< यिर्मयाह 34 >
1 १ जब बाबेल का राजा नबूकदनेस्सर अपनी सारी सेना समेत और पृथ्वी के जितने राज्य उसके वश में थे, उन सभी के लोगों समेत यरूशलेम और उसके सब गाँवों से लड़ रहा था, तब यहोवा का यह वचन यिर्मयाह के पास पहुँचा
१परमेश्वरापासून यिर्मयाकडे वचन आले. नबुखद्नेस्सर बाबेलाचा राजा व त्याचे सर्व सैन्य व त्याच्या सत्तेखाली असलेली पृथ्वीवरील सर्व राज्ये व सर्व लोक यरूशलेमेशी व त्याच्या सर्व नगरांशी लढत होते तेव्हा हे वचन आले. ते या प्रमाणे,
2 २ “इस्राएल का परमेश्वर यहोवा यह कहता है: जाकर यहूदा के राजा सिदकिय्याह से कह, ‘यहोवा यह कहता है: देख, मैं इस नगर को बाबेल के राजा के वश में कर देने पर हूँ, और वह इसे फुँकवा देगा।
२परमेश्वर, इस्राएलाचा देव, हे म्हणतो, “जा आणि यहूदाचा राजा सिद्कीया याच्याशी बोलून सांग, पाहा हे नगर मी बाबेलाच्या राजाच्या हाती देईन. तो ते जाळून टाकील.
3 ३ तू उसके हाथ से न बचेगा, निश्चय पकड़ा जाएगा और उसके वश में कर दिया जाएगा; और तेरी आँखें बाबेल के राजा को देखेंगी, और तुम आमने-सामने बातें करोगे; और तू बाबेल को जाएगा।’
३तू त्याच्या हातून सुटणार नाहीस, कारण खात्रीने पकडला जाऊन आणि त्याच्या हाती दिला जाशील. जेव्हा तू बाबेलास जाशील, तू आपल्या डोळ्यांनी बाबेलाच्या राजाला प्रत्यक्ष पाहशील आणि तुम्ही समोरासमोर येऊन एकमेकांशी बोलाल.
4 ४ तो भी हे यहूदा के राजा सिदकिय्याह, यहोवा का यह भी वचन सुन जिसे यहोवा तेरे विषय में कहता है: ‘तू तलवार से मारा न जाएगा।
४सिद्कीया, यहूदाच्या राजा, परमेश्वराचे वचन ऐक. परमेश्वर तुझ्याबद्दल असे म्हणतो की, तुला तलवारीने मृत्यू येणार नाही.
5 ५ तू शान्ति के साथ मरेगा। और जैसा तेरे पितरों के लिये अर्थात् जो तुझ से पहले राजा थे, उनके लिये सुगन्ध-द्रव्य जलाया गया, वैसा ही तेरे लिये भी जलाया जाएगा; और लोग यह कहकर, “हाय मेरे प्रभु!” तेरे लिये छाती पीटेंगे, यहोवा की यही वाणी है।’”
५तू शांतीने मरशील. तुझ्या पूर्वीचे राजे तुझे पूर्वज यांच्याकरिता धूप वगैरे जाळीत तसे तुझ्याकरता जाळतील, व हाय रे, माझ्या स्वामी असे बोलून तुझ्याकरता शोक करतील; आता मी बोललो आहे. हे परमेश्वराचे वचन आहे.”
6 ६ ये सब वचन यिर्मयाह भविष्यद्वक्ता ने यहूदा के राजा सिदकिय्याह से यरूशलेम में उस समय कहे,
६म्हणून यिर्मया संदेष्ट्याने परमेश्वराची ही सर्व वचने यरूशलेमेमध्ये सिद्कीया राजाला सांगितली.
7 ७ जब बाबेल के राजा की सेना यरूशलेम से और यहूदा के जितने नगर बच गए थे, उनसे अर्थात् लाकीश और अजेका से लड़ रही थी; क्योंकि यहूदा के जो गढ़वाले नगर थे उनमें से केवल वे ही रह गए थे।
७त्यावेळी बाबेलाच्या राजाचे सैन्य यरूशलेमेविरूद्ध लढत आणि यहूदातील उरलेल्या सर्व नगराविरूद्ध म्हणजे लाखीश व अजेकाशी लढत होते. यहूदामध्ये तटबंदी असलेली ही नगरे राहिली होती.
