< गिनती 29 >
1 “‘पहले महीने की पहली तारीख पर तुम पवित्र सभा आयोजित करोगे. इस दिन तुम कोई भी मेहनत न करोगे. यह वह दिन होगा, जिसे तुम तुरही बजाने के लिए प्रयोग करोगे.
१सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पवित्र मेळा भरवावा. त्यादिवशी तुम्ही कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये. हा तुमचा कर्णा वाजवण्याचा दिवस आहे.
2 तुम याहवेह को सुखद-सुगंध भेंट करने के लिए यह होमबलि भेंट करोगे: एक बछड़ा, एक मेढ़ा तथा सात एक वर्ष के निर्दोष मेमने.
२परमेश्वरास मधुर सुवास यावा म्हणून एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक एक वर्षांची सात निर्दोष कोकरे होमबलि म्हणून अर्पण करावी.
3 इनके अलावा उनकी अन्नबलि भी; तेल मिला हुआ मैदा; बछड़ों के साथ ढाई किलो, मेढ़े के साथ दो किलो;
३त्याबरोबरचे अन्नार्पण तेलांत मळलेल्या सपीठाचे असावे, गोऱ्ह्यामागे तीन दशमांश एफा, मेंढ्यामागे दोन दशमांस एफा,
4 तथा हर एक मेमने के साथ एक-एक किलो तेल मिला हुआ मैदा,
४मेंढ्याबरोबर आठ कप पीठ प्रत्येक कोकराबरोबर अर्पण करावे.
5 साथ में अपने प्रायश्चित के लिए पापबलि में एक बकरा.
५तुम्हासाठी प्रायश्चित करायला पापार्पणासाठी एक बकरा अर्पावा.
6 नए चांद के लिए होमबलि तथा इससे संबंधित अन्नबलि के लिए नियमित होमबलि तथा अन्नबलि तथा उससे संबंधित पेय बलियां, जैसा उनके विषय में याहवेह ने आज्ञा दी थी, वैसे भेंट किए जाएं.
६चंद्रदर्शनाचे होमार्पण आणि त्याबरोबरचे अन्नार्पण, तसेच नेहमीचे होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण व त्याबरोबरची पेयार्पणे याव्यतिरिक्त परमेश्वरास मधुर सुवासासाठी अग्नीतून केलेले हे अर्पण असावे.
7 “‘इसी महीने की दसवीं तारीख पर तुम एक पवित्र सभा आयोजित करोगे; तुम स्वयं को नम्र करोगे, तुम किसी प्रकार की मेहनत नहीं करोगे.
७सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा. त्यादिवशी तुम्ही अन्न घ्यायचे नाही आणि काही कामही करायचे नाही.
8 सुखद-सुगंध के लिए तुम याहवेह के लिए यह होमबलि भेंट करोगे: एक बछड़ा, एक मेढ़ा तथा एक वर्ष के सात निर्दोष मेमने.
८तुम्ही परमेश्वरास मधुर सुवास मिळावा म्हणून होमार्पणे करावे ते हे, तुम्ही एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक एक वर्ष वयाचे सात निर्दोष कोकरे अर्पण करावेत.
9 उनके साथ अन्नबलि होगी: तेल मिला हुआ मैदा; बछड़े के साथ ढाई किलो, मेढ़े के साथ दो किलो;
९आणि त्याबरोबर तेलात मळलेल्या सपिठाचे अन्नार्पण असावे. गोऱ्ह्यामागे तीन दशमांश एफा, मेंढ्यामागे दोन दशमांस एफा,
10 तथा हर एक मेमने के साथ एक-एक किलो मैदा.
१०सात कोकरांपैकी प्रत्येक कोकराबरोबर एक दशमांश एफा सपीठ अर्पावे.
11 प्रायश्चित के लिए पापबलि, नियमित होमबलि तथा अन्नबलि एवं पेय बलियां के अलावा पापबलि के लिए एक बकरा भी भेंट किया जाए.
