< Ezékiel 34 >
1 És lett hozzám az Örökkévaló igéje, mondván:
१मग परमेश्वराचे वचन मजकडे आले आणि म्हणाले,
2 Ember fia, prófétálj Izraél pásztorairól: prófétálj és szól hozzájuk, a pásztorokhoz. Így szól az Úr, az Örökkévaló: Oh Izraél pásztorai, a kik önmagukat legeltették, nemde a juhokat legeltessék a pásztorok?
२“मानवाच्या मुला, इस्राएलाच्या मेंढपाळाविरूद्ध भविष्य सांग! भविष्य सांग आणि त्यांना म्हण, प्रभू परमेश्वर मेंढपाळाविषयी असे म्हणतो, जे इस्राएलाचे मेंढपाळ स्वत: च चरत आहेत त्यास धिक्कार असो! मेंढपाळाने आपल्या कळपाची काळजी घ्यायला नको का?
3 A zsiradékot megeszitek, a gyapjút felöltitek, a kövéret levágjátok, a juhokat nem legeltetitek.
३तुम्ही चरबी खाता आणि लोकरीचे कपडे घालता. तुम्ही कळपातील धष्टपुष्ट मेंढ्या मारता. पण तुम्ही मेंढरांना कधीच चारत नाही.
4 Az elgyengülteket nem erősítettétek, a beteget nem gyógyítottátok, a sérültet nem kötöztétek be, az eltévedtet nem hoztátok vissza, az elveszettet nem kerestétek, és erővel uralkodtatok rajtuk és szigorúsággal.
४जे कोणी दुर्बळ होते त्यांना तुम्ही सबळ केले नाही किंवा तुम्ही आजाऱ्यांना बरे केले नाही. तुम्ही जे कोणी मोडले त्यांना पट्टी बांधली नाही. आणि जे घालवून दिलेले त्यास परत आणले नाही किंवा हरवलेल्यास शोधत नाही. त्याऐवजी तुम्ही त्यांच्यावर सक्तीने व जुलमाने राज्य करता.
5 És elszéledtek pásztor híján és eledelül lettek a mező minden vadjának és elszéledtek.
५मग मेंढपाळ नसल्याने त्यांची पांगापांग झाली आणि त्यांची पांगापाग झाल्यानंतर ते रानातील सर्व जिवंत पशूंचे भक्ष्य बनले.
6 Tévelyegnek juhaim mind a hegyeken és minden magas halmon és az ország egész színén elszélednek juhaim, és nincs ki kutatja, nincs ki keresi.
६माझा कळप सर्व डोंगरांतून व प्रत्येक उंच टेकड्यांवरुन भटकून गेली, पृथ्वीच्या सर्व पाठीवर पांगविली गेली. तरी त्यांना शोधण्यास कोणीही नव्हते.
7 Azért pásztorok, halljátok az Örökkévaló igéjét!
७म्हणून, मेंढपाळांनो, परमेश्वराचे म्हणणे ऐका.
8 Ahogy élek, úgy mond az Úr, az Örökkévaló, bizony mivel juhaim prédává lettek és eledelül lettek juhaim a mező minden vadjának pásztor híján, és pásztoraim nem viselték juhaimnak gondját, hanem önmagukat legeltették a pásztorok, de juhaimat nem legeltették:
८प्रभू परमेश्वर असे म्हणतो, जसा मी जिवंत आहे; माझी मेंढरे लुटीस गेली आहेत; कारण तेथे त्यांना मेंढपाळ नव्हता ती वनपशूस भक्ष्य झाली आणि माझ्या मेंढपाळांनी कोणीही कळपाला शोधले नाही परंतु मेंढपाळाने स्वतःची काळजी घेतली आणि माझ्या कळपाला चारले नाही.
9 azért pásztorok, halljátok az Örökkévaló igéjét.
९तेव्हा, मेंढपाळांनो, परमेश्वराचे म्हणणे ऐका.
10 Így szól az Úr, az Örökkévaló: im én fordulok a pásztorok ellen és követelem juhaimat kezüktől és elmozdítom őket a juhok legeltetésétől, úgy hogy nem legeltetik többé magukat a pásztorok; és megmentem juhaimat szájukból, hogy ne legyenek nekik eledelül.
१०प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी मेंढपाळांच्याविरूद्ध आहे आणि मी माझी मेंढरे त्यांच्या हातातून मागेन. त्यांचे कळप पाळणे मी बंद करीन; मग मेंढपाळ आपणास पुढे पोसणार नाहीत आणि मी आपली मेंढरे त्यांच्यामुखातून सोडवीन, अशासाठी की, माझी मेंढरे त्यांची भक्ष्य अशी होऊ नयेत.
