< न्यायियों 19 >

1 उन दिनों में जब इस्राएलियों का कोई राजा न था, तब एक लेवीय पुरुष एप्रैम के पहाड़ी देश की परली ओर परदेशी होकर रहता था, जिसने यहूदा के बैतलहम में की एक रखैल रख ली थी।
त्या दिवसात जेव्हा इस्राएलावर कोणी राजा नव्हता, तेव्हा असे झाले की कोणी लेवी एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशाच्या सर्वांत दूरच्या भागात राहत होता आणि त्याने आपल्याला यहूदातील बेथलेहेम नगरातील एक स्त्री उपपत्नी करून घेतली होती.
2 उसकी रखैल व्यभिचार करके यहूदा के बैतलहम को अपने पिता के घर चली गई, और चार महीने वहीं रही।
परंतु त्याच्या उपपत्नीने त्यास सोडून व्यभिचार केला, आणि ती त्यास सोडून यहूदातील बेथलेहेमात आपल्या वडिलाच्या घरी परत गेली, आणि तेथे चार महिने राहिली.
3 तब उसका पति अपने साथ एक सेवक और दो गदहे लेकर चला, और उसके यहाँ गया, कि उसे समझा बुझाकर ले आए। वह उसे अपने पिता के घर ले गई, और उस जवान स्त्री का पिता उसे देखकर उसकी भेंट से आनन्दित हुआ।
तेव्हा तिचा पती उठून तिचे मन वळवून तिला माघारी आणावे म्हणून गेला. त्याच्याबरोबर त्याचा नोकर होता व गाढवांची जोडी होती, तेव्हा तिने त्यास आपल्या वडिलाच्या घरात नेले, आणि त्या मुलीच्या वडिलाने त्यास पाहिले, त्यास भेटून तो आनंदित झाला.
4 तब उसके ससुर अर्थात् उस स्त्री के पिता ने विनती करके उसे रोक लिया, और वह तीन दिन तक उसके पास रहा; इसलिए वे वहाँ खाते पीते टिके रहे।
त्याच्या सासऱ्याने म्हणजे त्या मुलीच्या वडिलाने त्यास फार आग्रह केला; म्हणून तो त्याच्याकडे तीन दिवस राहिला, आणि तो खाऊन पिऊन तेथे वस्तीस राहिला.
5 चौथे दिन जब वे भोर को सवेरे उठे, और वह चलने को हुआ; तब स्त्री के पिता ने अपने दामाद से कहा, “एक टुकड़ा रोटी खाकर अपना जी ठंडा कर, तब तुम लोग चले जाना।”
मग चौथ्या दिवशी असे झाले की तो सकाळी लवकर उठला आणि तो जायला तयार झाला, परंतु त्या मुलीच्या वडिलाने आपल्या जावयाला म्हटले, “तू आपल्याला भाकरीच्या तुकड्याचा आधार कर, आणि मग तुम्ही जा.”
6 तब उन दोनों ने बैठकर संग-संग खाया पिया; फिर स्त्री के पिता ने उस पुरुष से कहा, “और एक रात टिके रहने को प्रसन्न हो और आनन्द कर।”
त्या दोघांनी एकत्र बसून खाणेपिणे केले; नंतर त्या मुलीच्या वडिलाने म्हटले, “कृपा करून तू अजून एक रात्र राहायला तयार हो, आणि चांगली वेळ घालव.”
7 वह पुरुष विदा होने को उठा, परन्तु उसके ससुर ने विनती करके उसे दबाया, इसलिए उसने फिर उसके यहाँ रात बिताई।
जेव्हा लेवी जायला उठला, तेव्हा तरुण मुलीच्या वडिलाने त्यास पुन्हा राहण्याचा आग्रह केला, म्हणून त्याने त्याची जाण्याची योजना बदलली आणि पुन्हा तेथे रात्र घालवली.
8 पाँचवें दिन भोर को वह तो विदा होने को सवेरे उठा; परन्तु स्त्री के पिता ने कहा, “अपना जी ठंडा कर, और तुम दोनों दिन ढलने तक रुके रहो।” तब उन दोनों ने रोटी खाई।
नंतर पाचव्या दिवशी सकाळी लवकर जायला उठला, “परंतु त्या मुलीच्या वडिलाने म्हटले तू आपल्या पोटाला आधार कर दुपारपर्यंत थांब.” तेव्हा त्या दोघांनी जेवण केले.
