< 1 Sámuel 3 >
1 A fiú Sámuel pedig szolgálta az Örökkévalót Éli előtt; az Örökkévaló szava pedig ritka volt ama napokban, látomás nem volt elterjedve.
१शमुवेल बाळ एलीच्या हाताखाली देवाची सेवा करीत होता. परमेश्वराचे वचन त्या दिवसात दुर्मिळ झाले होते; वारंवार भविष्यसूचक दृष्टांत होत नव्हते.
2 És volt valamely napon, Éli feküdt a helyén, szemei kezdtek elhomályosodni, látni sem tudott;
२त्या वेळेस असे झाले की, एली आपल्या ठिकाणी झोपला होता, आणि त्याची दृष्टी मंद झाल्यामुळे त्यास डोळ्यांनी चांगले दिसत नव्हते;
3 Isten mécsese pedig még nem aludt ki. Sámuel meg feküdt az Örökkévaló templomában, ahol Isten ládája volt.
३आणि देवाचा दीप अजून विझला नव्हता, आणि देवाचा कोश परमेश्वराच्या मंदिरात होता, तेथे शमुवेल झोपला होता.
4 És szólította az Örökkévaló Sámuelt; mondta: Itt vagyok.
४परमेश्वराने शमुवेलाला हाक मारली, तेव्हा तो म्हणाला, “मी येथे आहे.”
5 Odafutott Élihez és mondta: Itt vagyok, mert szólítottál engem. Mondta: Nem szólítottalak, feküdj le újra; ment és lefeküdt.
५मग शमुवेल एलीकडे धावत जाऊन म्हणाला, “मी येथे आहे, कारण तुम्ही मला हाक मारलीत.” आणि एलीने म्हटले, “मी बोलावले नाही परत जाऊन झोप.” म्हणून शमुवेल परत जाऊन झोपला.
6 És ismét szólította az Örökkévaló Sámuelt; erre fölkelt Sámuel, Élihez ment és mondta: Itt vagyok, mert szólítottál engem. Mondta: Nem szólítottalak fiam, feküdj le újra.
६पुन्हा परमेश्वराने, “शमुवेला,” अशी हाक मारली. तेव्हा शमुवेल उठून एलीकडे जाऊन म्हणाला, “मी येथे आहे, कारण तुम्ही मला हाक मारलीत.” एलीने उत्तर दिले, “माझ्या मुला मी तुला बोलावले नाही; परत जाऊन झोप.”
7 Sámuel pedig még nem ismerte az Örökkévalót, még nem nyilatkozott meg neki az Örökkévaló igéje.
७शमुवेलाला तर अजून परमेश्वराचा काही अनुभव आला नव्हता, आणि परमेश्वराचा संदेश अजून त्यास प्रगट झालेला नव्हता.
8 És ismét szólította az Örökkévaló Sámuelt, harmadszor; erre fölkelt, Élihez ment és mondta: Itt vagyok, mert szólítottál engem. Ekkor megértette Éli, hogy az Örökkévaló szólítja a fiút.
८मग परमेश्वराने शमुवेलाला पुन्हा तिसऱ्याने हाक मारली. तेव्हा तो पुन्हा उठून एलीकडे जाऊन म्हणाला, “मी येथे आहे, कारण तुम्ही मला हाक मारलीत.” तेव्हा एलीला समजले की, परमेश्वराने मुलाला हाक मारली आहे.
9 Mondta tehát Éli Sámuelnek: Menj, feküdj le; és lesz, ha szólít téged, akkor mondjad: beszélj, Örökkévaló, mert hallja a szolgád. És ment Sámuel és lefeküdt helyére.
९मग एली शमुवेलाला म्हणाला, “तू जाऊन पुन्हा झोप; आणि जर त्याने तुला पुन्हा हाक मारली, तर असे म्हण, हे परमेश्वरा बोल कारण तुझा दास ऐकत आहे.” मग शमुवेल परत जाऊन आपल्या जागी झोपला.
10 S eljött az Örökkévaló, odaállt és szólította, mint már több ízben: Sámuel, Sámuel. Mondta Sámuel Beszélj, mert hallja a te szolgád.
१०आणि परमेश्वर आला आणि उभा राहिला; त्याने पहिल्या वेळेप्रमाणे, “शमुवेला शमुवेला,” अशी हाक मारली. तेव्हा शमुवेल म्हणाला, “बोल तुझा दास ऐकत आहे.”