११पापार्पणासाठी एक बकराही अर्पावा. याखेरीज प्रायश्चित्ताचे पापार्पण व निरंतरचे होमार्पण व त्याचे अन्नार्पण, पेयार्पणे ही असावीत.
12 “‘इसके बाद सातवें महीने की पन्द्रहवीं तारीख पर तुम एक पवित्र सभा आयोजित करोगे. तुम इसमें कोई भी मेहनत न करोगे, और याहवेह के लिए सात दिन उत्सव मनाओगे.
१२सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी पवित्र मेळा भरवावा. त्यादिवशी तुम्ही कसलेहि अंगमेहनतीचे काम करू नये आणि परमेश्वरासाठी सात दिवस सण साजरा करावा.
13 तुम याहवेह के लिए सुखद-सुगंध के लिए आग के द्वारा यह होमबलि भेंट करो: तेरह बछड़े, दो मेढ़े, चौदह एक वर्ष के निर्दोष मेमने.
१३तुम्ही होमार्पणे करावीत. ही अग्नीबरोबर करावयाची अर्पणे आहेत. त्यांचा सुवास परमेश्वरास आनंदीत करील. तुम्ही तेरा गोऱ्हे, दोन मेंढे, एकएक वर्षाची नरजातीची चौदा कोकरे, ही दोषरहित असावी.
14 उन तेरह बछड़ों के साथ यह अन्नबलि होगी: तेल मिला हुआ मैदा ढाई किलो, मेढ़े के साथ तेल मिला हुआ मैदा दो किलो,
१४त्याबरोबर तेलात मळलेल्या सपिठाचे अन्नार्पण असावे. तेरा गोऱ्ह्यांपैकी प्रत्येक गोऱ्ह्यामागे तीन दशमांश एफा, दोन मेंढ्यापैकी प्रत्येक मेंढ्याबरोबर दोन दशमांश एफा,
15 तथा हर एक मेमने के साथ एक-एक किलो तेल मिला हुआ मैदा.
१५आणि चौदा कोकरापैकी प्रत्येक कोकराबरोबर एक दशमांश एफा सपीठ अर्पावे.
16 नियमित होमबलि, अन्नबलि तथा पेय बलि के अलावा पापबलि के लिए एक बकरा भेंट किया जाए.
१६आणि पापार्पणासाठी एक बकरा अर्पावा. याखेरीज निरंतरचे होमार्पणाव्यातिरिक्त आणि त्याबरोबरच्या अन्नार्पण व त्यांची पेयार्पण ही अर्पणे असावीत.
17 “‘इसके बाद अगले दिन पशुओं में से बारह बछड़े, दो मेढ़े, एक वर्ष के चौदह निर्दोष मेमने.
१७दुसऱ्या दिवशी तुम्ही बारा गोऱ्हे, दोन मेंढे आणि एक वर्षाचे चौदा कोकरे अर्पण करावेत. ती दोषरहित असावी.
18 इनके अलावा अन्नबलि और पेय बलि चढ़ाना; जो बछड़ों, मेढ़ों तथा मेमनों के लिए उनकी संख्या के अनुरूप, नियम के अनुसार हो.
१८त्याबरोबर गोऱ्ह्यासाठी, मेंढ्यासाठी आणि कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्य प्रमाणात अन्नार्पण आणि पेयार्पण विधिपूर्वक करावी.
19 तथा नियमित होमबलि के अलावा पापबलि के लिए एक बकरा तथा इसके साथ अन्नबलि तथा उनकी पेय बलियां.
१९आणि पापार्पणासाठी एक बकरा म्हणून द्यावा. याखेरीज निरंतरचे होमार्पण व त्यांची पेयार्पण ही असावीत.
20 “‘तीसरे दिन ग्यारह बछड़े, दो मेढ़े, एक वर्ष के चौदह निर्दोष मेमने.
