< מִשְׁלֵי 22 >

נבחר שם מעשר רב מכסף ומזהב חן טוב׃ 1
चांगले नाव विपुल धनापेक्षा आणि सोने व चांदीपेक्षा प्रीतीयुक्त कृपा निवडणे उत्तम आहे.
עשיר ורש נפגשו עשה כלם יהוה׃ 2
गरीब आणि श्रीमंत यांच्यात हे सामाईक आहे, त्या सर्वांचा निर्माणकर्ता परमेश्वर आहे.
ערום ראה רעה ויסתר ופתיים עברו ונענשו׃ 3
शहाणा मनुष्य संकट येताना पाहून लपतो, पण भोळे पुढे जातात आणि त्यामुळे दुःख सोसतात.
עקב ענוה יראת יהוה עשר וכבוד וחיים׃ 4
परमेश्वराचे भय नम्रता आणि संपत्ती, मान आणि जीवन आणते.
צנים פחים בדרך עקש שומר נפשו ירחק מהם׃ 5
कुटिलाच्या मार्गात काटे आणि पाश असतात; जो कोणी आपल्या जिवाची काळजी करतो तो त्यापासून दूर राहतो.
חנך לנער על פי דרכו גם כי יזקין לא יסור ממנה׃ 6
मुलाने ज्या मार्गात चालावे त्याचे शिक्षण त्यास दे, आणि जेव्हा तो मोठा होईल तेव्हा त्या मार्गांपासून तो मागे फिरणार नाही.
עשיר ברשים ימשול ועבד לוה לאיש מלוה׃ 7
श्रीमंत गरीबावर अधिकार गाजवितो, आणि जो कोणी एक उसने घेतो तो कोणा एका उसने देणाऱ्यांचा गुलाम आहे.
זורע עולה יקצור און ושבט עברתו יכלה׃ 8
जो कोणी वाईट पेरतो तो संकटाची कापणी करतो, आणि त्याच्या क्रोधाची काठी तूटून जाईल.
טוב עין הוא יברך כי נתן מלחמו לדל׃ 9
जो उदार दृष्टीचा आहे तो आशीर्वादित होईल कारण तो आपले अन्न गरिबांबरोबर वाटून खातो.
גרש לץ ויצא מדון וישבת דין וקלון׃ 10
१०निंदकाला घालवून दे म्हणजे भांडणे मिटतात, मतभेद आणि अप्रतिष्ठा संपून जातील.
אהב טהור לב חן שפתיו רעהו מלך׃ 11
११ज्याला मनाची शुद्धता आवडते, आणि ज्याची वाणी कृपामय असते; अशांचा मित्र राजा असतो.
עיני יהוה נצרו דעת ויסלף דברי בגד׃ 12
१२परमेश्वराचे नेत्र ज्ञानाचे रक्षक आहेत, परंतु तो विश्वासघातक्यांची वचने उलथून टाकतो.
אמר עצל ארי בחוץ בתוך רחבות ארצח׃ 13
१३आळशी म्हणतो, “बाहेर रस्त्यावर सिंह आहे! मी उघड्या जागेवर ठार होईल.”
שוחה עמקה פי זרות זעום יהוה יפול שם׃ 14
१४व्यभिचारी स्त्रियांचे तोंड खोल खड्डा आहे; ज्या कोणाच्याविरूद्ध परमेश्वराचा कोप भडकतो तो त्यामध्ये पडतो.
אולת קשורה בלב נער שבט מוסר ירחיקנה ממנו׃ 15
१५बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते, पण शिक्षेची काठी ती त्याच्यापासून दूर करील.
עשק דל להרבות לו נתן לעשיר אך למחסור׃ 16
१६जो कोणी आपली संपत्ती वाढविण्यासाठी गरीबावर जुलूम करतो, किंवा जो धनवानाला भेटी देतो, तोही गरीब होईल.
הט אזנך ושמע דברי חכמים ולבך תשית לדעתי׃ 17
१७ज्ञानाची वचने ऐकून घे आणि त्याकडे लक्ष दे, आणि आपले मन माझ्या ज्ञानाकडे लाव.
כי נעים כי תשמרם בבטנך יכנו יחדו על שפתיך׃ 18
१८कारण ती जर तू आपल्या अंतर्यामात ठेवशील, आणि ती सर्व तुझ्या ओठावर तयार राहतील. तर किती बरे होईल.
להיות ביהוה מבטחך הודעתיך היום אף אתה׃ 19
१९परमेश्वरावर तुम्ही विश्वास ठेवावा, म्हणून मी तुला ती वचने आज शिकवली आहेत.
הלא כתבתי לך שלשום במועצות ודעת׃ 20
२०मी तुझ्यासाठी शिक्षण व ज्ञान ह्यातल्या तीस म्हणी लिहिल्या नाहीत काय?
להודיעך קשט אמרי אמת להשיב אמרים אמת לשלחיך׃ 21
२१या सत्याच्या वचनाचे विश्वासूपण तुला शिकवावे, ज्याने तुला पाठवले त्यास विश्वासाने उत्तरे द्यावीत म्हणून नाहीत काय?
אל תגזל דל כי דל הוא ואל תדכא עני בשער׃ 22
२२गरीब मनुष्यास लुटू नको, कारण तो गरीबच आहे, किंवा गरजवंतावर वेशीत जुलूम करू नकोस.
כי יהוה יריב ריבם וקבע את קבעיהם נפש׃ 23
२३कारण परमेश्वर त्यांचा कैवार घेईल, आणि ज्या कोणी त्यांना लुटले त्यांचे जिवन तो लुटेल.
אל תתרע את בעל אף ואת איש חמות לא תבוא׃ 24
२४जो कोणी एक व्यक्ती रागाने राज्य करतो त्याची मैत्री करू नकोस, आणि जो कोणी संतापी आहे त्याच्याबरोबर जाऊ नकोस.
פן תאלף ארחתו ולקחת מוקש לנפשך׃ 25
२५तुम्ही त्याचे मार्ग शिकाल, आणि गेलात तर तुम्ही स्वतःला जाळ्यात अडकवून घ्याल.
אל תהי בתקעי כף בערבים משאות׃ 26
२६दुसऱ्याच्या कर्जाला जे जामीन होतात, आणि हातावर हात मारणारे त्यांच्यातला तू एक होऊ नको.
אם אין לך לשלם למה יקח משכבך מתחתיך׃ 27
२७जर तुझ्याकडे कर्ज फेडण्यास काही नसले, तर त्याने तुमच्या अंगाखालून तुझे अंथरुण का काढून घ्यावे?
אל תסג גבול עולם אשר עשו אבותיך׃ 28
२८तुझ्या वडिलांनी जी प्राचीन सीमा घालून ठेवली आहे, तो दगड दूर करू नकोस.
חזית איש מהיר במלאכתו לפני מלכים יתיצב בל יתיצב לפני חשכים׃ 29
२९जो आपल्या कामात तरबेज अशा मनुष्यास तू पाहिले आहे का? तो राजासमोर उभा राहील; तो सामान्य लोकांसमोर उभा राहणार नाही.

< מִשְׁלֵי 22 >