11 És szólt az Örökkévaló Sámuelhez: Íme, én cselekszem oly dolgot Izraelben, hogy bárki hallja, megcsendül a két füle.
११परमेश्वर शमुवेलास म्हणाला, “पाहा इस्राएलात मी अशी एक गोष्ट करणार आहे की, जो कोणी ती ऐकेल त्या प्रत्येकाचे कान भणभणतील.
12 Ama napon teljesítem Élin mindazt, amit beszéltem házáról, kezdve és végezve.
१२एलीच्या घराण्याविषयी जे मी सांगितले, ते मी सर्व आरंभापासून शेवटपर्यंत मी त्याच्या विरूद्ध पूर्ण करीन.
13 Kijelentem neki, hogy ítéletet tartok háza fölött örökre, ama bűn miatt, hogy tudta, hogy fiai átkot vonnak magukra, de nem feddte meg őket.
१३कारण मी त्यास सांगितले की जो अन्याय त्यास माहित आहे, त्यामुळे मी त्याच्या घराण्याला निरंतर न्यायदंड करीन कारण त्याच्या मुलांनी आपणावर शाप आणला तरी त्याने त्यांना आवरले नाही.
14 Azért tehát megesküdtem Éli házáról: Nem jut engesztelés Éli háza bűnének, sem vágóáldozattal, sem lisztáldozattal, soha sem.
१४यामुळे एलीच्या घराण्याविषयी मी अशी शपथ केली आहे की यज्ञ व अर्पण यांकडून एलीच्या घराण्याचा अन्याय कधीही दूर होणार नाही.”
15 És feküdt Sámuel reggelig, akkor kinyitotta az Örökkévaló házának ajtajait; Sámuel pedig félt Élinek megmondani a látomást.
१५नंतर शमुवेल सकाळपर्यंत झोपला; मग त्याने परमेश्वराच्या मंदिराची दारे उघडली. पण शमुवेल एलीला हा दृष्टांत सांगाण्यास घाबरत होता.
16 És hívta Éli Sámuelt és mondta: Sámuel fiam! Mondta: Itt vagyok.
१६मग एलीने शमुवेलाला हाक मारून म्हटले, “माझ्या मुला शमुवेला.” तेव्हा शमुवेल म्हणाला, “हा मी येथे आहे.”
17 És mondta: Mi az az ige, melyet szólt hozzád? Ne titkold el, kérlek, előttem. Úgy tegyen veled az Isten és úgy folytassa, ha eltitkolsz előttem valamit mind azon igéből, melyet hozzád szólt.
१७मग त्याने म्हटले, “तो तुझ्याशी काय बोलला? मी तुला विनंती करतो ते माझ्यापासून लपवून ठेवू नको. जे काही त्याने तुला सांगितले त्यातले काही जर तू माझ्यापासून लपवून ठेवशील तर परमेश्वर तुझे तसे व त्यापेक्षा अधिकही करो.”
18 Erre megmondta neki Sámuel mind a dolgokat s nem titkolta el előtte. Mondta: Ő az Örökkévaló, ami jónak tetszik szemeiben, azt tegye.
१८तेव्हा शमुवेलाने सर्वकाही त्यास सांगितले; त्याच्यापासून काही लपवून ठेवले नाही. मग एली म्हणाला, तो “परमेश्वरच आहे. त्यास बरे वाटेल ते तो करो.”
19 Felnőtt Sámuel és az Örökkévaló vele volt és nem ejtett el mind a szavaiból semmit a földre.
१९आणि शमुवेल वाढत गेला आणि परमेश्वर त्याच्या बरोबर होता आणि त्याने त्याचा एकही भविष्यविषयक शब्द सत्यात अपयशी होऊ दिला नाही.
20 És megtudta egész Izrael Dántól Beér-Sebáig, hogy hűséges Sámuel mint az Örökkévalónak prófétája.
२०शमुवेल परमेश्वराचा नियुक्त केलेला भविष्यवादी आहे असे दानापासून बैर-शेबापर्यंत सर्व इस्राएलांना समजले.
21 Továbbra is megjelent az Örökkévaló Sílóban, mert megnyilatkozott az Örökkévaló Sámuelnek Sílóban az Örökkévaló igéjével.
२१शिलोत परमेश्वराने पुन; दर्शन दिले, कारण त्याने शिलो येथे वचनाद्वारे स्वतःला शमुवेलाला प्रगट केले.