< 1 Sámuel 2 >
1 Ekkor imádkozott Channa és mondta: Ujjong szívem az Örökkévalóban, emelkedik szarvam az Örökkévaló által; tágra nyílik szám ellenségeim ellen, mert örvendek segítségedben.
१मग हन्ना प्रार्थना करून म्हणाली, “माझे मन परमेश्वराच्या ठायी आनंद पावत आहे; माझे शिंग परमेश्वराच्या ठायी उंच केले आहे; माझे मुख माझ्या शत्रूविरूद्ध धैर्याने बोलत आहे, कारण तू केलेल्या तारणाने मी आनंदीत होत आहे.
2 Nincs szent, mint az Örökkévaló, mert nincs senki kívüled; és nincs szirt, mint Istenünk.
२परमेश्वरासारखा कोणी पवित्र नाही, कारण तुझ्या शिवाय कोणी नाही, आमच्या देवासारखा खडकही कोणी नाही,
3 Ne sokat beszéljetek fennhéjázva, fennhéjázva, ne jöjjön kemény szó a szátokból! Mert tudás Istene az Örökkévaló s meg vannak szabva az ő tettei.
३अति गर्विष्ठपणाने आणखी बढाई मारू नका; तुमच्या तोंडातून उद्धटपणाचे भाषण न निघो. कारण परमेश्वर ज्ञानाचा देव आहे; त्याच्याकडून कृत्ये तोलली जातात.
4 Hősöknek íja megtörik, a gyengéket pedig erő övezi.
४पराक्रमी पुरूषांची धनुष्ये मोडलेली आहेत, परंतू जे अडखळले त्यांनी बलरूप कमरबंद वेष्टीला आहे.
5 Jóllakottak kenyérért szegődnek, s az éhesek megszűnnek éhezni; míg hetet szül a magtalan, elfonnyad a sok gyermekű.
५जे तृप्त होते ते अन्नासाठी मोलमजुरी करीत आहेत; आणि जे भुकेले होते ते तसे राहिले नाहीत. वांझ होती तिने सात मुलांस जन्म दिला आहे, परंतु फार लेकरे आहेत ती अशक्त झाली आहे.
6 Az Örökkévaló öl és éltet, sírba dönt és fölhoz; (Sheol )
६परमेश्वर जिवे मारतो व जिवनात आणतो. तो अधोलोकास नेतो व वर आणतो. (Sheol )
7 az Örökkévaló szegényít és gazdagít, lealáz s föl is emel.
७परमेश्वर गरीब करतो व श्रीमंतही करतो. तो नम्र करतो, तसेच तो उंचही करतो.
8 Föltámasztja porból a szegényt, szemétből fölemeli a szűkölködőt, hogy ültesse a nemesek mellé és a tisztelet székét bírassa velük. Mert az Örökkévalóé a föld oszlopai és rájuk helyezte a világot.
८तो गरीबाला धुळीतून वर उठवतो; तो भिकाऱ्याला उकिरड्यावरून उठवून उभे करतो; यासाठी की त्यांना राजपुत्राबरोबर बसवावे आणि त्यांना वारसाने सन्मानाचे आसन मिळावे. कारण पृथ्वीचे खांब परमेश्वराचे आहेत; त्याने त्यावर जग ठेवले आहे.
9 Jámborainak lábait megőrzi, s a gonoszok sötétségben enyésznek; mert nem erővel győz az ember!
९तो आपल्या विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे पाय संभाळील, परंतु दुष्ट अंधारात शांत ठिकाणी ठेवले जातील, कारण सामर्थ्याने कोणी मनुष्य विजय मिळविणार नाही.
10 Az Örökkévaló – megtörnek akik küzdenek ellene, rájuk dörög az egekben; az Örökkévaló ítél a föld végei fölött, hogy hatalmat adjon királyának, s fölemelje fölkentjének szaruját.
१०देवाशी विरोध करणाऱ्यांचे तुकडे तुकडे केले जातील; आकाशांतून तो त्यांच्याविरुध्द मेघगर्जना करील. परमेश्वर पृथ्वीच्या शेवटल्या टोकावर असलेल्यांचा न्याय करील; तो आपल्या राजाला सामर्थ्य देईल आणि आपल्या अभिषिक्ताचे शिंग उंच करील.”