9 जब वह पुरुष अपनी रखैल और सेवक समेत विदा होने को उठा, तब उसके ससुर अर्थात् स्त्री के पिता ने उससे कहा, “देख दिन तो ढल चला है, और साँझ होने पर है; इसलिए तुम लोग रात भर टिके रहो। देख, दिन तो डूबने पर है; इसलिए यहीं आनन्द करता हुआ रात बिता, और सवेरे को उठकर अपना मार्ग लेना, और अपने डेरे को चले जाना।”
जेव्हा लेवी, त्याची उपपत्नी व त्याचा नोकर जायला उठले, तेव्हा त्याचा सासरा त्यास बोलला, “आता पाहा मावळतीकडे दिवस उतरला आहे, तुम्ही आज रात्री येथेच राहा; पाहा, दिवस थोडाच राहिला आहे, येथे वस्ती करून तुमच्या मनाला उल्ल्हास होवो; मग सकाळी उठून आपल्या मार्गाने आपल्या घरी जा.”
10 १० परन्तु उस पुरुष ने उस रात को टिकना न चाहा, इसलिए वह उठकर विदा हुआ, और काठी बाँधे हुए दो गदहे और अपनी रखैल संग लिए हुए यबूस के सामने तक (जो यरूशलेम कहलाता है) पहुँचा।
१०परंतु लेवी ती रात्र घालवायला तयार झाला नाही. तो उठला आणि निघून गेला, मग यबूस म्हणजे यरूशलेमेच्या जवळ आला; तेव्हा त्याच्याबरोबर खोगीर घातलेल्या गाढवांची जोडी, आणि त्याची उपपत्नी होती.
11 ११ वे यबूस के पास थे, और दिन बहुत ढल गया था, कि सेवक ने अपने स्वामी से कहा, “आ, हम यबूसियों के इस नगर में मुड़कर टिकें।”
११जेव्हा ते यबूसजवळ होते तेव्हा दिवस फार उतरला होता, म्हणून त्याच्या नोकराने आपल्या धन्याला म्हटले, “चला, आपण बाजूला वळून यबूसी यांच्या नगराकडे जाऊ आणि त्यामध्ये रात्र घालवू.”
12 १२ उसके स्वामी ने उससे कहा, “हम पराए नगर में जहाँ कोई इस्राएली नहीं रहता, न उतरेंगे; गिबा तक बढ़ जाएँगे।”
१२त्याचा धनी त्यास म्हणाला, “जे इस्राएलाचे लोक नाहीत अशा परक्यांच्या नगरात आम्ही वळणार नाही; तर गिबा तेथवर जाऊ.”
13 १३ फिर उसने अपने सेवक से कहा, “आ, हम उधर के स्थानों में से किसी के पास जाएँ, हम गिबा या रामाह में रात बिताएँ।”
१३लेवीने आपल्या नोकराला सांगितले, “चल, आपण गिबा किंवा रामा या नगरांपैकी एका ठिकाणी पोहचू आणि त्यामध्ये रात्र घालवू.”
14 १४ और वे आगे की ओर चले; और उनके बिन्यामीन के गिबा के निकट पहुँचते-पहुँचते सूर्य अस्त हो गया,
१४मग ते पुढे चालत गेले; आणि बन्यामिनाचा प्रदेश जो गिबा त्याच्याकडे आल्यावर सूर्य मावळला.
15 १५ इसलिए वे गिबा में टिकने के लिये उसकी ओर मुड़ गए। और वह भीतर जाकर उस नगर के चौक में बैठ गया, क्योंकि किसी ने उनको अपने घर में न टिकाया।
१५तेव्हा गिब्यात वस्ती करायला ते तिकडे वळले, नंतर तो जाऊन नगराच्या चौकात बसला, परंतु त्यांना रात्री रहावयास कोणी आपल्या घरी घेऊन गेला नाही.
16 १६ तब एक बूढ़ा अपने खेत के काम को निपटाकर साँझ को चला आया; वह तो एप्रैम के पहाड़ी देश का था, और गिबा में परदेशी होकर रहता था; परन्तु उस स्थान के लोग बिन्यामीनी थे।
१६परंतु पाहा, संध्याकाळी एक म्हातारा मनुष्य शेतातून आपल्या कामावरून येत होता; तोसुद्धा मनुष्य एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातला होता, परंतु गिब्यात उपरा होता आणि त्या ठिकाणातली माणसे बन्यामिनी होती.
