< गिनती 4 >

1 फिर यहोवा ने मूसा और हारून से कहा,
परमेश्वर मोशे व अहरोन यांच्याशी बोलला, तो म्हणाला,
2 “लेवियों में से कहातियों की, उनके कुलों और पितरों के घरानों के अनुसार, गिनती करो,
लेवी लोकांपैकी कहाथी कुळांच्या पुरुषांची त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे गणती कर. (हे लोक लेवीच्या कुळापैकीच होते)
3 अर्थात् तीस वर्ष से लेकर पचास वर्ष तक की आयु वालों में, जितने मिलापवाले तम्बू में काम-काज करने को भर्ती हैं।
तीस ते पन्नास वर्षांच्या पुरुषांची गणती कर. हे पुरुष दर्शनमंडपातली सेवा करण्यासाठी सैन्यात जातात त्यांची गणती कर.
4 और मिलापवाले तम्बू में परमपवित्र वस्तुओं के विषय कहातियों का यह काम होगा,
कहाथ वंशजांनी दर्शनमंडपामधील परमपवित्र वस्तू ज्या माझ्यासाठी राखून ठेवल्या आहेत त्यांची त्यांनी काळजी घ्यावी.
5 अर्थात् जब जब छावनी का कूच हो तब-तब हारून और उसके पुत्र भीतर आकर, बीचवाले पर्दे को उतार कर उससे साक्षीपत्र के सन्दूक को ढाँप दें;
जेव्हा छावणी आपला तळ पुढे हलविण्याची तयारी करील, तेव्हा अहरोन व त्याच्या मुलांनी तंबूत जाऊन परमपवित्र स्थानातील पडदा जो पवित्रस्थानापासून वेगळा करतो तो खाली काढावा व त्याने कराराचा कोश झाकावा.
6 तब वे उस पर सुइसों की खालों का आवरण डालें, और उसके ऊपर सम्पूर्ण नीले रंग का कपड़ा डालें, और सन्दूक में डंडों को लगाएँ।
मग त्यांनी कोशावर तहशाच्या कातड्याचे आच्छादन घालावे व त्यावर संपूर्ण निळ्या रंगाचे कापड पसरावे व त्यांनी तो वाहून नेण्यासाठी दांडे लावावे.
7 फिर भेंटवाली रोटी की मेज पर नीला कपड़ा बिछाकर उस पर परातों, धूपदानों, करछों, और उण्डेलने के कटोरों को रखें; और प्रतिदिन की रोटी भी उस पर हो;
त्यांनी समक्षतेच्या भाकरीच्या मेजावर निळ्या रंगाचे कापड पसरावे व त्यावर तबके, धूपपात्रे, वाट्या व पेयार्पणे ओतण्याचे पेले ठेवावे; त्याचप्रमाणे नेहमीची भाकरही त्यावर ठेवावी.
8 तब वे उन पर लाल रंग का कपड़ा बिछाकर उसको सुइसों की खालों के आवरण से ढाँपें, और मेज के डंडों को लगा दें।
त्या सर्वांवर किरमिजी रंगाचे कापड पसरावे व नंतर ते सर्व तहशाच्या कातड्याने झाकून टाकावे; तो वाहून नेण्यासाठी मेजाला दांडे बसवावे.
9 फिर वे नीले रंग का कपड़ा लेकर दीपकों, गुलतराशों, और गुलदानों समेत उजियाला देनेवाले दीवट को, और उसके सब तेल के पात्रों को, जिनसे उसकी सेवा टहल होती है, ढाँपें;
त्यांनी दीपस्तंभ आणि त्यावरील दिवे, तसेच दिवे सतत तेवत ठेवण्याकरिता लागणारी सर्व उपकरणे चिमटे, ताटल्या आणि दिव्यासाठी लागणाऱ्या तेलाची सर्व पात्रे ही सर्व निळ्या कापडाने झाकावी.
10 १० तब वे सारे सामान समेत दीवट को सुइसों की खालों के आवरण के भीतर रखकर डंडे पर धर दें।
१०या सर्व वस्तू त्यांनी तहशाच्या कातड्याने लपेटून घ्याव्यात आणि हे सर्व वाहून न्यावयाच्या चौकटीवर त्यांनी ठेवावे.