11 S elment Elkána Rámába házához; a fiú pedig szolgálta az Örökkévalót Éli pap előtt.
११मग एलकाना रामा येथे आपल्या घरी गेला. आणि तो लहान मुलगा एली याजकासमोर परमेश्वराची सेवा करू लागला.
12 Éli fiai alávaló emberek voltak, nem ismerték az Örökkévalót.
१२एलीची मुले नालायक माणसे होती; ते परमेश्वरास ओळखत नव्हते.
13 A papok eljárása ugyanis a néppel: bárki áldozatot mutatott be, jött a papnak legénye, mikor főzték a húst, háromfogú villával a kezében;
१३लोकांच्या बाबतीत याजकांची अशी रीत होती की कोणी मनुष्य यज्ञ अर्पण करू लागला की, मांस शिजत असतानाच याजकाचा चाकर मांस उचलण्यासाठी तीन अणकुचीदार टोकाचा काटा आपल्या हातात घेऊन येई
14 és beleszúrt a medencébe, vagy az üstbe, vagy a bögrébe, vagy a fazékba: mind amit fölhozott a villa, elvitte azt a pap; így tettek egész Izraellel, akik oda, Sílóba mentek.
१४तो परातीत किंवा पातेल्यांत किंवा कढईत किंवा गंगाळात तो काटा घुसवत असे आणि तो काटा जे सर्व धरून काढी, ते याजक आपणासाठी घेई. जे इस्राएली लोक शिलो येथे येत त्या सर्वांना ते तसेच करत असत
15 Sőt még mielőtt elfüstölögtették a zsiradékot, eljött a papnak legénye és mondta az áldozó embernek: Adj húst, hogy megsüssék a papnak; nem fogad el tőled főtt húst, hanem csak nyerset!
१५त्यांनी चरबी जाळण्याच्या आधीच याजकाचा चाकर येऊन यज्ञ करणाऱ्याला म्हणत असे की, “याजकासाठी मांस भाजण्यास दे कारण तो तुझ्यापासून शिजलेले मांस घेणार नाही तर फक्त कच्चे घेईल.”
16 Ha így szólt hozzá az ember: Azonnal elfüstölögtetik a zsiradékot, akkor végy magadnak, amint kívánja a lelked, – azt mondta: Nem, hanem most adj; ha pedig nem, veszek erővel!
१६जर त्या मनुष्याने त्यास असे म्हटले की, “अगोदर ते चरबी जाळतील मगच तुला पाहिजे तेवढे तू घे” तर तो म्हणे असे नाही, “पण तू आताच दे नाही तर मी ते बळजबरीने घेईन.”
17 S igen nagy volt az ifjak vétke az Örökkévaló előtt, mert megvetették az emberek az Örökkévaló áldozatát.
१७हे त्या तरुणाचे पाप परमेश्वराच्यासमोर फार मोठे होते कारण त्यामुळे देवासाठी अर्पण आणण्याचा लोकांस तिरस्कार वाटू लागला.
18 Sámuel pedig szolgált az Örökkévaló színe előtt, mint fiú len-éfóddal övezve.
१८परंतु शमुवेल बाळ तर तागाचे वस्त्र एफोद घालून देवाची सेवा करीत होता.
19 És kis köpenyt készített neki anyja és fölvitte neki évről évre, mikor fölment férjével, áldozni az évi áldozatot.
१९त्याची आई त्याच्यासाठी लहान अंगरखा करीत असे आणि प्रत्येक वर्षी आपल्या पतीबरोबर वार्षिक यज्ञ करावयास येई त्यावेळी त्यास तो देत असे.
20 Ilyenkor megáldotta Éli Elkánát és feleségét és mondta: Adjon neked az Örökkévaló magzatot ez asszonytól azon fölajánlás helyett, melyet, fölajánlott az Örökkévalónak. Erre elmentek hazájába.