8 ८ यहोवा का यह वचन यिर्मयाह के पास उस समय आया जब सिदकिय्याह राजा ने सारी प्रजा से जो यरूशलेम में थी यह वाचा बँधाई कि दासों के स्वाधीन होने का प्रचार किया जाए,
८सिद्कीया राजाने यरूशलेमेतील सर्व लोकांबरोबर स्वतंत्र करण्याचा करार प्रस्थापित करून घोषित केल्यानंतर यिर्मयाला जे परमेश्वराचे वचन आले.
9 ९ कि सब लोग अपने-अपने दास-दासी को जो इब्री या इब्रिन हों, स्वाधीन करके जाने दें, और कोई अपने यहूदी भाई से फिर अपनी सेवा न कराए।
९तो करार म्हणजे प्रत्येकाने आपल्या इब्री दासास, पुरुष व स्त्रिला मोकळे करावे. कोणीही आपल्या इब्री बंधूकडून दास्य करून घेऊ नये.
10 १० तब सब हाकिमों और सारी प्रजा ने यह प्रण किया कि हम अपने-अपने दास दासियों को स्वतंत्र कर देंगे और फिर उनसे अपनी सेवा न कराएँगे; इसलिए उस प्रण के अनुसार उनको स्वतंत्र कर दिया।
१०म्हणून सर्व नेत्यांनी व लोकांनी या कराराचे पालन करण्यास मान्यता दिली. प्रत्येकजण आपल्याकडील स्त्री वा पुरुष गुलामांना ह्यापुढे गुलाम म्हणून न ठेवता मुक्त करावे. त्यांनी ऐकले आणि त्यांना पाठवून दिले.
11 ११ परन्तु इसके बाद वे फिर गए और जिन दास दासियों को उन्होंने स्वतंत्र करके जाने दिया था उनको फिर अपने वश में लाकर दास और दासी बना लिया।
११पण त्यानंतर त्यांनी आपले मन बदलले. त्यांनी त्यांना गुलाम होण्यास भाग पाडले.
12 १२ तब यहोवा की ओर से यह वचन यिर्मयाह के पास पहुँचा
१२मग यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले आणि म्हणाले,
13 १३ “इस्राएल का परमेश्वर यहोवा तुम से यह कहता है, जिस समय मैं तुम्हारे पितरों को दासत्व के घर अर्थात् मिस्र देश से निकाल ले आया, उस समय मैंने आप उनसे यह कहकर वाचा बाँधी
१३परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, “जेव्हा मी तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून दास्याच्या घरातून बाहेर आणले तेव्हा मी त्यांच्याशी करार केला. तो म्हणजे,
14 १४ ‘तुम्हारा जो इब्री भाई तुम्हारे हाथ में बेचा जाए उसको तुम सातवें वर्ष में छोड़ देना; छः वर्ष तो वह तुम्हारी सेवा करे परन्तु इसके बाद तुम उसको स्वतंत्र करके अपने पास से जाने देना।’ परन्तु तुम्हारे पितरों ने मेरी न सुनी, न मेरी ओर कान लगाया।
१४जो तुझा इब्री भाऊ तुला विकला होता त्यास तुम्ही प्रत्येक सातव्या वर्षाच्या शेवटी मुक्त करून सोडा, त्याने सहा वर्षे तुझी सेवा केली तेव्हा तू आपल्यापासून सुटका दे; परंतु तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही व लक्ष दिले नाही.
15 १५ तुम अभी फिरे तो थे और अपने-अपने भाई को स्वतंत्र कर देने का प्रचार कराके जो काम मेरी दृष्टि में भला है उसे तुम ने किया भी था, और जो भवन मेरा कहलाता है उसमें मेरे सामने वाचा भी बाँधी थी;
१५आता तुम्ही स्वतः पश्चाताप केला होता आणि माझ्या दृष्टीने जे योग्य आहे ते करू लागला होता. तुम्ही प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्याच्या मनुष्यास स्वातंत्र जाहीर केले. आणि ज्या घराला माझे नाव ठेवले आहे त्यामध्ये तुम्ही माझ्यासमोर करार केला होता.
