< מִשְׁלֵי 18 >

לתאוה יבקש נפרד בכל תושיה יתגלע׃ 1
जो कोणी आपणास वेगळा करतो तो स्वतःची इच्छा पूर्ण करायला पाहतो; आणि तो सर्व स्वस्थ सुज्ञतेविरूद्ध लढतो.
לא יחפץ כסיל בתבונה כי אם בהתגלות לבו׃ 2
मूर्खाला समंजसपणात आनंद मिळत नाही, पण केवळ आपल्या मनात काय आहे हे प्रगट करण्यात त्यास आनंद आहे.
בבוא רשע בא גם בוז ועם קלון חרפה׃ 3
जेव्हा वाईट मनुष्य येतो, त्याच्याबरोबर तिरस्कार येतो, निर्भत्सना आणि लाज त्यासह येतात.
מים עמקים דברי פי איש נחל נבע מקור חכמה׃ 4
मनुष्याच्या मुखाचे शब्द खोल पाण्यासारखे आहेत; ज्ञानाचा झरा वाहणाऱ्या प्रवाहासारखे आहेत.
שאת פני רשע לא טוב להטות צדיק במשפט׃ 5
जे कोणी चांगले करतात त्यांचा न्याय विपरित करण्यासाठी, दुष्टाचा पक्ष धरणे चांगले नाही.
שפתי כסיל יבאו בריב ופיו למהלמות יקרא׃ 6
मूर्खाचे ओठ त्यास भांडणात पाडतात, आणि त्याचे मुख मारास आमंत्रण देते.
פי כסיל מחתה לו ושפתיו מוקש נפשו׃ 7
मूर्खाचा नाश त्याच्या तोंडामुळे होतो, आणि त्याचे ओठ त्यास स्वतःला पाश होतात.
דברי נרגן כמתלהמים והם ירדו חדרי בטן׃ 8
गप्पागोष्टी करणाऱ्याचे शब्द स्वादिष्ट पक्वान्नासारखे आहेत, आणि ते अगदी खोल पोटात शिरतात.
גם מתרפה במלאכתו אח הוא לבעל משחית׃ 9
जो कोणी आपल्या कामात निष्काळजी आहे तो नाश करणाऱ्याचा भाऊ आहे.
מגדל עז שם יהוה בו ירוץ צדיק ונשגב׃ 10
१०परमेश्वराचे नाव बळकट बुरुजाप्रमाणे आहे; नीतिमान त्यामध्ये धावत जातो आणि सुरक्षित राहतो.
הון עשיר קרית עזו וכחומה נשגבה במשכיתו׃ 11
११श्रीमंताची संपत्ती त्याचे बळकट नगर आहे; आणि त्याच्या कल्पनेने तो उंच भींतीसारखा आहे.
לפני שבר יגבה לב איש ולפני כבוד ענוה׃ 12
१२मनुष्याच्या नाशापूर्वी त्याचे अंतःकरण गर्विष्ठ असते, पण गौरवापूर्वी विनम्रता येते.
משיב דבר בטרם ישמע אולת היא לו וכלמה׃ 13
१३जो कोणी ऐकण्यापूर्वी उत्तर देतो, त्याचे ते करणे मूर्खपणाचे आणि लज्जास्पद असते.
רוח איש יכלכל מחלהו ורוח נכאה מי ישאנה׃ 14
१४आजारपणात मनुष्याचा आत्मा जिवंत राहतो, पण तुटलेला आत्मा कोणाच्याने सोसवेल?
לב נבון יקנה דעת ואזן חכמים תבקש דעת׃ 15
१५सुज्ञाचे मन ज्ञान प्राप्त करून घेते, आणि शहाणा ऐकून ते शोधून काढतो.
מתן אדם ירחיב לו ולפני גדלים ינחנו׃ 16
१६मनुष्याचे दान त्याच्यासाठी मार्ग उघडते, आणि महत्वाच्या मनुष्यांसमोर त्यास आणते.
צדיק הראשון בריבו יבא רעהו וחקרו׃ 17
१७जो सुरुवातीला आपली बाजू मांडतो तो बरोबर आहे असे वाटते, पण त्याचा प्रतिस्पर्धी येऊन त्यास प्रश्र विचारतो.
מדינים ישבית הגורל ובין עצומים יפריד׃ 18
१८चिठ्ठ्या टाकल्याने भांडणे मिटतात, आणि बलवान प्रतिस्पर्धी वेगळे होतात.
אח נפשע מקרית עז ומדונים כבריח ארמון׃ 19
१९दुखवलेल्या भावाची समजूत घालणे हे बळकट तटबंदी असलेले शहर जिंकण्यापेक्षा कठीण आहे. आणि भांडणे राजवाड्याच्या अडसरासारखे आहेत.
מפרי פי איש תשבע בטנו תבואת שפתיו ישבע׃ 20
२०मनुष्याचे पोट त्याच्या मुखाच्या फळाने भरेल, तो आपल्या ओठांच्या पीकाने तृप्त होईल.
מות וחיים ביד לשון ואהביה יאכל פריה׃ 21
२१जीवन किंवा मरण ही जीभेच्या अधिकारात आहेत; आणि ज्या कोणाला ती प्रिय आहे तो तिचे फळ खातो.
מצא אשה מצא טוב ויפק רצון מיהוה׃ 22
२२ज्या कोणाला पत्नी मिळते त्यास चांगली वस्तू मिळते, आणि त्यास परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो.
תחנונים ידבר רש ועשיר יענה עזות׃ 23
२३गरीब मनुष्य दयेची विनवणी करतो, पण श्रीमंत मनुष्य कठोरपणाने उत्तर देतो.
איש רעים להתרעע ויש אהב דבק מאח׃ 24
२४जो कोणी पुष्कळ मित्र करतो तो आपल्याच नाशासाठी ते करतो, परंतु एखादा असा मित्र असतो की तो आपल्या भावापेक्षाही आपणांस धरून राहतो.

< מִשְׁלֵי 18 >