< गिनती 15 >

1 फिर यहोवा ने मूसा से कहा,
मग परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
2 “इस्राएलियों से कह कि जब तुम अपने निवास के देश में पहुँचो, जो मैं तुम्हें देता हूँ,
इस्राएल लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग. परमेश्वर तुम्हास एक देश वस्ती करण्यासाठी देत आहे. तुम्ही जेव्हा तिथे पोहचाल,
3 और यहोवा के लिये क्या होमबलि, क्या मेलबलि, कोई हव्य चढ़ाओं, चाहे वह विशेष मन्नत पूरी करने का हो चाहे स्वेच्छाबलि का हो, चाहे तुम्हारे नियत समयों में का हो, या वह चाहे गाय-बैल चाहे भेड़-बकरियों में का हो, जिससे यहोवा के लिये सुखदायक सुगन्ध हो;
आणि तुम्ही परमेश्वरासाठी सुवास म्हणून गुरेढोरे किंवा शेरडेमेंढरे यांचे परमेश्वराकरता अर्पण कराल, मग ते होमार्पणाचे असो किंवा नवस फेडण्याचा किंवा स्वखुशीचा किंवा तुमच्या सणातला तो यज्ञ असो.
4 तब उस होमबलि या मेलबलि के संग भेड़ के बच्चे यहोवा के लिये चौथाई हीन तेल से सना हुआ एपा का दसवाँ अंश मैदा अन्नबलि करके चढ़ाना,
जो कोणी आपले अर्पण परमेश्वराकरता आणतो त्याने हिनाच्या एक चतुर्थाश तेलात मळलेले एफाचा एक दशांश सपिठ अन्नार्पण आणावे.
5 और चौथाई हीन दाखमधु अर्घ करके देना।
प्रत्येक कोकऱ्याच्या होमार्पणाकरता किंवा यज्ञाकरता पेयार्पणासाठी एका हीनाचा एक चतुर्थाश द्राक्षरस तयार कर.
6 और मेढ़े के बलि के साथ तिहाई हीन तेल से सना हुआ एपा का दो दसवाँ अंश मैदा अन्नबलि करके चढ़ाना;
अन्नार्पण म्हणून प्रत्येक मेंढ्यामागे एकतृतीयांश हिन तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ तयार करावे.
7 और उसका अर्घ यहोवा को सुखदायक सुगन्ध देनेवाला तिहाई हीन दाखमधु देना।
परमेश्वरास सुवास यावा म्हणून एकतृतीयांश हिनभर द्राक्षरसाचे पेयार्पण तयार करावे.
8 और जब तू यहोवा को होमबलि या किसी विशेष मन्नत पूरी करने के लिये बलि या मेलबलि करके बछड़ा चढ़ाए,
जेव्हा तू परमेश्वराकरता होमार्पण किंवा नवस फेडण्यासाठी यज्ञ किंवा शांत्यर्पणाचा यज्ञ म्हणून गोऱ्हा म्हणून अर्पण करावा.
9 तब बछड़े का चढ़ानेवाला उसके संग आधा हीन तेल से सना हुआ एपा का तीन दसवाँ अंश मैदा अन्नबलि करके चढ़ाए।
तेव्हा अर्पण करणाऱ्याने त्या गोऱ्ह्या बरोबर अर्धां हिन तेलात मळलेल्या तीन दशमांश एफा सपिठाचे अन्नार्पण करावे.
10 १० और उसका अर्घ आधा हीन दाखमधु चढ़ाए, वह यहोवा को सुखदायक सुगन्ध देनेवाला हव्य होगा।
१०तू पेयार्पणासाठी अर्धा हीन द्राक्षरस अग्नीतून केलेले अर्पण, परमेश्वरास सुवासाचे अर्पण कर.
11 ११ “एक-एक बछड़े, या मेढ़े, या भेड़ के बच्चे, या बकरी के बच्चे के साथ इसी रीति चढ़ावा चढ़ाया जाए।
११तुम्ही परमेश्वरास जो बैल, मेंढा, मेंढी किंवा कोकरा यांचे अर्पण कराल ते याप्रमाणे करावे.
12 १२ तुम्हारे बलिपशुओं की जितनी गिनती हो, उसी गिनती के अनुसार एक-एक के साथ ऐसा ही किया करना।
१२तुम्ही जे प्रत्येक अर्पण तयार कराल आणि ते अर्पण याप्रमाणे अर्पण करा.