16 १६ पर तुम भटक गए और मेरा नाम इस रीति से अशुद्ध किया कि जिन दास दासियों को तुम स्वतंत्र करके उनकी इच्छा पर छोड़ चुके थे उन्हें तुम ने फिर अपने वश में कर लिया है, और वे फिर तुम्हारे दास- दासियाँ बन गए हैं।
१६पण नंतर तुम्ही बदलला आणि माझे नाव अपवित्र केले; ज्यांना तुम्ही त्यांच्या इच्छेप्रमाणे कोठेही जाण्यास पाठवले होते. त्यांना तुम्ही प्रत्येक मनुष्याने आपल्या मुक्त केलेल्या दासांना स्त्रिया व पुरुष यांना परत आणले. त्यांना बळजबरीने पुन्हा तुमचे दास केलेत.
17 १७ इस कारण यहोवा यह कहता है: तुम ने जो मेरी आज्ञा के अनुसार अपने-अपने भाई के स्वतंत्र होने का प्रचार नहीं किया, अतः यहोवा का यह वचन है, सुनो, मैं तुम्हारे इस प्रकार से स्वतंत्र होने का प्रचार करता हूँ कि तुम तलवार, मरी और अकाल में पड़ोगे; और मैं ऐसा करूँगा कि तुम पृथ्वी के राज्य-राज्य में मारे-मारे फिरोगे।
१७यास्तव परमेश्वर असे म्हणतो, ‘तुम्ही प्रत्येकाने आपल्या भावास व सहकारी इस्राएलास स्वातंत्र्य जाहीर करायचे होते. तुम्ही माझे ऐकले नाही. म्हणून परमेश्वर म्हणतो, पाहा, मी तुम्हाविरुध्द तलवारीला, मरीला आणि दुष्काळाला स्वातंत्र्य जाहीर करतो, कारण पृथ्वीवरील प्रत्येक राज्याच्या दृष्टीने मी तुम्हास असे काही करीन की, त्याबद्दल ऐकून भीतीने थरथर कापाल.
18 १८ जो लोग मेरी वाचा का उल्लंघन करते हैं और जो प्रण उन्होंने मेरे सामने और बछड़े को दो भाग करके उसके दोनों भागों के बीच होकर किया परन्तु उसे पूरा न किया,
१८मग ज्या लोकांनी माझा कराराचा भंग केला आहे, ज्यांनी माझ्यासमोर केलेल्या कराराचे वचन पाळले नाही. त्यांनी वासराचे दोन तुकडे केले व ते त्यामधून चालत गेले.
19 १९ अर्थात् यहूदा देश और यरूशलेम नगर के हाकिम, खोजे, याजक और साधारण लोग जो बछड़े के भागों के बीच होकर गए थे,
१९जे यहूदा आणि यरूशलेमेचे सरदार, षंढ, याजक व देशातले सर्व लोक जे वासराच्या दोन भागांमधून चालत गेले.
20 २० उनको मैं उनके शत्रुओं अर्थात् उनके प्राण के खोजियों के वश में कर दूँगा और उनकी लोथ आकाश के पक्षियों और मैदान के पशुओं का आहार हो जाएँगी।
२०मी त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हातात देईल आणि त्यांना त्यांचा जीव घेऊ पाहणाऱ्याच्या हाती देईल. त्यांची प्रेते आकाशातील पक्ष्यास व पृथ्वीवरील पशूंना भक्ष्य होतील.
21 २१ मैं यहूदा के राजा सिदकिय्याह और उसके हाकिमों को उनके शत्रुओं और उनके प्राण के खोजियों अर्थात् बाबेल के राजा की सेना के वश में कर दूँगा जो तुम्हारे सामने से चली गई है।
२१म्हणून मी यहूदाचा राजा सिद्कीया व त्याचे सरदार ह्यांना त्यांच्या शत्रूंच्या हाती आणि जे त्यांचा जीव घेऊ पाहणाऱ्यास हाती व बाबेलाच्या राजाचे जे सैन्य तुम्हापासून निघून गेले आहे त्यांच्या हाती देईन.
22 २२ यहोवा का यह वचन है कि देखो, मैं उनको आज्ञा देकर इस नगर के पास लौटा ले आऊँगा और वे लड़कर इसे ले लेंगे और फूँक देंगे; और यहूदा के नगरों को मैं ऐसा उजाड़ दूँगा कि कोई उनमें न रहेगा।”
२२परमेश्वर म्हणतो, पाहा, मी आज्ञा देत आहे आणि ते नगराकडे परत येतील असे करीन, तेव्हा ते त्याविरूद्ध लढतील व ते घेतील व ते जाळून टाकतील; कारण मी यहूदाची नगरे रहिवासीहीन ओसाड करीन.”