< תהילים 94 >
אל נקמות יהוה אל נקמות הופיע׃ | 1 |
१हे परमेश्वरा, देवा तुझ्याकडे सूड घेणे आहे, तुझ्याकडे सूड घेणे आहे; तू हे देवा आपले तेज प्रगट कर.
הנשא שפט הארץ השב גמול על גאים׃ | 2 |
२पृथ्वीच्या न्यायाधीशा, ऊठ, गर्विष्ठांना त्यांचे उचित प्रतिफल दे.
עד מתי רשעים יהוה עד מתי רשעים יעלזו׃ | 3 |
३हे परमेश्वरा, दुष्ट किती काळ, दुष्ट किती काळ विजयोत्सव करतील?
יביעו ידברו עתק יתאמרו כל פעלי און׃ | 4 |
४ते बडबड करतात आणि उर्मटपणे बोलतात आणि फुशारकी मारतात.
עמך יהוה ידכאו ונחלתך יענו׃ | 5 |
५हे परमेश्वरा, ते तुझ्या लोकांस चिरडतात; जे तुझ्या मालकीचे राष्ट्र आहे त्यांना ते पीडितात.
אלמנה וגר יהרגו ויתומים ירצחו׃ | 6 |
६ते विधवांना आणि उपऱ्यांचा जीव घेतात, आणि ते अनाथांचा खून करतात.
ויאמרו לא יראה יה ולא יבין אלהי יעקב׃ | 7 |
७ते म्हणतात की, परमेश्वर बघणार नाही, याकोबाचा देव लक्ष देत नाही.
בינו בערים בעם וכסילים מתי תשכילו׃ | 8 |
८अहो तुम्ही मूर्ख लोकांनो, समजून घ्या; मूर्खांनो, तुम्ही कधीपर्यंत शिकणार आहात?
הנטע אזן הלא ישמע אם יצר עין הלא יביט׃ | 9 |
९ज्याने आपला कान घडविला तो ऐकणार नाही काय? ज्याने आपला डोळा बनविला तो पाहणार नाही काय?
היסר גוים הלא יוכיח המלמד אדם דעת׃ | 10 |
१०जो राष्ट्रांना शिस्त लावतो, तो शिक्षा करणार नाही का? जो मनुष्यांना ज्ञान शिकवतो. तो अज्ञानी असणार का?
יהוה ידע מחשבות אדם כי המה הבל׃ | 11 |
११परमेश्वर मनुष्यांचे विचार जाणतो, ते भ्रष्ट आहेत.
אשרי הגבר אשר תיסרנו יה ומתורתך תלמדנו׃ | 12 |
१२हे परमेश्वरा ज्या मनुष्यास तू शिस्त लावतोस, ज्याला आपल्या नियमशास्रातून शिकवितोस तो आशीर्वादित आहे.
להשקיט לו מימי רע עד יכרה לרשע שחת׃ | 13 |
१३दुष्टासाठी खाच खणली जाईपर्यंत, तू त्यास संकटसमयी विसावा देशील.
כי לא יטש יהוה עמו ונחלתו לא יעזב׃ | 14 |
१४कारण परमेश्वर आपल्या लोकांस किंवा आपल्या वतनाला सोडून देणार नाही.
כי עד צדק ישוב משפט ואחריו כל ישרי לב׃ | 15 |
१५कारण न्याय नितीमानाकडे वळेल; आणि सरळ मनाचे सर्व तो अनुसरतील.
מי יקום לי עם מרעים מי יתיצב לי עם פעלי און׃ | 16 |
१६माझ्यासाठी दुष्कर्म करणाऱ्याविरूद्ध कोण लढेल? अन्याय करणाऱ्याविरूद्ध माझ्यासाठी कोण उभा राहिल?
לולי יהוה עזרתה לי כמעט שכנה דומה נפשי׃ | 17 |
१७जर परमेश्वराने मला मदत केली नसती, तर माझा जीव निवांतस्थानी कधीच जाऊन पडला असता.
אם אמרתי מטה רגלי חסדך יהוה יסעדני׃ | 18 |
१८जेव्हा मी म्हणतो, माझा पाय घसरला आहे, तेव्हा, परमेश्वरा, तुझा विश्वासाचा करार मला उचलून धरतो.
ברב שרעפי בקרבי תנחומיך ישעשעו נפשי׃ | 19 |
१९जेव्हा माझे मन खूप चिंताग्रस्त होते तेव्हा तुझ्यापसून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाला आनंदित करते.
היחברך כסא הוות יצר עמל עלי חק׃ | 20 |
२०जे दुष्टपणाचे राजासन कायद्याने अरिष्ट योजते ते तुझ्याशी संबंध ठेवाल काय?
יגודו על נפש צדיק ודם נקי ירשיעו׃ | 21 |
२१ते नितीमानाच्या जिवाविरूद्ध एकवट होतात, आणि निर्दोष्यांस देहांत शिक्षा देतात;
ויהי יהוה לי למשגב ואלהי לצור מחסי׃ | 22 |
२२परंतु परमेश्वर माझा उंच बुरुज आहे, आणि माझा देव मला आश्रयाचा खडक आहे.
וישב עליהם את אונם וברעתם יצמיתם יצמיתם יהוה אלהינו׃ | 23 |
२३त्याने त्यांचा अन्याय त्यांच्यावरच आणला आहे; आणि त्यांच्याच दुष्टपणात तो त्यांना नाहीसे करील. आमचा देव परमेश्वर त्यांना नाहीसे करील.