< Ezékiel 7 >
1 És lett hozzám az Örökkévaló igéje, mondván:
१परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला व तो म्हणाला.
2 Te pedig, ember fia, így szól az Úr, az Örökkévaló Izrael földjéhez: Vég, eljött a vég az ország négy sarkára
२“मानवाच्या मुला, परमेश्वर देव इस्राएलाच्या भूमीला म्हणतो, या देशाच्या चारही बाजुचा शेवट झाला आहे.
3 Most íme rajtad a vég, rádbocsátom haragomat, rnegitéllek útjaid szerint és rádvetem mind az utálatosságaidat;
३आता इस्राएल देशाचा शेवट जवळ आला आहे, यास्तव मी माझा क्रोध त्यांच्यावर प्रकट करेन, त्यांच्या अपवित्र कामा वरुन मी त्यांचा न्याय करेल. त्यानंतर त्यांच्यावर घृणा आणिन.
4 nem fog téged sajnálni a szemem és nem fogok könyörülni, mert utaidat hárítom rád és utálatosságaid közepetted lesznek, hogy megtudjátok, hogy én vagyok az Örökkévaló.
४माझी दृष्टी तुमच्यावर दया करणार नाही, आणि मी तुमची गय करणार नाही, तुमच्या कामाचे वेतन तुम्हास देईन, तुमची घृणा मला येते, मग तुम्हास कळेल मी परमेश्वर देव आहे.
5 Így szól az Úr, az Örökkévaló: vész, egyetlen vész íme jön!
५परमेश्वर देव हे सांगतो, अनर्थ! अनर्था मागे अनर्थ! पाहा तो येत आहे.
6 Vég jön, jön a vég, ébredt ellened, íme jön.
६शेवट हा निश्चित जवळ आला आहे, शेवट तुमच्यासाठी जागा झाला आहे, पाहा तो येत आहे.
7 Jön a végzet rád, ország lakója, jön az idő, közül a nap zavarodás és nem kurjantás a hegyeken.
७रहीवाशी असलेल्या लोकांच्या भूमीवर सत्यानाश येऊन ठेपला आहे, हानी जवळ येण्याचा समय आला आहे, आणि कुठल्याही पर्वतावर हर्षभरीत ध्वनी ऐकू येणार नाही.
8 Most a közelben rád ontom hevemet és elvégzem rajtad haragomat, megitéllek útjaid szerint és rádvetem mind az utálatosságaidat.
८आता जास्त काळ मी तुम्हाविरुध्द आपल्या त्वेषाने माझ्या रागाची ओतणी तुम्हावर करेन, जेव्हा मी तुमच्या कृत्याप्रमाणे न्यायाचा निकाल करेन तेव्हा तुमचाच सर्व प्रकारचा घृणितपणा तुमच्यावर येईल.
9 És nem fog sajnálni a szemem és nem fogok könyörülni, útjaid szerint vetek rád és utálatosságaid közepetted lesznek, hogy megtudjátok, hogy én az Örökkévaló verek.
९मी तुम्हाकडे करुणेने बघणार नाही, आणि तुझी गय मी करणार नाही, तुझ्या कामाची परतफेड तुझ्यावर होईल. तुम्हामध्ये घृणा वास करेल मग तुम्हास समजेल मी परमेश्वर देव आहे. जो शिक्षा करणारा आहे.
10 Íme a nap, íme jön, kisarjadt a végzet, kivirágzott a vessző, kivirult a kevélység.
१०पहा! असे दिवस येत आहेत, जे घमंडाने भरलेल्या शिक्षेची काठी तुम्हावर येईल.
11 Az erőszak támadt, gonoszság vesszejéül, nem marad semmi belőlük, sem tömegükből, sem tombolásukból, jajszó sincsen értük.
११क्रुरपणाची काठी दुष्टपणावर उगवेल त्यांच्या सर्वांवर, त्यांच्यातल्या धनावर, त्यांच्या महत्वाच्या शेवटच्या इच्छा रहाणार नाहीत.
12 Jött az idő, elérkezett a nap, a vevő ne örüljön és az eladó ne gyászoljon, mert harag lobban föl egész tömege ellen.
१२वेळ, दिवस समीप येत आहे, हर्ष खरेदी न करो आणि दुःख विक्री न करो, तोपर्यंत माझा क्रोध सर्व बहुसंख्य लोकांवर रहाणार आहे.
13 Mert az eladó nem jut vissza az eladott jószághoz, amíg az élők közt van az élete, mart látomás szól egész tömegének, nem fordul el, és kiki a bűne miatt életüket nem tartják meg.
१३विकणारा जिवंत राहिला तरी तो विकलेल्या भूमीला परत जावयाचा नाही, कारण हे भाकीत त्या सर्व समूहाविषयी आहे, त्यातले काही ही चूकणार नाही, कोणीही आपल्या अधर्माने आपल्या जिवीतास बळकटी आणणार नाही.
14 Fújták a harsonát, elkészítettek mindent, de nincs ki harcba megy, mert haragom lobbant föl egész tömege ellen.
१४ते तुताऱ्यांचा नाद करतील आणि तयारी करतील तरी लढाई करण्यास कोणी तयार होणार नाही. तथापि माझा क्रोध पूर्ण समुदायावर आला आहे.
