< यूहन्ना 4 >
1 जब मसीह येशु को यह मालूम हुआ कि फ़रीसियों के मध्य उनके विषय में चर्चा हो रही है कि वह योहन से अधिक शिष्य बनाते और बपतिस्मा देते हैं;
१येशू योहानापेक्षा अधिक शिष्य करून त्यांचा बाप्तिस्मा करीत आहे हे परूश्यांच्या कानी गेले आहे असे जेव्हा प्रभूला कळले.
2 यद्यपि स्वयं मसीह येशु नहीं परंतु उनके शिष्य बपतिस्मा देते थे,
२(तरी, येशू स्वतः बाप्तिस्मा करीत नव्हता पण त्याचे शिष्य करीत होते)
3 तब वह यहूदिया प्रदेश छोड़कर पुनः गलील प्रदेश को लौटे.
३तेव्हा तो यहूदीया प्रांत सोडून पुन्हा गालील प्रांतात गेला.
4 उन्हें शमरिया प्रदेश में से होकर जाना पड़ा.
४आणि त्यास शोमरोन प्रांतातून जावे लागले.
5 वह शमरिया प्रदेश के सूख़ार नामक नगर पहुंचे. यह नगर उस भूमि के पास है, जो याकोब ने अपने पुत्र योसेफ़ को दी थी.
५मग तो शोमरोन प्रांतातील सूखार नावाच्या नगरास आला. ते याकोबाने आपला मुलगा योसेफ याला दिलेल्या शेताजवळ होते.
6 याकोब का कुंआ भी वहीं था. यात्रा से थके मसीह येशु कुएं के पास बैठ गए. यह लगभग दिन का बारह बजे का समय था.
६तेथे याकोबाची विहीर होती. म्हणून प्रवासाने दमलेला येशू तसाच त्या विहिरीजवळ बसला, तेव्हा सुमारे दुपारचे बारा वाजले होते.
7 उसी समय शमरियावासी एक स्त्री उस कुएं से जल भरने आई. मसीह येशु ने उससे कहा, “मुझे पीने के लिए जल दो.”
७तेथे एक शोमरोनी स्त्री पाणी काढाण्यास आली. येशू तिला म्हणाला, “मला प्यायला दे.”
8 उस समय मसीह येशु के शिष्य नगर में भोजन लेने गए हुए थे.
८कारण त्याचे शिष्य गावात अन्न विकत घ्यायला गेले होते.
9 इस पर आश्चर्य करते हुए उस शमरियावासी स्त्री ने मसीह येशु से पूछा, “आप यहूदी होकर मुझ शमरियावासी से जल कैसे मांग रहे हैं?” (यहूदी शमरियावासियों से किसी प्रकार का संबंध नहीं रखते थे.)
९तेव्हा ती शोमरोनी स्त्री त्यास म्हणाली, “आपण यहूदी असून माझ्यासारख्या एका शोमरोनी स्त्रीजवळ प्यायला पाणी मागता हे कसे?” कारण यहूदी शोमरोनी लोकांबरोबर कोणतेही व्यवहारीक संबंध ठेवत नव्हते.
10 मसीह येशु ने उत्तर दिया, “यदि तुम परमेश्वर के वरदान को जानतीं और यह पहचानतीं कि वह कौन है, जो तुमसे कह रहा है, ‘मुझे पीने के लिए जल दो,’ तो तुम उससे मांगतीं और वह तुम्हें जीवन का जल देता.”
१०येशूने तिला उत्तर दिले, “देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यायला दे असे तुला म्हणणारा कोण आहे, हे तुला समजले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असतेस आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते.”
11 स्त्री ने कहा, “किंतु श्रीमन, आपके पास तो जल निकालने के लिए कोई बर्तन भी नहीं है और कुंआ बहुत गहरा है; जीवन का जल आपके पास कहां से आया!
११ती स्त्री त्यास म्हणाली, “साहेब, पाणी काढायला आपल्याजवळ काही नाही व विहीर तर खोल आहे, मग आपल्याजवळ ते जिवंत पाणी कोठून?
