< תהילים 97 >
יהוה מלך תגל הארץ ישמחו איים רבים׃ | 1 |
१परमेश्वर राज्य करतो; पृथ्वी आनंदित होवो. अनेक द्वीपसमूह आनंदित होवो.
ענן וערפל סביביו צדק ומשפט מכון כסאו׃ | 2 |
२ढग आणि काळोख त्याच्याभोवती आहेत. निती व न्याय त्याच्या सिंहासनाचा पाया आहेत.
אש לפניו תלך ותלהט סביב צריו׃ | 3 |
३अग्नी त्याच्यापुढे चालतो, आणि प्रत्येक बाजूने त्याच्या शत्रूंना नष्ट करून टाकतो.
האירו ברקיו תבל ראתה ותחל הארץ׃ | 4 |
४त्याच्या विजांनी जग प्रकाशित केले; पृथ्वी हे पाहून थरथर कापली.
הרים כדונג נמסו מלפני יהוה מלפני אדון כל הארץ׃ | 5 |
५परमेश्वरासमोर, सर्व पृथ्वीच्या प्रभूसमोर पर्वत मेणासारखे वितळले.
הגידו השמים צדקו וראו כל העמים כבודו׃ | 6 |
६आकाशाने, त्याचा न्याय जाहीर केला, आणि सर्व राष्ट्रांनी त्याचे वैभव पाहिले.
יבשו כל עבדי פסל המתהללים באלילים השתחוו לו כל אלהים׃ | 7 |
७जे कोरीव मूर्तीची पूजा करतात, जे मूर्तीचा अभिमान बाळगतात ते सर्व लज्जित झाले. अहो सर्व देवहो! त्याच्यासमोर नमन करा.
שמעה ותשמח ציון ותגלנה בנות יהודה למען משפטיך יהוה׃ | 8 |
८सियोनेने हे ऐकले आणि आनंदित झाली, कारण हे परमेश्वरा, तुझ्या न्यायामुळे यहूदाच्या नगरांनी आनंद केला.
כי אתה יהוה עליון על כל הארץ מאד נעלית על כל אלהים׃ | 9 |
९कारण हे परमेश्वरा, सर्व पृथ्वीवर तू परात्पर आहेस. तू सर्व देवापेक्षा खूपच उंचावलेला आहेस.
אהבי יהוה שנאו רע שמר נפשות חסידיו מיד רשעים יצילם׃ | 10 |
१०जे तुम्ही परमेश्वरावर प्रीती करता, ते तुम्ही वाईटाचा द्वेष करा, तो आपल्या भक्तांच्या जीवाचे रक्षण करतो, आणि तो त्यास दुष्टांच्या हातातून सोडवतो.
אור זרע לצדיק ולישרי לב שמחה׃ | 11 |
११नितीमानासाठी प्रकाश आणि जे सरळ अंतःकरणाचे आहेत त्यांच्यासाठी हर्ष पेरला आहे.
שמחו צדיקים ביהוה והודו לזכר קדשו׃ | 12 |
१२अहो नितीमानांनो, परमेश्वराठायी आनंदी व्हा. त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद द्या.