< תהילים 77 >
למנצח על ידיתון לאסף מזמור קולי אל אלהים ואצעקה קולי אל אלהים והאזין אלי׃ | 1 |
१आसाफाचे स्तोत्र मी आपल्या वाणीने देवाला हाक मारीन; मी आपल्या वाणीने देवाला हाक मारीन आणि माझा देव माझे ऐकेल.
ביום צרתי אדני דרשתי ידי לילה נגרה ולא תפוג מאנה הנחם נפשי׃ | 2 |
२माझ्या संकटाच्या दिवसात मी प्रभूला शोधले. मी रात्रभर हात पसरून प्रार्थना केली; तो ढिला पडला नाही. माझ्या जीवाने सांत्वन पावण्याचे नाकारले.
אזכרה אלהים ואהמיה אשיחה ותתעטף רוחי סלה׃ | 3 |
३मी देवाचा विचार करतो तसा मी कण्हतो; मी त्याबद्दल चिंतन करतो तसा मी क्षीण होतो.
אחזת שמרות עיני נפעמתי ולא אדבר׃ | 4 |
४तू माझे डोळे उघडे ठेवतोस; मी इतका व्याकुळ झालो की, माझ्याने बोलवत नाही.
חשבתי ימים מקדם שנות עולמים׃ | 5 |
५मी पूर्वीचे दिवस व पुरातन काळची वर्षे याबद्दल मी विचार करतो.
אזכרה נגינתי בלילה עם לבבי אשיחה ויחפש רוחי׃ | 6 |
६रात्रीत मी एकदा गाईलेल्या गाण्याची मला आठवण येते. मी काळजीपूर्वक विचार करतो आणि काय घडले हे मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
הלעולמים יזנח אדני ולא יסיף לרצות עוד׃ | 7 |
७प्रभू सर्वकाळ आमचा नकार करील काय? तो मला पुन्हा कधीच प्रसन्नता दाखवणार नाही का?
האפס לנצח חסדו גמר אמר לדר ודר׃ | 8 |
८त्याच्या विश्वासाचा करार कायमचा गेला आहे का? त्याची अभिवचने पिढ्यानपिढ्या अयशस्वी होतील का?
השכח חנות אל אם קפץ באף רחמיו סלה׃ | 9 |
९देव दया करण्याचे विसरला का? त्याच्या रागाने त्याचा कळवळा बंद केला आहे का?
ואמר חלותי היא שנות ימין עליון׃ | 10 |
१०मी म्हणालो, हे माझे दुःख आहे, आमच्या प्रती परात्पराचा उजवा हात बदलला आहे
אזכיר מעללי יה כי אזכרה מקדם פלאך׃ | 11 |
११पण मी परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करीन; मी तुझ्या पुरातन काळच्या आश्चर्यकारक कृत्यांविषयी विचार करीन.
והגיתי בכל פעלך ובעלילותיך אשיחה׃ | 12 |
१२मी तुझ्या सर्व कृत्यावर चिंतन करीन, आणि मी त्यावर काळजीपूर्वक विचार करीन.
אלהים בקדש דרכך מי אל גדול כאלהים׃ | 13 |
१३हे देवा, तुझे मार्ग पवित्र आहेत, आमच्या महान देवाशी कोणता देव तुलना करेल.
אתה האל עשה פלא הודעת בעמים עזך׃ | 14 |
१४अद्भुत कृत्ये करणारा देव तूच आहेस. तू लोकांमध्ये आपले सामर्थ्य उघड केले आहे.
גאלת בזרוע עמך בני יעקב ויוסף סלה׃ | 15 |
१५याकोब आणि योसेफ यांच्या वंशजाना, आपल्या लोकांस आपल्या सामर्थ्याने विजय दिला आहेस.
ראוך מים אלהים ראוך מים יחילו אף ירגזו תהמות׃ | 16 |
१६हे देवा, जलाने तुला पाहिले, जलांनी तुला पाहिले आणि ते घाबरले, खोल जले कंपित झाली.
זרמו מים עבות קול נתנו שחקים אף חצציך יתהלכו׃ | 17 |
१७मेघांनी पाणी खाली ओतले; आभाळ गडगडाटले; तुझे बाणही चमकू लागले.
קול רעמך בגלגל האירו ברקים תבל רגזה ותרעש הארץ׃ | 18 |
१८तुझ्या गर्जनेची वाणी वावटळित ऐकण्यात आली; विजांनी जग प्रकाशमय केले; पृथ्वी कंपित झाली आणि थरथरली.
בים דרכך ושביליך במים רבים ועקבותיך לא נדעו׃ | 19 |
१९समुद्रात तुझा मार्ग व महासागरात तुझ्या वाटा होत्या, पण तुझ्या पावलाचे ठसे कोठेही दिसले नाहीत.
נחית כצאן עמך ביד משה ואהרן׃ | 20 |
२०मोशे आणि अहरोन याच्या हाताने तू आपल्या लोकांस कळपाप्रमाणे नेलेस.