< תהילים 144 >
לדוד ברוך יהוה צורי המלמד ידי לקרב אצבעותי למלחמה׃ | 1 |
१दाविदाचे स्तोत्र परमेश्वर माझा खडक त्यास धन्यवाद असो, जो माझ्या हाताला युद्ध करण्यास; आणि माझ्या बोटास लढाई करण्यास शिक्षण देतो.
חסדי ומצודתי משגבי ומפלטי לי מגני ובו חסיתי הרודד עמי תחתי׃ | 2 |
२तो माझा दयानिधी व माझा दुर्ग, माझा उंच बुरुज आणि मला सोडवणारा, माझी ढाल आहे आणि मी त्याचा आश्रय घेतो; तो लोकांस माझ्या सत्तेखाली आणतो.
יהוה מה אדם ותדעהו בן אנוש ותחשבהו׃ | 3 |
३हे परमेश्वरा, मानव तो काय की तू त्याची ओळख ठेवावी? किंवा मनुष्य तो काय की तू त्याच्याविषयी विचार करावा?
אדם להבל דמה ימיו כצל עובר׃ | 4 |
४मनुष्य एका श्वासासारखा आहे; त्याचे दिवस नाहीशा होणाऱ्या सावलीसारखे आहेत.
יהוה הט שמיך ותרד גע בהרים ויעשנו׃ | 5 |
५हे परमेश्वरा, तू आपले आकाश लववून खाली उतर; पर्वतांना स्पर्श कर आणि त्यातून धूर येऊ दे.
ברוק ברק ותפיצם שלח חציך ותהמם׃ | 6 |
६विजांचे लखलखाट पाठवून, माझ्या शत्रूला पांगवून टाक; तुझे बाण मारून, त्यांचा पराभव करून त्यांना माघारी पाठव.
שלח ידיך ממרום פצני והצילני ממים רבים מיד בני נכר׃ | 7 |
७वरून आपले हात लांब कर; महापुरातून, या परक्यांच्या हातून, मला सोडवून वाचव.
אשר פיהם דבר שוא וימינם ימין שקר׃ | 8 |
८त्यांचे मुख असत्य बोलते, आणि त्यांचा उजवा हात असत्याचा आहे.
אלהים שיר חדש אשירה לך בנבל עשור אזמרה לך׃ | 9 |
९हे देवा, मी तुला नवे गाणे गाईन. दशतंतु वीणेवर मी तुझी स्तवने गाईन;
הנותן תשועה למלכים הפוצה את דוד עבדו מחרב רעה׃ | 10 |
१०तूच राजांना तारण देणारा आहे; तूच आपला सेवक दावीद याला दुष्टाच्या तलवारीपासून वाचवले.
פצני והצילני מיד בני נכר אשר פיהם דבר שוא וימינם ימין שקר׃ | 11 |
११मला या परक्यांच्या हातातून मुक्त कर व मला वाचव. त्यांचे मुख असत्य बोलते; आणि त्यांचा उजवा हात असत्याचा आहे.
אשר בנינו כנטעים מגדלים בנעוריהם בנותינו כזוית מחטבות תבנית היכל׃ | 12 |
१२आमची मुले आपल्या तारुण्याच्या भरांत उंच वाढलेल्या रोपांसारखी आहेत. आमच्या मुली राजवाड्याच्या कोपऱ्यातील कोरलेल्या खांबाप्रमाणे आहेत.
מזוינו מלאים מפיקים מזן אל זן צאוננו מאליפות מרבבות בחוצותינו׃ | 13 |
१३आमची कोठारे प्रत्येक प्रकारच्या वस्तुंनी भरलेली असावीत. आणि आमच्या शेतात आमची मेंढरे सहस्रपट, दशसहस्रपट वाढावीत.
אלופינו מסבלים אין פרץ ואין יוצאת ואין צוחה ברחבתינו׃ | 14 |
१४मग आमचे बैल लादलेले असावेत; दरोडे, धरपकड व आकांत हे आमच्या रस्त्यात नसावेत;
אשרי העם שככה לו אשרי העם שיהוה אלהיו׃ | 15 |
१५ज्यांना असे आशीर्वाद आहेत ते लोक आशीर्वादित आहेत; ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते आनंदी आहेत.