11 ११ फिर वे सोने की वेदी पर एक नीला कपड़ा बिछाकर उसको सुइसों की खालों के आवरण से ढाँपें, और उसके डंडों को लगा दें;
११त्यांनी सोन्याच्या वेदीवर निळे कापड पसरावे. ते तहशाच्या कातड्याने झाकावे व मग वेदीला वाहून नेण्याचे दांडे बसवावे.
12 १२ तब वे सेवा टहल के सारे सामान को लेकर, जिससे पवित्रस्थान में सेवा टहल होती है, नीले कपड़े के भीतर रखकर सुइसों की खालों के आवरण से ढाँपें, और डंडे पर धर दें।
१२मग पवित्रस्थानातील उपासनेसाठी लागणारी सर्व उपकरणे त्यांनी गोळा करावीत व ती निळ्या कापडात गुंडाळावीत; त्यावर तहशाच्या कातड्याचे आच्छादन टाकावे आणि मग हे सर्व त्यांनी वाहून नेणाऱ्या चौकटीवर ठेवावे.
13 १३ फिर वे वेदी पर से सब राख उठाकर वेदी पर बैंगनी रंग का कपड़ा बिछाएँ;
१३मग त्यांनी वेदीवरील सर्व राख काढून ती स्वच्छ करावी व वेदीवर जांभळ्या रंगाचे कापड पसरावे.
14 १४ तब जिस सामान से वेदी पर की सेवा टहल होती है वह सब, अर्थात् उसके करछे, काँटे, फावड़ियाँ, और कटोरे आदि, वेदी का सारा सामान उस पर रखें; और उसके ऊपर सुइसों की खालों का आवरण बिछाकर वेदी में डंडों को लगाएँ।
१४नंतर त्यांनी वेदीच्या सेवेची सर्व उपकरणे म्हणजे अग्नीपात्रे, काटे, फावडी व कटोरे या वेदीच्या सर्व वस्तू गोळा करून त्या वेदीवर ठेवाव्यात; मग तिच्यावर तहशाच्या कातड्याचे आच्छादन घालावे व मग तिला वाहून नेण्याचे दांडे बसवावेत.
15 १५ और जब हारून और उसके पुत्र छावनी के कूच के समय पवित्रस्थान और उसके सारे सामान को ढाँप चुकें, तब उसके बाद कहाती उसके उठाने के लिये आएँ, पर किसी पवित्र वस्तु को न छूएँ, कहीं ऐसा न हो कि मर जाएँ। कहातियों के उठाने के लिये मिलापवाले तम्बू की ये ही वस्तुएँ हैं।
१५अहरोन व त्याचे पुत्र ह्यानी पवित्रस्थानातील सर्व पवित्र वस्तूवर आच्छादन टाकण्याचे पूर्ण करावे; मग कहाथी लोकांनी आत जावे आणि त्या वस्तू वाहून नेण्याचे काम सुरु करावे; अशा प्रकारे ते पवित्र वस्तूंना स्पर्श करणार नाहीत आणि मरणार नाहीत. दर्शनमंडपामधील जी ओझी कहाथवंशजांनी वाहावयाची ती हीच.
16 १६ “जो वस्तुएँ हारून याजक के पुत्र एलीआजर को देख-रेख के लिये सौंपी जाएँ वे ये हैं, अर्थात् उजियाला देने के लिये तेल, और सुगन्धित धूप, और नित्य अन्नबलि, और अभिषेक का तेल, और सारे निवास, और उसमें की सब वस्तुएँ, और पवित्रस्थान और उसके सम्पूर्ण सामान।”
१६पवित्र निवासमंडप व त्यातील सर्व वस्तू व उपकरणे म्हणजे पवित्रस्थान व त्यातील दिव्यांना लागणारे तेल, सुगंधी धूप, रोजची अन्नार्पणे व अभिषेकाचे तेल या सर्वांची जबाबदारी अहरोन याजकाचा मुलगा एलाजार ह्याने घ्यावी.