12 आप हमारे कुलपिता याकोब से बढ़कर तो हैं नहीं, जिन्होंने हमें यह कुंआ दिया, जिसमें से स्वयं उन्होंने, उनकी संतान ने और उनके पशुओं ने भी पिया.”
१२आमचा पूर्वज याकोब याने ही विहीर आम्हास दिली, तो स्वतः, त्याचे पुत्र व त्याची गुरेढोरे हिचे पाणी पीत असत. त्याच्यापेक्षा आपण मोठे आहात काय?”
13 मसीह येशु ने कहा, “कुएं का जल पीकर हर एक व्यक्ति फिर प्यासा होगा.
१३येशूने तिला उत्तर दिले, “जो कोणी हे पाणी पिईल त्यास पुन्हा तहान लागेल,
14 किंतु जो व्यक्ति मेरा दिया हुआ जल पिएगा वह आजीवन किसी भी प्रकार से प्यासा न होगा. और वह जल जो मैं उसे दूंगा, उसमें से अनंत काल के जीवन का सोता बनकर फूट निकलेगा.” (aiōn , aiōnios )
१४परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्यास कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्यास देईन ते त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल.” (aiōn , aiōnios )
15 यह सुनकर स्त्री ने उनसे कहा, “श्रीमन, आप मुझे भी वह जल दीजिए कि मुझे न प्यास लगे और न ही मुझे यहां तक जल भरने आते रहना पड़े.”
१५ती स्त्री त्यास म्हणाली, “साहेब, मला तहान लागू नये व पाणी काढायला मला येथवर येणे भाग पडू नये म्हणून ते पाणी मला द्या.”
16 मसीह येशु ने उससे कहा, “जाओ, अपने पति को यहां लेकर आओ.”
१६येशू तिला म्हणाला, “जा, तुझ्या पतीला बोलावून आण.”
17 स्त्री ने उत्तर दिया, “मेरे पति नहीं है.” मसीह येशु ने उससे कहा, “तुमने सच कहा कि तुम्हारा पति नहीं है.
१७ती स्त्री म्हणाली, “मला पती नाही.” येशूने तिला म्हटले, “तू ठीक बोललीस की, ‘तुला पती नाही;’
18 सच यह है कि पांच पति पहले ही तुम्हारे साथ रह चुके हैं और अब भी जो तुम्हारे साथ रह रहा है, तुम्हारा पति नहीं है.”
१८कारण तुला पाच पती होते आणि तुझ्याजवळ आता आहे तो तुझा पती नाही, हे तू खरे बोललीस.”
19 यह सुन स्त्री ने उनसे कहा, “श्रीमन, ऐसा लगता है कि आप भविष्यवक्ता हैं.
१९ती स्त्री त्यास म्हणाली, “साहेब, आपण संदेष्टे आहात हे आता मला समजले.
20 हमारे पूर्वज इस पर्वत पर आराधना करते थे किंतु आप यहूदी लोग कहते हैं कि येरूशलेम ही वह स्थान है, जहां आराधना करना सही है.”
२०आमच्या पूर्वजांनी याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता की, जिथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरूशलेम शहरात आहे.”
21 मसीह येशु ने उससे कहा, “मेरा विश्वास करो कि वह समय आ रहा है जब तुम न तो इस पर्वत पर पिता की आराधना करोगे और न येरूशलेम में.
२१येशू तिला म्हणाला, “मुली, माझ्यावर विश्वास ठेव की अशी घटका येत आहे; तुम्ही या डोंगरावर किव्हा यरूशलेम शहरात पित्याची उपासना करणार नाही,
22 तुम लोग तो उसकी आराधना करते हो जिसे तुम जानते नहीं. हम उनकी आराधना करते हैं जिन्हें हम जानते हैं, क्योंकि उद्धार यहूदियों में से ही है.
२२तुम्ही ज्याला ओळखीत नाही अशाची उपासना करता; आम्हास ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो, कारण यहूद्यांतूनच तारण आहे.