17 १७ उसने आँखें उठाकर उस यात्री को नगर के चौक में बैठे देखा; और उस बूढ़े ने पूछा, “तू किधर जाता, और कहाँ से आता है?”
१७त्याने तर आपली दृष्टी लावून नगराच्या चौकात तो वाटसरू मनुष्य पाहिला; तेव्हा तो म्हातारा मनुष्य म्हणाला, “तू कोठे जात आहेस? तू कोठून आला आहेस?”
18 १८ उसने उससे कहा, “हम लोग तो यहूदा के बैतलहम से आकर एप्रैम के पहाड़ी देश की परली ओर जाते हैं, मैं तो वहीं का हूँ; और यहूदा के बैतलहम तक गया था, और अब यहोवा के भवन को जाता हूँ, परन्तु कोई मुझे अपने घर में नहीं टिकाता।
१८तेव्हा तो त्यास म्हणाला, “आम्ही यहूदाच्या बेथलेहेमाहून आलो आहोत, आणि आम्हांला एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशाच्या पलीकडच्या बाजूस जायचे आहे; तेथला मी आहे; यहूदातील बेथलेहेम येथे गेलो होतो, आणि मला परमेश्वर देवाच्या मंदिराकडे जावयाचे आहे; परंतु कोणी मला त्यांच्या घरात घेत नाही.
19 १९ हमारे पास तो गदहों के लिये पुआल और चारा भी है, और मेरे और तेरी इस दासी और इस जवान के लिये भी जो तेरे दासों के संग है रोटी और दाखमधु भी है; हमें किसी वस्तु की घटी नहीं है।”
१९आमच्या गाढवांसाठी वैरण व दाणाही आहे, आणि माझ्यासाठी व तुझ्या दासीसाठी आणि तुझ्या सेवकाच्या बरोबर जो तरुण नोकर आहे त्याच्यासाठी भाकर व द्राक्षरसही आहे, कोणत्याही गोष्टीची उणीव नाही.”
20 २० बूढ़े ने कहा, “तेरा कल्याण हो; तेरे प्रयोजन की सब वस्तुएँ मेरे सिर हों; परन्तु रात को चौक में न बिता।”
२०तेव्हा त्या म्हाताऱ्या मनुष्याने त्यास अभिवादन केले, “तुझ्याबरोबर शांती असो! मी तुझ्या सर्व गरजांची काळजी घेईन. फक्त चौकात रात्र घालवू नको.”
21 २१ तब वह उसको अपने घर ले चला, और गदहों को चारा दिया; तब वे पाँव धोकर खाने-पीने लगे।
२१तेव्हा त्या मनुष्याने लेवीला आपल्या घरी नेले, आणि गाढवास वैरण दिली, नंतर त्यांनी आपले पाय धुऊन खाणेपिणे केले.
22 २२ वे आनन्द कर रहे थे, कि नगर के लुच्चों ने घर को घेर लिया, और द्वार को खटखटा-खटखटाकर घर के उस बूढ़े स्वामी से कहने लगे, “जो पुरुष तेरे घर में आया, उसे बाहर ले आ, कि हम उससे भोग करें।”
२२ते आनंदात वेळ घालवत असताना, त्या नगरातले दुष्ट लोक, “घराला वेढून आणि दारावर ठोकून, त्या म्हाताऱ्या घरधन्याला म्हणू लागले की, जो मनुष्य तुझ्या घरात आला आहे, त्यास तू बाहेर काढ, म्हणजे आम्ही त्याच्याबरोबर समागम करू.”
23 २३ घर का स्वामी उनके पास बाहर जाकर उनसे कहने लगा, “नहीं, नहीं, हे मेरे भाइयों, ऐसी बुराई न करो; यह पुरुष जो मेरे घर पर आया है, इससे ऐसी मूर्खता का काम मत करो।
२३मग तो मनुष्य, त्या घराचा धनी बाहेर त्यांच्याजवळ जाऊन त्यांना बोलला, “नाही, माझ्या भावांनो मी विनंती करतो अशी वाईट गोष्ट करू नका; हा मनुष्य माझ्या घरी पाहुणा म्हणून आला आहे, तर तुम्ही हा दुष्टपणा करू नका.
