< Hóseás 11 >

1 Midőn fiatal volt Izraél, megszerettem; és Egyiptomból elhívtam fiamat.
जेव्हा इस्राएल बालक होता तेव्हा त्यावर प्रेम केले, आणि माझ्या पुत्राला मिसरातून बोलावले.
2 Amint hívták őket, úgy mentek el előlük; a Báaloknak áldozgatnak, a képeknek füstölögtetnek!
त्यांना जेवढे बोलविले तेवढे ते माझ्यापासून दूर जात ते बआलास बली आणि मुर्तीस धूप जाळत.
3 Pedig én jártattam Efraimot, vevén őt karjainál; de nem tudták, hogy gyógyítgatom őket.
तरी तो मीच ज्याने एफ्राईमास चालणे शिकविले तो मीच ज्याने त्यास हात धरुन उभे केले पण त्यांना माहीत नव्हते की मी त्यांची काळजी घेत होतो.
4 Emberi kötelekkel vonzottam, szeretetnek kötelékeivel, és olyan lettem nekik, mint a ki megemelinti a jármot állkapcsukon, és nyújtottam neki ételt.
मी त्यांना मानवता आणि प्रेमाच्या दोरीने चालवत होतो मी त्यांना त्यासारखा होतो जो तोंडावरचे जू काढतो आणि मी खाली वाकून त्यांना खाऊ घातले.
5 Nemde Egyiptom országába fog visszatérni és Assúr lesz a királya, mert vonakodtak megtérni.
ते मिसरात परत येणार काय? अश्शूर त्यावर राज्य करणार काय? कारण ते मजकडे परत येण्याचे नाकारतात?
6 Kard csap le a városaira, megsemmisíti reteszeit és megemészti, az ő tanácsaik miatt.
त्यांच्या नगरावर तलवार चालेल आणि ती त्याच्या दाराचे अडसर नष्ट करील, त्यांचा नाश त्यांच्या स्वत: च्या योजनांमुळे होईल.
7 Népem pedig azon csüng, hogy tőlem elpártol; fölfelé hívják, egyaránt nem emelkedik.
माझ्या लोकांस मजपासून वळवण्याचा निश्चय केला आहे तरी ते त्यांना जो मी परमप्रधान आहे त्याकडे बोलवितात तरी त्यापैकी कोणीही मला गौरव देत नाही.
8 Hogy adnálak oda, Efraim, szolgáltatnálak ki, Izraél? hogy adnálak, mint Admát, tennélek hasonlóvá Czebójimhoz? Megfordult bennem a szívem, egészen megindult a szánalmam.
हे एफ्राईमे, मी तुझा त्याग कसा करु? हे इस्राएला, मी तुला शत्रुच्या हाती कसा देऊ? मी तुला अदमासारखे कसे करु? मी तुला सबोयिमासारखे कसे करु? माझे हृदय खळबळले आहे, माझी करुणा ढवळली गेली आहे.
9 Nem teszem meg fellobbant haragomat, nem rontom meg ismét Efraimot; mert Isten vagyok s nem ember, közepetted szent és nem támadlak gerjedésben.
मी माझा भयानक राग अमलात आणणार नाही मी एफ्राईमाचा पुन्हा नाश करणार नाही कारण मी देव आहे आणि मनुष्य नाही तुमच्यामध्ये असणारा मी पवित्र आहे मी क्रोधाने येणार नाही.
10 Az Örökkévaló után fognak menni, mint oroszlán fog ordítani; igenis, ő ordítani fog és remegnek a falak a tenger felől.
१०ते माझ्यामागे चालतील मी परमेश्वर सिंहासारखी गर्जना करेन मी खरोखर गर्जेन आणि लोक पश्चिमेकडून थरथरत येतील.
11 Remegve jönnek mint madár Egyiptomból s mint galamb Assúr országából; letelepítem őket házaikba, úgymond az Örökkévaló.
११ते मिसरातून पक्षासारखे आणि अश्शूरातून कबुतरा प्रमाणे थरथरत येतील मी त्यांना त्यांच्या घरात बसवीन असे परमेश्वर म्हणतो.
12 Körülvett engem hamissággal Efraim és csalfasággal Izraél háza; Jehúda pedig egyre állhatatos Isten mellett és a Szent iránt hűséges.
१२एफ्राईम मला लबाडीने आणि इस्राएलचे घराणे कपटाने वेढले, पण यहूदा आतापर्यंत देवाबरोबर, जो पवित्र आहे, त्याबरोबर विश्वासू बनून आहे.

< Hóseás 11 >