< यहोशू 10 >
1 फिर दूसरे दिन जब येरूशलेम के राजा अदोनी-त्सेदेक ने यह सुना कि यहोशू ने अय नगर को अपने अधीन कर उसे पूरा नष्ट कर दिया है; ठीक जैसा उन्होंने येरीख़ो एवं उसके राजा के साथ किया था; वैसा ही उन्होंने अय और उसके राजा के साथ भी किया, तथा गिबयोनवासियों ने इस्राएल के साथ संधि कर ली और अब वे उसी देश में रह रहे हैं,
१यहोशवाने आय नगर जिंकून त्याचा कसा पूर्णपणे नाश केला, आणि जसे त्याने यरीहोचे व त्याच्या राजाचे केले तसेच आय नगराचे व त्याच्या राजाचे केले, पण गिबोनाचे रहिवासी इस्राएल लोकांशी समेट करून त्यांच्यामध्ये राहत आहेत, हे सर्व यरूशलेमेचा राजा अदोनीसदेक याने ऐकले होते.
2 अदोनी-त्सेदेक और साथ के लोग डर गऐ, क्योंकि गिबयोन एक प्रतिष्ठित नगर था, और अय से अधिक बड़ा था तथा उसके लोग भी वीर थे.
२तेव्हा यरूशलेमातील लोक फार भयभीत झाले, कारण गिबोन हे मोठे शहर असून एखाद्या राजकीय नगरासारखे मोठे होते. ते आय नगरापेक्षा मोठे असून तेथले सगळे पुरुष पराक्रमी योद्धे होते.
3 तब येरूशलेम के राजा अदोनी-त्सेदेक ने हेब्रोन के राजा होहाम, यरमूथ के राजा पिरआम, लाकीश के राजा याफिया तथा एगलोन के राजा दबीर को यह संदेश भेजा कि,
३मग यरूशलेमेचा राजा अदोनीसदेक याने हेब्रोनाचा राजा होहाम, यर्मूथाचा राजा पिराम, लाखीशाचा राजा याफीय आणि एग्लोनाचा राजा दबीर यांना निरोप पाठवला,
4 “यहां आकर मेरी मदद कीजिए,” ताकि हम गिबयोन पर हमला करें, “क्योंकि उसने यहोशू तथा इस्राएल वंश से दोस्ती कर ली है.”
४“वर माझ्याकडे येऊन मला मदत करा, आपण गिबोनाला मार देऊ; कारण त्याने यहोशवाशी व इस्राएल लोकांशी समेट केला आहे.”
5 तब अमोरियों के पांच राजा येरूशलेम, हेब्रोन, यरमूथ लाकीश तथा एगलोन के राजा एक साथ मिल गए. उन्होंने अपनी-अपनी सेनाएं लेकर गिबयोन के पास तंबू खड़े किए तथा गिबयोन से लड़ाई शुरू की.
५तेव्हा यरूशलेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा, यर्मूथाचा राजा, लाखीशाचा राजा आणि एग्लोनाचा राजा या पाच अमोरी राजांनी एकत्र मिळून आपल्या सर्व सैन्यांसह चढाई केली आणि गिबोनासमोर तळ देऊन ते त्यांच्याशी लढू लागले.
6 तब गिबयोनवासियों ने गिलगाल में यहोशू को यह संदेश भेजा, “अपने सेवकों को अकेला मत छोड़िए. हमारी मदद के लिए तुरंत आइए. और हमें बचाइए. अमोरियों के सभी राजा, जो पर्वतीय क्षेत्र के हैं, एक होकर हमारे विरुद्ध खड़े हैं.”
६हे पाहून गिबोनातल्या मनुष्यांनी गिलगालच्या छावणीत यहोशवाला निरोप केला की, “आपल्या दासांवरील मदतीचा हात काढून घेऊ नको; आमच्याकडे लवकर येऊन आमचा बचाव कर व आम्हांला मदत कर; कारण डोंगरवटीतले सर्व अमोरी राजे एकत्र जमून आमच्यावर चालून आले आहेत.
7 यह सुन यहोशू, उनके साथ युद्ध के लिए तैयार व्यक्ति तथा शूर योद्धा लेकर गिलगाल से निकले.
७तेव्हा यहोशवा आपले सर्व योद्धे व शूर वीर यांना बरोबर घेऊन गिलगाल येथून निघाला.”
8 याहवेह ने यहोशू से कहा, “उनसे मत डरना, क्योंकि मैंने उन्हें तुम्हारे अधीन कर दिया है. उनमें से एक भी तुम्हारे सामने ठहर न सकेगा.”
८परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “त्यांना भिऊ नको; कारण मी त्यांना तुझ्या हाती दिले आहे; त्यांच्यातला कोणीही तुझ्यापुढे टिकणार नाही.”
9 तब गिलगाल से पूरी रात चलकर यहोशू ने उन पर अचानक हमला कर दिया.
९यहोशवा गिलगालाहून सारी रात्र चालत चढून जाऊन त्यांच्यावर एकाएकी चाल करून आला
10 याहवेह ने शत्रु को इस्राएलियों के सामने कमजोर कर दिया, तथा गिबयोन पर बड़ा विरोध किया. और बेथ-होरोन के मार्ग की चढ़ाई पर उनका पीछा किया और अज़ेका तथा मक्केदा तक उनको मारते गए.
१०आणि परमेश्वर देवाने इस्राएलापुढे शत्रूंत गोंधळ उडवला. त्यांनी गिबोनापाशी त्यांची मोठी कत्तल करून बेथ-होरोनाच्या चढावाच्या वाटेने त्यांचा पाठलाग केला आणि अजेका व मक्केदा येथपर्यंत ते त्यांना मारत गेले.
11 वे इस्राएलियों से बेथ-होरोन की ढलान तक भागते रहे, याहवेह ने उन पर अज़ेका से बड़े-बड़े पत्थर समान ओले फैंके, जिससे उनकी मृत्यु हो गई. और जो ओले से मरे वे कम थे, लेकिन तलवार से मारे गए लोग ज्यादा थे.
११ते इस्राएलापुढून बेथ-होरोनाच्या उतरणीवरून पळून जात असताना परमेश्वराने अजेकापर्यंत आकाशातून त्यांच्यावर गारांचे मोठे दगड फेकल्यामुळे ते ठार झाले. इस्राएल लोकांनी तलवारीने मारले त्यांपेक्षा जास्त लोक गारांच्या दगडांनी मरण पावले.
12 जिस दिन याहवेह ने अमोरियों को इस्राएल वंश के अधीन कर दिया था, उस दिन यहोशू ने याहवेह से बात की और इस्राएलियों के सामने कहा, “सूर्य, गिबयोन पर और चंद्रमा अय्जालोन घाटी पर रुक जाए.”
१२परमेश्वराने अमोऱ्यांना इस्राएल लोकांच्या हाती दिले त्या दिवशी यहोशवा देवाशी बोलला; इस्राएलासमक्ष तो असे म्हणाला, “हे सूर्या, तू गिबोनावर स्थिर हो; हे चंद्रा, तू अयालोनाच्या खोऱ्यावर स्थिर हो.”
13 तब सूर्य एवं, चंद्रमा रुक गये, जब तक इस्राएली राष्ट्र की सेना ने अपने शत्रुओं से बदला न लिया. यह घटना याशार की किताब में लिखी है. सूर्य लगभग पूरा दिन आकाश के बीच रुका रहा,
१३तेव्हा राष्ट्राने आपल्या शत्रूंचा बदला घेईपर्यंत सूर्य स्थिर झाला आणि चंद्र थांबला. याशाराच्या ग्रंथात ही कथा लिहिली आहे ना? सूर्य आकाशाच्या मधोमध सुमारे एक संपूर्ण दिवस थांबला; त्याने अस्तास जाण्याची घाई केली नाही.
14 इससे पहले और इसके बाद फिर कभी ऐसा नहीं हुआ कि, जब याहवेह ने किसी मनुष्य का ऐसा आग्रह स्वीकार किया हो; क्योंकि यह वह समय था, जब याहवेह इस्राएल की ओर से युद्ध कर रहे थे.
१४असा दिवस त्यापुर्वी किंवा त्यानंतरही आला नाही; त्या दिवशी परमेश्वराने मानवाचा शब्द ऐकला, कारण परमेश्वर इस्राएलासाठी लढत होता.
15 फिर यहोशू एवं उनके साथ सब इस्राएली गिलगाल चले गए.
१५मग यहोशवा सर्व इस्राएलासह गिलगाल येथील छावणीकडे परत आला.
16 जब पांचों राजा भागकर मक्केदा की गुफा में छिपे थे,
१६ते पाच राजे पळून जाऊन मक्केदा येथील एका गुहेत लपून बसले.
17 यहोशू को यह बताया गया: “पांचों राजा मक्केदा की गुफा में छिपे हुए हैं.”
