< 1 इतिहास 28 >
1 दावीद ने इस्राएल के सभी अधिकारियों, गोत्रों के प्रशासकों और राजकीय सेवा में लगी सेना की टुकड़ियों के हाकिमों और हज़ार सैनिकों के सेनापतियों, सौ सैनिकों के सेनापतियों, खजाने और राजा और उनके पुत्रों के पशुओं के अगुओं को, राजमहल के अधिकारियों, वीर योद्धाओं और बहुत अनुभवी योद्धाओं के साथ येरूशलेम में आमंत्रित किया.
१दावीदाने इस्राएलातील सर्व अधिकारी, वंशावंशाचे प्रमुख, पाळीपाळीने राजाचे काम करणारे सरदार, हजारांचे सरदार व शंभरांचे सरदार, राजाच्या व त्याच्या मुलांच्या सर्व संपत्तीवरील व धनावरील अधिकारी, अंमलदार, शूर वीर आणि लढवय्ये यांना यरूशलेमेत एकत्र बोलावले.
2 राजा दावीद ने इन सबके सामने खड़े होकर उन्हें संबोधित कर कहा: “मेरे भाइयो और मेरी प्रजा, मेरी बातें ध्यान से सुनो; यह मेरी इच्छा थी कि मैं याहवेह की वाचा का संदूक और हमारे परमेश्वर के पैरों की चौकी के लिए एक स्थिर घर को बनाऊं. इसी उद्देश्य से मैंने भवन बनाने की तैयारी कर ली.
२नंतर राजा दावीद त्यांच्यापुढे उभा राहून म्हणाला, “माझ्या बांधवांनो आणि लोकांनो, माझे ऐका परमेश्वराचा कराराचा कोश ठेवण्यासाठी आणि देवाच्या पादासनासाठी एक विसाव्याचे घर बांधावे असा माझा मानस होता. त्याच्या बांधकामासाठी मी तयारी ही केली होती.
3 मगर परमेश्वर ने मुझसे कहा, ‘मेरे आदर में भवन को तुम नहीं बनवाओगे क्योंकि तुम एक योद्धा हो, तुमने बहुत लहू बहाया है.’
३पण देव मला म्हणाला, ‘तू माझ्या नावासाठी मंदिर बांधायचे नाही. कारण तू एक लढवय्या आहेस आणि रक्त पाडले आहेस.’
4 “फिर भी याहवेह, इस्राएल के परमेश्वर ने मेरे पिता के पूरे परिवार में से मुझे इस्राएल के सदाकाल के राजा के पद पर बैठाना सही समझा. यह इसलिये कि उन्होंने ही यहूदाह गोत्र को अगुआ बनाने के लिए चुना और यहूदाह गोत्र में से मेरे पिता के परिवार को और मेरे पिता के पुत्रों में से पूरे इस्राएल का राजा मुझे बनाने में उनकी खुशी थी.
४इस्राएलाचा देव परमेश्वर याने मला सर्वकाळ इस्राएलाचा राजा होण्यासाठी माझ्या वडिलाच्या सर्व घराण्यातून मला निवडून घेतले आहे. कारण त्याने यहूदाच्या वंशातून माझ्या पित्याचे घराणे प्रमुख व्हावे अशी त्याने निवड केली.
5 याहवेह ने मुझे बहुत पुत्र दिए हैं. उन्होंने मेरे पुत्र शलोमोन को इस्राएल के ऊपर याहवेह के साम्राज्य के सिंहासन पर बैठने के लिए चुना है.
५देवाने मला भरपूर पुत्र संतती दिली आहे. या पुत्रांमधून इस्राएलावर परमेश्वराच्या राज्याच्या राजासनावर बसायला माझा पुत्र शलमोनाला निवडले आहे.
6 याहवेह ने मुझसे कहा, ‘तुम्हारा पुत्र शलोमोन ही वह है जो मेरे भवन और मेरे आंगनों को बनाएगा; क्योंकि मैंने यही सही समझा है कि वह मेरे लिए पुत्र हो और मैं उसका पिता हो जाऊंगा.
६त्याने मला म्हटले तुझा पुत्र शलमोन हाच माझे मंदिर आणि अंगणे बांधील. कारण मी त्यास माझा पुत्र म्हणून निवडले आहे आणि मी त्याचा पिता होईन.
7 अगर वह हमेशा मेरे आदेशों और नियमों का पालन करता रहे, जैसा कि वह इस समय कर ही रहा है, मैं उसके राज्य को हमेशा के लिए स्थिर कर दूंगा.’
७माझ्या आज्ञा आणि नियम यांचे पालन आजच्याप्रमाणे त्याने न विसरता केले तर त्याच्या राज्याला मी सर्वकाळ स्थैर्य देईन.