17 १७ फिर यहोवा ने मूसा और हारून से कहा,
१७परमेश्वर मोशे व अहरोनाशी बोलला. तो म्हणाला,
18 १८ “कहातियों के कुलों के गोत्रों को लेवियों में से नाश न होने देना;
१८तुम्ही कहाथी वंशातल्या कुळाचा वंश लेव्यातून काढून टाकण्याची परवानगी देऊ नका;
19 १९ उसके साथ ऐसा करो, कि जब वे परमपवित्र वस्तुओं के समीप आएँ, तब न मरें परन्तु जीवित रहें; इस कारण हारून और उसके पुत्र भीतर आकर एक-एक के लिये उसकी सेवकाई और उसका भार ठहरा दें,
१९जेव्हा ते परमपवित्रस्थानातील वस्तूजवळ जातील तेव्हा त्यांनी मरू नये पण जगावे म्हणून अहरोन व त्याचे पुत्र ह्यांनी आत जाऊन त्यांच्यातील एकएकाला त्यांचे काम व ओझे नेमून द्यावे.
20 २० और वे पवित्र वस्तुओं के देखने को क्षण भर के लिये भी भीतर आने न पाएँ, कहीं ऐसा न हो कि मर जाएँ।”
२०पवित्र स्थानातील वस्तू पाहण्यास त्यांनी क्षणभरही आत जाऊ नये किंवा गेले तर ते मरतील. अहरोनाने व त्याच्या मुलांनी आत जाऊन कहाथीतल्या एकएकाला त्याचे काम व त्याचे विशेष काम नेमून द्यावे.
21 २१ फिर यहोवा ने मूसा से कहा,
२१परमेश्वर मोशेशी पुन्हा बोलला. तो म्हणाला,
22 २२ “गेर्शोनियों की भी गिनती उनके पितरों के घरानों और कुलों के अनुसार कर;
२२गेर्षोन वंशातील पुरुषांची गणना कर आणि त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याच्याप्रमाणे त्यांची यादी कर;
23 २३ तीस वर्ष से लेकर पचास वर्ष तक की आयु वाले, जितने मिलापवाले तम्बू में सेवा करने को भर्ती हों उन सभी को गिन ले।
२३म्हणजे तीस ते पन्नास वर्षे वयाचे जे दर्शनमंडपातले काम करायला पात्र असतील अशा लोकांची गणती कर.
24 २४ सेवा करने और भार उठाने में गेर्शोनियों के कुलवालों की यह सेवकाई हो;
२४गेर्षोनी कुळांनी करावयाची सेवा व वाहावयाची ओझी ही अशीः
25 २५ अर्थात् वे निवास के पटों, और मिलापवाले तम्बू और उसके आवरण, और इसके ऊपरवाले सुइसों की खालों के आवरण, और मिलापवाले तम्बू के द्वार के पर्दे,
२५त्यांनी निवासमंडपाचे पडदे, दर्शनमंडप व त्याचे आच्छादन आणि त्यावर असलेले तहशाच्या कातड्याचे आच्छादन तसेच दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वाराचा पडदा,
26 २६ और निवास, और वेदी के चारों ओर के आँगन के पर्दों, और आँगन के द्वार के पर्दे, और उनकी डोरियों, और उनमें काम में आनेवाले सारे सामान, इन सभी को वे उठाया करें; और इन वस्तुओं से जितना काम होता है वह सब भी उनकी सेवकाई में आए।
२६निवासमंडप व वेदी ह्यांच्या भोंवतीच्या अंगणाच्या कनातीचे पडदे, तसेच अंगणाच्या प्रवेश दाराचा पडदा, सर्व तणावे व त्यांच्याबरोबर लागणारी उपकरणे, या सर्व वस्तू गेर्षोनी कुळांनी वहाव्यात; आणि या सामानासंबंधी जे काही काम पडेल ते त्यांनी करावे.
27 २७ और गेर्शोनियों के वंश की सारी सेवकाई हारून और उसके पुत्रों के कहने से हुआ करे, अर्थात् जो कुछ उनको उठाना, और जो-जो सेवकाई उनको करनी हो, उनका सारा भार तुम ही उन्हें सौंपा करो।
२७गेर्षोनी लोकांनी त्यांना नेमून दिलेली कामे वाहने आणि जी सर्व सेवा, अहरोनाच्या व त्याच्या मुलांच्या आज्ञेवरून करावी. त्यांचा भार त्यांच्याकडे सोपवावा.