23 वह समय आ रहा है बल्कि आ ही गया है जब सच्चे भक्त पिता की आराधना अपनी अंतरात्मा और सच्चाई में करेंगे क्योंकि पिता अपने लिए ऐसे ही भक्तों की खोज में हैं.
२३तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने स्वर्गीय पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे; कारण आपले उपासक असेच असावेत, अशी पित्याची इच्छा आहे.
24 परमेश्वर आत्मा हैं इसलिये आवश्यक है कि उनके भक्त अपनी आत्मा और सच्चाई में उनकी आराधना करें.”
२४देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.”
25 स्त्री ने उनसे कहा, “मैं जानती हूं कि मसीह, जिन्हें ख्रिस्त कहा जाता है, आ रहे हैं. जब वह आएंगे तो सब कुछ साफ़ कर देंगे.”
२५ती स्त्री त्यास म्हणाली, “मी जाणते की, मसीहा ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येणार आहे, हे मला माहित आहे. तो येईल तेव्हा तो सर्व गोष्टी सांगेल.”
26 मसीह येशु ने उससे कहा, “जो तुमसे बातें कर रहा है, वही तो मैं ही हूं.”
२६येशू तिला म्हणाला, “तुझ्याशी बोलणारा मीच तो आहे.”
27 तभी उनके शिष्य आ गए और मसीह येशु को एक स्त्री से बातें करते देख दंग रह गए, फिर भी किसी ने उनसे यह पूछने का साहस नहीं किया कि वह एक स्त्री से बातें क्यों कर रहे थे या उससे क्या जानना चाहते थे.
२७इतक्यात त्याचे शिष्य आले आणि तो एका स्त्रीबरोबर बोलत आहे याचे त्यांना आश्चर्य वाटले, तरी कोणी असे म्हणले नाही की, “आपण काय विचारत आहात?” किंवा “आपण तिच्याशी का बोलत आहात?”
28 अपना घड़ा वहीं छोड़ वह स्त्री नगर में जाकर लोगों को बताने लगी,
२८ती स्त्री तेव्हा आपला पाण्याचा घडा तेथेच टाकून नगरात गेली आणि लोकांस म्हणाली,
29 “आओ, एक व्यक्ति को देखो, जिन्होंने मेरे जीवन की सारी बातें सुना दी हैं. कहीं यही तो मसीह नहीं?”
२९“चला, मी केलेले सर्वकाही ज्याने मला सांगितले, तो मनुष्य पाहा, तोच ख्रिस्त असेल काय?”
30 तब नगरवासी मसीह येशु को देखने वहां आने लगे.
३०तेव्हा ते नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागले.
31 इसी बीच शिष्यों ने मसीह येशु से विनती की, “रब्बी, कुछ खा लीजिए.”
३१त्याचे शिष्य त्यास विनंती करून म्हणाले, “रब्बी, काहीतरी खाऊन घ्या.”
32 मसीह येशु ने उनसे कहा, “मेरे पास खाने के लिए ऐसा भोजन है, जिसके विषय में तुम कुछ नहीं जानते.”
३२पण तो त्यांना म्हणाला, “तुम्हास माहीत नाही असे अन्न माझ्याजवळ खायला आहे.”
33 इस पर शिष्य आपस में पूछताछ करने लगे, “कहीं कोई गुरु के लिए भोजन तो नहीं लाया?”
३३यावरुन शिष्य एकमेकांस म्हणू लागले, “ह्याला कोणी खायला आणून दिले असेल काय?”
34 मसीह येशु ने उनसे कहा, “अपने भेजनेवाले, की इच्छा पूरी करना तथा उनका काम समाप्त करना ही मेरा भोजन है.
३४येशू त्यांना म्हणाला, “ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्न आहे.
35 क्या तुम यह नहीं कहते कि कटनी में चार महीने बचे हैं? किंतु मैं तुमसे कहता हूं कि खेतों पर दृष्टि डालो. वे कब से कटनी के लिए पक चुके हैं.