8 “इसलिये अब, सारे इस्राएल के सामने, जो याहवेह की सभा है और हमारे परमेश्वर के सामने याहवेह तुम्हारे परमेश्वर के सभी आदेशों का यत्न से पालन करो कि इस समृद्ध भूमि पर तुम अधिकारी बने रहो और तुम अपने बाद हमेशा के लिए अपने बच्चों को सौंपते जाओ.
८तर आता सर्व इस्राएल बांधवांनो, परमेश्वरासमोर आणि तुमच्यासमोर मी सांगतो की आपला देव परमेश्वर याच्या सर्व आज्ञा काटेकोरपणे पाळा. यासाठी की तुम्ही हा चांगला देश वतन करून घ्यावा आणि आपल्यानंतर तो आपल्या वंशजास सर्वकाळचे वतन म्हणून द्यावा.
9 “और तुम, मेरे शलोमोन, अपने पिता के परमेश्वर का ज्ञान प्राप्त करो, सच्चे हृदय और तैयार मन से उनकी सेवा करो क्योंकि याहवेह हर एक हृदय को जांचते रहते हैं और मन के हर एक विचारों को समझते हैं. यदि तुम उन्हें खोजोगे तो उन्हें पाओगे, अगर तुम उनको छोड़ दोगे, वह हमेशा के लिए तुम्हें अकेला छोड़ देंगे.
९हे शलमोना, माझ्या पुत्रा, आपल्या वडीलांच्या देवाला जाणून घे. पूर्ण अंतःकरणाने व मनोभावाने त्याची सेवा कर. तू हे कर कारण परमेश्वर सर्वाची अंत: करणे पारखतो आणि आपल्या प्रत्येकाच्या विचाराच्या सर्व कल्पना त्यास कळतात. जर तू त्याचा शोध करशील तर तो तुला सापडेल, पण जर तू त्यास सोडशील, तर तो तुझा कायमचा त्याग करील.
10 अब सावधान हो जाओ, क्योंकि याहवेह ने तुम्हें मंदिर के भवन को बनाने के लिए चुना है. दृढ़ निश्चय के साथ इस काम को पूरा करो.”
१०परमेश्वराने त्याचे पवित्रस्थानासाठी मंदिर बांधण्यासाठी तुझी निवड केली आहे हे लक्षात ठेव. बलवान हो आणि हे कर.”
11 इसके बाद दावीद ने शलोमोन को मंदिर के भीतरी हिस्सों, इसके भवनों, इसके भंडार घरों, इसके ऊपरी कमरों, इसके भीतरी कमरों, और करुणासन के कमरे का नमूना सौंप दिया.
११दावीदाने आपला पुत्र शलमोन याला मंदिराचे व्दारमंडप, त्याची घरे, त्यातील इमारती, कोठाराच्या खोल्या, वरच्या मजल्यावरची आणि आतल्या बाजूची दालने, दयासनाचे स्थान यांचा आराखडा दिला.
12 इसके अलावा वह सारा नमूना भी जो उनके मन में याहवेह के भवन के आंगन, आस-पास के कमरों, परमेश्वर के भवन के भंडार घरों और भेंट की हुई वस्तुओं के भंडार घरों के संबंध में था.
१२त्यास दैवी आत्म्याच्या प्रेरणेने जे काही प्राप्त झाले त्याचा आराखडा म्हणजे परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणाचा आणि चोहोकडच्या खोल्यांचा आणि देवाच्या मंदिराच्या भांडारांचा व पवित्र वस्तूंच्या भांडारांचा.
13 साथ ही वह नमूना भी, जो पुरोहितों और लेवियों के समूहों और याहवेह के भवन के सभी सेवा के कामों से संबंधित थी और याहवेह के भवन में इस्तेमाल होनेवाली सेवा से संबंधित पात्रों के बारे में.
१३याजक आणि लेवी यांच्या गटांची माहिती व परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेच्या सर्व कामाची आणि परमेश्वराच्या मंदिरातील सर्व उपयोगात येणारी उपकरणे याबद्दलची जबाबदारी त्यांना नेमून दिली.
14 दावीद ने हर एक प्रकार की आराधना में इस्तेमाल होनेवाले सारे सोने के बर्तनों के लिए सोने की मात्रा तय की. इसी प्रकार हर एक तरह की आराधना में इस्तेमाल होनेवाले सभी चांदी के बर्तनों की भी मात्रा तय की:
१४सोन्याच्या पात्रांसाठी, सर्व प्रकारच्या सेवेच्या सर्व पात्रांसाठी सोन्याचे वजन दिले. रुप्याच्या सर्व पात्रांसाठी सर्व प्रकारच्या सेवेच्या पात्रांसाठी रुप्याचे वजन दिले.
