< תהילים 107 >
הדו ליהוה כי טוב כי לעולם חסדו׃ | 1 |
१परमेश्वरास धन्यावाद द्या. कारण तो चांगला आहे. आणि त्याची कराराची विश्वसनियता सर्वकाळ टिकणारी आहे.
יאמרו גאולי יהוה אשר גאלם מיד צר׃ | 2 |
२परमेश्वराने उद्धारलेले, ज्यांना खंडणी भरून त्याने शत्रूच्या अधिकारातून सोडवले आहे,
ומארצות קבצם ממזרח וממערב מצפון ומים׃ | 3 |
३त्याने त्यांना परक्या देशातून पूर्व व पश्चिम, उत्तर व दक्षिण या दिशातून एकवट केले आहे.
תעו במדבר בישימון דרך עיר מושב לא מצאו׃ | 4 |
४ते रानात वैराण प्रदेशातील रस्त्याने भटकले; आणि त्यांना राहण्यास नगर सापडले नाही.
רעבים גם צמאים נפשם בהם תתעטף׃ | 5 |
५ते खूप भुकेले आणि तान्हेले होते; आणि ते थकव्याने मूर्च्छित झाले.
ויצעקו אל יהוה בצר להם ממצוקותיהם יצילם׃ | 6 |
६नंतर त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारली, आणि त्याने त्यांना त्यांच्या विपत्तीतून सोडवले.
וידריכם בדרך ישרה ללכת אל עיר מושב׃ | 7 |
७त्याने त्यांना सरळ मार्गाने नेले यासाठी की, त्या नगरात त्यांना वस्त्ती करावी
יודו ליהוה חסדו ונפלאותיו לבני אדם׃ | 8 |
८अहा, परमेश्वराच्या कराराची विश्वसनियता आणि आश्चर्यकारक गोष्टी त्याने मनुष्यजातीसाठी केल्या त्याबद्दल लोक त्याचा धन्यवाद करोत.
כי השביע נפש שקקה ונפש רעבה מלא טוב׃ | 9 |
९कारण त्याने तान्हेल्या जिवास तृप्त केले, आणि भुकेल्या जिवाला उत्तम पदार्थांनी भरले.
ישבי חשך וצלמות אסירי עני וברזל׃ | 10 |
१०काही कैदी क्लेशाने आणि साखळ्यांनी जखडलेले असता; काळोखात आणि मरणाच्या छायेत बसले आहेत.
כי המרו אמרי אל ועצת עליון נאצו׃ | 11 |
११त्यांनी देवाच्या वचनाविरुध्द बंड केले, आणि त्यांनी परात्पराचे शिक्षण नापसंत केले.
ויכנע בעמל לבם כשלו ואין עזר׃ | 12 |
१२त्यांने त्यांचे हृदय कष्टाद्वारे नम्र केले; ते अडखळून पडले आणि त्यांना मदत करायला तेथे कोणीही नव्हता.
ויזעקו אל יהוה בצר להם ממצקותיהם יושיעם׃ | 13 |
१३तेव्हा त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारली आणि त्याने त्यांना त्यांच्या क्लेशातून बाहेर आणले.
יוציאם מחשך וצלמות ומוסרותיהם ינתק׃ | 14 |
१४देवाने त्यांना अंधारातून आणि मरणाच्या छायेतून बाहेर आणले, आणि त्यांची बंधणे तोडली.
יודו ליהוה חסדו ונפלאותיו לבני אדם׃ | 15 |
१५परमेश्वराच्या कराराची विश्वसनियता आणि त्याने मनुष्यजातीसाठी केलेल्या आश्चर्यकारक गोष्टीबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत.
כי שבר דלתות נחשת ובריחי ברזל גדע׃ | 16 |
१६कारण त्याने पितळेची दारे तोडली, आणि लोखंडाचे गज तोडून टाकले.
אולים מדרך פשעם ומעונתיהם יתענו׃ | 17 |
१७आपल्या बंडखोरीच्या मार्गात ते मूर्ख होते, आणि आपल्या पापामुळे ते पीडिले होते.
כל אכל תתעב נפשם ויגיעו עד שערי מות׃ | 18 |
१८सर्व उत्तम अन्न खाण्याची इच्छा त्यांना होईना आणि ते मरणाच्या दाराजवळ ओढले गेले.
ויזעקו אל יהוה בצר להם ממצקותיהם יושיעם׃ | 19 |
१९तेव्हा त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारली, आणि त्याने त्यांना क्लेशातून बाहेर आणले.
ישלח דברו וירפאם וימלט משחיתותם׃ | 20 |
२०त्याने आपले वचन पाठवून त्यांना बरे केले, आणि त्याने त्यांच्या नाशापासून त्यांना सोडवले.
יודו ליהוה חסדו ונפלאותיו לבני אדם׃ | 21 |
२१परमेश्वराच्या कराराची विश्वसनियता व त्याने मनुष्यजातीसाठी केलेल्या आश्चर्यकारक गोष्टींबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत.