11 Mert így szól az Úr, az Örökkévaló: Íme itt vagyok én, hogy gondját viseljem juhaimnak és számon tartom őket.
११कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी स्वत: च आपल्या कळपाचा शोध घेईन आणि मी त्यांची काळजी घेईन,
12 A mint számon tartja a pásztor nyáját, a mely napon elkülönített juhai között van, úgy fogom számon tartani juhaimat, és megmentem őket mindazon helyekből, a hová elszéledtek felhő és sűrű ködnek napján.
१२जो मेंढपाळ आपल्या पांगलेल्या मेंढ्यांबरोबर राहून त्यास शोधतो, तसाच मी आपली मेंढरे शोधीन आणि आभाळाच्या व अंधकाराच्या दिवशी त्यांची पांगापाग झाली त्या सर्व ठिकाणाहून मी त्यांना सोडवीन.
13 És kivezetem őket a népek közül, összegyűjtöm az országokból és leviszem földjükre, és legeltetem őket Izraél hegyein, a medrek mellett és mind az ország lakóhelyein.
१३मग मी त्यांना लोकांतून काढून आणीन. देशातून त्यांना एकत्र करीन व त्यांना त्यांच्या भूमीत परत आणीन. मी त्यांना इस्राएलाच्या पर्वताच्याबाजूला, झऱ्यांकाठी आणि लोक राहत असलेल्या सर्व ठिकाणी कुरणात चारीन.
14 Jó legelőn legeltetem őket és Izraél magasságos hegyein lesz a tanyájuk; ott fognak heverészni jó tanyán és kövér legelőn legelnek Izraél hegyein.
१४मी त्यांना चांगल्या कुरणांत ठेवीन. त्यांचे कुरण इस्राएलाच्या डोंगरावरील उंच ठिकाणी होईल; तेथे ती चांगल्या कुरणात पहुडतील. इस्राएलाच्या डोंगरावर ती उत्तम हिरवळीवर त्या चरतील.
15 Én legeltetem majd juhaimat és én heverésztetem őket, úgymond az Úr, az Örökkévaló.
१५मी स्वतः माझा कळप चारीन व त्यांना विश्रांती देईन, असे प्रभू परमेश्वर, म्हणतो.
16 Az elveszettet megkeresem, az eltévedtet visszahozom, a megsérültet bekötözöm, a beteget erősítem, a kövért pedig és az erőset megsemmisítem, jogosság szerint fogom legeltetni.
१६हरवलेल्या मेंढ्यांचा मी शोध घेईन व भटकलेल्यांना मी परत आणीन. जे मोडलेले त्यास मी पट्टी बांधीन आणि रोगी मेंढीस बरे करीन. व मी पुष्ट व बलिष्ट यांना नामशेष करीन. त्यास मी यथान्याय चारीन.
17 Ti pedig, juhaim, így szól az Úr, az Örökkévaló: Íme én ítélek bárány és bárány között, kosok és bakok között.
१७आणि प्रभू परमेश्वर, असे म्हणतो, तू माझ्या कळपा, पाहा, मी मेंढरामेंढरामध्ये, एडका व बोकड ह्यांच्यात न्यायनिवाडा करीन.
18 Kevés-e nektek, hogy a jó legelőn legeltek, hogy még legelőtök maradékát lábaitokkal tapossátok; lecsillapodott vizet isztok és a megmaradtat lábaitokkal kavarjátok fel?
१८तुम्ही चांगले कुरण खाऊन टाकता उरलेले कुरण तुम्ही आपल्या पायांनी तुडवता आणि तुम्ही स्वच्छ पाणी पिऊन राहिलेले पायांनी गढूळ करता. हे काहीच नाही असे तुम्हास वाटते का?
19 Juhaim pedig, amit lábaitok letapostak, azon legeljenek, és a mit lábaitok felkavartak, azt igyák-e?
१९पण माझी मेंढरे आता तुमच्या पावलांनी, चिरडलेले गवत खातात आणि तुमच्या पायांनी गढूळ झालेले पाणी पितात.
20 Azért így szól hozzájuk az Úr, az Örökkévaló: Íme itt vagyok én, hogy ítéljek kövér bárány és sovány bárány között.
२०म्हणून, प्रभू परमेश्वर, त्यांना असे म्हणतो, पाहा! मी स्वत: पुष्ट मेंढी आणि बारीक ह्यांच्यात निवाडा करीन.