28 २८ मिलापवाले तम्बू में गेर्शोनियों के कुलों की यही सेवकाई ठहरे; और उन पर हारून याजक का पुत्र ईतामार अधिकार रखे।
२८गेर्षोनी कुळातील लोकांची दर्शनमंडपातली ही सेवा आहे. अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्यांच्या हाताखाली त्यांनी कामाची जबाबदारी पार पाडावी.
29 २९ “फिर मरारियों को भी तू उनके कुलों और पितरों के घरानों के अनुसार गिन लें;
२९मरारी वंशजांचीही, त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी या प्रमाणे गणती कर.
30 ३० तीस वर्ष से लेकर पचास वर्ष तक की आयु वाले, जितने मिलापवाले तम्बू की सेवा करने को भर्ती हों, उन सभी को गिन ले।
३०म्हणजे तीस ते पन्नास वर्षेच्या वयाच्या दर्शनमंडपामधील सेवा करण्यास पात्र असलेल्या पुरुषांची गणती कर.
31 ३१ और मिलापवाले तम्बू में की जिन वस्तुओं के उठाने की सेवकाई उनको मिले वे ये हों, अर्थात् निवास के तख्ते, बेंड़े, खम्भे, और कुर्सियाँ,
३१दर्शनमंडपाच्या ज्या वस्तू वाहून नेण्याची जबाबदारी त्यांना करावी लागेल ती हीः निवासमंडपाच्या फळ्या, अडसर, खांब, उथळ्या, वाहून नेण्याचे काम त्यांनी करावे.
32 ३२ और चारों ओर आँगन के खम्भे, और इनकी कुर्सियाँ, खूँटे, डोरियाँ, और भाँति-भाँति के काम का सारा सामान ढोने के लिये उनको सौंपा जाए उसमें से एक-एक वस्तु का नाम लेकर तुम गिन लो।
३२तसेच सभोंवतीच्या अंगणाचे खांब, उथळ्या, तंबूच्या मेखा, तणावे आणि अंगणाच्या खांबासाठी लागणारी इतर उपकरणे, इत्यादी सर्वसामान वाहून नेण्याचे व निगा राखण्याचे काम मरारी लोकांचे आहे. त्या मनुष्यांच्या नावांची यादी करा व प्रत्येकाने नक्की काय वाहून न्यायचे ते त्यास सांगा.
33 ३३ मरारियों के कुलों की सारी सेवकाई जो उन्हें मिलापवाले तम्बू के विषय करनी होगी वह यही है; वह हारून याजक के पुत्र ईतामार के अधिकार में रहे।”
३३दर्शनमंडपाची कामे करिताना मरारी कुळातील पुरुषांनी ही सेवा करावी त्यांच्या कामासाठी अहरोन याजकाचा मुलगा इथामार हा जबाबदार राहील.
34 ३४ तब मूसा और हारून और मण्डली के प्रधानों ने कहातियों के वंश को, उनके कुलों और पितरों के घरानों के अनुसार,
३४मोशे, अहरोन व इस्राएलाच्या मंडळीचे पुढारी ह्यानी कहाथी लोकांची, त्यांची कुळे व वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे गणती केली.
35 ३५ तीस वर्ष से लेकर पचास वर्ष की आयु के, जितने मिलापवाले तम्बू की सेवकाई करने को भर्ती हुए थे, उन सभी को गिन लिया;
३५त्यांनी, दर्शनमंडपाच्या सेवेसाठी पात्र असलेल्या तीस ते पन्नास वर्षे वयाच्या पुरुषांची गणती केली.
36 ३६ और जो अपने-अपने कुल के अनुसार गिने गए, वे दो हजार साढ़े सात सौ थे।
३६ज्या पुरुषांची त्यांच्या वंशाप्रमाणे गणती झाली ते दोन हजार सातशे पन्नास लोक होते.
37 ३७ कहातियों के कुलों में से जितने मिलापवाले तम्बू में सेवा करनेवाले गिने गए, वे इतने ही थे; जो आज्ञा यहोवा ने मूसा के द्वारा दी थी उसी के अनुसार मूसा और हारून ने इनको गिन लिया।
३७कहाथी वंशापैकी जे दर्शनमंडपामध्ये पवित्र सेवा करीत त्यांची गणती करण्यात आली. मोशे व अहरोन ह्यानी, परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले.
