< תהילים 147 >
הללו יה כי טוב זמרה אלהינו כי נעים נאוה תהלה׃ | 1 |
१परमेश्वराची स्तुती करा, कारण आमच्या देवाची स्तुती गाणे चांगले आहे; ते आनंददायक आहे व स्तुती करणे उचित आहे.
בונה ירושלם יהוה נדחי ישראל יכנס׃ | 2 |
२परमेश्वर यरूशलेम पुन्हा बांधतो; तो इस्राएलाच्या विखुरलेल्या लोकांस एकत्र करतो.
הרפא לשבורי לב ומחבש לעצבותם׃ | 3 |
३तो भग्नहृदयी जनांना बरे करतो, आणि त्यांच्या जखमांस पट्टी बांधतो.
מונה מספר לכוכבים לכלם שמות יקרא׃ | 4 |
४तो ताऱ्यांची मोजणी करतो; तो त्यांच्यातील प्रत्येकाला त्यांच्या नावाने हाक मारतो.
גדול אדונינו ורב כח לתבונתו אין מספר׃ | 5 |
५आमचा प्रभू महान आणि सामर्थ्यात भयचकीत कार्ये करणारा आहे; त्याची बुद्धी मोजू शकत नाही.
מעודד ענוים יהוה משפיל רשעים עדי ארץ׃ | 6 |
६परमेश्वर जाचलेल्यास उंचावतो; तो वाईटांना खाली धुळीस मिळवतो.
ענו ליהוה בתודה זמרו לאלהינו בכנור׃ | 7 |
७गाणे गाऊन परमेश्वराची उपकारस्तुती करा. वीणेवर आमच्या देवाचे स्तुतीगान करा.
המכסה שמים בעבים המכין לארץ מטר המצמיח הרים חציר׃ | 8 |
८तो ढगांनी आकाश झाकून टाकतो, आणि पृथ्वीसाठी पाऊस तयार करतो, तो डोंगरावर गवत उगवतो.
נותן לבהמה לחמה לבני ערב אשר יקראו׃ | 9 |
९तो प्राण्यांना आणि जेव्हा कावळ्यांची पिल्ले कावकाव करतात त्यांना अन्न देतो.
לא בגבורת הסוס יחפץ לא בשוקי האיש ירצה׃ | 10 |
१०घोड्याच्या बलाने त्यास आनंद मिळत नाही; मनुष्याच्या शक्तीमान पायांत तो आनंद मानत नाही.
רוצה יהוה את יראיו את המיחלים לחסדו׃ | 11 |
११जे परमेश्वराचा आदर करतात, जे त्याच्या दयेची आशा धरतात त्यांच्याबरोबर तो आनंदित होतो.
שבחי ירושלם את יהוה הללי אלהיך ציון׃ | 12 |
१२हे यरूशलेमे, परमेश्वराची स्तुती कर; हे सियोने तू आपल्या देवाची स्तुती कर.
כי חזק בריחי שעריך ברך בניך בקרבך׃ | 13 |
१३कारण त्याने तुझ्या वेशींचे अडसर बळकट केले आहेत; त्याने तुझ्यामध्ये तुझी लेकरे आशीर्वादित केली आहेत.
השם גבולך שלום חלב חטים ישביעך׃ | 14 |
१४तो तुझ्या सीमांच्या आत भरभराट आणतो; तो तुला उत्कृष्ट गव्हाने तृप्त करतो.
השלח אמרתו ארץ עד מהרה ירוץ דברו׃ | 15 |
१५तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो; त्याचा शब्द फार वेगाने धावतो.
הנתן שלג כצמר כפור כאפר יפזר׃ | 16 |
१६तो लोकरीसारखे बर्फ पसरतो; तो राखेसारखे दवाचे कण विखरतो.
משליך קרחו כפתים לפני קרתו מי יעמד׃ | 17 |
१७तो आपल्या गारांचा बर्फाच्या चुऱ्याप्रमाणे वर्षाव करतो; त्याने पाठवलेल्या गारठ्यापुढे कोण टिकेल?
ישלח דברו וימסם ישב רוחו יזלו מים׃ | 18 |
१८तो आपली आज्ञा पाठवून त्यांना वितळवितो; तो आपला वारा वाहवितो व पाणी वाहू लागते.
מגיד דברו ליעקב חקיו ומשפטיו לישראל׃ | 19 |
१९त्याने याकोबाला आपले वचन, इस्राएलाला आपले नियम व निर्णय सांगितले.
לא עשה כן לכל גוי ומשפטים בל ידעום הללו יה׃ | 20 |
२०त्याने हे दुसऱ्या कोणत्याही राष्ट्रासाठी केले नाही; आणि त्यांनी त्याचे निर्णय जाणले नाहीत. परमेश्वराची स्तुती करा.