< 2 Krónika 35 >
1 És tartott Jósijáhú Jeruzsálemben pészachot az Örökkévalónak, s levágták a pészacháldozatot az első hónap tizennegyedikén.
१राजा, योशीयाने यरूशलेमात परमेश्वराप्रीत्यर्थ वल्हांडणाचा उत्सव केला. पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशू कापला गेला.
2 És fölállította a papokat őrizetükre s megerősítette őket az Örökkévaló háza szolgálatára.
२परमेश्वराच्या मंदिराची कामे पार पाडण्यासाठी योशीयाने याजक नेमले आणि त्यांच्या कार्यात त्यांना प्रोत्साहन दिले.
3 És meghagyta a levitáknak, akik értelmeztek egész Izraelnek, akik szentek voltak az Örökkévalónak: tegyétek a szent ládát a házba, melyet épített Salamon, Dávid fia, Izrael királya; nincs nektek vállatokra való teher; most szolgáljátok az Örökkévalót, a ti Istenteket, s népét Izraelt.
३इस्राएली लोकांस शिक्षण देणाऱ्या आणि परमेश्वराच्या सेवेसाठी पवित्र होणाऱ्या लेव्यांना योशीया म्हणाला, “दावीद पुत्र शलमोनाने बांधलेल्या या मंदिरात पवित्र करार कोश ठेवा. दावीद इस्राएलचा राजा होता. यापुढे पवित्र करारकोश वारंवार खांद्यावरुन वाहू नका. परमेश्वर देवाची सेवा करा. देवाची प्रजा म्हणजे इस्राएलचे लोक त्यांची सेवा करा.
4 S legyetek kész atyai házaitok szerint, osztályaitokhoz képest, Dávidnak, Izrael királyának irata szerint s fia Salamon írása szerint,
४आपआपल्या घराण्यांप्रमाणे तुमचा जो क्रम ठरला आहे त्यानुसार मंदिरातील सेवेसाठी सिध्द व्हा. इस्राएलाचा राजा दावीद आणि त्याचा पुत्र राजा शलमोन यांनी आखून दिल्याप्रमाणे आपआपली कर्तव्ये पार पाडा.
5 s álljatok a szentélyben testvéreitek a nép fiai atyai házai szerint való csoportoknak megfelelően egy-egy atyai háznak osztálya a levitákból;
५आपआपल्या घराण्यांच्या वर्गवारीप्रमाणे, भाऊबंदांबरोबर पवित्र स्थानी उभे राहा. म्हणजे तुम्हास आपापसात सहकार्य करता येईल.
6 s vágjátok le a pészacháldozatot s szenteljétek meg magatokat s legyetek kész testvéreitek számára, cselekedvén az Örökkévalónak Mózes által adott igéje szerint.
६वल्हांडणाचे यज्ञपशू कापा, परमेश्वरासाठी स्वत: चे पवित्रीकरण करा. इस्राएल बांधवांसाठी यज्ञपशू तयार ठेवा. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही पार पाडा. या आज्ञा परमेश्वराने आपल्याला मोशेद्वारे दिल्या आहेत.”
7 És adományozott Jósijáhú a nép fiai számára juhokat s fiatal kecskéket, mindet pészacháldozatokul, mindazok számára, akik találtattak, szám szerint harmincezret és háromezer szarvasmarhát: ezeket a király vagyonából.
७वल्हांडणासाठी योशीयाने तीस हजार शेरडेमेंढरे जे तेथे उपस्थित होते त्यांना यज्ञपशू म्हणून इस्राएल लोकांस दिली; याखेरीज तीन हजार दिले. हे पशुधन त्याच्या खाजगी मालमत्तेतील होते.
8 Nagyjai pedig fölajánlásképpen a nép számára, a papok számára s a leviták számára adományoztak; Chilkijáhú, Zekharjáhú és Jechíél, az Isten házának elöljárói, adtak a papoknak pészacháldozatokul kétezerhatszázat és háromszáz szarvasmarhát.
८या उत्सवा निमित्त योशीयाच्या सरदारांनीदेखील लोकांस, लेवींना आणि याजकांना पशूंचे आणि वस्तूंचे मुक्त वाटप केले. मुख्य याजक हिल्कीया, जखऱ्या आणि यहीएल हे देवाच्या मंदिराचे प्रमुख कारभारी होते. त्यांनी दोन हजार सहाशे शेरडेमेंढरे आणि तीनशे बैल एवढे पशू वल्हांडणाचे बली म्हणून याजकांना दिले.
9 És Kánanjáhú, meg Semájáhú és Netanél, az ő testvérei, és Chasabjáhú, meg Jeíél és Józábád, a leviták nagyjai adományoztak a leviták számára pészacháldozatokul ötezret és ötszáz szarvasmarhát.