१७मक्केदा येथील गुहेत ते पाच राजे लपलेले सापडले आहेत असे यहोशवाला कोणी कळवले.
18 यहोशू ने उनसे कहा, “गुफा के मुख पर बड़ा गोल पत्थर रख दो और वहां कुछ पहरेदार बिठा दो,
१८तेव्हा यहोशवा म्हणाला, गुहेच्या तोंडावर मोठमोठे धोंडे लोटा आणि तिच्यावर मनुष्यांचा पहारा बसवा.
19 और तुम वहां मत रुकना. तुम अपने शत्रुओं का पीछा करना और उन पर वार करना, जो सबसे पीछे हैं, उन्हें मौका देना कि वे अपने नगर में जा पाएं, क्योंकि याहवेह, तुम्हारे परमेश्वर ने उन्हें तुम्हारे हाथों में सौंप दिया है.”
१९पण तुम्ही स्वतः तेथे थांबू नका; आपल्या शत्रूंचा पाठलाग करा; त्यांच्या पिछाडीच्या लोकांस ठार मारा; त्यांना त्यांच्या नगरांत जाऊ देऊ नका; कारण तुमचा देव परमेश्वर याने त्यांना तुमच्या हाती दिले आहे.
20 जब यहोशू एवं इस्राएल वंश उनको मार चुके और उनमें से कुछ लोग बच गए, वे नगर के गढ़ में चले गए,
२०यहोशवा आणि इस्राएल लोक यांनी त्यांची मोठी कत्तल करून त्यांचा नाश करण्याचे काम संपवले; पण त्यांच्यातले काही लोक बचावून तटबंदीच्या नगरांत गेले.
21 तब सभी इस्राएली मक्केदा के पड़ाव में यहोशू के पास सुरक्षित लौट आए. इसके बाद फिर किसी में भी यह साहस न रहा कि इस्राएल के विरुद्ध कुछ कहें.
२१मग सर्व सैन्य मक्केदाच्या छावणीत यहोशवाकडे शांतीने माघारी आले; इस्राएलाविरुद्ध कोणी चकार शब्द काढण्याचे धाडस केले नाही.
22 तब यहोशू ने कहा, “गुफा का पत्थर हटा दो और पांचों राजाओं को मेरे पास लाओ.”
२२मग यहोशवा म्हणाला, “गुहेचे तोंड उघडून त्या पाच राजांना तेथून माझ्याकडे घेऊन या.”
23 वे गुफा में से उन पांच राजाओं को निकाल लाए; वे येरूशलेम, हेब्रोन, यरमूथ लाकीश तथा एगलोन के राजा थे.
२३त्याप्रमाणे त्यांनी केले, म्हणजे यरूशलेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा, यर्मूथाचा राजा, लाखीशाचा राजा आणि एग्लोनाचा राजा या पाच राजांना त्यांनी गुहेतून काढून त्याच्याकडे आणले.
24 जब इन्हें यहोशू के पास लाया गया, तब यहोशू ने सब इस्राएलियों को बुलाया तथा योद्धाओं के प्रमुखों को, जो उनके साथ युद्ध पर गए थे, उनसे कहा, “इन राजाओं की गर्दनों पर पैर रखो.” और वे उनके पास गए और उनकी गर्दन पर अपने पैर रखे.
२४ते त्या राजांना यहोशवाकडे घेऊन आले तेव्हा त्याने सर्व इस्राएल लोकांस बोलावून आणले. मग तो आपल्याबरोबर लढाईवर गेलेल्या योद्ध्यांच्या सेनानायकांना म्हणाला, “पुढे येऊन त्यांच्या मानेवर पाय द्या.” तेव्हा त्यांनी पुढे येऊन त्यांच्या मानेवर पाय दिले.
25 तब यहोशू ने सब इस्राएली प्रजा को बोला, “न तो डरना और न निराश होना, बहादुर तथा साहसी बनना, क्योंकि याहवेह शत्रुओं की यही दशा करेंगे, जिन-जिन से तुम युद्ध करोगे.”
२५यहोशवा त्यांना म्हणाला, “भिऊ नका, कचरू नका, बलवान व निर्भय व्हा; कारण ज्यांच्याशी तुम्ही लढाल त्या तुमच्या सर्व शत्रूचे परमेश्वर असेच करील.”
26 फिर यहोशू ने उनको मार दिया तथा उनके शवों को पांच वृक्षों पर लटका दिया; शाम तक उनके शव पेड़ों पर लटके रहे.