२०एलकानाला व त्याच्या पत्नीला एली आशीर्वाद देऊन म्हणत, “असे या पत्नीपासून परमेश्वर तुला संतान देवो” कारण जे तिने देवाकडे विनंती करून मागितले त्यास परत दिले मग ते आपल्या घरी जात असत.
21 Csakugyan gondolt az Örökkévaló Channára; várandós lett és szült három fiút és két leányt. És felnőtt a fiú Sámuel az Örökkévaló mellett.
२१आणि परमेश्वराने हन्नेला पुन्हा मदत केली ती गरोदर झाली. तिने तीन मुलांना व दोन मुलींना जन्म दिला दरम्यानच्या काळात शमुवेल बाळ परमेश्वरासमोर वाढत गेला.
22 Éli pedig nagyon öreg volt; hallotta mindazt, amit tesznek fiai egész Izraellel és hogy hálnak az asszonyokkal, akik odasereglettek a találkozás sátorának bejáratához.
२२आता एली फार म्हातारा झाला होता आणि आपले पुत्र सर्व इस्राएलाशी कसे वागले आणि दर्शनमंडपाच्या प्रवेशदाराजवळ ज्या स्त्रिया सेवा करीत त्यांच्यापाशी ते कसे निजले हे सर्व त्याने ऐकले.
23 És mondta nekik: Miért tesztek ily dolgokat, amely gonosz dolgaitokat hallom ez egész néptől.
२३तेव्हा तो त्यांना म्हणाला, “तुम्ही अशी कृत्ये का करता? कारण तुमची वाईट कृत्ये या सर्व लोकांपासून मी ऐकली आहेत.
24 Ne fiaim! Mert nem jó a hír, melyet hallok, ahogy terjeszti az Örökkévaló népe.
२४माझ्या मुलांनो असे करू, नका कारण जी बातमी मी ऐकतो ती चांगली नाही; तुम्ही परमेश्वराच्या लोकांस आज्ञाभंग करायला लावता.
25 Ha ember ember ellen vét, ítéli a bíró, de ha az Örökkévaló ellen vét az ember, ki szerez ítéletet neki? De nem hallgattak atyjuk szavára, mert az Örökkévaló meg akarta őket ölni.
२५जर कोणी एक पुरुष दुसऱ्याविरूद्ध पाप करील तर परमेश्वर त्याचा न्याय करील. पण जर पुरुष परमेश्वराच्या विरूद्ध पाप करील तर त्यासाठी कोण मध्यस्थी करेल?” पण ते आपल्या बापाचे शब्द ऐकेनात कारण त्यांना जिवे मारावे असा देवाचा हेतू होता.
26 A fiú Sámuel egyre nagyobb és jobb lett, az Örökkévaló előtt is, és az emberek előtt is.
२६शमुवेल बाळ हा मोठा झाला आणि परमेश्वराच्या व मनुष्याच्या कृपेत वाढत गेला.
27 Jött az Isten embere Élihez és szólt hozzá: Így szól az Örökkévaló: Úgy-e megnyilatkoztam atyád háza előtt, mikor Egyiptomban voltak Fáraó házában!
२७आता देवाचा एक पुरुष एलीकडे येऊन त्यास म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो, तुझ्या पूर्वजांचे घराणे मिसरात फारोच्या दास्यात राहत असता मी त्यास प्रगट झालो नाही काय?
28 Kiválasztottam őt magamnak mind az Izrael törzsei közül papnak, hogy fölmenjen oltáromra, hogy füstölögtessen füstölőszert és viseljen éfódot előttem; s adtam atyád házának Izrael fiainak mind a tűzáldozatait.
२८आणि त्याने माझा याजक व्हावे माझ्या वेदीकडे धूप जाळायला वरती जावे माझ्यासमोर एफोद धारण करावे म्हणून मी त्यास सर्व इस्राएलाच्या वंशातून निवडून काढले नाही काय? आणि इस्राएलाच्या लोकांनी अग्नीतून केलेली सर्व अर्पणे मी तुझ्या पूर्वजांच्या घराण्याला दिली नाहीत काय?
29 Miért tiporjátok vágóáldozatomat és lisztáldozatomat, melyet elrendeltem a. szentély számára? Jobban tisztelted fiaidat nálam, hízlalván magatokat Izrael népem minden áldozatának zsengéjéből!