13 १३ जितने देशी हों वे यहोवा को सुखदायक सुगन्ध देनेवाला हव्य चढ़ाते समय ये काम इसी रीति से किया करें।
१३अग्नीतून केलेले अर्पण परमेश्वरास सुवासाचे असे अर्पण करताना देशात जन्मलेल्या सर्वांनी या वस्तू याप्रमाणे अर्पण कराव्या.
14 १४ “और यदि कोई परदेशी तुम्हारे संग रहता हो, या तुम्हारी किसी पीढ़ी में तुम्हारे बीच कोई रहनेवाला हो, और वह यहोवा को सुखदायक सुगन्ध देनेवाला हव्य चढ़ाना चाहे, तो जिस प्रकार तुम करोगे उसी प्रकार वह भी करे।
१४तुमच्याबरोबर राहत असलेल्या परदेशीयाला अथवा पिढ्यानपिढ्या तुमच्यामध्ये वस्ती करून राहिलेल्या कोणालाही परमेश्वराकरता हे सुवासिक हव्य अर्पण करायची इच्छा झाली तर तुमच्या प्रमाणेच त्यानेही केले पाहिजे.
15 १५ मण्डली के लिये, अर्थात् तुम्हारे और तुम्हारे संग रहनेवाले परदेशी दोनों के लिये एक ही विधि हो; तुम्हारी पीढ़ी-पीढ़ी में यह सदा की विधि ठहरे, कि जैसे तुम हो वैसे ही परदेशी भी यहोवा के लिये ठहरता है।
१५हेच नियम सर्वांना लागू आहेत. इस्राएलचे लोक आणि परदेशी लोक तुमच्या देशात राहतात. त्यांना हे नियम सर्वकाळ लागू राहतील. तुम्ही आणि तुमच्याबरोबर राहणारे इतर लोक परमेश्वरापुढे समान आहात.
16 १६ तुम्हारे और तुम्हारे संग रहनेवाले परदेशियों के लिये एक ही व्यवस्था और एक ही नियम है।”
१६हे नियम व विधी तुम्हास आणि तुमच्यात राहणाऱ्या इतरांना एकच असावा.
17 १७ फिर यहोवा ने मूसा से कहा,
१७परमेश्वर मोशेशी पुन्हा बोलला. तो म्हणाला,
18 १८ “इस्राएलियों को मेरा यह वचन सुना, कि जब तुम उस देश में पहुँचो जहाँ मैं तुम को लिये जाता हूँ,
१८इस्राएल लोकांशी बोल व त्यांना सांग मी ज्या देशात तुम्हास घेऊन जात आहे त्यामध्ये तुम्ही जाऊन पोहचाल.
19 १९ और उस देश की उपज का अन्न खाओ, तब यहोवा के लिये उठाई हुई भेंट चढ़ाया करो।
१९जेव्हा तुम्ही तेथे पिकणारे अन्न खाल तेव्हा त्यातला काही भाग समर्पण म्हणून परमेश्वरास अर्पण करा.
20 २० अपने पहले गुँधे हुए आटे की एक पपड़ी उठाई हुई भेंट करके यहोवा के लिये चढ़ाना; जैसे तुम खलिहान में से उठाई हुई भेंट चढ़ाओगे वैसे ही उसको भी उठाया करना।
२०मळलेल्या कणिकेची पहिली पोळी करून परमेश्वरास अर्पण करावा. तुम्ही आपल्या खळ्यातला समर्पण म्हणून जो भाग अर्पण करता त्याप्रमाणे ही अर्पावी.
21 २१ अपनी पीढ़ी-पीढ़ी में अपने पहले गुँधे हुए आटे में से यहोवा को उठाई हुई भेंट दिया करना।
२१मळलेल्या कणिकेतून पहिला काही भाग तुम्ही समर्पण म्हणून परमेश्वरास पिढ्यानपिढ्या द्यावा.
22 २२ “फिर जब तुम इन सब आज्ञाओं में से जिन्हें यहोवा ने मूसा को दिया है किसी का उल्लंघन भूल से करो,
२२जेव्हा तुम्ही परमेश्वराने मोशेला सांगितलेल्या या सर्व आज्ञेपैकी कधीतरी नकळत मोडली.
23 २३ अर्थात् जिस दिन से यहोवा आज्ञा देने लगा, और आगे की तुम्हारी पीढ़ी-पीढ़ी में उस दिन से उसने जितनी आज्ञाएँ मूसा के द्वारा दी हैं,
२३परमेश्वराने त्या आज्ञा तुम्हास मोशे मार्फत दिल्या आहेत त्या दिवसापासून व पुढेही तुमच्या पिढ्यानपिढ्या आहेत.