24 २४ देखो, यहाँ मेरी कुँवारी बेटी है, और उस पुरुष की रखैल भी है; उनको मैं बाहर ले आऊँगा। और उनका पत-पानी लो तो लो, और उनसे तो जो चाहो सो करो; परन्तु इस पुरुष से ऐसी मूर्खता का काम मत करो।”
२४पाहा, माझी कुमारी कन्या व याची उपपत्नी येथे आहेत. मी तिला आता बाहेर आणतो; मग तुम्ही तिची अब्रू घ्या व तुम्हाला जे बरे वाटते तसे तुम्ही तिच्याशी करा; परंतु या मनुष्याशी असे दुष्टाईचे कृत्य करू नका.”
25 २५ परन्तु उन मनुष्यों ने उसकी न मानी। तब उस पुरुष ने अपनी रखैल को पकड़कर उनके पास बाहर कर दिया; और उन्होंने उससे कुकर्म किया, और रात भर क्या भोर तक उससे लीलाक्रीड़ा करते रहे। और पौ फटते ही उसे छोड़ दिया।
२५तथापि ती माणसे त्याचे ऐकायला तयार झाली नाहीत; तेव्हा त्या मनुष्याने आपली उपपत्नी घेऊन आणि बाहेर त्यांच्याजवळ आणली. मग त्यांनी तिच्यासोबत कुकर्म केले आणि सारी रात्र वाईट रीतीने वागवले आणि पहाट झाली असता तिला सोडले.
26 २६ तब वह स्त्री पौ फटते ही जा के उस मनुष्य के घर के द्वार पर जिसमें उसका पति था गिर गई, और उजियाले के होने तक वहीं पड़ी रही।
२६तेव्हा पहाटेच्या वेळेस ती स्त्री येऊन जेथे आपला धनी होता, त्या मनुष्याच्या घराच्या दाराजवळ उजेड होईपर्यंत पडून राहिली.
27 २७ सवेरे जब उसका पति उठ, घर का द्वार खोल, अपना मार्ग लेने को बाहर गया, तो क्या देखा, कि उसकी रखैल घर के द्वार के पास डेवढ़ी पर हाथ फैलाए हुए पड़ी है।
२७जेव्हा सकाळी तिच्या धन्याने उठून घराची दारे उघडली, आणि आपल्या मार्गाने जायला तो बाहेर निघाला; तर पाहा, ती त्याची उपपत्नी घराच्या दाराजवळ पडलेली आणि तिचे हात उंबरठ्यावर होते.
28 २८ उसने उससे कहा, “उठ हम चलें।” जब कोई उत्तर न मिला, तब वह उसको गदहे पर लादकर अपने स्थान को गया।
२८तेव्हा लेवीने तिला म्हटले, “ऊठ, म्हणजे आपण जाऊ.” परंतु तिने उत्तर दिले नाही; नंतर तो पुरुष तिला गाढवावर घालून निघाला आणि आपल्या ठिकाणी गेला.
29 २९ जब वह अपने घर पहुँचा, तब छूरी ले रखैल को अंग-अंग करके काटा; और उसे बारह टुकड़े करके इस्राएल के देश में भेज दिया।
२९मग आपल्या घरी पोहचल्यावर त्याने सुरी घेतली, आणि आपल्या उपपत्नीला घेऊन कापले, तिचा एकएक अवयव कापून बारा तुकडे केले, आणि ते इस्राएलाच्या प्रत्येक ठिकाणी पाठवून दिले.
30 ३० जितनों ने उसे देखा, वे सब आपस में कहने लगे, “इस्राएलियों के मिस्र देश से चले आने के समय से लेकर आज के दिन तक ऐसा कुछ कभी नहीं हुआ, और न देखा गया; अतः इस पर सोचकर सम्मति करो, और बताओ।”
३०ज्या प्रत्येकाने ते पाहिले, त्यांनी म्हटले, “मिसर देशातून इस्राएल लोक पुन्हा आले, त्या दिवसापासून आजपर्यंत यासारखी गोष्ट घडली नाही, आणि कधी दृष्टीस पडली नाही; याविषयी तुम्ही विचार करा! आम्हांला सल्ला द्या! काय करावे ते आम्हांला सांगा!”

< न्यायियों 19 >