्वराची प्रार्थना कराल. पण तो तुम्हास उत्तर देणार नाही. त्या वेळेस तो आपले तोंड तुमच्यापासून लपवेल. कारण तुम्ही दुष्कृत्ये केली आहेत.”
5 Így szól az Örökkévaló ama prófétákról, kik megtévesztik népemet, kik, ha harapni valójuk van fogaik alá, békét hirdetnek – de a ki nem ad szájukba valót, az ellen háborút indítanak.
५जे संदेष्टे माझ्या लोकांस बहकवितात, ज्यांनी अन्नपाणी दिले त्यांच्यासाठी, ते घोषणा करतात की, समृद्धी नांदेल. पण जर कोणी त्यांच्या मुखांत काही घातले नाही, तर हे संदेष्टे किंचाळतात, युध्दाला तयार होतात, त्यांच्या विषयी परमेश्वर असे म्हणतो.
6 Azért éjjel rátok látomás nélkül, is besötétedik rátok jóslás nélkül! Lenyugszik a nap a próféták felett, és elborul felettök a nappal.
६“म्हणून ही जणू काही तुमची रात्र असेल, पण तुम्हास दृष्टांत होणार नाही. तुम्ही अंधारात असाल, पण त्यामुळे तुम्ही भविष्य पाहणार नाही. संदेष्ट्यांच्या माथ्यांवरचा सूर्य मावळेल, आणि दिवस त्यांच्यावर काळोख असा होईल.
7 Megszégyenülnek a látók, és elpirulnak: a jóslók, és bajuszig elburkolóznak: mindannyian, mert nincs felelet Istentől.
७द्रष्टे लाजविले जातील आणि ज्योतिषी गोंधळून जातील. ते सर्व आपले ओठ झाकतील, कारण माझ्याकडून त्यांना उत्तर मिळणार नाही.
8 Azonban én telve vagyok erővel az Örökkévaló szellemétől, joggal és bátorsággal, hogy megmondjam Jákóbnak az ő bűntettét, és Izraélnek az ő vétkét.
८पण मी तर परमेश्वराच्या आत्म्याकडून पराक्रमाने, चांगुलपणा व सामर्थ्याने परिपूर्ण आहे, ह्यासाठी की याकोबाला त्याचा अपराध व इस्राएलाला, त्याचे पाप दाखवावे.”
9 Halljátok csak ezt, Jákób házának fejei, és Izraél házának vezérei, kik utálják a jogot és mindazt, ami egyenes, elgörbítik.
९याकोबाच्या घराण्यातल्या पुढाऱ्यांनो आणि इस्राएल घराण्याच्या अधिकाऱ्यांनो, जे तुम्ही योग्य चालीरीतीचा तिरस्कार करता व सरळ गोष्टीला वाकडी करता, आता हे ऐका,
10 Cziónt vérontással építik és Jeruzsálemet jogtalansággal.
१०तुम्ही सियोन रक्ताने आणि यरूशलेम अन्यायाने बांधले आहे.
11 Fejei vesztegetésért ítélnek, papjai díjért tanítanak és prófétái pénzért jósolnak, de az Örökkévalóra támaszkodnak, mondván: nemde az Örökkévaló közepünkben van, nem jön ránk veszedelem!
११तुझे अधिकारी लाच घेण्यासाठी न्याय करतात, आणि तिचे याजक मोबदल्यासाठी शिकवण देतात. आणि तुझे भविष्य बघणारे पैशासाठी भविष्य बघतात. तरीही ते परमेश्वरावर अवलंबून राहतात व म्हणतात, “परमेश्वर आम्हाबरोबर नाही काय? आम्हांवर अनिष्ट येणार नाही.”
12 Azért timiattatok Czión mezővé fog fölszántatni és Jeruzsálem romhalmazzá lészen és a Háznak hegye erdős magaslatokká.
१२ह्यास्तव, तुमच्यामुळे सियोन शेतासारखे नांगरले जाईल, यरूशलेम नासधुशीचा ढीग होईल, आणि मंदिराचा पर्वत जंगलातल्या टेकडीसारखा होईल.