२६नंतर यहोशवाने त्यांना ठार मारून पाच झाडांवर त्यांना टांगले, आणि ते संध्याकाळपर्यंत त्या झाडांवर टांगलेले होते.
27 सूर्य ढलने पर यहोशू के आदेश पर उन्होंने वे शव उतारकर उसी गुफा में रख दिए, जहां वे छिपे थे. उन्होंने गुफा पर बड़े-बड़े पत्थरों का ढेर लगा दिया, जो आज तक वैसा ही है.
२७सूर्यास्ताच्या वेळी यहोशवाच्या आज्ञेवरून लोकांनी त्यांना त्या झाडांवरून उतरविले आणि ज्या गुहेत ते लपले होते तिच्यात त्यांना टाकले आणि त्या गुहेच्या तोंडावर त्यांनी मोठमोठे धोंडे रचले. आजपर्यंत ते तसेच आहेत.
28 मक्केदा नगर को यहोशू ने उसी दिन अपने अधीन कर लिया और नगरवासियों तथा राजा को तलवार से मार दिया. और कोई भी जीवित न रहा. यहोशू ने मक्केदा के राजा के साथ ठीक वही किया, जैसा उन्होंने येरीख़ो के राजा के साथ किया था.
२८त्या दिवशी यहोशवाने मक्केदा घेऊन तलवारीने त्यांचा व त्याच्या राजाचा पूर्णपणे नाश केला; त्यांच्याबरोबर तेथल्या प्रत्येक जिवंत प्राण्यांचाही त्याने नाश केला; त्याने कोणालाही जिवंत ठेवले नाही. त्याने यरीहोच्या राजाचे जे केले तेच मक्केदाच्या राजाचेही केले.
29 तब यहोशू तथा उनके साथ सब इस्राएली मक्केदा से होते हुए लिबनाह पहुंचे, और उन्होंने लिबनाह से युद्ध किया.
२९मग मक्केदाहून निघून सर्व इस्राएलांना बरोबर घेऊन यहोशवा लीब्नावर चालून गेला व लिब्नाच्याविरुद्ध त्यांनी लढाई केली;
30 याहवेह ने लिबनाह नगर तथा उसके राजा को इस्राएल के अधीन कर दिया. यहोशू ने नगर के हर व्यक्ति को तलवार से मार दिया, किसी को भी जीवित न छोड़ा. राजा के साथ भी यहोशू ने वही किया, जो उन्होंने येरीख़ो के राजा के साथ किया था.
३०परमेश्वराने ते नगर व त्याचा राजा यांना इस्राएलाच्या हाती दिले आणि यहोशवाने त्याचा व त्यातल्या सर्व जिवंत प्राण्यांचा तलवारीने संहार केला; त्यांच्यातल्या कोणालाही जिवंत ठेवले नाही; यरीहोच्या राजाचे त्याने जे केले तेच येथल्याही राजाचे केले.
31 तब यहोशू और उनके साथ सब इस्राएली लिबनाह से होते हुए लाकीश पहुंचे. उन्होंने वहां उनसे लड़ाई की.
३१त्यानंतर लिब्ना सोडून सर्व इस्राएलासह यहोशवा लाखीशावर चालून गेला. त्याने त्यासमोर तळ दिला आणि त्याच्याविरुध्द लढला.
32 याहवेह ने लाकीश को इस्राएल के अधीन कर दिया. दूसरे दिन यहोशू ने हर एक व्यक्ति को तलवार से मार दिया.
३२परमेश्वराने लाखीश इस्राएलाच्या हाती दिले व त्यांनी ते दुसऱ्या दिवशी घेतले, लिब्नाचा केला तसाच लाखीशाचा व तेथल्या प्रत्येक जिवंत प्राण्याचा त्याने तलवारीने नाश केला.
33 लाकीश की मदद के लिए गेज़ेर का राजा होराम आया. यहोशू ने उसे और उसकी सेना को भी मार दिया. यहोशू ने किसी को भी जीवित न छोड़ा.
३३तेव्हा गेजेराचा राजा होरम लाखीशाला मदत देण्यासाठी चालून आला, पण यहोशवाने त्यास व त्याच्या लोकांस एवढा मार दिला की त्यातला एकही जिवंत राहिला नाही.
34 यहोशू और उनके साथ सभी इस्राएली लाकीश से होकर एगलोन पहुंचे. उन्होंने उसके पास तंबू डाले और उनसे लड़ाई की.
३४मग लाखीश सोडून यहोशवा सर्व इस्राएलासह एग्लोनावर चालून गेला; त्यासमोर तळ देऊन ते त्याच्याशी लढले.
