< 1 शमूएल 26 >

1 फिर जीपी लोग गिबा में शाऊल के पास जाकर कहने लगे, “क्या दाऊद उस हकीला नामक पहाड़ी पर जो यशीमोन के सामने है छिपा नहीं रहता?”
जीफी लोक शौलाकडे गिबा येथे येऊन म्हणाले, “यशीमोनासमोर हकीला डोंगरात दावीद लपला आहे की नाही?”
2 तब शाऊल उठकर इस्राएल के तीन हजार छाँटे हुए योद्धा संग लिए हुए गया कि दाऊद को जीप के जंगल में खोजे।
तेव्हा शौल उठला व आपल्याबरोबर इस्राएलाच्या तीन हजार निवडक मनुष्यांना घेऊन दावीदाचा शोध करायला जीफ रानात गेला.
3 और शाऊल ने अपनी छावनी मार्ग के पास हकीला नामक पहाड़ी पर जो यशीमोन के सामने है डाली। परन्तु दाऊद जंगल में रहा; और उसने जान लिया, कि शाऊल मेरा पीछा करने को जंगल में आया है;
शौलाने यशीमोनासमोरील मार्गाजवळ हकीला डोंगरावर तळ दिला; तेव्हा दावीद रानात राहत होता आणि त्याने पाहिले की आपला पाठलाग करायला शौल रानात आला आहे.
4 तब दाऊद ने भेदियों को भेजकर निश्चय कर लिया कि शाऊल सचमुच आ गया है।
म्हणून दावीदाने हेर पाठवले आणि शौल खचित आला आहे असे त्यास समजले.
5 तब दाऊद उठकर उस स्थान पर गया जहाँ शाऊल पड़ा था; और दाऊद ने उस स्थान को देखा जहाँ शाऊल अपने सेनापति नेर के पुत्र अब्नेर समेत पड़ा था, शाऊल तो गाड़ियों की आड़ में पड़ा था और उसके लोग उसके चारों ओर डेरे डाले हुए थे।
मग दावीद उठून शौलाने तळ दिला होता त्या ठिकाणावर आला आणि जेथे शौल व त्याचा सेनापती नेराचा मुलगा अबनेर हे निजले होते ते ठिकाण दावीदाने पाहिले; शौल तर छावणीत निजला होता व त्याच्यासभोवती लोकांनी तळ दिला होता.
6 तब दाऊद ने हित्ती अहीमेलेक और सरूयाह के पुत्र योआब के भाई अबीशै से कहा, “मेरे साथ उस छावनी में शाऊल के पास कौन चलेगा?” अबीशै ने कहा, “तेरे साथ मैं चलूँगा।”
तेव्हा अहीमलेख हित्ती व सरूवेचा मुलगा अबीशय यवाबाचा भाऊ यांना दावीदाने उत्तर देऊन म्हटले, “छावणीत शौलाकडे खाली माझ्याबरोबर कोण येईल?” तेव्हा अबीशय म्हणाला, “मी तुझ्याबरोबर खाली येईन.”
7 अतः दाऊद और अबीशै रातों-रात उन लोगों के पास गए, और क्या देखते हैं, कि शाऊल गाड़ियों की आड़ में पड़ा सो रहा है, और उसका भाला उसके सिरहाने भूमि में गड़ा है; और अब्नेर और योद्धा लोग उसके चारों ओर पड़े हुए हैं।
मग दावीद व अबीशय रात्री लोकांजवळ गेले आणि पाहा शौल छावणीत निजला आहे व त्याचा भाला त्याच्या उशाजवळ भूमीत रोवलेला व त्याच्यासभोवती अबनेर व लोक निजलेले आहेत.
8 तब अबीशै ने दाऊद से कहा, “परमेश्वर ने आज तेरे शत्रु को तेरे हाथ में कर दिया है; इसलिए अब मैं उसको एक बार ऐसा मारूँ कि भाला उसे बेधता हुआ भूमि में धँस जाए, और मुझ को उसे दूसरी बार मारना न पड़ेगा।”
तेव्हा अबीशय दावीदाला म्हणाला, “आज परमेश्वराने तुझा शत्रू तुझ्या हाती दिला आहे; तर आता मी तुला विनंती करतो मला भाल्याने एकदाच घाव मारून त्यास भूमीवर ठार करून दे, मी त्यास दुसरा घाव मारणार नाही.”
9 दाऊद ने अबीशै से कहा, “उसे नष्ट न कर; क्योंकि यहोवा के अभिषिक्त पर हाथ चलाकर कौन निर्दोष ठहर सकता है।”
पण दावीद अबीशयाला म्हणाला, “त्यांचा वध करू नकोस कारण परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकून कोण निर्दोष राहील?”