३५अजून चार महिन्यांचा अवकाश आहे, मग कापणी येईल, असे तुम्ही म्हणता की नाही? पाहा, मी तुम्हास म्हणतो, आपली नजर वर करून शेते पाहा; ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत.
36 इकट्ठा करनेवाला अपनी मज़दूरी प्राप्त कर अनंत काल के जीवन के लिए फसल इकट्ठी कर रहा है कि किसान और इकट्ठा करनेवाला दोनों मिलकर आनंद मनाएं. (aiōnios )
३६कापणारा मजुरी मिळवतो व सार्वकालिक जीवनासाठी पीक गोळा करतो; यासाठी की पेरणाऱ्याने व कापणी करणाऱ्यानेही एकत्र आनंद करावा. (aiōnios )
37 यहां यह कहावत ठीक बैठती है: ‘एक बोए दूसरा काटे.’
३७‘एक पेरतो आणि दुसरा कापतो’, अशी जी म्हण आहे ती या बाबतीत खरी आहे.
38 जिस उपज के लिए तुमने कोई परिश्रम नहीं किया, उसी को काटने मैंने तुम्हें भेजा है. परिश्रम अन्य लोगों ने किया और तुम उनके प्रतिफल में शामिल हो गए.”
३८ज्यासाठी तुम्ही कष्ट केले नाहीत ते कापायला मी तुम्हास पाठवले. दुसर्यांनी कष्ट केले होते व तुम्ही त्यांच्या कष्टात वाटेकरी झालेले आहात.”
39 अनेक शमरियावासियों ने उस स्त्री की इस गवाही के कारण मसीह येशु में विश्वास किया: “आओ, एक व्यक्ति को देखो, जिन्होंने मेरे जीवन की सारी बातें सुना दी हैं.”
३९“मी केलेले सर्वकाही त्याने मला सांगितले” अशी साक्ष देणाऱ्या त्या स्त्रीच्या बोलण्यावरून त्या नगरातल्या पुष्कळ शोमरोनी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
40 तब शमरियावासियों की विनती पर मसीह येशु दो दिन तक उनके मध्य रहे
४०म्हणून शोमरोनी त्याच्याकडे आल्यावर, त्यांनी त्यास आपल्याबरोबर रहायची विनंती केली; मग तो तेथे दोन दिवस राहिला.
41 और उनका प्रवचन सुनकर अनेकों ने उनमें विश्वास किया.
४१आणखी कितीतरी लोकांनी त्याच्या वचनावरून विश्वास धरला.
42 उन्होंने उस स्त्री से कहा, “अब हम मात्र तुम्हारे कहने से ही इनमें विश्वास नहीं करते, हमने अब इन्हें स्वयं सुना है और जान गए हैं कि यही वास्तव में संसार के उद्धारकर्ता हैं.”
४२आणि ते त्या स्त्रीला म्हणाले, “आता तुझ्या बोलण्यावरूनच आम्ही विश्वास धरतो असे नाही, कारण आम्ही स्वतः ऐकले आहे व हा खरोखर जगाचा तारणारा आहे, हे आम्हास समजले आहे.”
43 दो दिन बाद मसीह येशु ने गलील प्रदेश की ओर प्रस्थान किया.
४३मग त्या दोन दिवसानंतर, तो तेथून गालील प्रांतात निघून गेला.
44 यद्यपि मसीह येशु स्वयं स्पष्ट कर चुके थे कि भविष्यवक्ता को अपने ही देश में सम्मान नहीं मिलता,
४४कारण येशूने स्वतः साक्ष दिली की, संदेष्ट्याला स्वतःच्या देशात मान मिळत नाही.
45 गलील प्रदेश पहुंचने पर गलीलवासियों ने उनका स्वागत किया क्योंकि वे फ़सह उत्सव के समय येरूशलेम में मसीह येशु द्वारा किए गए काम देख चुके थे.
४५म्हणून तो गालील प्रांतात आल्यावर गालीलकरांनी त्याचे स्वागत केले; कारण त्याने सणात यरूशलेम शहरात केलेल्या सर्व गोष्टी त्यांनी पाहिल्या होत्या; कारण तेही सणाला गेले होते.
