< תהילים 122 >
שיר המעלות לדוד שמחתי באמרים לי בית יהוה נלך׃ | 1 |
१दाविदाचे स्तोत्र आपण परमेश्वराच्या घराला जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला.
עמדות היו רגלינו בשעריך ירושלם׃ | 2 |
२हे यरूशलेमे, तुझ्या द्वारात आमची पावले लागली आहेत.
ירושלם הבנויה כעיר שחברה לה יחדו׃ | 3 |
३हे यरूशलेमे, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस.
ששם עלו שבטים שבטי יה עדות לישראל להדות לשם יהוה׃ | 4 |
४इस्राएलास लावून दिलेल्या नियमाप्रमाणे, तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश, परमेश्वराच्या नांवाचे उपकारस्मरण करण्यासाठी वर चढून येतात.
כי שמה ישבו כסאות למשפט כסאות לבית דויד׃ | 5 |
५कारण तेथे न्यायासने, दावीदाच्या घराण्यासाठी राजासने मांडली आहेत.
שאלו שלום ירושלם ישליו אהביך׃ | 6 |
६यरूशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करा! तुझ्यावर प्रीती करतात त्यांची भरभराट होईल.
יהי שלום בחילך שלוה בארמנותיך׃ | 7 |
७तुझ्या कोटात शांती असो, आणि तुझ्या राजवाड्यात उन्नती असो.
למען אחי ורעי אדברה נא שלום בך׃ | 8 |
८माझे बंधू आणि माझे सहकारी ह्यांच्याकरता, मी आता म्हणेन, तुमच्यामध्ये शांती असो.
למען בית יהוה אלהינו אבקשה טוב לך׃ | 9 |
९परमेश्वर आमचा देव ह्याच्या घराकरता, मी तुझ्या हितासाठी प्रार्थना करीन.