15 इसके बाद दावीद ने यह भी तय किया कि दीप घरों और उनके दीवटों में कितने सोने की ज़रूरत होगी, इसी प्रकार चांदी के दीप घरों और उनके दीपकों में कितनी चांदी की ज़रूरत होगी. इनकी यह मात्रा आराधना में हर एक दीपक के इस्तेमाल के आधार पर तय की गई थी;
१५सोन्याच्या दिपस्तंभासाठी व त्याच्या दिव्यासाठी, एकेक दिपस्तंभ व त्याच्या दिव्यासाठी सोन्याचे वजन दिले आणि रुप्याच्या दिपस्तंभासाठी एकेका दिपस्तंभाच्या कामाप्रमाणे एकेका दिपस्तंभासाठी व तिच्या दिव्यासाठी रुप्याचे वजन दिले.
16 दावीद ने निम्न लिखित वस्तुओं में इस्तेमाल किए जानेवाले सोने और चांदी की मात्रा तय की: भेंट की रोटी के मेजों के लिए सोना और चांदी की मेजों के लिए ज़रूरी चांदी;
१६आणि समक्षतेच्या भाकरीच्या मेजासाठी एकेका मेजासाठी सोन्याचे आणि रुप्याच्या मेजासाठी रुप्याचे वजन दिले.
17 कांटों, कटोरों और प्यालों के लिए चोखा सोना, सोने की कटोरियों के लिए ज़रूरी सोना; चांदी की कटोरियों के लिए ज़रूरी चांदी;
१७शुद्ध सोन्याचे काटे, प्याले, वाट्या व प्रत्येक सुरईसाठी सोने आणि रुप्याच्या वाट्यासाठी लागणारे रुपे, एकेका वाटीसाठी लागणारे रुपे यांचे वजन दिले.
18 तब चोखे सोने से बनाने के लिए ठहराई गई धूप की वेदी के लिए चोखा सोना और रथ के नमूने के लिए सोना और उन करूबों के लिए सोना जो याहवेह की वाचा के संदूक को अपने फैले हुए पंखों से ढांपे हुए हैं, सोने की मात्रा तय कर दी.
१८धूपवेदीसाठी शुध्द केलेल्या सोन्याचे आणि जे करुब आपले पंख पसरून परमेश्वराच्या कराराचा कोश झाकीत होते त्यांच्या रथाच्या नमुन्याप्रमाणे सोन्याचे वजन दिले.
19 दावीद ने शलोमोन से कहा, “यह सब याहवेह के निर्देश के अनुसार इस नमूने का हर एक बारीक़ विवरण के रूप में लिखा है. मुझ पर याहवेह का हाथ बना रहा है.”
१९दावीद म्हणाला, “हे सर्व कार्य मी परमेश्वराच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि त्या सर्व रुपरेषा त्याने मला समजावून सांगितलेल्या आहेत त्या मी लिहून ठेवल्या आहेत.”
20 दावीद ने शलोमोन से आगे कहा, “दृढ़ हो जाओ, हिम्मत बनाए रखो और काम में लग जाओ. न तो तुम डरना और न निराश होना, क्योंकि याहवेह परमेश्वर, जो मेरे परमेश्वर हैं, तुम्हारे साथ हैं. वह न तो तुम्हें निराश करेंगे, न तुम्हें त्यागेंगे; जब तक याहवेह के भवन के बनने का काम पूरा न हो जाए.
२०दावीद शलमोनाला पुढे म्हणाला “बलवान हो आणि धैर्य धर. काम कर. कारण परमेश्वर देव म्हणजे माझा देव तुझ्यासोबत आहे, तेव्हा घाबरु नको. परमेश्वराच्या घराचे सर्व काम पुरे़ होईपर्यंत तो तुला सोडणार नाही व टाकणार नाही.
21 यह ध्यान रहे कि परमेश्वर के भवन में सभी आराधनाओं को चलाने के लिए पुरोहितों और लेवियों के समूह हैं. तुम्हें किसी भी काम के लिए अपनी इच्छा अनुसार अपना कौशल इस्तेमाल करने के लिए कारीगर उपलब्ध हैं. अधिकारी भी सभी लोगों के साथ तुम्हारे आदेश को पूरा करने के लिए तैयार हैं.”
२१देवाच्या मंदिराच्या सेवेच्या कामाला याजक आणि लेवी यांचे वर्ग नेमले आहेत. सर्व प्रकारच्या कामांत कोणत्याही प्रकारच्या सेवेसाठी स्वखुशीने व निपुण कारागिर कामात मदत करण्यास तुझ्याबरोबर आहेत. अधिकारी आणि सर्व लोक तुझ्या आज्ञा मानण्यास तयार असतील.”