46 मसीह येशु दोबारा गलील प्रदेश के काना नगर में आए, जहां उन्होंने जल को दाखरस में बदला था. कफ़रनहूम नगर में एक राजकर्मचारी था, जिसका पुत्र अस्वस्थ था.
४६नंतर तो गालील प्रांतातील काना नगरात पुन्हा आला. तेथे त्याने पाण्याचा द्राक्षरस केला होता. त्या स्थळी कोणीएक अंमलदार होता, त्याचा मुलगा कफर्णहूमात आजारी होता.
47 यह सुनकर कि मसीह येशु यहूदिया प्रदेश से गलील में आए हुए हैं, उसने आकर मसीह येशु से विनती की कि वह चलकर उसके पुत्र को स्वस्थ कर दें, जो मृत्यु-शय्या पर है.
४७येशू यहूदीया प्रांतातून गालील प्रांतात आला आहे हे ऐकून तो त्याच्याकडे गेला आणि त्याने खाली येऊन आपल्या मुलाला बरे करावे अशी त्याने विनंती केली कारण तो मरायला टेकला होता.
48 इस पर मसीह येशु ने उसे झिड़की देते हुए कहा, “तुम लोग तो चिह्न और चमत्कार देखे बिना विश्वास ही नहीं करते!”
४८त्यावर येशू त्यास म्हणाला, “तुम्ही चिन्हे आणि अद्भूते बघितल्याशिवाय विश्वास ठेवणारच नाही.”
49 राजकर्मचारी ने उनसे दोबारा विनती की, “श्रीमन, इससे पूर्व कि मेरे बालक की मृत्यु हो, कृपया मेरे साथ चलें.”
४९तो अंमलदार त्यास म्हणाला, “प्रभूजी, माझे मूल मरण्यापूर्वी आपण खाली येण्याची कृपा करा.”
50 मसीह येशु ने उससे कहा, “जाओ, तुम्हारा पुत्र जीवित रहेगा.” उस व्यक्ति ने मसीह येशु के वचन पर विश्वास किया और घर लौट गया.
५०येशू त्यास म्हणाला, “जा, तुमचा मुलगा वाचला आहे.” तेव्हा तो मनुष्य, त्यास येशूने म्हटलेल्या वचनावर विश्वास ठेवून, आपल्या मार्गाने निघून गेला.
51 जब वह मार्ग में ही था, उसके दास उसे मिल गए और उन्होंने उसे सूचना दी, “स्वामी, आपका पुत्र स्वस्थ हो गया है.”
५१आणि तो खाली जात असता त्याचे दास त्यास भेटून म्हणाले, “आपला मुलगा वाचला आहे.”
52 “वह किस समय से स्वस्थ होने लगा था?” उसने उनसे पूछा. उन्होंने कहा, “कल लगभग दोपहर एक बजे उसका ज्वर उतर गया.”
५२तेव्हा केव्हापासून त्याच्यात सुधारणा होऊ लागली म्हणून त्याने त्यांना प्रश्न केला आणि ते त्यास म्हणाले, “काल, दुपारी एक वाजता त्याचा ताप गेला.”
53 पिता समझ गया कि यह ठीक उसी समय हुआ जब मसीह येशु ने कहा था, “तुम्हारा पुत्र जीवित रहेगा.” इस पर उसने और उसके सारे परिवार ने मसीह येशु में विश्वास किया.
५३यावरुन ज्या ताशी येशूने त्यास सांगितले होते की, “तुमचा मुलगा वाचला आहे,” त्याच ताशी हे झाले असे पित्याने ओळखले आणि त्याने स्वतः व त्याच्या सर्व घराण्याने विश्वास ठेवला.
54 यह दूसरा अद्भुत चिह्न था, जो मसीह येशु ने यहूदिया प्रदेश से लौटकर गलील प्रदेश में किया.
५४येशू यहूदीया प्रांतातून गालील प्रांतात आल्यावर त्याने पुन्हा जे दुसरे चिन्ह केले ते हे.