38 ३८ गेर्शोनियों में से जो अपने कुलों और पितरों के घरानों के अनुसार गिने गए,
३८तसेच गेर्षोनी वंशजांचीही, त्यांची कुळे व वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे गणती करण्यात आली;
39 ३९ अर्थात् तीस वर्ष से लेकर पचास वर्ष तक की आयु के, जो मिलापवाले तम्बू की सेवकाई करने को दल में भर्ती हुए थे,
३९म्हणजे दर्शनमंडपाच्या सेवेसाठी पात्र असलेले तीस ते पन्नास वर्षे वयाच्या सर्व पुरुषांची गणती करण्यात आली.
40 ४० उनकी गिनती उनके कुलों और पितरों के घरानों के अनुसार दो हजार छः सौ तीस थी।
४०ज्या पुरुषांची, त्यांचे वंश व वाडवडिलांची घराणी ह्यास अनुसरून गणती झाली ती दोन हजार सहाशे तीस होती.
41 ४१ गेर्शोनियों के कुलों में से जितने मिलापवाले तम्बू में सेवा करनेवाले गिने गए, वे इतने ही थे; यहोवा की आज्ञा के अनुसार मूसा और हारून ने इनको गिन लिया।
४१गेर्षोनी कुळांपैकी नोंद घेतलेले जे सर्व दर्शनमंडपामध्ये सेवा करीत असत, ज्यांची नोंद मोशे व अहरोन ह्यानी, परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केली.
42 ४२ फिर मरारियों के कुलों में से जो अपने कुलों और पितरों के घरानों के अनुसार गिने गए,
४२त्याचप्रमाणे मरारी वंशजांचीही, त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे गणती करण्यात आली,
43 ४३ अर्थात् तीस वर्ष से लेकर पचास वर्ष तक की आयु के, जो मिलापवाले तम्बू की सेवकाई करने को भर्ती हुए थे,
४३म्हणजे तीस ते पन्नास वर्षे वयाचे जे दर्शनमंडपातले काम करायला पात्र होते ते सर्व,
44 ४४ उनकी गिनती उनके कुलों के अनुसार तीन हजार दो सौ थी।
४४ज्या पुरुषांची त्यांच्या कुळास अनुसरून गणती झाली ते तीन हजार दोनशे भरले.
45 ४५ मरारियों के कुलों में से जिनको मूसा और हारून ने, यहोवा की उस आज्ञा के अनुसार जो मूसा के द्वारा मिली थी, गिन लिया वे इतने ही थे।
४५मरारी वंशापैकी ज्या पुरुषांची गणती मोशे व अहरोन ह्यानी, परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे केली, ते इतके भरले.
46 ४६ लेवियों में से जिनको मूसा और हारून और इस्राएली प्रधानों ने उनके कुलों और पितरों के घरानों के अनुसार गिन लिया,
४६तेव्हा मोशे, अहरोन व इस्राएलाचे पुढारी ह्यानी सर्व लेवी लोकांची गणती, त्यांची कुळे व वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे केली.
47 ४७ अर्थात् तीस वर्ष से लेकर पचास वर्ष तक की आयु वाले, जितने मिलापवाले तम्बू की सेवकाई करने और बोझ उठाने का काम करने को हाजिर होनेवाले थे,
४७तीस ते पन्नास वर्षे वय असलेल्या व दर्शनमंडपामधील सेवा करण्यास व ओझे वाहण्यास पात्र असलेल्या पुरुषांची गणती करण्यात आली;
48 ४८ उन सभी की गिनती आठ हजार पाँच सौ अस्सी थी।
४८त्यांची एकूण संख्या आठ हजार पांचशे ऐंशी होती.
49 ४९ ये अपनी-अपनी सेवा और बोझ ढोने के लिए यहोवा के कहने पर गए। जो आज्ञा यहोवा ने मूसा को दी थी उसी के अनुसार वे गिने गए।
४९तेव्हा परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याची गणती करण्यात आली; प्रत्येक मनुष्यास त्याने स्वत: करावयाचे काम नेमून देण्यात आले व त्याने काय वाहून न्यावयाचे ते सांगण्यात आले. हे सर्व परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे करण्यात आले.

< गिनती 4 >