< תהילים 145 >

תהלה לדוד ארוממך אלוהי המלך ואברכה שמך לעולם ועד׃ 1
दाविदाचे स्तोत्र माझ्या देवा, हे राजा, मी तुझी खूप स्तुती करीन; मी सदासर्वकाळ व कायम तुझ्या नावाचा धन्यवाद करीन.
בכל יום אברכך ואהללה שמך לעולם ועד׃ 2
प्रत्येक दिवशी मी तुझा धन्यवाद करीन. मी सदासर्वकाळ व कायम तुझ्या नावाचे स्तवन करीन.
גדול יהוה ומהלל מאד ולגדלתו אין חקר׃ 3
परमेश्वर महान आणि परमस्तुत्य आहे; त्याची महानता अनाकलनीय आहे.
דור לדור ישבח מעשיך וגבורתיך יגידו׃ 4
एक पिढी दुसऱ्या पिढीपुढे तुझ्या कृत्यांची प्रशंसा करीत राहील, आणि तुझ्या पराक्रमी कृतीचे वर्णन करतील.
הדר כבוד הודך ודברי נפלאותיך אשיחה׃ 5
ते तुझ्या राजवैभवाचा गौरवयुक्त प्रतापाविषयी बोलतील, मी तुझ्या अद्भुत कार्यांचे मनन करीन.
ועזוז נוראתיך יאמרו וגדולתיך אספרנה׃ 6
ते तुझ्या भयावह कृत्यांच्या पराक्रमाविषयी बोलतील, मी तुझ्या महिमेचे वर्णन करीन.
זכר רב טובך יביעו וצדקתך ירננו׃ 7
ते तुझ्या विपुल अशा चांगुलपणाविषयी सांगतील, आणि तुझ्या न्यायीपणाबद्दल गाणे गातील.
חנון ורחום יהוה ארך אפים וגדל חסד׃ 8
परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे, तो मंदक्रोध व अतिदयाळू आहे.
טוב יהוה לכל ורחמיו על כל מעשיו׃ 9
परमेश्वर सर्वांना चांगला आहे; त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे.
יודוך יהוה כל מעשיך וחסידיך יברכוכה׃ 10
१०हे परमेश्वरा, तू केलेली सर्व कृत्ये तुला धन्यवाद देतील; तुझे भक्त तुला धन्यवाद देतील.
כבוד מלכותך יאמרו וגבורתך ידברו׃ 11
११ते तुझ्या राज्याच्या गौरवाविषयी सांगतील, आणि तुझ्या सामर्थ्याविषयी बोलतील.
להודיע לבני האדם גבורתיו וכבוד הדר מלכותו׃ 12
१२हे यासाठी की, त्यांनी देवाची पराक्रमी कृत्ये आणि त्याच्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर्य ही मानवजातीस कळवावी.
מלכותך מלכות כל עלמים וממשלתך בכל דור ודור׃ 13
१३तुझे राज्य युगानुयुग राहणारे राज्य आहे. आणि तुझा राज्याधिकार पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे.
סומך יהוה לכל הנפלים וזוקף לכל הכפופים׃ 14
१४पडत असलेल्या सर्वांना परमेश्वर आधार देतो, आणि वाकलेल्या सर्वांना तो उभे करतो.
עיני כל אליך ישברו ואתה נותן להם את אכלם בעתו׃ 15
१५सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात. आणि तू त्यांना योग्य वेळी त्यांचे अन्न देतोस.
פותח את ידך ומשביע לכל חי רצון׃ 16
१६तू आपला हात उघडून प्रत्येक जिवंत प्राण्याची इच्छा तृप्त करतो.
צדיק יהוה בכל דרכיו וחסיד בכל מעשיו׃ 17
१७परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे; आणि तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे.
קרוב יהוה לכל קראיו לכל אשר יקראהו באמת׃ 18
१८जे कोणी त्याचा धावा करतात, जे सत्यतेने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे.
רצון יראיו יעשה ואת שועתם ישמע ויושיעם׃ 19
१९तो त्याचे भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवतो; तो त्यांची आरोळी ऐकून त्यांना वाचवतो.
שומר יהוה את כל אהביו ואת כל הרשעים ישמיד׃ 20
२०परमेश्वर आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे रक्षण करतो. परंतु तो वाईटांचा नाश करतो.
תהלת יהוה ידבר פי ויברך כל בשר שם קדשו לעולם ועד׃ 21
२१माझे मुख परमेश्वराची स्तुती करील. सर्व मानवजात त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद सदासर्वकाळ व कायम करो.

< תהילים 145 >