10 १० फिर दाऊद ने कहा, “यहोवा के जीवन की शपथ यहोवा ही उसको मारेगा; या वह अपनी मृत्यु से मरेगा; या वह लड़ाई में जाकर मर जाएगा।
१०दावीद म्हणाला, “परमेश्वर जिवंत आहे; परमेश्वर त्यास मारील किंवा त्याचा मरण्याचा दिवस येईल किंवा तो खाली लढाईत जाऊन नष्ट होईल.
11 ११ यहोवा न करे कि मैं अपना हाथ यहोवा के अभिषिक्त पर उठाऊँ; अब उसके सिरहाने से भाला और पानी की सुराही उठा ले, और हम यहाँ से चले जाएँ।”
११मी आपला हात परमेश्वराच्या अभिषिक्तावर टाकावा असे परमेश्वराने माझ्याकडून घडू देऊ नये; परंतु आता मी तुला विनंती करतो की, तू त्याच्या उशाजवळचा भाला व पाण्याचा लोटा घे; मग आपण जाऊ.”
12 १२ तब दाऊद ने भाले और पानी की सुराही को शाऊल के सिरहाने से उठा लिया; और वे चले गए। और किसी ने इसे न देखा, और न जाना, और न कोई जागा; क्योंकि वे सब इस कारण सोए हुए थे, कि यहोवा की ओर से उनमें भारी नींद समा गई थी।
१२तेव्हा शौलाच्या उशाजवळून भाला व पाण्याचा लोटा हे दावीदाने घेतले मग कोणाला न दिसता व कोणाला न कळता व कोणी जागा न होता ते निघून गेले कारण ते सर्व झोपेत होते. परमेश्वराकडून त्याच्यांवर गाढ झोप आली होती.
13 १३ तब दाऊद दूसरी ओर जाकर दूर के पहाड़ की चोटी पर खड़ा हुआ, और दोनों के बीच बड़ा अन्तर था;
१३नंतर दावीद पलीकडे डोंगराच्या शिखरावर जाऊन दूर उभा राहिला आणि त्याच्यामध्ये मोठे अंतर होते;
14 १४ और दाऊद ने उन लोगों को, और नेर के पुत्र अब्नेर को पुकारके कहा, “हे अब्नेर क्या तू नहीं सुनता?” अब्नेर ने उत्तर देकर कहा, “तू कौन है जो राजा को पुकारता है?”
१४तेव्हा दावीदाने लोकांस व नेराचा मुलगा अबनेर याला हाक मारली. तो म्हणाला, “अबनेरा तू उत्तर करीत नाहीस काय?” तेव्हा अबनेराने उत्तर देऊन म्हटले, “राजाला हाक मारणारा असा तू कोण आहेस?”
15 १५ दाऊद ने अब्नेर से कहा, “क्या तू पुरुष नहीं है? इस्राएल में तेरे तुल्य कौन है? तूने अपने स्वामी राजा की चौकसी क्यों नहीं की? एक जन तो तेरे स्वामी राजा को नष्ट करने घुसा था।
१५मग दावीद अबनेराला म्हणाला, “तू वीर पुरुष नाहीस काय आणि इस्राएलात तुझ्यासारखा कोण आहे? तर तू आपला प्रभू राजा याच्यावर पहारा का केला नाही? कारण लोकातला कोणीएक तुझा प्रभू राजा याचा घात करायला आला होता.
16 १६ जो काम तूने किया है वह अच्छा नहीं। यहोवा के जीवन की शपथ तुम लोग मारे जाने के योग्य हो, क्योंकि तुम ने अपने स्वामी, यहोवा के अभिषिक्त की चौकसी नहीं की। और अब देख, राजा का भाला और पानी की सुराही जो उसके सिरहाने थी वे कहाँ हैं?”
१६ही जी गोष्ट तू केली ती बरी नाही; परमेश्वर जिवंत आहे. तुम्ही आपला प्रभू परमेश्वराचा अभिषिक्त याला राखले नाही, म्हणून तुम्ही मरायला योग्य आहा. तर आता पाहा राजाचा भाला व पाण्याचा लोटा त्याच्या उशाजवळ होता तो कोठे आहे?”
17 १७ तब शाऊल ने दाऊद का बोल पहचानकर कहा, “हे मेरे बेटे दाऊद, क्या यह तेरा बोल है?” दाऊद ने कहा, “हाँ, मेरे प्रभु राजा, मेरा ही बोल है।”
१७तेव्हा शौल दावीदाची वाणी ओळखून म्हणाला, “माझ्या मुला दावीदा ही तुझी वाणी आहे काय?” दावीद म्हणाला, “माझ्या प्रभू राजा, ही माझी वाणी आहे.”
18 १८ फिर उसने कहा, “मेरा प्रभु अपने दास का पीछा क्यों करता है? मैंने क्या किया है? और मुझसे कौन सी बुराई हुई है?