21 Mivel oldallal és vállal taszítjátok és szarvaitokkal döfitek mind az elgyengülteket, míg el nem szélesztettétek őket kifelé:
२१तुम्ही बाजूने व खांद्याने ढकलता. आणि जी सर्व दुर्बळ झालेली त्यांना तुम्ही देशा बाहेर घालवून लावीपर्यंत त्यांना तुम्ही भोसकता,
22 segítem majd juhaimat, hogy prédára többé ne legyenek, és ítélni fogok bárány és bárány között.
२२म्हणून, मी माझ्या कळपाला वाचवीन. यापुढे त्यांची लूट होणार नाही. आणि मी मेंढ्या-मेंढ्यात न्यायनिवाडा करीन.
23 És egy pásztort támasztok föléjük, hogy legeltesse őket, szolgámat Dávidot; ő fogja legeltetni őket és ő lesz nékik pásztorul.
२३मग मी त्यांच्यावर एक मेंढपाळ नेमीन व तो त्यांना चारील आणि माझा सेवक दावीद, ह्याला मी मेंढपाळ म्हणून नेमीन. तो त्यांस चारील; तो त्यांच्यावर मेंढपाळ होईल.
24 Én, az Örökkévaló, pedig leszek nekik Istenül és Dávid szolgám fejedelem közöttük; én az Örökkévaló beszéltem.
२४कारण मी परमेश्वर त्यांचा देव होईन. व त्यांच्यामध्ये माझा सेवक दावीद त्यामध्ये अधिपती होईल मी परमेश्वर बोललो आहे.
25 És kötöm velök a béke szövetségét és elpusztítom a vadállatot az országból; és biztonságban laknak a pusztában és alszanak az erdőkben.
२५मग मी त्यांच्याबरोबर एक शांततेचा करार करीन आणि दुष्ट वन्य पशू देशातून नाहीसे करीन, मग माझ्या मेंढ्या वाळवंटातही सुरक्षित राहतील आणि रानात झोपतील.
26 És teszem őket meg halmom környékét áldássá s lebocsátom az esőt a maga idejében, áldásos esők lesznek.
२६मग मी त्यास व डोंगराभोवतालच्या स्थानांस आशीर्वाद असे करीन. कारण मी योग्य वेळी पाऊस पाडीन. ते आशीर्वादांचे वर्षाव होतील.
27 És megadja a mező fája az, ő gyümölcsét, és a föld megadja termését, és biztonságban lesznek földjükön; és megtudják, hogy én vagyok az Örökkévaló, midőn eltöröm jármuk rudjait és megmentem őket leigázói kezéből.
२७नंतर शेतातली झाडे त्यांचे फळ उत्पन्न करतील. आणि पृथ्वी आपला उपज देईल. माझी मेंढरे त्यांच्या देशात सुरक्षित राहतील; मी त्यांच्या जोखडाचे बंधने तोडून ज्यांनी त्यांना आपले दास केले त्यांच्या हातातून सोडवले म्हणजे ते जाणतील की मी परमेश्वर आहे.
28 És nem lesznek többé prédául a nemzeteknek, és az ország vadja nem eszi meg őket, és biztonságban laknak, és nincs, ki felijeszti.
२८यापुढे ते राष्ट्रांसाठी लूट असे होणार नाहीत आणि पृथ्वीवरील वनपशू त्यांना खाऊन टाकणार नाहीत. कारण ते सुखरुप राहतील. व कोणीही त्यांना भयभीत करणार नाही.
29 És támasztok nekik hírnévre való ültetvényt; és nem lesznek többé éhség elragadottjai az országban és nem viselik többé a nemzetek gyalázatát.
२९कारण मी त्यांच्यासाठी नावाजण्याजोगी लागवड करीन, मग त्यांची पुन्हा देशात दुष्काळाने उपासमार होणार नाही. यापुढे राष्ट्रांकडून त्यांना अपमान सहन करावा लागणार नाही.
30 És megtudják, hogy én, az Örökkévaló, az ő Istenük, velük vagyok, ők pedig az én népem, Izraél háza, úgymond az Úr, az Örökkévaló.
३०मग त्यांना समजून येईल की मीच त्यांचा परमेश्वर देव आहे, व मी त्यांच्याबरोबर आहे, इस्राएलाचे घराणे माझे लोक आहेत, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
31 És ti vagytok juhaim, legelőmnek ember-juhai vagytok; én vagyok Istentek, úgymond az Úr, az Örökkévaló.
३१कारण तुम्ही माझी मेंढरे आहात, माझ्या कुरणातील मेंढरे आहात. आणि माझे लोक! मी तुमचा देव आहे! असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”