24 २४ उसमें यदि भूल से किया हुआ पाप मण्डली के बिना जाने हुआ हो, तो सारी मण्डली यहोवा को सुखदायक सुगन्ध देनेवाला होमबलि करके एक बछड़ा, और उसके संग नियम के अनुसार उसका अन्नबलि और अर्घ चढ़ाए, और पापबलि करके एक बकरा चढ़ाए।
२४तेव्हा असे व्हावे की, मंडळीला नकळत जर तुम्ही पाप केले, तर सर्व मंडळीने मिळून परमेश्वरास सुवास म्हणून एक गोऱ्हा होमार्पण, नियमानुसार अन्नार्पण आणि पेयार्पण करावे. तुम्ही पापार्पणासाठी बकराही अर्पण करावा.
25 २५ तब याजक इस्राएलियों की सारी मण्डली के लिये प्रायश्चित करे, और उनकी क्षमा की जाएगी; क्योंकि उनका पाप भूल से हुआ, और उन्होंने अपनी भूल के लिये अपना चढ़ावा, अर्थात् यहोवा के लिये हव्य और अपना पापबलि उसके सामने चढ़ाया।
२५म्हणून याजकाने इस्राएलाच्या सर्व लोकांसाठी प्रायश्चित करावे. म्हणजे त्याची क्षमा होईल. कारण त्यांचे पाप चुकून झाले असून त्यांनी आपल्या या चुकीबद्दल आपले अर्पण म्हणजे परमेश्वराकरता हव्य आणि आपला पापबलि परमेश्वरासमोर अर्पिला आहे.
26 २६ इसलिए इस्राएलियों की सारी मण्डली का, और उसके बीच रहनेवाले परदेशी का भी, वह पाप क्षमा किया जाएगा, क्योंकि वह सब लोगों के अनजाने में हुआ।
२६इस्राएलाच्या सर्व लोकांस आणि त्यांच्यात राहणाऱ्या इतर लोकांस क्षमा केली जाईल. त्यांना क्षमा करण्यात येईल. कारण आपण चूक करीत आहोत हे त्यांना माहीत नव्हते.
27 २७ फिर यदि कोई मनुष्य भूल से पाप करे, तो वह एक वर्ष की एक बकरी पापबलि करके चढ़ाए।
२७पण जर फक्त एकाच मनुष्याने नकळत पाप केले तर त्याने एक वर्ष वयाची बकरी आणली पाहिजे. ती बकरी पापासाठी अर्पण केली जाईल.
28 २८ और याजक भूल से पाप करनेवाले मनुष्य के लिये यहोवा के सामने प्रायश्चित करे; अतः इस प्रायश्चित के कारण उसका वह पाप क्षमा किया जाएगा।
२८त्या मनुष्याने चुकून परमेश्वरापुढे पाप केले. तर त्या नकळत पाप करणाऱ्या मनुष्यासाठी प्रायश्चित करायला याजकाने प्रायश्चित करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.
29 २९ जो कोई भूल से कुछ करे, चाहे वह इस्राएलियों में देशी हो, चाहे तुम्हारे बीच परदेशी होकर रहता हो, सब के लिये तुम्हारी एक ही व्यवस्था हो।
२९जो मनुष्य चुकून पाप करतो त्याच्यासाठी हा नियम आहे. इस्राएलच्या कुटुंबात जन्मलेल्या लोकांसाठी व तुमच्यात राहणाऱ्या परदेशी लोकांसाठी सारखेच नियम आहेत.
30 ३० “परन्तु क्या देशी क्या परदेशी, जो मनुष्य ढिठाई से कुछ करे, वह यहोवा का अनादर करनेवाला ठहरेगा, और वह प्राणी अपने लोगों में से नाश किया जाए।
३०पण जर एखादा व्यक्ती काही कृत्य करून उघड विरोध करतो, इस्राएलाच्या वंशात जन्मलेल्या मनुष्यासाठी किंवा परदेशी असो, तो परमेश्वराची निंदा करणारा समजावा. त्या मनुष्यास आपल्या लोकांतून काढून टाकावे.
31 ३१ वह जो यहोवा का वचन तुच्छ जानता है, और उसकी आज्ञा का टालनेवाला है, इसलिए वह मनुष्य निश्चय नाश किया जाए; उसका अधर्म उसी के सिर पड़ेगा।”
३१कारण त्याने परमेश्वराचा शब्द तुच्छ मानला आहे आणि त्याने माझी आज्ञा मोडली. तर त्या व्यक्तीला पुर्णपणे तुमच्यातून काढून टाकले पाहिजे. त्याचा दोष त्याच्यावरच राहील.