९कोनन्या आणि त्याचे भाऊ शमाया व नथनेल यांनी तसेच हशब्या, ईयेल व योजाबाद यांनी लेवींना पाच हजार शेरडेमेंढरे व पाचशे बैल वल्हांडणाचे यज्ञपशू म्हणून दिले, कोनन्या इत्यादी मंडळी लेव्याची प्रमुख होती.
10 Így megszilárdult a szolgálat, s fölálltak a papok állásukra s a leviták osztályaikhoz, a király parancsolata szerint.
१०वल्हांडणाच्या उपासनेची सर्व सिध्दता झाल्यावर याजक आणि लेवी आपापल्या जागी स्थानापन्न झाले. तशी राजाज्ञाच होती.
11 És levágták a pészacháldozatot, s a papok hintettek kezükből, a leviták pedig lehúzták a bőrt.
११वल्हांडणाचे कोकरे मारली गेली. त्या पशूंची कातडी काढून रक्त याजकांना दिले. लेवींकडून मिळालेले हे रक्त याजकांनी वेदीवर शिंपडले.
12 És elkülönítették az égőáldozatot, hogy odaadják a nép fiainak atyai házai szerint való csoportoknak, hogy bemutassák az Örökkévalónak, amint írva van Mózes könyvében; és így a szarvasmarhákat.
१२त्यांनी मग हे बैल परमेश्वरास होमार्पण करण्यासाठी वेगवेगळ्या घराण्याच्या लोकांकडे स्वाधीन केले. हा अर्पणाचा विधी मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे करायचा होता.
13 És megfőzték a pészacháldozatot tűzön rendelet szerint; a szentségeket pedig megfőzték a fazekakban, üstökben s tálakban és sürögve hordták mind a nép fiainak.
१३लेवींनी वल्हांडणाच्या यज्ञपशूंचे मांस विधिवत भाजले. पातेल्यात, हंड्यांत आणि कढई मध्ये त्यांनीही पवित्रार्पणे शिजवली आणि तत्परतेने लोकांस ती नेऊन दिली.
14 Azután pedig készítettek maguknak s a papoknak, mert a papok, Áron fiai, az égőáldozat s a zsiradékok bemutatásánál voltak éjjelig; a leviták tehát készítettek maguknak s a papoknak Áron fiainak.
१४हे काम उरकल्यावर लेवींना स्वत: साठी आणि अहरोनाचे वंशज असलेल्या याजकांसाठी मांस मिळाले. कारण हे याजक होमबली आणि चरबी अर्पण करण्यात रात्र पडेपर्यंत गुंतले होते.
15 De az énekesek, Ászáf fiai, állásukon voltak, parancsolata szerint Dávidnak, Ászáfnak, Hémánnak meg Jedútunnak, a király látójának; a kapuőrök is egy-egy kapunál voltak; nem kellett eltávozniuk szolgálatuktól, mert testvéreik a leviták készítettek számukra.
१५आसाफच्या घराण्यातील लेवी गायक राजा दाविदाने नेमून दिलेल्या आपापल्या जागांवर उभे होते. आसाफ, हेमान आणि राजाचा संदेष्टा यदूथून हे ते होत. प्रत्येक प्रवेशद्वारावरील द्वारपालांना आपले काम सोडायची गरज नव्हती कारण त्यांच्या लेवी बांधवांनी वल्हांडणाच्या सणाची त्यांच्यासाठी करायची सगळी तयारी केली होती.
16 És megszilárdult az Örökkévaló szolgálata azon a napon, mert tartották a pészacháldozatot s bemutatták az égőáldozatokat az Örökkévaló oltárán Jósijáhú király parancsolata szerint.
१६तेव्हा राजा योशीयाच्या आज्ञेनुसार परमेश्वराच्या उपासनेची सर्व तयारी त्या दिवशी पूर्ण झाली. वल्हांडणाचा उत्सव झाला आणि परमेश्वराच्या वेदीवर होमबली अर्पण करण्यात आले.
17 S tartották Izrael fiai, az ottlevők, a pészacháldozatot abban az időben, meg a kovásztalan kenyerek ünnepét hét napon át.
१७सर्व उपस्थित इस्राएल लोकांनी वल्हांडणाचा आणि बेखमीर भाकरीचा सण सात दिवस साजरा केला.
18 És nem tartatott Izraelben ilyen pészach Sámuél próféta napjai óta, s mind az Izrael királyai nem tartottak olyan pészachot, mint volt az, amelyet tartott Jócijáhú meg a papok és a leviták, meg egész Jehúda s Izrael, amely találtatott, meg Jeruzsálem lakói.