35 उन्होंने उसी दिन उस पर अधिकार कर लिया तथा सभी को तलवार से मार दिया.
३५त्याच दिवशी त्यांनी ते घेतले आणि तलवारीने त्यांचा संहार केला; लाखीशातल्याप्रमाणे तेथील प्रत्येक जिवंत प्राण्यांचा त्या दिवशी त्याने समूळ नाश केला.
36 फिर यहोशू और उनके साथ सभी इस्राएली एगलोन से हेब्रोन पहुंचे. उन्होंने उनसे युद्ध किया.
३६मग एग्लोन सोडून यहोशवा सर्व इस्राएलासह हेब्रोनावर चढाई करून गेला. आणि ते त्याच्याशी लढले;
37 और उन पर अधिकार कर उन्हें नष्ट कर दिया, तथा उसके राजा और सभी लोगों को तलवार से मार दिया, और किसी को भी जीवित न छोड़ा; यहोशू ने नगर को तथा हर एक नगरवासी को पूरी तरह नष्ट कर दिया.
३७त्यांनी ते घेतले आणि ते नगर, त्याचा राजा, त्याची सर्व उपनगरे आणि त्यातले सर्व प्राणी यांचा तलवारीने संहार केला; यहोशवाने एग्लोनातल्याप्रमाणेच येथेही कोणाला जिवंत राहू दिले नाही. त्याने त्याचा आणि त्यातल्या प्रत्येक जिवंत प्राण्यांचा समूळ नाश केला.
38 उसके बाद यहोशू तथा उनके साथ सब इस्राएली दबीर को गए, और उन्होंने उन पर आक्रमण कर दिया.
३८नंतर यहोशवा सर्व इस्राएलासह मागे वळून दबीरास चालून गेला आणि त्याच्याविरुध्द लढला.
39 यहोशू ने उसके राजा तथा नगर को अपने अधीन करके तलवार से मार दिया. और कोई भी जीवित न रहा. ठीक जैसा उन्होंने हेब्रोन में किया था, दबीर तथा उसके राजा के साथ भी वही किया, जैसा उन्होंने लिबनाह तथा उसके राजा के साथ भी किया था.
३९त्याने ते तेथला राजा व त्याची सर्व नगरे हस्तगत करून त्यांचा तलवारीने संहार केला. तेथील प्रत्येक जिवंत प्राण्यांचा त्याने समूळ नाश केला. कोणालाही जिवंत राहू दिले नाही हेब्रोनाचे, लिब्ना व त्याचा राजा यांचे त्याने जे केले तेच दबीर व त्याचा राजा यांचेही केले.
40 इस प्रकार यहोशू ने, पर्वतीय क्षेत्र, नेगेव, तथा उनके राजाओं को भी नष्ट कर दिया, और किसी को भी जीवित न छोड़ा; ठीक जैसा याहवेह, इस्राएल के परमेश्वर का आदेश था.
४०या प्रकारे यहोशवाने त्या सर्व देशांचा म्हणजे डोंगराळ प्रदेश, नेगेब, तळवट व उतरण यातील सर्व प्रांत आणि त्यांचे राजे यांना काबीज केले; कोणालाही जिवंत राहू दिले नाही; इस्राएलाचा देव परमेश्वर याने आज्ञा केल्याप्रमाणे प्रत्येक जिवंत गोष्टीचा त्याने समूळ नाश केला.
41 यहोशू ने कादेश-बरनेअ से लेकर गाज़ा तक तथा गोशेन से लेकर गिबयोन तक पूरे देश को अपने अधीन कर लिया.
४१यहोशवाने तलवारीने हल्ला करून कादेश-बर्ण्यापासून गज्जापर्यंतचा मुलूख व गिबोनापर्यंतचा सर्व गोशेन प्रांत त्याने मारला.
42 यहोशू ने एक ही बार में इन सभी राजाओं तथा उनकी सीमाओं को अपने अधिकार में ले लिया, क्योंकि याहवेह, इस्राएल के परमेश्वर उनके लिए युद्ध कर रहे थे.
४२हे सर्व राजे व त्यांचे देश यहोशवाने एकाच वेळेस घेतले, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर इस्राएलासाठी लढत होता.
43 इसके बाद यहोशू तथा उनकी सेना गिलगाल में अपने पड़ाव में लौट आए.
४३मग यहोशवा आणि त्याच्याबरोबर सर्व इस्राएल गिलगाल येथील छावणीकडे माघारी आले.