< תהילים 19 >
למנצח מזמור לדוד השמים מספרים כבוד אל ומעשה ידיו מגיד הרקיע׃ | 1 |
१मुख्य गायकासाठी. दाविदाचे स्तोत्र. आकाश देवाचा गौरव जाहीर करते, आणि अंतराळ त्याच्या हातचे कृत्य दाखविते.
יום ליום יביע אמר ולילה ללילה יחוה דעת׃ | 2 |
२दिवस दिवसाशी बोलतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते.
אין אמר ואין דברים בלי נשמע קולם׃ | 3 |
३संभाषण नाही, बोललेले शब्दही नाही, त्यांचा आवाजही ऐकू येत नाही.
בכל הארץ יצא קום ובקצה תבל מליהם לשמש שם אהל בהם׃ | 4 |
४तरी त्यांचे शब्द सर्व पृथ्वीभर जातात. आणि त्यांचे बोलणे जगाच्या शेवटापर्यंत जाते. त्याने सुर्यासाठी आकाशामध्ये मंडप उभारला आहे.
והוא כחתן יצא מחפתו ישיש כגבור לרוץ ארח׃ | 5 |
५सूर्य नवऱ्या मुलासारखा आपल्या मांडवातून बाहेर येतो. आणि सामर्थ्यवान पुरुषाप्रमाणे तो आपली धाव धावण्यात आनंद करतो.
מקצה השמים מוצאו ותקופתו על קצותם ואין נסתר מחמתו׃ | 6 |
६सूर्य एक क्षितीजापासून उदय होतो, आणि दुसऱ्या क्षितिजापर्यंत आकाशात पार जातो. त्याच्या उष्णतेपासून कोणाचीही सुटका होत नाही.
תורת יהוה תמימה משיבת נפש עדות יהוה נאמנה מחכימת פתי׃ | 7 |
७परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते जीवाला पुर्नजीवित करणारे आहे. परमेश्वराचे नियम विश्वसनीय आहेत, ज्यांना अनुभव नाही त्यांना शहाणपण देणारे आहे.
פקודי יהוה ישרים משמחי לב מצות יהוה ברה מאירת עינים׃ | 8 |
८परमेश्वराच्या सूचना खऱ्या आहेत. जे हृदयाला हर्षीत करतात. परमेश्वराच्या कराराचे नियम शुद्ध आहेत, ते डोळे प्रकाशवनारे आहेत.
יראת יהוה טהורה עומדת לעד משפטי יהוה אמת צדקו יחדו׃ | 9 |
९परमेश्वराची भीती शुद्ध आहे, ती सर्वकाळ टिकणारे आहे, परमेश्वराचे नियम खरे आहेत, आणि सर्व न्यायी आहेत.
הנחמדים מזהב ומפז רב ומתוקים מדבש ונפת צופים׃ | 10 |
१०ते सोन्यापेक्षा ही मौल्यवान आहेत. अती उत्तम सोन्यापेक्षाही ते शुद्ध आहेत. ते मधाच्या पोळ्यातून गळणाऱ्या, मधापेक्षाही गोड आहेत.
גם עבדך נזהר בהם בשמרם עקב רב׃ | 11 |
११होय, त्याकडून तुझ्या सेवकाला चेतावनी मिळते. ते पाळण्याने उत्तम प्रतिफळ मिळते.
שגיאות מי יבין מנסתרות נקני׃ | 12 |
१२आपल्या स्वत: च्या चुका कोण ओळखू शकतो? माझ्या गुप्त दोषांची मला क्षमा कर.
גם מזדים חשך עבדך אל ימשלו בי אז איתם ונקיתי מפשע רב׃ | 13 |
१३तुझ्या सेवकाला जाणूनबुजून केलेल्या पापापासून राख; ती माझ्यावर राज्य न गाजवोत. तेव्हा मी परिपूर्ण होईल, आणि माझ्या पुष्कळ अपराधांपासून निर्दोष राहीन.
יהיו לרצון אמרי פי והגיון לבי לפניך יהוה צורי וגאלי׃ | 14 |
१४माझ्या तोंडचे शब्द आणि माझ्या हृदयाचे विचार तुझ्यासमोर मान्य असोत. परमेश्वरा, तू माझा खडक आहेस, मला तारणारा तूच आहेस.