< מִשְׁלֵי 29 >
איש תוכחות מקשה ערף פתע ישבר ואין מרפא׃ | 1 |
१जर एखाद्या मनुष्यावर खूप दोष असूनही, जो आपली मान ताठ करतो, तो अचानक तुटतो आणि त्यावर काही उपाय चालत नाही.
ברבות צדיקים ישמח העם ובמשל רשע יאנח עם׃ | 2 |
२जेव्हा नीतिमानाची वाढ होते, लोक आनंदित होतात, पण जेव्हा दुर्जन अधिकार चालवतात तेव्हा लोक शोक करतात.
איש אהב חכמה ישמח אביו ורעה זונות יאבד הון׃ | 3 |
३ज्या कोणाला ज्ञानाची आवड आहे तो आपल्या पित्याला आनंदित करतो, पण जो कोणी वेश्येशी सोबत करतो तर तो आपल्या संपत्तीचा नाश करतो.
מלך במשפט יעמיד ארץ ואיש תרומות יהרסנה׃ | 4 |
४राजा न्यायाने देश दृढ करतो, पण जो कोणी लाचेची मागणी करतो तो त्याचे वाटोळे करतो.
גבר מחליק על רעהו רשת פורש על פעמיו׃ | 5 |
५जो कोणी मनुष्य आपल्या शेजाऱ्याची फाजील स्तुती करतो, तो त्याच्या पावलासाठी जाळे पसरतो.
בפשע איש רע מוקש וצדיק ירון ושמח׃ | 6 |
६दुष्ट मनुष्य आपल्या स्वतःच्या पापाने पाशात पडतो, पण नीतिमान गाणे गाऊन आनंदित होतो.
ידע צדיק דין דלים רשע לא יבין דעת׃ | 7 |
७नीतिमान गरिबांच्या वादासाठी विनंती करतो; दुर्जनाला तो समजण्याची बुद्धी नसते.
אנשי לצון יפיחו קריה וחכמים ישיבו אף׃ | 8 |
८थट्टा करणारे शहराला पेटवतात; पण सुज्ञजन क्रोधापासून दूर निघून जातात.
איש חכם נשפט את איש אויל ורגז ושחק ואין נחת׃ | 9 |
९जर सुज्ञ मनुष्याचा मूर्खाशी वाद असला तर, मुर्ख रागावला किंवा हसला तरी काही स्वस्थता नसते.
אנשי דמים ישנאו תם וישרים יבקשו נפשו׃ | 10 |
१०रक्तपिपासू सात्विकाचा द्वेष करतात, आणि सरळ मनुष्यास ठार मारण्यासाठी ते त्याचा शोध घेतात.
כל רוחו יוציא כסיל וחכם באחור ישבחנה׃ | 11 |
११मूर्ख आपल्या मनातील सारा राग प्रगट करतो, पण शहाणा मनुष्य तो आवरून धरतो आणि शांत राहतो.
משל מקשיב על דבר שקר כל משרתיו רשעים׃ | 12 |
१२जर अधिकाऱ्याने खोट्या गोष्टींकडे लक्ष दिले, तर त्याचे सगळे अधिकारी वाईट होतात.
רש ואיש תככים נפגשו מאיר עיני שניהם יהוה׃ | 13 |
१३गरीब मनुष्य आणि जुलूम करणारा या दोघांमध्ये एक गोष्ट समान आहे; परमेश्वर दोघांच्याही डोळ्यांना दृष्टी देतो.
מלך שופט באמת דלים כסאו לעד יכון׃ | 14 |
१४जर राजाने गरीबांचा न्याय सत्याने केला, तर त्याचे राजासन सर्वकाळ स्थापित होईल.
שבט ותוכחת יתן חכמה ונער משלח מביש אמו׃ | 15 |
१५छडी आणि सुबोध ज्ञान देतात, पण मोकळे सोडलेले मूल आपल्या आईला लाज आणते.
ברבות רשעים ירבה פשע וצדיקים במפלתם יראו׃ | 16 |
१६जेव्हा दुष्ट वाढतात, तेव्हा अपराध वाढतात; पण धार्मिकांना त्यांचे वतन पाहावयास मिळते.
יסר בנך ויניחך ויתן מעדנים לנפשך׃ | 17 |
१७आपल्या मुलाला शिस्त लाव आणि तो तुला विसावा देईल आणि तो तुझा जीव आनंदित करील.
באין חזון יפרע עם ושמר תורה אשרהו׃ | 18 |
१८जेथे कोठे भविष्यसूचक दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात, पण जो कोणी नियम पाळतो तो सुखी होतो.
בדברים לא יוסר עבד כי יבין ואין מענה׃ | 19 |
१९दास शब्दाने सुधारत नाही, कारण जरी त्यास समजले तरी तो प्रतिसाद देणार नाही.
חזית איש אץ בדבריו תקוה לכסיל ממנו׃ | 20 |
२०कोणी आपल्या बोलण्यात उतावळा आहे अशा मनुष्यास पाहतोस काय? तर त्याच्यापेक्षा मूर्खाविषयी अधिक आशा आहे.
מפנק מנער עבדו ואחריתו יהיה מנון׃ | 21 |
२१जर कोणी आपल्या दासास बालपणापासून लाडाने वाढवले तर त्याच्या शेवटी तो त्रासदायकच होईल.
איש אף יגרה מדון ובעל חמה רב פשע׃ | 22 |
२२रागावलेला मनुष्य संकटे आणतो; आणि क्रोधी मनुष्याकडून पुष्कळ अपराध घडतात.
גאות אדם תשפילנו ושפל רוח יתמך כבוד׃ | 23 |
२३गर्व मनुष्यास खाली आणतो, पण जो कोणी विनम्र आत्म्याचा असतो त्याचा आदर होतो.
חולק עם גנב שונא נפשו אלה ישמע ולא יגיד׃ | 24 |
२४जो कोणी चोराचा भागीदार होतो, तो स्वतःचाच शत्रू आहे; ते शपथेखाली ठेवले जातात आणि ते काहीच बोलू शकत नाही.
חרדת אדם יתן מוקש ובוטח ביהוה ישגב׃ | 25 |
२५मनुष्याची भीती पाशरूप होते, पण जो कोणी परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो सुरक्षित राहतो.
רבים מבקשים פני מושל ומיהוה משפט איש׃ | 26 |
२६पुष्कळजन अधिपतीची मर्जी संपादण्याचा शोध करतात, पण परमेश्वरच लोकांचा न्याय करतो.
תועבת צדיקים איש עול ותועבת רשע ישר דרך׃ | 27 |
२७अप्रामाणीक मनुष्याचा धार्मिकाला वीट येतो; आणि सरळमार्गी मनुष्याचा दुष्टाला वीट येतो.