२९तर तुम्ही जो माझा यज्ञ व जे माझे अर्पण मी जिथे राहतो तिथे आज्ञापिले आहे, त्यांना तुम्ही का लाथ मारता? आणि माझे लोक इस्राएलांच्या सर्व अर्पणातील जी उत्तम त्यांकडून आपणाला पुष्ट करण्यास माझ्यांपेक्षा आपल्या मुलांचा तू का अधिक आदर करतोस?
30 Azért, úgymond az Örökkévaló, Izrael Istene, azt mondtam volt, házad és atyád háza majd járnak előttem örökké; de most, úgymond az Örökkévaló, távol legyen az tőlem! Mert tisztelőimet tisztelem, megvetőim pedig megalacsonyulnak.
३०यामुळे इस्राएलांचा परमेश्वर म्हणतो, की तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे माझ्यासमोर निरंतर चालेल असे मी म्हटले खरे; परंतु आता परमेश्वर असे म्हणतो, ही गोष्ट माझ्यापासून दूर होवो कारण जे माझा आदर करतात त्यांचा आदर मी करीन आणि जे मला तिरस्कार करतात त्यांचा अवमान होईल.
31 Íme napok jönnek, és levágom karodat és atyád házának karját, hogy öreg ne legyen házadban.
३१पाहा असे दिवस येत आहे की, ज्यात मी तुझे सामर्थ्य व तुझ्या वडिलाच्या घराण्याचे सामर्थ्य कापून टाकीन आणि तुझ्या घराण्यात कोणी म्हातारा होणार नाही.
32 És majd látsz vetélytársat a szentélyben mindazzal, amit jót tesz Izraellel; és öreg nem lesz házadban sohasem.
३२जरी इस्राएलाला जे सर्व चांगले दिले जाईल तरी जिथे मी राहतो त्या जागी दुःख पाहशील आणि तुझ्या घराण्यात सर्वकाळ कधी कोणी म्हातारा होणार नाही.
33 De nem mindenkit irtok ki közüled oltárom mellől, szemed elepesztésére és lelked elcsüggesztésére; de házadnak minden szaporulása férfikorban fog meghalni.
३३आणि तुझा जो पुरुष मी आपल्या वेदीपासून काढून टाकणार नाही, त्यास जिवंत राखले जाईल यासाठी की, तो तुझे डोळे क्षीण करणारा व तुझ्या मनाला खेद देणारा होईल. आणि तुझ्या घराण्याची सर्व संतती ऐन तरुणपणात मरेल.
34 S ez legyen számodra a jel, mely bekövetkezik két fiadon, Chofnin és Pínechászon: ugyanegy napon halnak meg mindketten.
३४आणि तुझे दोघे पुत्र हफनी व फिनहास यांच्यावर जे येईल तेच तुला चिन्ह होईल; ते दोघेही एकाच दिवशी मरतील.
35 Támasztok majd magamnak hűséges papot, aszerint, amint szívemben és lelkemben van, fog cselekedni; és építek neki hűséges házat, és járni fog az én fölkentem előtt minden időben.
३५मी आपणासाठी विश्वासू याजक उभा करीन; तो माझ्या मनात व माझ्या मनांत जे आहे त्याप्रमाणे करील. मी त्याचे घराणे निश्चित स्थापीन; आणि तो माझ्या अभिषिक्त राजासमोर निरंतर चालेल.
36 És lesz, akárki megmarad házadban, eljön leborulni előtte egy ezüst fillérért és egy cipó kenyérért, és azt mondja: fogadj be engem a papi teendők egyikére, hogy ehessem egy darab kenyeret.
३६असे होईल की तुझ्या घराण्यातील प्रत्येक जण जो कोणी राहिलेला आहे तो येऊन रुप्याच्या तुकड्यासाठी व भाकरीच्या तुकड्यासाठी त्याच्यापुढे नमन करील आणि म्हणेल की, मी तुला विनंती करतो मला भाकरीचा तुकडा खाण्यास मिळावा म्हणून मला याजकपदातले एखादे काम दे.”