< 1 इतिहास 7 >
1 इस्साखार के पुत्र: तोला, पुआह, याशूब और शिम्रोन—चार पुत्र.
१इस्साखारला चार पुत्र होते. त्यांची नावे अशी, तोला, पुवा, याशूब आणि शिम्रोन.
2 तोला के पुत्र: उज्जी, रेफ़ाइयाह, येरिएल, याहमाई, इबसाम और शमुएल ये अपने पूर्वजों के परिवारों के प्रधान थे. तोला के पुत्र अपनी पीढ़ी में वीर योद्धाओं के रूप में मशहूर थे. दावीद के शासनकाल में इनकी संख्या 22,600 आंकी गई थी.
२उज्जी, रफाया, यरीएल, यहमय, इबसाम आणि शमुवेल हे तोलाचे पुत्र. आपापल्या पित्याच्या घराण्यात प्रमुख होते. ते आणि त्यांचे वंशज हे शूर लढवय्ये होते. त्यांची संख्या वाढून दावीदाच्या दिवसापर्यंत बावीस हजार सहाशें इतकी झाली.
3 उज्जी का पुत्र: यिज़राहियाह था. यिज़राहियाह के पुत्र: मिखाएल, ओबदिया, योएल, इश्शियाह; ये पांचों ही प्रधान थे.
३इज्रह्या हा उज्जीचा पुत्र. मीखाएल. ओबद्या. योएल आणि इश्शीया हे इज्रह्याचे पाच पुत्र. हे ही आपापल्या घराण्यांचे प्रमुख पुरुष होते.
4 उस पीढ़ी में उनके साथ उनके पूर्वजों के गोत्र के अनुसार युद्ध के लिए सेना की टुकड़िया तैयार थी, जिनकी संख्या 36,000 थी. इस संख्या का कारण था उनकी अनेक पत्नियां और उनसे पैदा अनेक पुत्र.
४त्यांच्या घराण्यात छत्तीस हजार सैनिक युध्दाला तयार होते असे त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले होते. कारण त्यांच्या स्त्रिया आणि पुत्र पुष्कळ होते.
5 इस्साखार के सभी परिवारों में सभी संबंधी वीर योद्धा थे. उनका लेखा वंशावली में रखा गया है. ये कुल 87,000 योद्धा थे.
५इस्साखाराच्या सर्व घराण्यांमध्ये मिळून सत्याऐंशीं हजार लढवय्ये वंशावळ्यांनी मोजलेले होते.
6 बिन्यामिन के तीन पुत्र: बेला, बेकेर और येदिआएल.
६बन्यामीनाला तीन पुत्र होते. बेला, बेकर आणि यदीएल.
7 बेला के पांच पुत्र: एज़बोन, उज्जी, उज्ज़िएल, येरीमोथ और ईरी: ये अपने पिता के परिवार के प्रमुख थे. वंशावली लेखा के अनुसार ये 22,034 सभी वीर योद्धा थे.
७बेलाला पाच पुत्र होते. एस्बोन, उज्जी, उज्जियेल, यरीमोथ आणि ईरी हे ते पाच होत. ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्यात बावीस हजार चौतीस सैनिक होते.
8 बेकेर के पुत्र: ज़ेमिराह, योआश, एलिएज़र, एलिओएनाइ, ओमरी, येरेमोथ, अबीयाह, अनाथोथ और अलेमेथ. ये सभी बेकेर के पुत्र थे.
८जमीरा, योवाश, अलियेजर, एल्योवेनय, अम्री, यरेमोथ, अबीया, अनाथोथ व अलेमेथ हे बेकेरचे पुत्र.
9 इनका नामांकन इनकी पीढ़ी के अनुसार वंशावली में किया गया है. ये अपने पूर्वजों के परिवार में नायक रहे. इन वीर योद्धाओं की संख्या 20,200 थी.
९आपापल्या घराण्यांचे प्रमुख कोण ते त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले. वीस हजार दोनशे सैनिक होते.
10 येदिआएल का पुत्र: बिलहान. बिलहान के पुत्र: येऊश, बिन्यामिन, एहूद, केनानाह, ज़ेथान, तरशीश और अहीशाहार.
१०यदीएलचा पुत्र बिल्हान. बिल्हानचे पुत्र, यऊश, बन्यामीन, एहूद, कनाना, जेथान, तार्शीश व अहीशाहर.
11 उनके पिता के परिवार के प्रमुखों के अनुसार ये येदिआएल के पुत्र हुए. ये सभी शूर योद्धा थे, संख्या में 17,200. ये सभी युद्ध के लिए निपुण थे.
११यदीएलचे पुत्र हे त्यांच्या घराण्याचे प्रमुख होते. त्यांच्याकडे सतरा हजार दोनशे सैनिक युध्दाला तयार होते.
12 ईर के पुत्र थे शुप्पिम और हुप्पिम. अहेर का पुत्र था हुषीम.
