< מִשְׁלֵי 16 >
לאדם מערכי לב ומיהוה מענה לשון׃ | 1 |
१मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे, पण त्याच्या जिव्हेचे उत्तर देणे परमेश्वराकडचे आहे.
כל דרכי איש זך בעיניו ותכן רוחות יהוה׃ | 2 |
२मनुष्याच्या दृष्टीने त्याचे सर्व मार्ग शुद्ध असतात, पण परमेश्वर आत्मे तोलून पाहतो.
גל אל יהוה מעשיך ויכנו מחשבתיך׃ | 3 |
३आपली कामे परमेश्वराच्या स्वाधीन करा, आणि म्हणजे तुमच्या योजना यशस्वी होतील.
כל פעל יהוה למענהו וגם רשע ליום רעה׃ | 4 |
४परमेश्वराने सर्वकाही त्याच्या उद्देशासाठी बनवलेले आहे, दुर्जनदेखील अरिष्टाच्या दिवसासाठी केलेला आहे.
תועבת יהוה כל גבה לב יד ליד לא ינקה׃ | 5 |
५प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वरास वीट आहे, जरी ते हातात हात घालून उभे राहिले, तरी त्यांना शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही.
בחסד ואמת יכפר עון וביראת יהוה סור מרע׃ | 6 |
६कराराचा प्रामाणिकपणा व विश्वसनीयता ह्यांच्या योगाने पापांचे प्रायश्चित होते, आणि परमेश्वराचे भय धरल्याने, लोक वाईटापासून वळून दूर राहतील.
ברצות יהוה דרכי איש גם אויביו ישלם אתו׃ | 7 |
७मनुष्याचे मार्ग परमेश्वरास आवडले म्हणजे, त्या मनुष्याच्या शत्रूलाही त्याच्याशी समेट करण्यास भाग पाडतो.
טוב מעט בצדקה מרב תבואות בלא משפט׃ | 8 |
८अन्यायाने मिळवलेल्या मोठ्या मिळकतीपेक्षा, न्यायाने कमावलेले थोडेसे चांगले आहे.
לב אדם יחשב דרכו ויהוה יכין צעדו׃ | 9 |
९मनुष्याचे मन त्याच्या मार्गाची योजना करते, पण परमेश्वर त्याच्या पावलांना वाट दाखवतो.
קסם על שפתי מלך במשפט לא ימעל פיו׃ | 10 |
१०दैवी निर्णय राजाच्या ओठात असतात, न्याय करताना त्याच्या मुखाने कपटाने बोलू नये.
פלס ומאזני משפט ליהוה מעשהו כל אבני כיס׃ | 11 |
११परमेश्वराकडून प्रामाणिक मोजमाप येते; पिशवीतील सर्व वजने त्याचे कार्य आहे.
תועבת מלכים עשות רשע כי בצדקה יכון כסא׃ | 12 |
१२जेव्हा राजा वाईट गोष्टी करतो, त्या गोष्टी त्यास तिरस्कारणीय आहेत, कारण राजासन नीतिमत्तेनेच स्थापित होते.
רצון מלכים שפתי צדק ודבר ישרים יאהב׃ | 13 |
१३नीतिमत्तेने बोलणाऱ्या ओठाने राजाला आनंद होतो, आणि जे कोणी सरळ बोलतात ते त्यास प्रिय आहेत.
חמת מלך מלאכי מות ואיש חכם יכפרנה׃ | 14 |
१४राजाचा क्रोध मृत्यू दूतांसारखा आहे. पण सुज्ञ मनुष्य त्याचा राग शांत करण्याचा प्रयत्न करतो.
באור פני מלך חיים ורצונו כעב מלקוש׃ | 15 |
१५राजाच्या मुखतेजात जीवन आहे, आणि त्याचा अनुग्रह शेवटल्या पावसाच्या मेघासारखा आहे.
קנה חכמה מה טוב מחרוץ וקנות בינה נבחר מכסף׃ | 16 |
१६सोन्यापेक्षा ज्ञान प्राप्त करून घेणे किती तरी उत्तम आहे. रुप्यापेक्षा समजुतदारपणा निवडून घ्यावा.