32 ३२ जब इस्राएली जंगल में रहते थे, उन दिनों एक मनुष्य विश्राम के दिन लकड़ी बीनता हुआ मिला।
३२यावेळी इस्राएल लोक अजून वाळवंटात राहत होते. एका मनुष्यास जळणासाठी लाकूड सापडले म्हणून तो ते गोळा करीत होता. परंतु तो शब्बाथाचा दिवस होता. इतरांनी त्यास ते करताना पाहिले.
33 ३३ और जिनको वह लकड़ी बीनता हुआ मिला, वे उसको मूसा और हारून, और सारी मण्डली के पास ले गए।
३३ज्या लोकांनी त्यास लाकडे गोळा करताना पाहिले त्यांनी त्यास मोशे व अहरोनाकडे आणले आणि सर्व लोक भोवती गोळा झाले.
34 ३४ उन्होंने उसको हवालात में रखा, क्योंकि ऐसे मनुष्य से क्या करना चाहिये वह प्रगट नहीं किया गया था।
३४त्यांनी त्या मनुष्यास तिथेच ठेवले कारण त्यास काय शिक्षा द्यायची ते त्यांना माहीत नव्हते.
35 ३५ तब यहोवा ने मूसा से कहा, “वह मनुष्य निश्चय मार डाला जाए; सारी मण्डली के लोग छावनी के बाहर उस पर पथरवाह करें।”
३५नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तो मनुष्य मेला पाहिजे. तेव्हा सर्व लोकांनी त्याच्यावर छावणीबाहेर दगडमार करावी.”
36 ३६ इस प्रकार जैसा यहोवा ने मूसा को आज्ञा दी थी उसी के अनुसार सारी मण्डली के लोगों ने उसको छावनी से बाहर ले जाकर पथरवाह किया, और वह मर गया।
३६म्हणून लोक त्यास छावणीबाहेर घेऊन गेले आणि त्यास दगडमार करून मारले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केली त्याप्रमाणे त्यांनी हे केले.
37 ३७ फिर यहोवा ने मूसा से कहा,
३७परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला
38 ३८ “इस्राएलियों से कह, कि अपनी पीढ़ी-पीढ़ी में अपने वस्त्रों के छोर पर झालर लगाया करना, और एक-एक छोर की झालर पर एक नीला फीता लगाया करना;
३८इस्राएली वंशजाशी बोल आणि त्यांना आज्ञा कर की, त्यांनी पिढयानपिढया आपल्या वस्त्राच्या टोकांना गोंडे लावावे आणि प्रत्येक टोकाच्या गोंड्यावर एक निळा दोरा बांधा.
39 ३९ और वह तुम्हारे लिये ऐसी झालर ठहरे, जिससे जब जब तुम उसे देखो तब-तब यहोवा की सारी आज्ञाएँ तुम को स्मरण आ जाएँ; और तुम उनका पालन करो, और तुम अपने-अपने मन और अपनी-अपनी दृष्टि के वश में होकर व्यभिचार न करते फिरो जैसे करते आए हो।
३९या गोंड्याचा उद्देश असा की, ते बघून परमेश्वराने दिलेल्या सगळ्या आज्ञा लक्षात ठेवाल व आज्ञा पाळाल. तुमचे हृदय व तुमची दृष्टी ज्यांच्यामागे जाऊन तुम्ही व्यभिचारी होत असा, त्याच्यामागे तुम्ही जाऊ नये.
40 ४० परन्तु तुम यहोवा की सब आज्ञाओं को स्मरण करके उनका पालन करो, और अपने परमेश्वर के लिये पवित्र बनो।
४०“माझ्या सगळ्या आज्ञा पाळायच्या आहेत हे तुम्ही लक्षात ठेवावे. आपल्या देवाकरता पवित्र व्हावे.
41 ४१ मैं यहोवा तुम्हारा परमेश्वर हूँ, जो तुम्हें मिस्र देश से निकाल ले आया कि तुम्हारा परमेश्वर ठहरूँ; मैं तुम्हारा परमेश्वर यहोवा हूँ।”
४१मी तुमचा देव परमेश्वर आहे. तुम्हास मिसर देशातून आणणारा मीच आहे. तुमचा देव होण्यासाठी मी हे केले. मीच तुमचा देव परमेश्वर आहे.”

< गिनती 15 >