१२शुप्पीम आणि हुप्पीम हे ईरचे वंशज आणि अहेरचा पुत्र हुशीम.
13 नफताली के पुत्र: याहत्सिएल, गूनी, येसेर और शल्लूम ये सभी बिलहाह से उत्पन्न पुत्र थे.
१३यहसिएल, गूनी, येसर आणि शल्लूम हे नफतालीचे पुत्र. हे सर्व बिल्हेचे वंशज.
14 मनश्शेह के पुत्र: उसकी अरामी उप-पत्नी से पैदा पुत्र अस्रीएल. उसी से पैदा हुआ गिलआद का पिता माखीर.
१४मनश्शेचे पुत्र, अस्रियेल हा त्याची अरामी उपपत्नीपासून झाला. माखीर म्हणजे गिलादाचा पिता.
15 माखीर ने हुप्पिम और शुप्पिम का विवाह कर दिया. उसकी बहन का नाम माकाह था और दूसरी बहन का नाम था ज़लोफेहाद. ज़लोफेहाद ने पुत्रियों को जन्म दिया.
१५हुप्पीम आणि शुप्पीम या लोकांपैकी एका स्त्रीशी माखीरने लग्न केले. त्या बहिणीचे नाव माका होते. मनश्शेच्या दुसऱ्या वंशजाचे नाव सलाफहाद होते. त्यास फक्त कन्याच होत्या.
16 माखीर की पत्नी माकाह ने एक पुत्र को जन्म दिया, उसने जिसका नाम रखा, पेरेश. उसके भाई का नाम था शेरेष. पेरेश के पुत्र उलाम और रेकेम.
१६माखीरची पत्नी माका हिला पुत्र झाला. तिने त्याचे नाव पेरेस ठेवले. त्याच्या भावाचे नाव शेरेश. शेरेशचे पुत्र ऊलाम आणि रेकेम.
17 उलाम का पुत्र था: बेदान. ये सभी गिलआद के पुत्र, माखीर के पोते और मनश्शेह के परपोते थे.
१७ऊलामचा पुत्र बदान. हे झाले गिलादाचे वंशज. गिलाद हा माखीरचा पुत्र. माखीर मनश्शेचा पुत्र.
18 माखीर की बहन हम्मोलेखेत ने इशहोद, अबीएज़ेर और महलाह को जन्म दिया.
१८माखीरची बहीण हम्मोलेखेथ हिला इशहोद, अबीयेजेर आणि महला हे पुत्र झाले.
19 शेमीदा के पुत्र थे: अहीयान, शेकेम, लीखी और आनियम.
१९अह्यान, शेखेम, लिखी आणि अनीयाम हे शमीदचे पुत्र.
20 एफ्राईम-वंशज: शूतेलाह, उसका पुत्र बेरेद, उसका पुत्र ताहाथ, उसका पुत्र एलियाद, उसका पुत्र ताहाथ,
२०एफ्राईमाची वंशावळ पुढीलप्रमाणेः एफ्राईमाचा पुत्र शूथेलाह. शुथेलहचा पुत्र बेरेद. बेरेदाचा पुत्र तहथ. तहथाचा पुत्र एलादा. एलादाचा पुत्र तहथ.
21 उसका पुत्र ज़ाबाद, उसके पुत्र शूतेलाह. (एज़र और एलियाद. इन दोनों का वध गाथ के निवासियों द्वारा उस समय कर दिया गया था, जब ये दोनों उनके पशुओं की चोरी करते हुए पकड़े गए थे.
२१तहथचा पुत्र जाबाद. जाबादचा पुत्र शुथेलह. गथ नगरात वाढलेल्या काही लोकांनी एजेर एलद यांना ठार मारले. कारण ते दोघे गथच्या लोकांची गुरेढोरे चोरण्यास गेले होते.
22 इनके लिए इनका पिता एफ्राईम लंबे समय तक दुःख में डूबा रहा. उसके संबंधी उसे सांत्वना देने उसके पास जाते रहे.
२२एजेर आणि एलद हे एफ्राईमाचे पुत्र होते. एजेर आणि एलद यांच्या निधनाचा शोक त्याने बरेच दिवस केला. त्याच्या बांधवांनी त्याचे सांत्वन केले.
23 इसके बाद उसने अपनी पत्नी से संबंध बनाए. वह गर्भवती हुई और उसने एक पुत्र को जन्म दिया, जिसका नाम रखा गया बेरियाह यानी मुसीबत, क्योंकि उसके परिवार पर मुसीबत आई हुई थी.
२३मग एफ्राईमाचा पत्नीशी संबंध येऊन त्याची पत्नी गर्भवती राहिली आणि तिने एका पुत्राला जन्म दिला. त्याने त्याचे नाव बरीया ठेवले. कारण त्याच्या घराण्यात शोकांतिका झाली होती.
24 उसकी पुत्री का नाम था शीराह. उसने ऊपरवाले और नीचेवाले बेथ-होरोन नगरों और उज्जेन-शीराह नगर का निर्माण किया था.)