15 A kard künn s a dögvész meg az éhség belül; ki a mezőn van, a kard által hal meg, s ki a városban van, azt éhség és dögvész emészti meg.
१५इमारतीच्या आत तलवार आणि दुष्काळ, साथीचा रोग बाहेर आहे. जे शेतात आहेत ते तलवारीने मरतील, जो नगरात असेल त्यास दुष्काळ आणि साथीचा रोग त्यांचा नायनाट करेल.
16 És menekülnek a menekülőik, s olyanok lesznek a hegyeken mint a völgyek galambjai, melyek búgnak mindannyian – ki-ki bűne miatt.
१६त्यांच्यातील काही जण बचावले जातील आणि पर्वतावर कबूतराप्रमाणे जातील, त्यांच्या पातकामुळे ते कण्हत राहतील.
17 Mind a kezek ellankadnak és mind a térdek vízként folynak szét.
१७प्रत्येक हात अडखळतील आणि प्रत्येक गुडघा पाण्याप्रमाणे कमजोर होईल.
18 És zsákokat kötnek föl és borzadály borítja őket, minden arcon szégyen és mind a fejeiken kopaszság.
१८आणि ते अंगावर पोते गुंडळतील, त्यांच्यावर दहशतीचे सावट पसरेल; त्यांच्या चेहऱ्यावर लाज व डोक्यावर टक्कल पडेल.
19 Ezüstjüket az utcára dobják és aranyuk fertőzetté lesz, ezüstjük és aranyuk nem mentheti meg őket az Örökkévaló haragjának napján, vágyukat nem elégítik ki és hasukat meg nem töltik, mert bűnre való botlásukká lett.
१९ते आपले सोने व चांदी रस्त्यावर फेकून देतील, त्याचा त्याग करतील, त्यांचे सोनेचांदीही त्यांना परमेश्वराच्या क्रोधापासून वाचवू शकणार नाही, त्यांच्या जीवाचा बचाव होणार नाही, त्यांचे पोट भरणार नाही, कारण त्यांनी त्यामुळे ठोकर खाऊन अधर्म केला आहे.
20 És ékes díszét gőggé tették és utálatos képeiket, undokságaikat készítették belőle, azért tettem azt nekik fertőzetté.
२०ते त्यांच्या दागिण्यांवर घमंड करीत होते, त्यांच्या मूर्ती त्यांनी तिरस्कार आणणाऱ्या घृणा निर्माण करणाऱ्या तयार केल्या होत्या. तिरस्करणीय कार्य त्यांच्याशी केले आहे. म्हणून या सर्व गोष्टी त्यांच्यासाठी अपवित्र केल्या आहे.
21 És majd az idegenek kezébe adom prédául és a föld gonoszainak zsákmányul, hogy megszentségtelenítsék.
२१आणि मी तिऱ्हाईतास हे सर्व लुट म्हणून वाटून देईन आणि पृथ्वी वरील वाईट लोकांस लुटून घेऊन देईन. ते ते भ्रष्ट करतील.
22 És elfordítom tőlük arcomat és majd megszentségtelenítik kincsemet, és bemennek abba garázdálkodók és megszentségtelenítik.
२२मग मी माझे तोंड त्यांच्या महत्वाच्या ठिकाणापासून फिरवेन कारण त्यांनी माझे स्थान भ्रष्ट केले आहे. लुटारू येऊन आत लुटालुट करतील.
23 Készítsd a láncot, mert az ország telve van vérontó ítélettel és a város telve van erőszakkal.
२३साखळी तयार करा, कारण भूमी रक्ताच्या न्यायाच्या निकालाने पूर्ण भरुन गेली आहे, शहर हिंसक बनले आहे.
24 És elhozom a nemzetek legrosszabbjait, hogy elfoglalják házaikat, és megszüntetem a hatalmasok gőgjét és megszentségteleníttetnek szentélyeik.
२४देशावर सर्वात दुष्ट लोक घेऊन येईन आणि ते त्यांची घरे बळकावून घेतील, आणि मी त्यांचा गर्व समाप्त करेन कारण त्यांनी पवित्र ठिकाण अमंगळ केली आहेत.
25 Rettegés jön, keresnek békét, de nincsen.
२५ते भयभीत होतील, शांततेच्या शोधात ते भटकतील पण त्यांना ती सापडणार नाहीत.
26 Baleset jön balesetre, hír lesz hír után, keresnek látomást a prófétától, de tanítás elvész a paptól, tanács a vénektől.
२६अनर्थावर अनर्थ येईल अफवांवर अफवा पसरतील, मग ते संदेष्ट्याला संदेश पहाण्यासाठी सांगतील, दृष्टांत विद्या, सल्ला, वडीलांची बुध्दी संपून जाईल.
27 A király gyászol, a fejedelem ámulatba öltözik, s az ország népének kezei megrémülnek; útjuk szerint fogok cselekedni velük és ítéleteik szerint fogom őket ítélni, hogy megtudják, hogy én vagyok az Örökkévaló.
२७राजा शोक करील, व राजकुमार निराशा परीधान करतील, तेव्हा भूमीच्या लोकांचे हात भितीने थरथरतील त्यांच्या कृत्याप्रमाणे हे त्यांच्याशी मी करेन, आणि मी त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांचा न्याय करेन, तोपर्यंत त्यांना समजणार नाही कि मी परमेश्वर देव आहे.”