१८शमुवेल संदेष्ट्यांच्या काळापासून हा सण एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा झाला नव्हता. इस्राएलच्या कुठल्याच राजाच्या कारकीर्दींत हे झाले नव्हते. राजा योशीया, याजक, लेवी, यहूदा आणि इस्राएलातून आलेले लोक आणि यरूशलेमची प्रजा यांनी वल्हांडणाचा उत्सव थाटामाटाने केला.
19 Jósijáhú uralkodásának tizennyolcadik évében tartatott ez a pészach.
१९योशीयाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी हा वल्हांडणाचा उत्सव झाला.
20 Mindezek után, hogy Jósijáhú helyrehozta a házat, felvonult Nekhó, Egyiptom királya, hogy harcoljon az Eufrátes mellett levő Karkemisnál; s kivonult ellene Jósijáhú.
२०योशीयाने मंदिरासाठी सर्व चांगल्या गोष्टी केल्या. पुढे मिसरचा राजा नखो, फरात नदीजवळच्या कर्कमीश नगराविरुध्द लढावयास सैन्यासह चालून आला. योशीया त्यास लढाईसाठी सामोरा गेला.
21 És amaz követeket küldött hozzá, mondván: mi közöm hozzád, Jehúda királya? Nem teellened megyek ma, hanem hadakozásom háza ellen, s Isten azt mondta, hogy siessek; állj el az Istentől, aki velem van, hogy meg ne rontson téged.
२१पण नखोने आपल्या वकीलांमार्फत त्यास कळवले की, यहूदाच्या राजा योशीया, मला तुझ्याशी कर्तव्य नाही. मी तुझ्याशी लढायला आलेलो नाही. माझ्या शत्रूंवर चालून आलो आहे. देवानेच मला त्वरा करायला सांगितले. परमेश्वराची मला साथ आहे तेव्हा तू त्रास घेऊ नकोस. तू मला विरोध केलास तर देव तुझा नाश करील.
22 De Jósijáhú el nem fordította arcát tőle, hanem vele harcolni igyekezett, s nem hallgatott Nekhónak Isten szájából való szavaira s jött harcolni Megiddó síkságában.
२२पण योशीया मागे हटला नाही. त्याने नखोला तोंड द्यायचे ठरवले. आणि वेष पालटून तो लढाईत उतरला. देवाच्या आज्ञेविषयी नखोने जे सांगितले ते योशीयाने ऐकले नाही. तो मगिद्दोच्या खोऱ्यात युध्दासाठी सज्ज झाला.
23 És az íjászok lőttek Jósijáhú királyra; s mondta a király a szolgáinak: Vigyetek el engem, mert nagyon megsebesültem.
२३या लढाईत योशीयावर बाणांचा वर्षाव झाला. तो आपल्या सेवकांना म्हणाला, मी घायाळ झालो आहे, मला इथून घेऊन जा.
24 És elvitték őt szolgái a szekérről s ráültették másodrendű szekerére s Jeruzsálembe vitték s meghalt s eltemették ősei sírjaiban; egész Jehúda pedig és Jeruzsálem gyászoltak Jóaijáhú fölött.
२४तेव्हा सेवकांनी योशीयाला त्याच्या रथातून उतरवून त्याने तिथे आणलेल्या दुसऱ्या रथात बसवले आणि योशीयाला त्यांनी यरूशलेमेला नेले. यरूशलेमेमध्ये योशीयाला मरण आले. त्याच्या पूर्वजांना पुरले तेथेच योशीयाला पुरण्यात आले. योशीयाच्या मृत्यूने यहूदा आणि यरूशलेमेच्या लोकांस फार दु: ख झाले.
25 És siralmat mondott Jirmejáhú Jósijáhú fölött, s mind az énekesek s énekesnők szóltak siralmaikban Jósijáhúról mind e mai napig, s törvényül tették meg Izraelben; s íme azok meg vannak írva a Siralmakban.
२५यिर्मयाने योशीया प्रीत्यर्थ शोकगीते लिहिली आणि गायिली. ती विलापगीते आजही इस्राएलचे स्त्रीपुरुष गातात. योशीयाची ही गीते निरंतर गाण्याचा त्यांनी ठरावच केला. विलापगीताच्या पुस्तकात ही लिहिलेली आहेत.
26 És Jósijáhúnak egyéb dolgai s kegyes tettei, aszerint ami írva van az Örökkévaló tanában,
२६योशीयाची बाकीची कृत्ये आणि परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमानेची चांगली कृत्ये
27 és előbbi s utóbbi dolgai, íme meg vannak írva Izrael s Jehúda királyainak könyvében.
२७म्हणजे त्याची सर्व इतर कृत्ये इस्राएल व यहूदी राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेले आहेत.