२०तिसऱ्या दिवशी तुम्ही अकरा गोऱ्हे, दोन मेंढे आणि एक वर्षाचे चौदा निर्दोष कोकरे अर्पावी.
21 इनके अलावा अन्नबलि और पेय बलि चढ़ाना जो बछड़ों, मेढ़ों तथा मेमनों के साथ उनकी संख्या के अनुरूप, नियम के अनुसार हो.
२१त्याबरोबर गोऱ्ह्यासाठी, मेंढ्यासाठी आणि कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात अन्नार्पण व पेयार्पण केले पाहिजे.
22 तथा नियमित होमबलि के अलावा पापबलि के लिए एक बकरा तथा इसके लिए अन्नबलि तथा उनकी पेय बलियां.
२२पापार्पण म्हणून एक बकराही द्यावा. हे निरंतरचे होमार्पण व अन्नार्पण व त्यांचे पेयार्पणाव्यतिरिक्त असावी.
23 “‘चौथे दिन दस बछड़े, दो मेढ़े, एक वर्ष के चौदह निर्दोष मेमने.
२३चौथ्या दिवशी तुम्ही दहा गोऱ्हे, दोन मेंढे व एक वर्षाचे चौदा निर्दोष कोकरे अर्पावी.
24 इनके अलावा अन्नबलि और पेय बलि चढ़ाना जो बछड़ों, मेढ़ों तथा मेमनों के साथ उनकी संख्या के अनुरूप, नियम के अनुसार हो.
२४गोऱ्हे, मेंढे व कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात अन्नार्पण व पेयार्पणही नियमाप्रमाणे करावी.
25 नियमित होमबलि, अन्नबलि तथा पेय बलि के अलावा पापबलि के लिए एक बकरा भेंट किया जाए.
२५आणि पापार्पणासाठी एक बकरा अर्पावा. याखेरीज निरंतरचे होमार्पण, त्याचे अन्नार्पण व त्याचे पेयार्पण ही असावी.
26 “‘पांचवें दिन नौ बछड़े, दो मेढ़े, एक वर्ष के चौदह निर्दोष मेमने.
२६पाचव्या दिवशी तुम्ही नऊ गोऱ्हे, दोन मेंढे व एक वर्षाचे चौदा निर्दोष कोकरे अर्पावी.
27 इनके अलावा अन्नबलि और पेय बलि चढ़ाना जो बछड़ों, मेढ़ों तथा मेमनों के साथ उनकी संख्या के अनुरूप, नियम के अनुसार हो.
२७त्या बरोबर गोऱ्ह्यासाठी, मेंढ्यासाठी व कोकरासाठी यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात अन्नार्पण व पेयार्पण विधिपूर्वक करावी.
28 नियमित होमबलि तथा अन्नबलि तथा पेय बलि के अलावा एक बकरा पापबलि के लिए चढ़ाया जाएगा.
२८एक बकरा पापार्पणासाठी म्हणून अर्पावा. याखेरीज निरंतरचे होमार्पण व त्याचे अन्नार्पण, त्याचे पेयार्पण ही असावी.
29 “‘छठवें दिन आठ बछड़े, दो मेढ़े, एक वर्ष के चौदह निर्दोष मेमने.
२९सहाव्या दिवशी तुम्ही आठ गोऱ्हे, दोन मेंढे व एक वर्षांचे चौदा निर्दोष कोकरे अर्पावी.
30 इनके अलावा अन्नबलि और पेय बलि चढ़ाना जो बछड़ों, मेढ़ों तथा मेमनों के साथ उनकी संख्या के अनुरूप, नियम के अनुसार हो.
३०आणि त्यांबरोबर गोऱ्ह्यासाठी, मेंढ्यासाठी व कोकरासाठी यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात अन्नार्पण, व पेयार्पण विधिपूर्वक करावी.
31 तथा नियमित होमबलि के अलावा पापबलि के लिए एक बकरा तथा इसके लिए अन्नबलि तथा उनकी पेय बलियां.