१८तो म्हणाला, “माझा प्रभू आपल्या दासाच्या पाठीस का लागला आहे? मी तर काय केले आहे? माझ्या हाती काय वाईट आहे?
19 १९ अब मेरा प्रभु राजा, अपने दास की बातें सुन ले। यदि यहोवा ने तुझे मेरे विरुद्ध उकसाया हो, तब तो वह भेंट ग्रहण करे; परन्तु यदि आदमियों ने ऐसा किया हो, तो वे यहोवा की ओर से श्रापित हों, क्योंकि उन्होंने अब मुझे निकाल दिया कि मैं यहोवा के निज भाग में न रहूँ, और उन्होंने कहा है, ‘जा पराए देवताओं की उपासना कर।’
१९तर आता मी तुम्हास विनंती करतो माझ्या प्रभू राजाने आपल्या दासाचे बोलणे ऐकावे: परमेश्वराने तुम्हास माझ्यावर चेतवले असले तर त्याने अर्पण मान्य करावे. परंतु मनुष्याच्या संतानांनी चेतवले असले, तर ती परमेश्वराच्यासमोर शापित होवोत. कारण आज मला परमेश्वराच्या वतनात वाटा मिळू नये म्हणून त्यांनी मला बाहेर लावून म्हटले की, जा अन्य देवांची सेवा कर.
20 २० इसलिए अब मेरा लहू यहोवा की आँखों की ओट में भूमि पर न बहने पाए; इस्राएल का राजा तो एक पिस्सू ढूँढ़ने आया है, जैसा कि कोई पहाड़ों पर तीतर का अहेर करे।”
२०तर आता माझे रक्त परमेश्वराच्या समक्षतेपासून दूर भूमीवर पडू नये; कारण जसा कोणी डोंगरावर तितराची शिकार करतो तसा, एका पिसवेचा शोध करण्यास इस्राएलाचा राजा निघून आला आहे.”
21 २१ शाऊल ने कहा, “मैंने पाप किया है, हे मेरे बेटे दाऊद लौट आ; मेरा प्राण आज के दिन तेरी दृष्टि में अनमोल ठहरा, इस कारण मैं फिर तेरी कुछ हानि न करूँगा; सुन, मैंने मूर्खता की, और मुझसे बड़ी भूल हुई है।”
२१तेव्हा शौल म्हणाला, “मी पाप केले आहे; माझ्या मुला दावीदा माघारा ये; माझा जीव आज तुझ्या दृष्टीने मोलवान होता, म्हणून मी यापुढे तुझे वाईट करणार नाही; पाहा मी मूर्खपणाने वागून फार अपराध केला आहे.”
22 २२ दाऊद ने उत्तर देकर कहा, “हे राजा, भाले को देख, कोई जवान इधर आकर इसे ले जाए।
२२मग दावीदाने असे उत्तर केले की, “हे राजा पाहा हा भाला, तरुणातील एकाने इकडे येऊन तो घ्यावा.
23 २३ यहोवा एक-एक को अपने-अपने धार्मिकता और सच्चाई का फल देगा; देख, आज यहोवा ने तुझको मेरे हाथ में कर दिया था, परन्तु मैंने यहोवा के अभिषिक्त पर अपना हाथ उठाना उचित न समझा।
२३परमेश्वर प्रत्येक मनुष्यास त्याचा न्याय व त्याचे विश्वासूपण याप्रमाणे परत करो. कारण आज परमेश्वराने तुम्हास माझ्या हाती दिले असता मी आपला हात परमेश्वराच्या अभिषिक्तावर टाकला नाही.
24 २४ इसलिए जैसे तेरे प्राण आज मेरी दृष्टि में प्रिय ठहरे, वैसे ही मेरे प्राण भी यहोवा की दृष्टि में प्रिय ठहरे, और वह मुझे समस्त विपत्तियों से छुड़ाए।”
२४पाहा जसा तुमचा जीव माझ्या दृष्टीने मोलवान होता, तसा माझा जीव परमेश्वराच्या दृष्टीने मोलवान होवो; आणि तो सर्व संकटातून सोडवो.”
25 २५ शाऊल ने दाऊद से कहा, “हे मेरे बेटे दाऊद तू धन्य है! तू बड़े-बड़े काम करेगा और तेरे काम सफल होंगे।” तब दाऊद ने अपना मार्ग लिया, और शाऊल भी अपने स्थान को लौट गया।
२५तेव्हा शौल दावीदाला म्हणाला, “माझ्या मुला दावीदा तू आशीर्वादित हो” तू मोठी कार्ये करशील व प्रबल होशील. मग दावीद आपल्या वाटेने गेला आणि शौलही आपल्या ठिकाणी परत गेला.

< 1 शमूएल 26 >