מסלת ישרים סור מרע שמר נפשו נצר דרכו׃ | 17 |
१७दुष्कर्मापासून वळणे हा सरळांचा राजमार्ग आहे, जो आपल्या मार्गाकडे लक्ष ठेवतो तो आपला जीव राखतो.
לפני שבר גאון ולפני כשלון גבה רוח׃ | 18 |
१८नाशापूर्वी गर्व येतो, आणि मनाचा ताठा अधःपाताचे मूळ आहे.
טוב שפל רוח את עניים מחלק שלל את גאים׃ | 19 |
१९गर्विष्ठांबरोबर राहून लूट वाटून घेण्यापेक्षा दीनांबरोबर विनम्र असणे चांगले.
משכיל על דבר ימצא טוב ובוטח ביהוה אשריו׃ | 20 |
२०जो कोणी जे काही चांगले आहे ते शोधतो, त्यास शिकवीले त्याचे निरीक्षण करतो, आणि जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो आनंदीत होतो.
לחכם לב יקרא נבון ומתק שפתים יסיף לקח׃ | 21 |
२१जो मनाचा सुज्ञ त्यास समंजस म्हणतात, आणि मधुर वाणीने शिकवण्यची क्षमता वाढते.
מקור חיים שכל בעליו ומוסר אולים אולת׃ | 22 |
२२ज्यांच्याकडे सुज्ञान आहे त्यास ती जीवनाचा झरा आहे, पण मूर्खाचे मूर्खपण त्याची शिक्षा आहे.
לב חכם ישכיל פיהו ועל שפתיו יסיף לקח׃ | 23 |
२३सुज्ञ मनुष्याच्या हृदयापासून त्याच्या मुखास शिक्षण मिळते; आणि त्याच्या वाणीत विद्येची भर घालते.
צוף דבש אמרי נעם מתוק לנפש ומרפא לעצם׃ | 24 |
२४आनंदी शब्द मधाचे पोळ अशी आहेत, ती जिवाला गोड व हाडांस आरोग्य आहेत.
יש דרך ישר לפני איש ואחריתה דרכי מות׃ | 25 |
२५मनुष्यास एक मार्ग सरळ दिसतो, पण त्याचा शेवट मृत्यूमार्गाकडे आहे.
נפש עמל עמלה לו כי אכף עליו פיהו׃ | 26 |
२६कामगाराची भूक त्याच्यासाठी काम करते; त्याची भूक त्यास ते करायला लावते.
איש בליעל כרה רעה ועל שפתיו כאש צרבת׃ | 27 |
२७नालायक मनुष्य खोड्या उकरून काढतो, आणि त्याची वाणी होरपळणाऱ्या अग्नीसारखी आहे.
איש תהפכות ישלח מדון ונרגן מפריד אלוף׃ | 28 |
२८कुटिल मनुष्य संघर्ष निर्माण करतो, आणि निंदा करणाऱ्या जवळच्या मित्रांना वेगळे करतो.
איש חמס יפתה רעהו והוליכו בדרך לא טוב׃ | 29 |
२९जुलमी मनुष्य आपल्या शेजाऱ्याशी लबाड बोलतो, आणि जो मार्ग चांगला नाही अशात त्यास नेतो.
עצה עיניו לחשב תהפכות קרץ שפתיו כלה רעה׃ | 30 |
३०जो कोणी मनुष्य कुटिल गोष्टीच्या योजणेला डोळे मिचकावतो; जो आपले ओठ आवळून धरतो तो दुष्कर्म घडून आणतो.
עטרת תפארת שיבה בדרך צדקה תמצא׃ | 31 |
३१पिकलेले केस वैभवाचा मुकुट आहे; नीतिमत्तेच्या मार्गाने चालण्याने तो प्राप्त होतो.
טוב ארך אפים מגבור ומשל ברוחו מלכד עיר׃ | 32 |
३२ज्याला लवकर राग येत नाही तो योद्धापेक्षा, आणि जो आत्म्यावर अधिकार चालवतो तो नगर जिंकऱ्यापेक्षा उत्तम आहे.
בחיק יוטל את הגורל ומיהוה כל משפטו׃ | 33 |
३३पदरात चिठ्ठ्या टाकतात, पण त्यांचा निर्णय सर्वस्वी परमेश्वराकडून आहे.