२४त्याची कन्या शेरा होती. हिने खालचे आणि वरचे बेथ-होरोन आणि उज्जन-शेरा ही बांधली.
25 उसका पुत्र था रेफ़ाह, उसका पुत्र था रेशेफ़, उसका पुत्र तेलाह, उसका पुत्र तहान
२५रेफह हा एफ्राईमाचा पुत्र. रेफहचा पुत्र रेशेफ. रेशेफचा पुत्र तेलह. तेलहचा पुत्र तहन.
26 उसका पुत्र लादान, उसका पुत्र अम्मीहूद, उसका पुत्र एलीशामा,
२६तहनचा पुत्र लादान. लादानचा पुत्र अम्मीहूद. आम्मीहूदचा अलीशामा.
27 उसका पुत्र नून और उसका पुत्र यहोशू.
२७त्याचा पुत्र नून आणि नूनचा पुत्र यहोशवा.
28 इनका स्वामित्व और घर बेथेल, और उसके आस-पास के गांव, पूर्वी नआरन, पश्चिमी गेज़ेर और इसके नगरों, शेकेम और इसके नगरों में और अय्याह और इसके नगरों में था.
२८एफ्राईमाच्या वंशजांची वतने आणि गावे पुढीलप्रमाणे त्या त्याठिकाणी ते राहत होते. बेथेल व त्याच्या जवळपासची गावे. पूर्वेला नारान, पश्चिमेस गेजेर आणि आसपासची खेडी, शखेम आणि त्याच्या आसपासची खेडी अगदी सरळ अय्या व त्या भोवतालच्या प्रदेशापर्यंत.
29 मनश्शेह-वंशजों के अधिकार में बेथ-शान और इसके नगर, तानख और उसके नगर, मगिद्दो और उसके नगर, इन सभी नगरों में इस्राएल के पुत्र योसेफ़ के वंशज निवास करते थे.
२९मनश्शेच्या सीमेला लागून असलेली बेथ-शान, तानख, मगिद्दो, दोर ही नगरे व त्यांच्या भोवतालचा प्रदेश एवढ्या भागात इस्राएलचा पुत्र योसेफ याचे वंशज राहत होते.
30 आशेर के पुत्र: इमनाह, इशवाह, इशवी, बेरियाह और उनकी बहन सेराह.
३०इम्ना, इश्वा, इश्वी, बरीया हे आशेरचे पुत्र. त्यांची बहीण सेराह.
31 बेरियाह के पुत्र: हेबेर और मालखिएल, जो पिता था बिरत्साइथ का.
३१हेबेर, मलकीएल, हे बरीयाचे पुत्र. मालकीएलचा पुत्र बिर्जाविथ.
32 हेबेर पिता था याफलेत, शोमर, होथाम और इनकी बहन शुआ का.
३२यफलेट, शोमर, होथाम हे पुत्र आणि शूवा ही बहीण यांच्या हेबेर हा पिता होता.
33 याफलेत के पुत्र: पासाख, बिमहाल और अषवाथ. ये यफलेत के पुत्र थे.
३३पासख, बिह्माल, अश्वथ हे यफलेटचे पुत्र.
34 उसके भाई शेमर के पुत्र: अही, रोहगाह, येहुब्बाह और अराम.
३४अही, राहागा. यहूबा व अराम हे शेमेराचे पुत्र.
35 उसके भाई हेलेम के पुत्र: ज़ोफ़ाह, इमना, शेलेश और आमाल.
३५शेमेरचा भाऊ हेलेम. त्याचे पुत्र सोफह, इम्ना, शेलेश आणि आमाल.
36 ज़ोफ़ाह के पुत्र: सुआह, हारनेफ़र, शुआल, बेरी, इमराह,
३६सोफहचे पुत्र सूहा, हर्नेफेर, शूवाल, बेरी व इम्ना,
37 बेज़र, होद, शम्मा, शिलशाह, इथरान और बीअरा.
३७बेसेर, होद, शम्मा, शिलशा, इथ्रान, बैरा.
38 येथेर के पुत्र: येफुन्नेह, पिस्पा और आरा.
३८यफुन्ने पिस्पा, अरा हे येथेरचे पुत्र.
39 उल्ला के पुत्र: आराह, हन्निएल और रिज़िया.
३९आरह, हन्निएल व रिस्या हे उल्लाचे पुत्र.
40 ये सभी आशेर वंश के पुरुष थे, अपने गोत्रपिता के परिवारों के प्रमुख, प्रमाणित वीर योद्धा, प्रशासकों के प्रधान थे. उनकी संख्या वंशावली द्वारा गिनी गई थी कि वे युद्धकाल में जाकर युद्ध करें. ये संख्या में 26,000 पुरुष थे.
४०हे सर्व आशेरचे वंशज. ते आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्या वंशावळ्यांनी मोजलेले असे ते सव्वीस हजार लढवय्ये पुरुष त्यांच्यात होते.