< מִשְׁלֵי 26 >
כשלג בקיץ וכמטר בקציר כן לא נאוה לכסיל כבוד׃ | 1 |
१उन्हाळ्यात जसे बर्फ किंवा कापणीच्यावेळी पाऊस, त्याचप्रमाणे मूर्खाला सन्मान शोभत नाही.
כצפור לנוד כדרור לעוף כן קללת חנם לא תבא׃ | 2 |
२जशी भटकणारी चिमणी आणि उडणारी निळवी, याप्रमाणे विनाकारण दिलेला शाप कोणावरही येत नाही.
שוט לסוס מתג לחמור ושבט לגו כסילים׃ | 3 |
३घोड्याला चाबूक, गाढवाला लगाम, आणि मूर्खाच्या पाठीला काठी आहे.
אל תען כסיל כאולתו פן תשוה לו גם אתה׃ | 4 |
४मूर्खाला उत्तर देऊ नको आणि त्याच्या मूर्खपणात सामील होऊ नकोस, किंवा देशील तर तू त्यांच्यासारखाच होशील.
ענה כסיל כאולתו פן יהיה חכם בעיניו׃ | 5 |
५मूर्खाला उत्तर दे आणि त्याच्या मूर्खतेत सामील हो, नाहीतर तो आपल्या स्वतःच्या दृष्टीने शहाणा होईल.
מקצה רגלים חמס שתה שלח דברים ביד כסיל׃ | 6 |
६जो कोणी मूर्खाच्या हाती निरोप पाठवतो, तो आपले पाय कापून टाकतो आणि तो उपद्रव पितो.
דליו שקים מפסח ומשל בפי כסילים׃ | 7 |
७पांगळ्याचे पाय जसे खाली लोंबकळतात तसे मूर्खाच्या तोंडचे नीतिवचन आहे.
כצרור אבן במרגמה כן נותן לכסיל כבוד׃ | 8 |
८मूर्खाला आदर देणारा, गोफणीत दगड बांधण्याऱ्यासारखा आहे.
חוח עלה ביד שכור ומשל בפי כסילים׃ | 9 |
९मूर्खाच्या तोंडचे नीतिवचन, झिंगलेल्याच्या हातात रुतलेल्या काट्यासारखे आहे.
רב מחולל כל ושכר כסיל ושכר עברים׃ | 10 |
१०एखादा तिरंदाज प्रत्येकाला जखमी करतो, तसेच जो मूर्खाला किंवा जवळून आल्या गेल्यास मोलाने काम करायला लावतो तो तसाच आहे.
ככלב שב על קאו כסיל שונה באולתו׃ | 11 |
११जसा कुत्रा आपल्या स्वतःच्या ओकीकडे फिरतो. तसा मूर्ख आपली मूर्खता पुन्हा करतो.
ראית איש חכם בעיניו תקוה לכסיל ממנו׃ | 12 |
१२आपल्या दृष्टीने स्वतःला शहाणा समजतो असा कोणी तुझ्या पाहण्यात आहे का? त्यापेक्षा मूर्खाला अधिक आशा आहे.
אמר עצל שחל בדרך ארי בין הרחבות׃ | 13 |
१३आळशी मनुष्य म्हणतो, “रस्त्यावर सिंह आहे!” तेथे उघड्या जागेमध्ये सिंह आहे.
הדלת תסוב על צירה ועצל על מטתו׃ | 14 |
१४दार जसे बिजागरीवर फिरते, तसा आळशी मनुष्य अंथरुणावर लोळत असतो.
טמן עצל ידו בצלחת נלאה להשיבה אל פיו׃ | 15 |
१५आळशी आपला हात ताटात घालून ठेवतो, आणि तरी त्यास आपला हात तोंडापर्यंत नेण्यास शक्ती नसते.
חכם עצל בעיניו משבעה משיבי טעם׃ | 16 |
१६विवेक दृष्टी असणाऱ्या सात मनुष्यांपेक्षा आळशी मनुष्य आपल्या दृष्टीने शहाणा समजतो.
מחזיק באזני כלב עבר מתעבר על ריב לא לו׃ | 17 |
१७जो दुसऱ्यांच्या वादात पडून संतप्त होतो, तो जवळून जाणाऱ्या कुत्र्याचे कान धरुन ओढणाऱ्यासारखा आहे.
כמתלהלה הירה זקים חצים ומות׃ | 18 |
१८जो कोणी मूर्खमनुष्य जळते बाण मारतो,
כן איש רמה את רעהו ואמר הלא משחק אני׃ | 19 |
१९तो अशा मनुष्यासारखा आहे जो आपल्या एका शेजाऱ्याला फसवतो, आणि म्हणतो, मी विनोद सांगत नव्हतो काय?
באפס עצים תכבה אש ובאין נרגן ישתק מדון׃ | 20 |
२०लाकडाच्या अभावी, अग्नी विझतो. आणि जेथे कोठे गप्पाटप्पा करणारे नसतील तर भांडणे थांबतात.
פחם לגחלים ועצים לאש ואיש מדונים לחרחר ריב׃ | 21 |
२१जसे लोणारी कोळसा जळत्या कोळश्याला आणि लाकडे अग्नीला, त्याचप्रमाणे भांडण पेटवायला भांडखोर लागतो.
דברי נרגן כמתלהמים והם ירדו חדרי בטן׃ | 22 |
२२गप्पाटप्पा करणाऱ्याचे शब्द स्वादिष्ट पक्वान्नासारखे असतात. ते पोटाच्या आंतील भागापर्यंत खाली जातात.
כסף סיגים מצפה על חרש שפתים דלקים ולב רע׃ | 23 |
२३जसे वाणी कळवळ्याची आणि दुष्ट हृदय असणे, हे मातीच्या पात्राला रुप्याचा मुलामा दिल्यासारखे आहे.
בשפתו ינכר שונא ובקרבו ישית מרמה׃ | 24 |
२४जो कोणी प्रबंधाचा द्वेष करतो तो आपल्या ओठांनी आपल्या भावना लपवतो, आणि तो आपल्या अंतर्यामात कपट बाळगतो;
כי יחנן קולו אל תאמן בו כי שבע תועבות בלבו׃ | 25 |
२५तो विनम्रपणे बोलेल, पण त्याच्यावर विश्वास ठेवू नका, कारण त्याच्या हृदयात सात घृणा आहेत;
תכסה שנאה במשאון תגלה רעתו בקהל׃ | 26 |
२६तरी त्याचा द्वेष कपटाने झाकला जाईल, आणि दुष्टपणा मंडळीसमोर उघड केला जाईल.
כרה שחת בה יפל וגלל אבן אליו תשוב׃ | 27 |
२७जो कोणी खड्डा खणतो तो तिच्यात पडेल, आणि जो धोंडा लोटतो त्याच्यावर तो उलट येईल.
לשון שקר ישנא דכיו ופה חלק יעשה מדחה׃ | 28 |
२८लबाड बोलणारी जिव्हा आपण चिरडून टाकलेल्या लोकांचा द्वेष करते, आणि फाजील स्तुती करणारे तोंड नाशाला कारण होते.