३१एक बकरा पापार्पण म्हणून अर्पावा. याखेरीज निरंतरचे होमार्पण, अन्नार्पण व त्याचे पेयार्पण ही असावी.
32 “‘सातवें दिन सात बछड़े दो मेढ़े, एक वर्ष के चौदह निर्दोष मेमने.
३२सातव्या दिवशी तुम्ही सात गोऱ्हे, दोन मेंढे व एक वर्षांचे चौदा निर्दोष कोकरे अर्पावी.
33 इनके अलावा अन्नबलि और पेय बलि चढ़ाना जो बछड़ों, मेढ़ों तथा मेमनों के साथ उनकी संख्या के अनुरूप, नियम के अनुसार हो.
३३त्याबरोबर गोऱ्ह्यासाठी, मेंढ्यासाठी व कोकरासाठी यांच्याबरोबर तुम्ही योग्यप्रमाणात अन्नार्पण व पेयार्पणे नियमपूर्वक करावी.
34 तथा नियमित होमबलि के अलावा पापबलि के लिए एक बकरा तथा इसके लिए अन्नबलि तथा उनकी पेय बलियां.
३४एक बकरा पापार्पण म्हणून अर्पावा. याखेरीज निरंतरचे होमार्पण, अन्नार्पण व त्याचे पेयार्पण अर्पावी.
35 “‘आठवें दिन तुम एक पवित्र सभा आयोजित करोगे. इस दिन तुम कोई भी मेहनत न करोगे.
३५आठव्या दिवशी तुमच्यासाठी पवित्र मेळा भरवावा. त्यादिवशी तुम्ही कसलेहि अंगमेहनतीचे काम करू नये.
36 किंतु तुम होमबलि, आग के द्वारा भेंट बलि चढ़ाओगे, जो याहवेह के लिए सुखद-सुगंध होगी: एक बछड़ा, एक मेढ़ा, एक वर्ष के, निर्दोष सात मेमने.
३६तुम्ही परमेश्वरास मधुर सुवासाचे होमार्पण, अग्नीतून केलेले अर्पण म्हणून तुम्ही एक गोऱ्हा, एक मेंढा व एक एक वर्षाचे सात निर्दोष कोकरे अर्पावी.
37 बछड़े, मेढ़े तथा मेमनों के साथ उनकी संख्या के अनुसार उनकी अन्नबलि तथा उनकी पेय बलि.
३७आणि त्याबरोबर गोऱ्ह्यासाठी, मेंढ्यांसाठी व कोकरासाठी त्यांच्या त्यांच्या संख्येप्रमाणे तुम्ही अन्नार्पण व पेयार्पणे विधिपूर्वक अर्पण करावी.
38 नियमित होमबलि तथा अन्नबलि तथा पेय बलि के अलावा एक बकरा पापबलि के लिए चढ़ाया जाएगा.
३८एक बकरा पापार्पण म्हणून अर्पावा. याखेरीज निरंतरचे होमार्पण, अन्नार्पण, व त्यांचे पेयार्पण अर्पावा.
39 “‘ठहराए गए अवसरों पर तुम ये सब याहवेह के सामने प्रस्तुत करोगे. तुम्हारी संकल्प की गई तथा स्वेच्छा बलियों के अलावा तुम्हारी होमबलियां, अग्निबलियां, पेय बलियां तथा मेल बलियां भी चढ़ाना होंगे.’”
३९तुमचे नवस व स्वखुशीचे या व्यतिरिक्त नेमलेल्या सणात हे होमार्पण व पेयार्पण ही नवस व शांत्यर्पणे परमेश्वरास अर्पावी.
40 मोशेह ने यह सब याहवेह द्वारा उन्हें दी गई आज्ञा के अनुसार इस्राएल के घराने पर प्रकट कर दिया.
४०मोशेने परमेश्वराच्या या सर्व आज्ञा इस्राएल लोकांस सांगितल्या.