ויזבחו זבחי תודה ויספרו מעשיו ברנה׃ | 22 |
२२ते त्यास आभाररुपी यज्ञ अर्पण करोत, आणि गाण्यात त्याची कृत्ये जाहीर करोत.
יורדי הים באניות עשי מלאכה במים רבים׃ | 23 |
२३काही जहाजातून समुद्र प्रवास करतात, आणि महासागरापार व्यवसाय करतात.
המה ראו מעשי יהוה ונפלאותיו במצולה׃ | 24 |
२४ते परमेश्वराची कृत्ये पाहतात, आणि त्याची अद्भुत कृत्ये समुद्रावर पाहतात.
ויאמר ויעמד רוח סערה ותרומם גליו׃ | 25 |
२५कारण तो आज्ञा करतो आणि वादळ उठवितो; तेव्हा समुद्र खवळतो.
יעלו שמים ירדו תהומות נפשם ברעה תתמוגג׃ | 26 |
२६लाटा आकाशापर्यंत वर पोहचतात, मग त्या खाली खोल तळाकडे जातात. मनुष्याचे धैर्य धोक्यामुळे गळून जाते.
יחוגו וינועו כשכור וכל חכמתם תתבלע׃ | 27 |
२७ते मद्याप्यासारखे डुलतात आणि झोकांड्या खातात, आणि त्यांची बुद्धी गुंग होते.
ויצעקו אל יהוה בצר להם וממצוקתיהם יוציאם׃ | 28 |
२८तेव्हा ते आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारतात, आणि तो त्यांना त्यांच्या क्लेशातून बाहेर आणून वाचवतो.
יקם סערה לדממה ויחשו גליהם׃ | 29 |
२९तो वादळ शांत करतो, आणि लाटांना स्तब्ध करतो.
וישמחו כי ישתקו וינחם אל מחוז חפצם׃ | 30 |
३०समुद्र शांत झाल्यामुळे ते आनंद करतात, तो त्यांना त्यांच्या इच्छित बंदरास आणतो.
יודו ליהוה חסדו ונפלאותיו לבני אדם׃ | 31 |
३१परमेश्वरास त्याच्या कराराची विश्वसनियता आणि त्याने मनुष्यजातीसाठी केलेल्या आश्चर्यकारक गोष्टींबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत.
וירממוהו בקהל עם ובמושב זקנים יהללוהו׃ | 32 |
३२लोकांच्या मंडळीत तो उंचविला जावो आणि वडिलांच्या सभेत त्याची स्तुती होवो.
ישם נהרות למדבר ומצאי מים לצמאון׃ | 33 |
३३तो नद्यांना रान करतो, पाण्याच्या झऱ्यांची कोरडी भूमी करतो,
ארץ פרי למלחה מרעת ישבי בה׃ | 34 |
३४आणि फलदायी जमिनीची नापीक जमिन करतो. कारण तेथील राहणाऱ्या वाईट लोकांमुळे.
ישם מדבר לאגם מים וארץ ציה למצאי מים׃ | 35 |
३५तो वाळवंटाचे पाण्याचे तळे करतो, आणि कोरडी भूमीतून पाण्याचे झरे करतो.
ויושב שם רעבים ויכוננו עיר מושב׃ | 36 |
३६तेथे भुकेल्यास वसवतो, आणि त्यामध्ये राहण्यासाठी नगर बांधतो.
ויזרעו שדות ויטעו כרמים ויעשו פרי תבואה׃ | 37 |
३७ते नगरे बांधतात त्यामध्ये शेते पेरतात, द्राक्षमळे लावतात, आणि विपुल पिके काढतात.
ויברכם וירבו מאד ובהמתם לא ימעיט׃ | 38 |
३८तो त्यास आशीर्वाद देतो आणि त्यांची खूप वाढ होते, तो त्यांच्या गुरांना कमी होऊ देत नाही.
וימעטו וישחו מעצר רעה ויגון׃ | 39 |
३९नंतर यातनामयी अरिष्ट आणि दुःख यांमुळे ते कमी होतात आणि नष्ट होतात.
שפך בוז על נדיבים ויתעם בתהו לא דרך׃ | 40 |
४०तो शत्रूंच्या अधिपतीवर अपमान ओततो, आणि त्यांना रस्ते नसलेल्या रानातून भटकायला लावतो.
וישגב אביון מעוני וישם כצאן משפחות׃ | 41 |
४१पण तो गरजवंताना क्लेशापासून सुरक्षित ठेवतो, आणि त्यांच्या कुटुंबांची कळपासारखी काळजी घेतो.
יראו ישרים וישמחו וכל עולה קפצה פיה׃ | 42 |
४२सरळ मनाचे हे पाहतात आणि आनंदी होतात, आणि सर्व दुष्ट आपले तोंड बंद करतात.
מי חכם וישמר אלה ויתבוננו חסדי יהוה׃ | 43 |
४३जो कोणी ज्ञानी आहे त्याने ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावे आणि परमेश्वराच्या कराराच्या विश्वसनीयतेच्या कृतीवर मनन करावे.